राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, July 31, 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विश्वातील महान विद्वान प्रा.डॉ. सुभाष वाघमारे


शाहू बोर्डिंग येथे डॉ. बाळासाहेब
आंबेडकर भेट दिन साजरा

- उद्धव फंगाळ - मेहकर -/ वार्ता -
सातारा - "ज्या अस्पृश्य मुलाला ओंजळीतून पाणी प्यावे लागत होते, कोणाला स्पर्श करता येत नव्हता असा मुलगा आपल्या विद्वत्तेच्या जोरावर परदेशात जाऊन कित्येक पदव्या मिळवतो, बॅरिस्टर होतो ही गोष्ट आजच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वातील एक महान विद्वान पुरुष होते", असे मत प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते सातारा येथील शाहू बोर्डिंग मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेट दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दि. २९ जुलै १९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू बोर्डिंगला भेट दिली होती. वसतिगृहात स्पृश्य - अस्पृश्य मांडीला मांडीला मांडी लावून बसतात, जेवतात, शिक्षण घेतात हे दृश्य पाहून डॉ. आंबेडकर प्रभावित झाले होते. 
आपल्या भेटीत त्यांनी वसतिगृहास वीस रुपयांची देणगीही दिली होती. डॉ. आंबेडकर यांनी शाहू बोर्डिंगचा उल्लेख 'अद्वितीय संस्था' असा केला आणि शेरे बुकात त्यांनी 'देशाच्या हिताची ज्यांना काळजी आहे त्यांनी शाहू बोर्डिंग ला पाठींबा द्या' असे लिहिले. छ. शिवाजी कॉलेज, रा. ब. काळे शाळा व शाहू बोर्डिंग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेत असतानाच्या छायाचित्राची दुर्मिळ प्रतिमा शाहू बोर्डिंगला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. हसत खेळत सहजपणे त्यांनी मुलांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडला. कर्मवीर भाऊराव पाटील तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे पाहून प्रा.वाघमारे चकित झाले. ऐतिहासिक घटनेवरील प्रश्नांची उत्तरे देताना मुलांमध्ये चढाओढ होती कु. दिशा शेलार, पूर्वी जांभळे, सोहम बर्गे, गणेश गावडे, मृगेंद्र पवार या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी प्रा. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना खाऊसाठी एक हजार रुपयांची देणगी दिली. 
 कार्यक्रमास शाहू बोर्डिंग चे अधीक्षक प्रशांत गुजरे, मुख्याध्यापक अमोल कोळेकर, प्रा.सरगडे, श्री. विजय माने, सौ.शीतल सुतार, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================






सदासर्वदा नेहमीच सर्वांच्या कामी येणारे !अन् गरजवंतांच्या हाकेला धावून जाणारे !!ह.सैलानीबाबा दर्गाह चे मुजावरजुबेर बिनसाद बाबा यांचे निधन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील हजरत सैलानी बाबा दरबार ट्रस्ट चे विश्वस्त आणी दर्गाह चे प्रमुख मुजावर जुबेर अवद बिनसाद (उर्फ सैलानी बाबा) यांचे बुधवार दि.३१ / ०७/ २०२४ रोजी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय आवघे ३४ वर्ष होते.
तिरंगा न्यूज,बिनदास न्यूज चे संपादक असलम बिनसाद, मोटार वाहन व्यावसायिक सलिम बिनसाद,अब्बू बॅग हाऊस चे संचालक कलीम बिनसाद यांचे ते बंधू होत.
सदैव हस्तमुख स्वभाव,कधी कोणाशी कोणतेच वाद - विवाद नाही, नेहमी कोणत्याही गरजवंतांच्या हाकेला धावून जाणारे आणी सर्वांच्या कामी येणारे असे अजातशत्रू व्यक्तमत्व असलेले जुबेरभाईंनी 
हजरत सैलानी बाबा दरबार ट्रस्ट च्या माध्यमातून आजवर अनेको सामाजिक/ शैक्षणिक / अध्यात्मिक अशी विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविली आहेत, सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अशा समाजसेवकाचे अचानक निधन झाल्याने श्रीरामपूर शहराच्या सामाजिक क्षेत्रासह सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुपारी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा हजरत सैलानी बाबा दर्गाह जवळ, वॉर्ड क्र. ३, श्रीरामपूर या त्यांच्या राहत्या निवासस्थापासून निघून वॉर्ड क्र.१ कॉलेज समोरील मुस्लिम कब्रस्तान या ठिकाणी शहर ए काझी मौलाना अकबरअली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज ए जनाजा पठण करण्यात येवून सायं ५.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार /दफनविधी करण्यात आले.
त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,५ भावंडे असा परिवार आहे.

===== ===== =====
समता न्यूज सर्व्हिस तर्फे भावपुर्ण आदरंजली - शोकाकुल... 💐💐💐❤️✅🇮🇳... +९१९५६११७४१११
===== ===== =====
...राज प्रसारित सोशल मीडिया ग्रुप तर्फे आदर पूर्वक भाव पूर्ण श्रद्धांजली - शोकाकुल...💐💐💐❤️✅🇮🇳... ±९१९८२३७८६३६३
===== ===== =====


कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे बोधवाक्य आता ‘अत्त दीप भव’



बोधवाक्य सूचक ‘प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचा विद्यार्थी मेळाव्यात सन्मान

