राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, July 13, 2024

सुलताना चांदबीबी यांच्या शहीद दिना निमित्त मखदूम सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळातर्फे अभिवादन


शत्रु पक्षाकडून 'सुलताना' ही लकब मिळविणारी चांदबिबी ही जगातील एकमेव उदाहरण- इंजि. अभिजीत वाघ

- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता 
दिनांक १३ जुलै २०२४ सुलताना चांद बीबी यांचा आज ४२४ वा शहीद दिवस,
यानिमित्त अहमदनगर शहरातील मखदूम सोसायटी आणी इतिहास प्रेमी मंडळातर्फ अभिवादन करण्यात आले,यावेळी अभिवादन करताना इंजि. अभिजीत वाघ म्हणाले की, मुर्तजा निजाम यांच्यानंतर अहमदनगर निजामशाहीवर मोगल दक्षिणेतून हल्ले होऊ लागले. तेव्हा अहमदनगर वाचविण्यासाठी चांदबिबी यांनी अहमदनगर येथे परतण्याचा निर्णय घेतला. अकबर पुत्र मुराद याने अहमदनगर किल्ल्यावर हल्ला केला. पण अनेक दिवस लढवून किल्ला ताब्यात येत नव्हता. शेवटी किल्ल्याची एक भिंत दारू गोळ्याने उडवली, परंतु सकाळी उठून पाहतो चांद बीबी आणी तिच्या सैन्याने ती रात्रीतून पुन्हा उभी केली. तिचे शौर्य पाहून राजपुत्र मुराद यानी तिला "सुलताना" हा लकब दिला आणी तो वरहाड प्रांताकडे निघून गेला. 
नंतर त्याचा भाऊ राजपुत्र दानीयाल याने किल्ल्याला वेढा दिला. अनेक महिने तो वेढा चालू होता. शेवटी त्याने एका सरदारला फितूर केले. त्यांनी दगाबाजीने सुलताना चांदबिबीवर तिच्या महालात हल्ला केला. त्यात ती व तिच्या सत्तर अंगरक्षक मैत्रिणी या शहीद झाल्या. त्यांचे प्रेत ही त्या राहत असलेल्या महाला जवळील मछली बावडी येथे सापडले. त्यात एका रत्नजडित सॅंडल वरून सुलताना चांद बीबी यांचे प्रेत ओळखले गेले.
त्या सॅंडलच्या रत्नांची किंमत त्याकाळी तीन लक्ष होती. असे समकालीन इतिहासकारांनी नोंद केली. ते सॅंडल राजपुत्र दानियाल याने पुढे आग्रा येथे पाठवले असे सांगितले. 
अहमदनगर निजामशाहीची राणी सुलताना चांद बीबी यांच्या ४२४ व्या शहीद दिनानिमित्त मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने त्यांच्या कबरीवर फुलं अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद,उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, आर्कि. फिरोज शेख, तंन्जिमे उर्दु अदबचे अध्यक्ष सय्यद खलील, आय बी शहा, इस्माईल शेख, फिरोज शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
चांदबीबीच्या कबरीचा शोध लावून प्रथमच त्यांना अभिवादन केल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले तथा असाच अहमदनगरचा इतिहास शोधून ते समाजापुढे आणण्याचे त्यांना आवाहनही केले. 
पुढे बोलताना अभिजीत इंजि. श्री. वाघ म्हणाले की, युद्ध संपले की शत्रुत्व संपते. राजपुत्र दानियाल यांनी सुलताना चांदबीबी हीची कबर शाही कब्रस्तान बागरोजा येथे बांधण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अहमद निजामशहा यांच्या कबरीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात जी कबर आहे ती सुलताना चांद बीबी हिची आहे. अनेक वर्ष इतिहासप्रेमी मंडळ यांनी त्यावर संशोधन केले आहे. तसेच तिच्या अंगरक्षक सहेली यांचे पण कबरी बागरोजेच्या पश्चिम दरवाजा समोरील जागेत जो "गंजे शहीदा" आहे तिथे आहे. 
पुढे काही वर्षानंतर मीर अबु तुराब मशदी याने चांदबिबीच्या अस्थी इराण येथे नेल्या व तेथे चांदबीबी ची कबर मशद इमाम रजा यांच्या दर्गा परिसरात आहे यासंबंधीचे "शोध चांदबीबीच्या कबरीचा" हे पुस्तक लवकरच इतिहास प्रेमी मंडळ प्रसिद्ध करणार आहे. 
कार्यक्रमाचच्या यशस्वीतेसाठी मखदूम सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. 