- सातारा -  प्रतिनिधि -/ वार्ता -
भारतीय’ या कविता संग्रहास अनेक पुरस्कार मिळाले आहेत.कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने त्यांनी गावी समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्था सुरु करून अनेक विद्यार्थ्यांचे हिताची कामे केली आहेत. माजी विद्यार्थी मेळाव्यात सन्मान केल्याबद्दल अनेकांनी त्यांना भेटून अभिनंदन केले. 
वृत्त प्रतिनिधीनी प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांना ‘अत्त दीप भव’ या बोधवाक्याचा संदर्भ विचारला असता वाघमारे म्हणाले की ‘ बुद्धविचार भौतिक जगाचा विचार करतो. जन्म ते मृत्यू या काळातील जीवन कसे जगावे या बाबत मध्यम मार्ग बुद्धांनी सांगितला. यथार्थ ज्ञान मिळवणे ,विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन ,पंचशील तत्वांचा उद्दात्त विचार,मनाची एकाग्रता, प्रज्ञा म्हणजे विवेक ,अनित्यबोध, सकारात्मक दृष्टीकोन , श्रमाला महत्व ,अर्थ विचार , मध्यम मार्ग ,सम्यक आजीविका, कुशल कर्मे करण्यासाठीची प्रेरणा, व्यापक दृष्टीकोन .मनुष्याचा उत्कर्ष करण्याचा विचार , शिक्षणातील करुणाशीलता, सदाचाराचे पालन,समता, बंधुता तत्वाचा प्रसार, बहुजन हिताय ,बहुजन सुखाय हा भवतु सब्ब मंगलम चा विचार ‘अत्त दीप भव’ संकल्पनेत अध्याहत असल्याने हे वाक्य ‘स्वतःच स्वतःचा दीप हो’ असा संदेश देते.आत्मनिर्भर व सदाचारी उन्नत जीवन जगण्याची प्रेरणा यातून मिळते. या बोधवाक्याचा शोध घ्यायला जो जाईल तो शीलवान,प्रज्ञावान होईल. जगण्याची सार्थकता काय याचे मार्गदर्शन या बोधवाक्यात आहे. विद्यापीठाने हे बोधवाक्य स्वीकारले हीच देशातील आणि जगातील अतिशय महत्वाची घटना आहे. द्रष्टेपणाने घेतलेला या निर्णयाबद्दल सर्वांनी विद्यापीठाचे कृतद्न्य असले पाहिजे असे ते म्हणाले. कर्मवीर स्वतः ‘अत्त दीप भव’ म्हणजे स्वयंदीप झाले. बहुजन हिताय असे शिक्षणाचे उत्तुंग कार्य त्यांनी केले आणि विद्यार्थ्यांना त्यांनी स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग दाखवला त्यांचे जीवन मध्यम मार्गी होते. ते दीपस्तंभ आहेत. हे बोधवाक्य सर्वकाळ जगाला प्रेरणादायी आहे असेही ते म्हणाले. 

*फोटो ओळ/कॅप्शन बॉक्स*
 सातारा - छत्रपती शिवाजी कॉलेजच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचा सत्कार करताना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी , डावीकडून सहसचिव बी.एन. पवार ,कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील ,सचिव विकास देशमुख व प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे आदि मान्यवर.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +91 9561174111
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



ह.सैलानीबाबा दर्गाह चे मुजावर जुबेर बिनसाद बाबा यांचे निधन


- शौकत भाई - शेख - / वार्ता 
श्रीरामपूर - येथील हजरत सैलानी बाबा दरबार ट्रस्ट चे विश्वस्त आणी दर्गाह चे प्रमुख मुजावर जुबेर अवद बिनसाद (उर्फ सैलानी बाबा) यांचे आज पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय आवघे ३४ वर्ष होते.
तिरंगा न्यूज,बिनदास न्यूज चे संपादक असलम बिनसाद, मोटार वाहन व्यावसायिक सलिम बिनसाद, अब्बू बॅग हाऊस चे कलीम बिनसाद यांचे ते बंधू होत.
हजरत सैलानी बाबा दरबार ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेको सामाजिक/ शैक्षणिक / अध्यात्मिक अशी अनेक विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविली आहेत, सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अशा एका समाजसेवकाचे अचानक निधन झाल्याने श्रीरामपूर शहराच्या सामाजिक क्षेत्रासह सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांची अंत्ययात्रा हजरत सैलानी बाबा दर्गाह जवळ, वॉर्ड क्र. ३, श्रीरामपूर याठिकाणाहून आज ( दि.३१ जुलै २०२४ रोजी) दुपारी ४ वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थापासून निघणार असून वॉर्ड क्र.१ कॉलेज समोरील मुस्लिम कब्रस्तान या ठिकाणी त्यांचा दफनविधी होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,५ भावंडे असा परिवार आहे.

=====    =====    =====
समता न्यूज सर्व्हिस तर्फे भावपुर्ण आदरंजली - शोकाकुल... 💐💐💐❤️✅🇮🇳... +९१९५६११७४१११
=====    =====    =====
...राज प्रसारित सोशल मीडिया ग्रुप तर्फे आदर पूर्वक भाव पूर्ण श्रद्धांजली - शोकाकुल...💐💐💐❤️✅🇮🇳... ±९१९८२३७८६३६३
=====    =====    =====

Monday, July 29, 2024

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खरा इतिहास घडवला - चंद्रकात दळवी


रयतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी तन 
मन धनाने रयतबरोबर राहिले पाहिजे 

उद्धव फंगाळ/ मेहकर
- सातारा - प्रतिनिधी - वार्ता -
दिनांक २७ : आम्ही आज छत्रपती शिवाजी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्थापनेपासून म्हणजे १९४७ पासून डेटा गोळा करत आहोत. जनरल रजिस्टरच्या आधारे आपण माहितीचे डीजीटायशेन करीत आहोत. जसे आम्ही महाराष्ट्रात प्रथम ७,१२ चे डीजीटायजेशन केले तसेच रयत शिक्षण संस्थेतल्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचे माहितीचे डीजीटायजेशन करून कनेक्शन जोडण्याचे काम आम्ही करीत आहोत. रयतचे अनेक शाखेतले विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही कनेक्ट करीत आहोत. त्या कामाचा प्रयोग म्हणून रयतच्या छत्रपती शिवाजी कॉलेज पासून आम्ही सुरुवात करीत आहोत. छत्रपती शिवाजी कॉलेजमुळे उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात मुले शिकली.अनेक उंच माणसे कॉलेजने घडविली. लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉ. पतंगरावजी कदम यांच्यासारखी मोठी माणसे येथे घडली आहेत. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये वलयांकित माणसांची यादी मोठी आहे. खरोखर छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात इतिहास घडवला आहे’ असे विचार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले .ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी संघ व कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलत होते.या वेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के,रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, माध्यमिक विभागाचे सहसचिव मा.बंडू पवार, प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी विद्यार्थी संघातील कार्यकारिणी सदस्य प्राचार्य आर.के.शिंदे, प्राचार्य शहाजी डोंगरे ,प्रा.एम.एस शिंदे ,श्री. वाघमारे, प्रा.प्रल्हाद गायकवाड, प्राचार्य सांगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
        रयत शिक्षण संस्था एक मोठा परिवार आहे.या परिवारातील विद्यार्थ्यांचे कनेक्शन निर्माण करण्याची योजना मांडताना ते पुढे म्हणाले की’रयतच्या प्रत्येक तालुका आणि गावात शिकलेली मुले यांच्याशी आम्ही संपर्क करणार आहोत. रयतच्या अनेक मुलांनी देशासाठी योगदान दिले आहे. जे विद्यार्थी शिकून बाहेर पडले त्या सर्वाना जोडून घ्यायचे आहे. आज प्रत्येक कार्यालयाच्या ठिकाणी रयतचे विद्यार्थी मला दिसतात. रयत मधून जे जे मोठे झाले त्या सर्वाना आम्ही भेटणार आहोत. संस्था लोकांच्या सहभागावर उभी राहिलेली असते ,म्हणून लोकांच्या जवळ आपण गेले पाहिजे. कर्मवीर आणि रयत माउली यांच्या पद पथावर आम्ही चालणार आहोत. ७५२ शाखेतल्या सर्व विद्यार्थ्यांना जोडणार.
जगात अनेक मोठी विद्यापीठे आहेत, ती विद्यापीठे माजी विद्यार्थी चालवतात. रयतचे सर्व विद्यार्थी जोडले तर केवढी मोठी शक्ती निर्माण होईल. रयतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी तन मन धनाने रयतबरोबर राहिले पाहिजे असे ते म्हणाले.

      डॉ.अनिल पाटील म्हणाले ‘कर्मवीर अण्णा शाहू बोर्डिंग मध्ये बसून अनेक स्वप्ने पाहत ‘ग्रेट शिवाजी महाविद्यालय काढण्याचे त्यांचे स्वप्न होते. १९४४ ला एका मुलाच्या लग्नासाठी कर्मवीर मुंबईला गेले तिथे हार्ट अटक आल्याने ते के इ. एम ला होते. तिथे विद्यार्थ्यांच्या साठी कॉलेज काढणार हे ठरवले . डी.पी. भोसले यांनी सुरवातीस ५००० रुपये दिले. गिरणी कामगारांनी मोठे आर्थिक सहकार्य केले. मुंबई विद्यापीठाचा अर्ज भरला, अण्णांना सायन्स कॉलेज काढायचे होते, पण वर्ल्ड वार सुरु झाले ,त्यामुळे साधने मिळाली नाहीत .म्हणून मग छत्रपती शिवाजी कॉलेज काढले. मालोजीराजे यांनी १९३९ ला जी जमीन दिली , तीच पुढे १९४५ ला देणगी दिली. फलटण निवास ही वास्तू दिली. ५००० रुपये दिले . कर्नल ग्रांड डफ यांनी याच कॉलेजमध्ये मराठ्यांचा इतिहास लिहिला,अण्णांनी शिवाजी कॉलेजसाठी मोठी माणसे निवडली. मोफत आणि निवासी कॉलेज अण्णांनी सुरु केले. कर्मवीरांच्या वर विश्वास ठेवून छत्रपती शिवाजी कॉलेजला मान्यता दिली. १७ मुलावर कॉलेज सुरु झाले. मोफत आणि निवासी विद्यार्थी असल्याने ४ वर्षात सव्वा दोन लाख तोटा कॉलेजला झाला. मॅथ्यू यांनी कमवा आणि शिका ही योजना सुरु केली. हळूहळू मुले वाढली .त्यामुळे जागा नाही म्हणून माहुलीतील वाड्यात अण्णांनी सोय केली. कर्मवीर अण्णा केवळ गरीब विद्यार्थ्यांची काळजी घेत नव्हते त्यांच्या आई वडिलाना देखील सांभाळत. अण्णांच्या वेळी केवळ उच्च शिक्षण मिळावे ही अपेक्षा होती. मी सुद्धा याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. गारंबीचा बापू आम्ही शिकत होतो. अनेक आव्हाने कॉलेजने पेलली.विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले होते की, जगात तुमच्यासारखा जमिनीवरचा काम करणारा जबरा गडी मी पाहिला नाही. या कोलेजला मोरारजी देसाई न्यायमूर्ती गजेंद्रगडकर येऊन गेले. जगन्नाथ भोसले, बाळासाहेब देसाई ,क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या हस्ते शिवाजी कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. आज जागतिकीकरणात जग बदलले आहे. या काळात आर्ट कॉलेजचे स्थान काय असणार ? छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये एम.पी.एस .सी आपण सुरु केले .आज ७५० इतके अधिकारी झाले. आज रयतला सर्वांचे सहकार्य आहे. अधिकारी मुले सहकार्य करत आहेत,रयत एक कुटुंब आहे. आज नोकऱ्या कमी आणि अर्ज जास्त झाले आहेत .आज विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळणार नसेल तर शिक्षणावरचा विश्वास कसा राहील ? पुन्हा पुन्हा परीक्षा घेतल्या जातात. आज ७५ टक्के इंजिनियर यांना कोणी नोकरी देऊ शकत नाही , स्वीपरला २४००० आणि इंजिनियरला १५००० असा पगार असेल तर शिक्षण घेऊन काय मिळाले ? नवीन शैक्षणिक धोरण राबविणारी पहिली कोणती संस्था असेल तर ती रयत आहे. भाषांतर ,पत्रकारिता,अनुवाद ,मिडिया ,सायबर सेक्युरिटी असू दे सर्व आधुनिक गोष्टी तुम्हालाच शिकाव्याच लागतील. कमीत कमी पाच कौशल्ये घेऊन कॉलेजमधून घ्या .चांगले जगता येईल. खाजगीकरण होत असल्याने शासन जागा भरेल हे सांगता येत नाही. क्वालिटीचे शिक्षण ,व्यवसाय या गोष्टी कालानुरूप विद्यार्थ्यांनी घ्याव्यात .जग बदलते आहे त्या नुसार फक्त रयत बदलते आहे. शिकण्याच्या पद्धती बदल .शिक्षणात ४० टक्के प्रात्यक्षिक असायला पाहिजे. मल्टी स्कील आले पाहिजे . आय.टी .यायला पाहिजे. बँकिंग क्षेत्रातल्या नोकरी पुढे असतील .इग्लिश कम्युनिकेशन करायला पाहिजे, जी गरज निर्माण होईल त्या प्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण घेतले पाहिजे .३५ मार्क पाडण्याचे दिवस गेले. रयतची नाळ टिकवा .आच असली पाहिजे .आमची रयत शिक्षण संस्था ,महान शिक्षण संस्था आहे.रयतचे कल्चर असेल तर संस्था टिकेल. परदेशी विद्यापीठे येत आहेत. संस्था ,कॉलेजने बदलले पाहिजे . तुमच्याकडील जे बेस्ट असेल ते रयतला द्या असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 
     मेळाव्याच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करण्यात आली . प्रा.डॉ. अभिमान निमसे यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी संघातर्फे आणि कॉलेजने आयोजित केलेल्या महत्वाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. डॉ.रामराजे देशमुख यांनी कमवा आणि शिका योजनेचे अहवाल वाचन केले. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजनाचा हेतू सांगून मा. चंद्रकात दळवी यांचा परिचय करून दिला या कार्यक्रमात प्रा.डॉ. अनिलकुमार वावरे लिखित’ इकोनोमिकस ऑफ ॲग्रीकल्चर ॲंड डेव्हलपमेंट’ या संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य कॉलेजचे माजी विद्यार्थी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी सुचवले व विद्यापीठाने ते मान्य करून त्यांना अभिनंदन पत्र दिले त्याबद्दल माजी विद्यार्थी संघ व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकात दळवी यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांच्या कार्याबद्दल माजी विद्यार्थी संघातर्फे सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी मधुकर शेंबडे यांच्या सुरक्षित वाहतूक मित्र या ग्रंथाची भेट सर्वाना देण्यात आली. ‘या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप किर्दत यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. डॉ.अनिलकुमार वावरे यांनी मानले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी ,प्राध्यापक मोठ्या संख्येने हजर होते.