=================================
*वृत्त विशेष सहयोग*
 ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
*सहयोगी*✍️✅🇮🇳...
============
 स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*💐✅🇮🇳
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Friday, July 12, 2024

मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना श्रीरामपूर नगर पालिकेकडून सावत्रपणाची वागणूक


ठराविक भागातच नोंदणी मदत केंद्र
=================================

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 येथील नगरपालिकेचा कारभार या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहिला आहे. सध्या नगरपालिका प्रशासनावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने मनमानी पद्धतीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांच्या योजनेच्या संदर्भात नगरपालिकेकडून शहरात जे नोंदणी मदत कक्ष उभारण्यात आले आहेत ते शहराच्या ठराविक भागात उभारून इतर भागातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना सावत्रपणाची वागणूक देत वंचित ठेवण्याचे काम नगरपालिकेकडून होत असल्याने शहरातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 
या संदर्भात शासनाच्या पोर्टलवर देखील तक्रारी करण्यात आल्या आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी नाव नोंदणी धूमधडाक्यात सुरू आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यामध्ये यासाठी शुक्रवार आणि शनिवार दोन दिवसाची नोंदणी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र नियोजन करण्यात आले आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने देखील यासाठी चार मदत केंद्रे स्थापित केली आहेत. मात्र ही चार ही मदत केंद्रे शहराच्या ठराविक भागात आहेत. लोकमान्य टिळक वाचनालयातील आगाशे हॉल,खासदार गोविंदराव आदिक सभागृह संगमनेर रोड, शाळा क्रमांक सात मोरगे वस्ती तसेच मिनी स्टेडियम तलाठी कार्यालयाजवळ अशी ही चार केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र शहराचा सर्वात मोठा भाग असलेल्या वार्ड क्रमांक दोनसह संजय नगर, गोपीनाथ नगर, लक्ष्मीनारायण नगर, रामनगर, फातिमा कॉलनी, मिल्लत नगर, गोंधवणी रोड,आंबेडकर वसाहत, गिरमे मळा, गोंधवणी गाव आदी मोठ्या भागासाठी कोणतेही मदत केंद्र उभारण्यात आलेले नाही.या भागातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या बहिणी या सावत्र आहेत की काय ? असा प्रश्न आता विचारला जात आहे. नगरपालिकेने ठराविक भागातच ही केंद्रे स्थापित करून शहराचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग वंचित ठेवल्याबद्दल शहरातील भगिनींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत बोलताना संजय नगर भागातील शकुंतला साळुंखे यांनी सांगितले की आमच्या भागातील महिला भगिनींना या चारही केंद्रात जाणे खूप लांब पडत आहे. त्यामुळे आमच्या भागात सुद्धा हे मदत केंद्र आवश्यक आहेत. या संपूर्ण भागामध्ये नगरपालिकेच्या तसेच खाजगी अनेक शाळा आहेत. त्या ठिकाणी या केंद्रासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. असे असताना नगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणींची कोणतीही दखल न घेता आपल्याला योग्य वाटेल अशा ठिकाणी ही केंद्रे कार्यान्वित केली आहेत. ही सर्व केंद्रे मुख्य रस्त्यांवर आहेत. परंतु शहराचा उपनगरातील हा मोठा परिसर यापासून वंचित राहिला आहे. तरी नगरपालिकेने तातडीने वार्ड नंबर क्रमांक दोन, संजय नगर, राम नगर, लक्ष्मीनारायण नगर, गोंधवणी गाव, गिरमे मळा आदि परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणींच्या सोयीसाठी तातडीने मदत केंद्रे उभारावी अशी मागणी केली आहे.
श्रीरामपूर नगरपालिकेचा कारभार सध्या मनमानी पद्धतीने सुरू आहे.प्रत्येक विभागातील अधिकारी आपल्या मर्जीनुसार निर्णय घेत आहेत. शहरवासीयांची कोणती ही काळजी घेतली जात नाही. याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

=================================
-----------------------------------------------
संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर (महाराष्ट्र)            + 919561174111
-----------------------------------------------
=================================


पंचकूला के श्री चिन्मय मिशन आश्रम में पंचमुखी हनुमान जी मूर्ति की स्थापना !