==================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

रेड क्रॉस दुर्गम भागात गरजूंना सेवा देणार - प्रांताधिकारी किरण सावंत पाटील


- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
जगात शांतता व सुरक्षितता, नैसर्गिक व मानव निर्मित संकट, आपत्ती मध्ये रेड क्रॉस जीवाची पर्वा न करता आजपर्यंत काम करत आल्याचं इतिहास आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा रेड क्रॉस सोसायटी विविध समाजोपयोगी उपक्रम घेवून तळागाळातील जनतेपर्यंत सेवा देण्याचे कार्य करत आहे. पुढील काळात दुर्गम भागात गरजूंना रेड क्रॉस सेवा देणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले
           इंडियन रेड क्रॉस सोसायटी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व तालुक्यातील ग्रामपंचायत वडाळा महादेव यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीर उद्घाटन किरण सावंत यांचे हस्ते झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
         प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार श्री मिलिंदकुमार वाघ, सरपंच वैशाली पवार, उपसरपंच उषा जगताप, उत्तम पवार,कृष्णा पवार, कैलास पवार,सचिन पवार, अविनाश पवार,भरत पवार, सचिन जगताप,विजय उघडे, सुजित राठोड, दादा झिंज, विजय राऊत, संजय अनारसे , अशोक होळकर , सुरेश पवार , प्रदीप वाघ , नाना भोंडगे, दीपक खेमनर, अशोक गायकवाड, वेडू पाटील कासार आदी मान्यवर उपस्थित होते तर वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मोहन शिंदे तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. अनुराधा अनाप, डॉ. प्रीती वाडेकर, राऊत एस बी, सत्यम पवार, मयूर पठारे, खडके दादा, अमोल गमे, सावदादा, सौ लगे एस एस, पवार कसार मुक्ता, कासार रूपाली, भोंडगे सीमा आदी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधांचे वाटप केले. यावेळी रेड क्रॉसचे आजीव सभासद गणेश थोरात यांचे वतीने खोकल्याचे औषधे मोफत वाटण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रेड क्रॉसचे सचिव श्री सुनील साळवे, पोपटराव शेळके, प्रवीण साळवे, सचिन चंदन, ज्ञानदेव माळी, बाळासाहेब कासार, विश्वास भोसले, श्रावण भोसले, सुरेश वाघुले, गणेश थोरात पुष्पाताई शिंदे निर्मला लांडगेआदी मान्यवर उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर + 919561174111
-----------------------------------------------
=================================

महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


वृक्षारोपण - हा महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचा स्तूत्य उपक्रम - शेख

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने श्रीरामपूर येथील वॉर्ड क्रं.१ खबडी परिसरातील ख्रिश्चन कब्रस्तानमध्ये समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर प्रकाश भालेराव, डि पॉल शाळेचे व्यवस्थापक फादर फ्रॅंको,पास्टर विजय खाजेकर पास्टर अण्णासाहेब अमोलिक, एडवोकेट मंगला दुशिंग, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, रवींद्र लोंढे, सुरेश ठुबे, निशिकांत पंडित, विशाल पंडित,प्रल्हाद अमोलिक,लेविन भोसले आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
             या प्रसंगी शौकतभाई शेख म्हणाले की, आजमितीस वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची नितांत गरज आहे, कोरोना काळात आपल्याला जो कटु प्रसंगाचा सामना करावा लागला तो प्रामुख्याने ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे, तथा वृक्ष हे ऑक्सिजन निर्मितीचे काम करतात तसेच वृक्षांमुळे पाऊसही अधिक प्रमाणात पडतो,पावसामुळे सर्वत्र सुजलाम सुफलाम होते. याकरीता वृक्ष लागवड आणी वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे समजून प्रत्येकाने वृक्ष लागवडी कामी पुढे येत वृक्ष संवर्धन ही मोठी चळवळ निर्माण झाली पाहिजे पाहिजे असे ते म्हणाले.तसेच यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
               
पुढे बोलताना श्री.शेख म्हणाले की, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने आज होत असलेला वृक्षरोपणाचा कार्यक्रम खुपच स्तूतीजन्य आहे,कारण आपली जी काही आजची धन - संपदा प्रोपर्टीज आहे ती उद्या कदाचित नसणार मात्र आम्ही लावलेली झाडे (वृक्ष) ही आम्ही गेल्यानंतरही आमच्या येणाऱ्या भावी पिढीस खुपच फायद्याची तथा फलदायी ठरणार असल्याने आम्ही आज आहोत, उद्या राहू न राहू मात्र वृक्ष संवर्धनाच्या निमित्ताने येणाऱ्या भावी पिढीसाठी नक्कीच काहीतरी चांगलं सोडून जावू असेही ते म्हणाले.

यावेळी ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे, संतोष दिवे, प्रमोद शिंदे,अंतोन दुशिंग, खंडागळे गुरुजी, प्रतिमा पंडित,जोसेफ खंडागळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे विश्वस्त अविनाश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी केले होते.शेवटी दिपक कदम यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
आपला - शौकतभाई शेख ✍️✅🇮🇳...
समता फाऊंडेशन, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Wednesday, July 24, 2024

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापिठात कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न


छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये
९० कवींनी सादर केल्या कविता
=================================

उदघोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
 संकल्पनेचे अनेकांनी केले कौतुक
=================================