चंद्रकांत सी.पूजारी पंचकूला / हरियाणा:-

चिन्मय मिशन आश्रम परिसर प्लॉट न.आई - 5,सैक्टर-20 पंचकूला में शुक्रवार प्रातः श्री पंचमुखी हनुमान जी की मूर्ति की विधिवत पूजन के बाद स्थापना की गई । इस अवसर पर 6 फुट के प्लेटफार्म पर 12 फुट ऊंची श्री हनुमान जी की विशालकाय प्रतिमा का भी विधिवत अनावरण हुआ। इलाका के सैंकड़ों लोगों ने बड़े उत्साह के साथ इस महोत्सव में शामिल हो कर इस अवसर का भरपूर आनंद उठाया गया। मूर्ति स्थापना के उपरांत सभी श्रद्धालुओं के लिए लंगर की व्यवस्था भी की गई। इस अवसर पर आश्रम परिसर में सांय. 5 से 7 बजे तक सुंदरकांड के पाठ के साथ भजन संध्या का आयोजन भी हुआ। आश्रम परिसर में लगभग तीन वर्ष पूर्व श्री रामेश्वर महादेव मंदिर की स्थापना की गई थी तभी से बड़ी संख्या में श्रद्धालु प्रात: व सांय नियमित आरती व पूजा अर्चना के लिए आते हैं । 
आश्रम परिसर में नियमित वेदान्त व श्रीमदभगवद गीता पर यहां की आचार्य ब्रह्मचारिणी कालिंदी चैतन्य जी प्रवचन भी करती हैं । 24 से 28 जुलाई तक यहां सुबह शाम ज्ञान यज्ञ का आयोजन भी होने जा रहा है जिस में प्रवचन कर्ता चिन्मय मिशन, नोएडा के प्रमुख स्वामी चिद्रुपानंद जी रहेंगे जो इस ज्ञान यज्ञ में सभी सादर आमंत्रित हैं । चिन्मय मिशन का उद्देश्य है सेवा, शिक्षा व आध्यात्मिक ज्ञान के प्रचार व प्रसार के कार्यों द्वारा आत्मिक विकास। चिन्मय मिशन का ध्येय वाक्य है - 'अधिक से अधिक खुशी, अधिक से अधिक लोगों को, अधिक से अधिक समय के लिए ' देना यही है !


=================================
-----------------------------------------------
वार्ता विशेष सहयोग 
*चंद्रकांत सी.पूजारी*✍️✅🇮🇳...
सहयोगी:-
=======
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर (महाराष्ट्र) + 919561174111
-----------------------------------------------
=================================


त्या चार कर्मचाऱ्यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासुन ते थेट गृहमंत्र्यांपर्यंत तक्रार दाखल,



 स्थानिक गुन्हे शाखेच्या चारही पोलीस कर्मचारी यांची चौकशी कोण व कधी करणार 

- मुज्जफर शेख - प्रतिनिधी - / संगमनेर वार्ता -
राज्याचे गृहविभाग सक्षम व लाचखोरी पासून मुक्त करण्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ध्येय धोरणाला काळिमा फासण्याच काम अहमदनगर जिल्ह्यात काही पोलीस कर्मचारी करत असल्याचे समोर आले आहे यामुळे संपूर्ण गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली असल्याची चर्चा जोरधरू लागली आहे तश्या आशयाच्या तक्रारी देखील विरिष्ठांना होऊ लागल्या आहेत  त्याच झालं असं की, दिनांक 23/ 6 /2024 रविवार रोजी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पोलीस कर्मचारी यांनी संगमनेर शहरातून दोन गुटखा व्यवसायाकडून एस.पी चे नाव सांगून दोन लाख पंचवीस हजार रुपयाची खंडणी वसूल केलेली आहे. याखंडणी बहाद्दरांची चर्चा आता संगमनेर शहरच नाही तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात होत आहे, याच अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारे वारंवार संगमनेर व अकोले तालुक्यातून गुटख्याचा व्यवसाय करणाऱ्या कडून दर महा लाखो रुपये हप्ते स्वरूपात खंडणी वसूल केल्याची मोठी चर्चा सुरू आहे मग ते अवैध व्यवसाय दारु गांजा गुटखा मटका तर भंगारवाले देखील सोडले नाही अवैध व्यवसाय चालकांकडून कारवाईच्या नावावर एस.पी साहेब अहमदनगर यांच्या नावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केलेली आहे.त्यामुळे स्वतःला मोठा कर्तबगार समजण्याचा गृहमंत्री यांचा चांगुलपणा मात्र फोल ठरला आहे? स्थानिक गुन्हे शाखेचे हे चार पोलीस कर्मचारी यांच्या खंडणी वसुली बाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासुन ते थेट गृहमंत्र्यांपर्यंत तक्रारदाराने तक्रार दाखल केली आहे त्यामुळे या अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या चारही पोलीस कर्मचारी यांची चौकशी कोण व क
धी करणा?हे बघन महत्वाचे ठरणार आहे