- उद्धव फंगाळ - मेहकर -/ समाचार 
सातारा - येथील येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा वर्धापन दिन उत्सव निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेजचा भाषा विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील माझं कवितांचं गाव जकातवाडी हा समुह या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने‘ उदघोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ या संकल्पनेवर आधारित कवी संमेलन शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील बॅरिस्टर पी.जी. पाटील सभागृहात नुकतेच संपन्न झाले. प्रारंभी उद्घाटन समारंभात माझा कवितांचं गाव जकातवाडी या समूहाचे अध्यक्ष प्रल्हाद पार्टे म्हणाले की ‘ ही कर्मवीरांची भूमी आहे. आपण आपली कवितेची विचारधारा सर्वत्र पोचवली पाहिजे.आपल्या कविता जनमानसात जायला हव्यात. महाविद्यालयाने समाजाकडे पोचायला हवे. आपण केवळ आनंदासाठी कविता करत नाही. हिंसा नको,कर्मकांड नको, माणसातील माणुसकी मला पाहिजे हा ध्यास आपण घेतलेला आहे. आपल्या कविता जनमानसात पोचायला पाहिजेत. कविता पोचली तर कवी पोचणार आहे. शिवाजी कॉलेजमधून प्रेरणा घेऊन कवितेचं गाव आपण पुढे न्यायचे आहे .असे ते म्हणाले.
यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापिठाचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अनिल वावरे तसेच आंतरविद्या शाखा विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.रघुनाथ साळुंखे, प्रा. डॉ.सुभाष वाघमारे ,प्रा. डॉ. सविता मेनकुदळे, प्रा.डॉ. रोशनआरा शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
            शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.भरत जाधव म्हणाले,‘ मी ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. कर्मवीरांची दृष्टी खूप महत्वाची होती. आपण खरेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत आहोत का,हा प्रश्न आहे. जुन्या नव्याचां संगम या कवी संमेलनात होत आहे. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी अनेक कार्यक्रम घेत प्रोत्साहन दिले आहे. कुलकर्णी मदम मला सर्वत्र कार्यक्रमात दिसतात. नखावर लावायची शाई तेवढीच आमची लोकशाही हे फ.मु.शिंदे यांनी सांगितले आहे. समाजामध्ये विध्वंस घडतो तेंव्हा साहित्यिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून हा विध्वंस थांबवला पाहिजे. समोरच्या माणसाच्या ह्दयात कविता पोचली पाहिजे . कवितेचे प्रकार समजून घेतले पाहिजे, या पुढच्या काळात कविता कशी लिहायची याची कार्यशाळा आपण घेणार आहोत. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाची संशोधन पत्रिका जगभरात पोचत आहे. साहित्यिक फक्त बोलत नाहीत तर ते करून दाखवतात. तुमच्या प्रत्येक शब्दाला कर्तुत्वाचे मोल यावे असेही ते म्हणाले.             
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले की, मला सतत तुमच्या सोबत रहावे वाटे. कवी कल्पनेच्या सहाय्याने नवनव्या गोष्टी सुचवत असतो. हे कवी संमेलन सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता बार्शी, धाराशिव येथून कवी आले आहेत. कवी समाजात विधायक दिशा देत असतात. उद्घोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय अतिशय समर्पक असून सदर काळात या चिंतनाची गरज आहे. शिक्षण व्यवस्थेची आणि समाजाची नाळ तुटत चाललीय ती जोडायचे काम छत्रपती शिवाजी कॉलेज करीत आहे. २७ ला आम्ही माजी विद्यार्थी मेळावा घेत आहोत .तसेच ८ व ९ ऑगस्टला माजी सैनिक मेळावा ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. उद्योजक मेळावा घेत आहोत. प्रत्येक गावात आम्ही वृक्षारोपण घेत आहोत. डोळेगाव ला आम्ही ५०० - ५५० झाडे लावली आहेत. मला कवितेचे गाव जकातवाडी समुहाचे कौतुक करावे वाटते .कवितेच्या प्रसारासाठी ते मोठे योगदान देत आहेत. तसेच दिवाळी नंतर अनेक कवीना बोलवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
                  या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले. माझं कवितेचं गाव जकातवाडी या संस्थेच्या वतीने ई - बुक प्रकाशित करण्यात आले. ई - बुकचे संपादन सुषमा आलेकरी यांनी केले. तर प्रा.डॉ.कांचन नलवडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. विद्या नावडकर यांनी केले. पाटण, कराड, फलटण, खंडाळा, कराड, सातारा इत्यादी विविध तालुक्यातील कवी उपस्थित होते. यात महिला कवींचा मोठा सहभाग होता. कवी संमेलनाचे निवेदन,कवी किशोर धरपडे ,वसुंधरा निकम, क्रांती पाटील ,गणेश शेंडे ,इत्यादींनी केले. महाविद्यालयातील कवी विद्यार्थी व प्राध्यापक यांनीही कवी संमेलनात सहभाग घेतला. रिमझिम पावसात सामाजिक कवितेतील विविध भावनांनी वातावरण जोशपूर्ण होत उत्साही राहिले.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +91 9561174111
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




आपलं कार्य प्रेरणादायी आहे आपली वैचारिक भूमिका स्पष्ट आहे याचा आम्हाला अभिमान वाटला..सर आपली बातमी प्रकाशित करावीं अशी अपेक्षा


- मुंबई - प्रतिनिधी - / वार्ता -
पुन्हा एकदा विविध मागण्यासाठी सरपंच करणार ९ आॅगस्ट ला मुंबईत आंदोलन** मुंबई प्रतिनिधी राजकीय पक्षाशी हित संबंध नसले सरपंच संघटना राज्यभर कार्यरत आहे राज्यातील सरपंच उपसरपंच सदस्यांच्या विविध मागण्यासाठी मुंबई आझाद मैदान मोर्चा धरणे आंदोलन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्याच्या प्रलंबित मागण्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्काळ सोडाव्यात या मागण्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी घेऊन मागण्या सोडविण्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करावी अधिवेशना दरम्यान विधानभवनात झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवार दि ९ आॅगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील अँड प्रविण कडाळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे 
   राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच उपसरपंच अहोरात्र मेहनत करून आम जनतेला दिलासा देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो अशा या सरपंच उपसरपंच याच्या मानधन सरसकट पंधरा हजार उपसरपंच सात हजाराची वाढ करावी , सरपंच पदाच्या कार्यकाळात पंधरा लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, सरपंच ग्रामसेवक यांची संयुक्त मासिक बैठक आयोजित करण्यात यावी ,सरपंचावर हल्ला करणाऱ्याना विशेष संरक्षण कायदा लागूकरावा राज्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच यांचे थकीत मानधन तत्काळ वर्ग करावे माजी सरपंच यांना पेन्शन सुरू करावी अनेक दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करून मागण्यासाठी अनेक आंदोलने सुद्धा करण्यात आली होती. परंतू सरकारने दखल घेतली नाही त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव मुंबईच्या आझाद मैदानावरती अधिवेशना दरम्यान आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्याघोषणांनी आझाद मैदानाचा परिसर दणाणून सोडला होता सरपंचांच्या आंदोलनाची राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत सरपंचाच्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री महाजन यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळाला सांगत लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात जाऊन भेट घेतली सरपंचाच्या मागण्या सोडविण्याबाबत त्यांना साकडे घातले परतू अबलबजावणी होत नाही सरपंच उपसरपंच यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा सरपंच सेवा संघाचे सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे आदर्श सरपंच अशोक ओहळ विजय पाटील अविनाश पवार नंदकुमार कदम अरूण खरमाटे डॉ तान्हाजी पाटील सौ पुजा जाधव जानु गायकर लता खोत संजय काळे बाबाजी गुळवे निलेश पावसे सोमनाथ नाडे रोहित पवार अमोलशेवाळे रविंद्र पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================





Monday, July 22, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेतील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर यासह नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले हे मतदारसंघ काँग्रेसने निवडणूक लकरावी या साठी प्रदेश समितीकडे आग्रह.


- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अहमदनगर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंघाने नुकतीच मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत नगर जिल्ह्यातील उत्तरेतील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर यासह नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले हे मतदारसंघ काँग्रेसने लढवावेत, यासाठी प्रदेश समितीकडे आग्रह धरण्यात आला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रदेश काँग्रेस समितीने आतापासून काँग्रेसला कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के. सी. वेणूगोपाल, राष्ट्रिय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रांताध्यक्ष आ. नाना पाटोले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. वर्षाताई गायकवाड, अविनाश पांडे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांच्यासह नेते उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्याचा आढावा जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी तर नगर शहराचा आढावा महानगर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सादर केला. तसेच नगर लोकसभा निवडणुकीतील अनुभव व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने नगर शहरासह जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती प्रदेश काँग्रेस समितीला देण्यात आली. यावेळी सात मतदारसंघावर दावा करण्यात आला. यातील संगमनेर, श्रीरामपूर याठिकाणी पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. याशिवाय राहाता, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव आणि अकोला हे मतदारसंघ काँग्रेसने लढवावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नगर दक्षिण जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा लढली नव्हती. आता राज्यात महाविकास आघाडी असून शिवसेनेने श्रीगोंद्यावर दावा केला आहे. नगरमध्ये काँग्रेसची तयारी सुरू आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नगर शहराची जागा ही काँग्रेसलाच मिळाली पाहिजे.

राष्ट्रवादीने त्यासाठी लोकसभेला काँग्रेसने केलेल्या मदतीची परतफेड केली पाहिजे, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नगर जिल्ह्यात काँग्रेस बळकट आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या विजयात माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि मतदारांचा महत्त्वाचा वाटा आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा खासदारकीला एकही उमेदवार नसला तरी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार करण्यासाठी काँग्रेसने जीवाचे रान केले. ज्येष्ठ नेते आ. थोरात यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो. त्यामुळे नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे असल्याचे वाघ आणि काळे यांनी यावेळी स्पष्ट केले

कॉंग्रेसचा मुख्यमंत्री :-

बैठकीत माजी मंत्री आ. थोरात म्हणाले, 
महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालपर्यंत बिनधास्त सुरु आहे. महागाई, बरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकर्‍यांचे हाल होत आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, हे सर्व जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. विधानसभा निवडणुक एकजूटीने लढलो तर मविआ 180 जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Friday, July 19, 2024

डाकविभागाच्या सेवांचा जनसामान्यांनी लाभ घ्यावा - जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर


अहमदनगर जि.मा.का.वृतसेवा: 
 गेल्या १७० वर्षापासुन पत्र व तार या माध्यमातुन जनतेपर्यंत संदेश पोहोचत डाकविभागाने जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. आधिुनकतेच्या युगामध्ये बदल स्वीकारत डाकविभागाने आपले स्वरुप बदलले असुन डाकविभागाच्या विविध सेवांचा जनसामान्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर यांनी केले.
येथील राधाबाई काळे महाविद्यालयात डाकविभाग व सावित्री-मैत्रैयी फोरमच्या यांच्या संयुक्त विद्यमाने डाक चौपाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी श्री ठाकुर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भुपेंद्र निकाळजे, भारतीय पोस्ट बँकेचे व्यवस्थापक अमोल भुमकर, वरिष्ठ पोस्टमास्तर श्रीमती ए.डी. फुलकर, विभागीय डाकविकास अधिकारी (डाकजीवन विमा) दीपक नागापुरे, कार्यालयीन सहायक, तानाजी सुर्यवंशी, पोस्टमन नितीन खेडकर, सावित्री-मैत्रैयी फोरमच्या अध्यक्षा डॉ. लक्ष्मी काथवटे, डाक सहायक सुखदेव पालवे, डाकसेवक अजय सोनावळे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. ठाकुर म्हणाले की, सामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या डाक विभागामार्फत सर्व सेवा सामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. आजघडीला सर्वांना आवश्यक असलेल्या आधारअपडेट, शासनाच्या योजनांसाठी आवश्यक असलेले बँक खाते यासारख्या अनेक बाबी विभामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भारतीय पोस्ट बँकेच्या माध्यमातुन जनतेला अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आयुष्यामध्ये बचतीला अनन्यसाधारण महत्व असुन अधिक व्याजदर देणाऱ्या अनेक योजना पोस्ट खात्यामार्फत राबविण्यात येतात. या योजनांची माहिती करुन घेत विद्यार्थ्यांनी पोस्ट बँकेत खाते उघडुन विद्यार्थी दशेमध्ये बचतीच्या सवयीचा अंगिकार करण्याचे आवाहनही श्री. ठाकुर यांनी यावेळी केले.
अमोल भुमकर म्हणाले की, स्पर्धेच्या व आधुनिकतेच्या युगात बदल स्वीकारत डाकविभाग सक्षमपणे सामान्यांना सेवा देत आहे. २०१८ मध्ये सुरु झालेल्या भारतीय पोस्ट बँकेत जिल्ह्यातील साडेचार लक्ष नागरिकांनी आपले खाते सुरु केले आहे. अत्यंत कमी वेळेमध्ये या पोस्ट बँकेमध्ये खाते उघडणे शक्य असुन कुठलेही कागदपत्र न देता केवळ आधार क्रमांकावर खाते सुरु करता येते. या बँकेमध्ये ऑनलाईन पेमेंट, एटीएम यासारख्या सुविधांचा खातेधारकांना लाभ देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
विभागीय डाकविकास अधिकारी दीपक नागापुरे यांनी डाक विभागाच्या विविध योजना, बचतखाते, आवर्ती खाते, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना, पब्लीक प्रॉव्हीडंड फंड, डाकजीवन विमा, इंडियन पोस्ट ऑफीस पेमेंटमार्फत उघडल्या जाणाऱ्या अपघाती विमा पॉलीसी, शासनाच्या विविध योजनांचे अनुदान जमा होणाऱ्या आयपीपीबी खाते याबाबत सविस्तर अशी माहिती दिली.
यावेळी उपप्राचार्य डॉ. भुपेंद्र निकाळजे, दीपक नागापुरे, सुखदेव पालवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. प्रज्ञा वाघ यांनी केले तर आभार प्रा. शितल झेंडे यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार रमेश जेठे ✍️✅🇮🇳... (सर) अहमदनगर 
*सहयोगी:*
-----------------------------------------------
=================================
*संकलन:*💐✅🇮🇳...
 समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर +91 9561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Thursday, July 18, 2024