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



श्रीरामपूर जिल्ह्याहोण्या साठी १५ ऑगस्टपर्यंत अल्टीमेट्म



जिल्हा नाहीतर मतदानही नाही,संघर्ष समिती जिल्हाभर अभियान राबविणार - राजेंद्र लांडगे 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
गेल्या ४२/४३ वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी शासन दरबारी अनेकदा जन आंदोलने करूनही शासन प्रतिसाद देत नाही.या पार्श्वभूमीवर शासनास १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत अल्टीमेटम देण्यात आले आहे, त्यानंतर जिल्हा नाही तर,मतदान नाही असे अभियान संपूर्ण जिल्हभर राबविणार असल्याची घोषणा श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांचे अधिपत्याखाली ठिय्या आंदोलनात करण्यात आली.

 यावेळी श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार श्रीमती कालापुरे यांना संघर्ष समिती आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी उबाठा शिवसेनेचे अशोक मामा थोरे,शेखर दुबैय्या, कामगार नेते नागेशभाई सावंत,कॉंग्रेसचे ज्ञानेश्वर मुरकुटे,अशोक नाना कानडे, सचिन गुजर,अरुण पा. नाईक,अण्णासाहेब डावखर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) चे शहराध्यक्ष लकी शेठी,कार्याध्यक्ष भागचंद औताडे,विधिज्ञ सुभाष जंगले,मनोज हासे, बाबा शेख,विजय नगरकर, अभिजित बोर्डे,राजेंद्र गोरे, चंद्रशेखर आगे,अनिस पठाण विजय शेलार,किशोर फाजगे, दिपक पाटील,सलीम शेख, मंगेश छतवाणी,संजय शेजूळ,जहांगीर पठाण,दीपक भांड,विजय बडाख,सलीम शेख आदिसह मोठ्या संख्येने समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी कॉंग्रेसचे ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी सर्व बाबींचे निकष पूर्ण झालेले आहेत.महाराष्ट्र राज्य शासन सध्या नवीन जिल्हे होण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलत आहे.त्यात श्रीरामपूरचासुद्धा विचार करावा ही संपूर्ण श्रीरामपूर शहर व तालुक्याची मागणी आहे.कामगार नेते नागेशभाई सावंत म्हणाले प्रभू श्रीरामचंद्र यांच्या नावाने पावन झालेले श्रीरामपूर शहर हे महराष्ट्र राज्यात ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते.गेल्या ४० वर्षापूर्वीच राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी सोनई येथे सहकार परिषदेत घोषणा केली होती.परंतु नंतरच्या काळात दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा अशी अवस्था निर्माण झाली. त्यानंतर श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी गळती लागली. परंतु श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्य पटलावर आणण्यासाठी या विषयावर गेल्या ११ वर्षापासून सातत्याने वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने आंदोलने करीत हा प्रयत्न सुरूच ठेवला ही श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या दृष्टीने जमेची बाब आहे.आणि आता शासनाने याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता श्रीरामपूरकरांचे स्वप्न साक्षात उतरविणेसाठी येत्या १५. ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी असेही ते म्हणाले.
यावेळी उबाठा शिवसेनेचे अशोक मामा थोरे म्हणाले की, श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे ठिकाण सर्वार्थाने योग्य आहे. श्रीरामपूर जिल्हा झाला तर यातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल कारण श्रीरामपूर शहरात अनेक प्रकारच्या सुख सुविधा सर्व आजी - माजी भूमिपुत्रांनी निर्माण करून ठेवल्या आहेत. त्यामुळे श्रीरामपूरच जिल्हा व्हावा ही एक निष्ठावंत शिवसौनिक म्हणून आमची मागणी असल्याने ते म्हणाले.शेवटी सामाजिक कार्यकर्ते मनोज हासे यांनी आभार मानले.


=================================-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - ✍️✅🇮🇳...शिरसगांव 
सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
=================================
*संकलन:*
समता न्यूज सर्व्हिसेस, 💐✅🇮🇳...श्रीरामपूर - +919561174111
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================