विशालगड हिंसाचार आणी शिळफाटा महिला अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणी आरोपींना कठोर शासन व्हावे - विविध सामाजिक संघटनांची मागणी

संगमनेरमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पोलिस व महसूल प्रशासनास निवेदन

- संगमनेर - प्रतिनिधी - / वार्ता -
कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली झालेला हिंसाचार तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परीसरात एका मंदिरात महिलेवर अत्याचार करुन करण्यात आलेल्या तीच्या निर्घूण हत्या प्रकरणी आरोपींना कठोर शासन व्हावे याकरीता संगमनेरमधे विविध सामाजिक संस्था संघटना एकवटल्या असून
यातील आरोपींना कठोरातील कठोर शासन होणेकामी पोलिस व महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.
 सदर निवेदनात असे म्हंटले आहे की, आम्ही संविधान प्रेमी तथा या भारताचे नागरिक तसेच ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व मुस्लिम समाजसह इतरही धर्मीय आपणास नम्रपणे निवेदन सादर करतो की, दिनांक १४/०७/२०२४ रोजी दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड या ठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली काही समाजकंटकांच्या जमावाने त्याच ठिकाणाहून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील असलेल्या गजापुर गावातील स्थानिक नागरिकांच्या घरावर तलवारी, काठ्या,कोयते, असली घातक शस्त्र घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली व वाहनांची जाळपोळ देखील केलेली आहे. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांची देखील विटंबना केली गेली या हिंसाचारात महिला व लहान मुले, वयोवृद्ध महिला व पुरुष या हल्ल्यातून बचावलेले नाहीत, त्यांना देखील जबर मारहाण करण्यात आलेली आहे,
तसेच बंदोबस्तासाठी सज्ज असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील तलवारीने वार करून जखमी करण्यात आलेले आहे, सदरचा कायदा हातात घेऊन नागरिक वस्तीवर हंल्ले करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांचा समस्त मानव जाहीर निषेध करत आहोत, तसेच या सर्व समाजकंटकांवर कुठल्याही नेता, पुढाऱ्याचा पदाचा मुलाहिजा न ठेवता शक्य तितक्या लवकर योग्य चौकशी करुन अशा समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करावी, यासोबतच या हिंसाचारात ज्या कुणाचे आर्थिक व संसारोपयोगी वस्तूंची नासधूस नुकसान झाली आहे त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळून देत सदर ठिकाणची पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण करावी, सदर निवेदनात पुढे असेही नमुद करण्यात आले आहे की, आम्ही किंवा आमचे निवेदन हे कुठल्याही अतिक्रमणाचे किंवा अतिक्रमण धारकांचे समर्थन करत नाही. गडकिल्ल्यांच्या नावाखाली गैरकृत्य करणाऱ्या तथा दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे, 
तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात गणेश मंदिरामधे आसरा घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर मंदिरातील पुजारी व त्याच्या साथीदारांनी तीच्यावर अत्याचार करत केलेली हत्या अश्या समाजविघातक आरोपींना कठोर शासन व्हावे, अश्या आशयाचे निवेदन संगमनेर शहर व तालुक्यातील विविध समाज बांधव तथा ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार,एकता सेवाभावी सामाजिक संस्थेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपविभागीय प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
 या प्रसंगी माजी नगरसेवक डॉ दानिश खान,सामाजिक कार्यकर्ते राजूभाई इनामदार, एकता सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आसिफभाई शेख, सामाजिक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते मुजाहिद पठाण,तौसीफ अली मणियार, हाफिज हमजा, मुस्लिम समाजातर्फे मुफ्ती सालीम साहब,ह. सय्यद बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष अन्सार सय्यद,वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अजिजभाई ओहरा,अंजुम शेख, नूर शेख, ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकारच्या महिला पदाधिकारी जिल्हा अध्यक्षा बानोबी शेख, तालुका अध्यक्षा सविता भालेराव, शहर अध्यक्षा आरती सोनवणे, जिल्हा अध्यक्ष पत्रकार शौकत पठाण, महासचिव जमीर शेख,आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार शौकत पठाण - संगमनेर
-----------------------------------------------
=================================

गुरूद्वारा प्रबंधक कमेटी डोमेगांव ४२ वी महान पैदल यात्रा...


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
सतकार योग साध संगत जी, फत्तेह प्रवान करनी जी
साधसंगतजी के सहयोग से हर साल की तरह इस साल भी " महान पेदल यात्रा" गुरूद्वारा श्री गुरूसिंग सभा, श्रीरामपूर से रविवार, ता.२१/७/२०२४ के दिन सुबह ४:३० बजे गुरूबाणी किर्तन करते हुए गुरुद्वारा बिरदबाबा डोमगांव, कमालपूर के लिए रवाना होगी। गुरुद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर तथा डोमेगांव की ओरसे बेनती की जाती है कि इस ४२ वी महान "पैदल यात्रा" में ज्यादा से ज्यादा गिनती में हाजिर होकर पैदल यात्रा की शान बढाएँ तथा गुरूघर की खुशीयाँ प्राप्त करते हुए अपना अनमोल जनम सफल करें।
नोट :-

१) सभी साध संगत सुबह ४:०० बजे गुरुद्वारा साहेब पहुँच जाए। गुरुद्वारे में जपजी साहेबजी, आनंदसाहेबजी के पाठ उपरंत अरदास के बाद कडाह प्रसाद की देग बरतेगी, तथा "पैदल यात्रा" आरंभ होगी ।

गुरुद्वारा बिस्दबाबा डोमेगांव में ४२ वी पेदल यात्रा' की खुशीमें
धार्मिक दिवान
की खुशीमें गुरुद्वारा साहेब की नई इमारत
में निचे लिखे हुए प्रोग्राम के मुताबीक दिवान सजनगें ।
प्रोग्राम (रविवार, ता.२१/७/२०२४)
किरतन दिवान ग्यानी अनोखसिंग मस्कीन व भाई मनप्रितसिंगजी (हजुरी जथ्था गुरुद्वारासाहिब, श्रीरामपूर)
सुबह ११:३० से दोपहर १२:३० बजे अरदास, दिवान की समाप्ती, गुरूमहाराज के सुखासन दोपहर १२:३० से १:३० बजे
साध संगत के सहयोग से गुरु का लंगर अतुट वरतेगा ! संत बाबा हरनामसिंगजी लंगर साहेब नांदेडवाले इनके आशिर्वाद से तथा समुह संगत के सहयोगसे गुरुद्वारासाहिब की लंगर हॉल पुर्ण निर्माण की सेवा आरंभ होनेवाली है। संगत से बेनती की आप तन, मन, धनसे पुरा सहयोग दे। संत बाबा नरेंद्रसिंगजी, बलविंदरसिंगजी, गुरूद्वारा लंगरसाहिब, हजुरसाहिब, बाबा रणजितसिंगजी
मनमाडवाले इनका पूरा सहयोग प्राप्त है। सभी संगत बढचढकर अपनी माया सफल करे। कॅश के रूपमे या बैंक अंकौंट या निचे दिए नंबर के अकौंटमें माया जमा करवाये।
हर महिने दी पुरनमासी अंते मसाया विशेष दिवान सवेरेनू ७ तो ८ बजे तक लगदे हन उपरांत गुरुदे लंगर अतुट वरताये जांदेअन् लाभ लेनदी कीरपा करो जी ।
२) रास्ते में चायपानी तथा नाश्ते के लिए पैदल यात्रा का स्वागत होगा ।
३) जिन सज्जनोंको पैदल यात्रा के रस्तेमें सेवा करनी है वे अपने नाम निचे दिये गये मोबाईल नंबर पर लिखवादे।

=================================
-----------------------------------------------
Reg. Trust A.nagar No. A1352 Dt. 15/3/2015
गुरुद्वारा बिरदबाबा देवस्थान ट्रस्ट, कमालपूर
Account No. 915020052482202
AAXIS BANK
IFS Code: UTIB0001370
SHRIRAMPUR BRANCH
• साध संगत के आसरे...🌹🥀🌺🌸🌷❤️✅🇮🇳
गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, डोमेगांव
गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर
मो. 9822059646, 7020308707, 9850181315, 9890188181,8806490555, 9028900117, 9028838878, 9422339034 (पुणे) पुछताछ : स. हरभजनसिंगजी, हेडग्रंथी गुरूद्वारा बिरदबाबा, डोमेगांव (कमालपूर), मो. 8888446876
बंटी थापर, श्रीरामपूर/९८२२३५२९९४
-----------------------------------------------
================================











गुरूद्वारा प्रबंधक कमेटी डोमेगांव ४२ वी महान पैदल यात्रा...


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
सतकार योग साध संगत जी, फत्तेह प्रवान करनी जी
साधसंगतजी के सहयोग से हर साल की तरह इस साल भी " महान पेदल यात्रा" गुरूद्वारा श्री गुरूसिंग सभा, श्रीरामपूर से रविवार, ता.२१/७/२०२४ के दिन सुबह ४:३० बजे गुरूबाणी किर्तन करते हुए गुरुद्वारा बिरदबाबा डोमगांव, कमालपूर के लिए रवाना होगी। गुरुद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर तथा डोमेगांव की ओरसे बेनती की जाती है कि इस ४२ वी महान "पैदल यात्रा" में ज्यादा से ज्यादा गिनती में हाजिर होकर पैदल यात्रा की शान बढाएँ तथा गुरूघर की खुशीयाँ प्राप्त करते हुए अपना अनमोल जनम सफल करें।
नोट :-

१) सभी साध संगत सुबह ४:०० बजे गुरुद्वारा साहेब पहुँच जाए। गुरुद्वारे में जपजी साहेबजी, आनंदसाहेबजी के पाठ उपरंत अरदास के बाद कडाह प्रसाद की देग बरतेगी, तथा "पैदल यात्रा" आरंभ होगी ।

गुरुद्वारा बिस्दबाबा डोमेगांव में ४२ वी पेदल यात्रा' की खुशीमें
धार्मिक दिवान
की खुशीमें गुरुद्वारा साहेब की नई इमारत
में निचे लिखे हुए प्रोग्राम के मुताबीक दिवान सजनगें ।
प्रोग्राम (रविवार, ता.२१/७/२०२४)
किरतन दिवान ग्यानी अनोखसिंग मस्कीन व भाई मनप्रितसिंगजी (हजुरी जथ्था गुरुद्वारासाहिब, श्रीरामपूर)
सुबह ११:३० से दोपहर १२:३० बजे अरदास, दिवान की समाप्ती, गुरूमहाराज के सुखासन दोपहर १२:३० से १:३० बजे
साध संगत के सहयोग से गुरु का लंगर अतुट वरतेगा ! संत बाबा हरनामसिंगजी लंगर साहेब नांदेडवाले इनके आशिर्वाद से तथा समुह संगत के सहयोगसे गुरुद्वारासाहिब की लंगर हॉल पुर्ण निर्माण की सेवा आरंभ होनेवाली है। संगत से बेनती की आप तन, मन, धनसे पुरा सहयोग दे। संत बाबा नरेंद्रसिंगजी, बलविंदरसिंगजी, गुरूद्वारा लंगरसाहिब, हजुरसाहिब, बाबा रणजितसिंगजी
मनमाडवाले इनका पूरा सहयोग प्राप्त है। सभी संगत बढचढकर अपनी माया सफल करे। कॅश के रूपमे या बैंक अंकौंट या निचे दिए नंबर के अकौंटमें माया जमा करवाये।
हर महिने दी पुरनमासी अंते मसाया विशेष दिवान सवेरेनू ७ तो ८ बजे तक लगदे हन उपरांत गुरुदे लंगर अतुट वरताये जांदेअन् लाभ लेनदी कीरपा करो जी ।
२) रास्ते में चायपानी तथा नाश्ते के लिए पैदल यात्रा का स्वागत होगा ।
३) जिन सज्जनोंको पैदल यात्रा के रस्तेमें सेवा करनी है वे अपने नाम निचे दिये गये मोबाईल नंबर पर लिखवादे।



=================================
-----------------------------------------------
Reg. Trust A.nagar No. A1352 Dt. 15/3/2015
गुरुद्वारा बिरदबाबा देवस्थान ट्रस्ट, कमालपूर
Account No. 915020052482202
AAXIS BANK
IFS Code: UTIB0001370
SHRIRAMPUR BRANCH
• साध संगत के आसरे...🌹🥀🌺🌸🌷❤️✅🇮🇳
गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, डोमेगांव
गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर
मो. 9822059646, 7020308707, 9850181315, 9890188181,8806490555, 9028900117, 9028838878, 9422339034 (पुणे) पुछताछ : स. हरभजनसिंगजी, हेडग्रंथी गुरूद्वारा बिरदबाबा, डोमेगांव (कमालपूर), मो. 8888446876
बंटी थापर, श्रीरामपूर/९८२२३५२९९४
-----------------------------------------------
=================================