राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, July 18, 2024

गुरूद्वारा प्रबंधक कमेटी डोमेगांव ४२ वी महान पैदल यात्रा...


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
सतकार योग साध संगत जी, फत्तेह प्रवान करनी जी
साधसंगतजी के सहयोग से हर साल की तरह इस साल भी " महान पेदल यात्रा" गुरूद्वारा श्री गुरूसिंग सभा, श्रीरामपूर से रविवार, ता.२१/७/२०२४ के दिन सुबह ४:३० बजे गुरूबाणी किर्तन करते हुए गुरुद्वारा बिरदबाबा डोमगांव, कमालपूर के लिए रवाना होगी। गुरुद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर तथा डोमेगांव की ओरसे बेनती की जाती है कि इस ४२ वी महान "पैदल यात्रा" में ज्यादा से ज्यादा गिनती में हाजिर होकर पैदल यात्रा की शान बढाएँ तथा गुरूघर की खुशीयाँ प्राप्त करते हुए अपना अनमोल जनम सफल करें।
नोट :-

१) सभी साध संगत सुबह ४:०० बजे गुरुद्वारा साहेब पहुँच जाए। गुरुद्वारे में जपजी साहेबजी, आनंदसाहेबजी के पाठ उपरंत अरदास के बाद कडाह प्रसाद की देग बरतेगी, तथा "पैदल यात्रा" आरंभ होगी ।

गुरुद्वारा बिस्दबाबा डोमेगांव में ४२ वी पेदल यात्रा' की खुशीमें
धार्मिक दिवान
की खुशीमें गुरुद्वारा साहेब की नई इमारत
में निचे लिखे हुए प्रोग्राम के मुताबीक दिवान सजनगें ।
प्रोग्राम (रविवार, ता.२१/७/२०२४)
किरतन दिवान ग्यानी अनोखसिंग मस्कीन व भाई मनप्रितसिंगजी (हजुरी जथ्था गुरुद्वारासाहिब, श्रीरामपूर)
सुबह ११:३० से दोपहर १२:३० बजे अरदास, दिवान की समाप्ती, गुरूमहाराज के सुखासन दोपहर १२:३० से १:३० बजे
साध संगत के सहयोग से गुरु का लंगर अतुट वरतेगा ! संत बाबा हरनामसिंगजी लंगर साहेब नांदेडवाले इनके आशिर्वाद से तथा समुह संगत के सहयोगसे गुरुद्वारासाहिब की लंगर हॉल पुर्ण निर्माण की सेवा आरंभ होनेवाली है। संगत से बेनती की आप तन, मन, धनसे पुरा सहयोग दे। संत बाबा नरेंद्रसिंगजी, बलविंदरसिंगजी, गुरूद्वारा लंगरसाहिब, हजुरसाहिब, बाबा रणजितसिंगजी
मनमाडवाले इनका पूरा सहयोग प्राप्त है। सभी संगत बढचढकर अपनी माया सफल करे। कॅश के रूपमे या बैंक अंकौंट या निचे दिए नंबर के अकौंटमें माया जमा करवाये।
हर महिने दी पुरनमासी अंते मसाया विशेष दिवान सवेरेनू ७ तो ८ बजे तक लगदे हन उपरांत गुरुदे लंगर अतुट वरताये जांदेअन् लाभ लेनदी कीरपा करो जी ।
२) रास्ते में चायपानी तथा नाश्ते के लिए पैदल यात्रा का स्वागत होगा ।
३) जिन सज्जनोंको पैदल यात्रा के रस्तेमें सेवा करनी है वे अपने नाम निचे दिये गये मोबाईल नंबर पर लिखवादे।



=================================
-----------------------------------------------
Reg. Trust A.nagar No. A1352 Dt. 15/3/2015
गुरुद्वारा बिरदबाबा देवस्थान ट्रस्ट, कमालपूर
Account No. 915020052482202
AAXIS BANK
IFS Code: UTIB0001370
SHRIRAMPUR BRANCH
• साध संगत के आसरे...🌹🥀🌺🌸🌷❤️✅🇮🇳
गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, डोमेगांव
गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर
मो. 9822059646, 7020308707, 9850181315, 9890188181,8806490555, 9028900117, 9028838878, 9422339034 (पुणे) पुछताछ : स. हरभजनसिंगजी, हेडग्रंथी गुरूद्वारा बिरदबाबा, डोमेगांव (कमालपूर), मो. 8888446876
बंटी थापर, श्रीरामपूर/९८२२३५२९९४
-----------------------------------------------
=================================



Wednesday, July 17, 2024

संगमनेर :- सखोल चौकशीसाठी उपोषणाचा तिसरा दिवस


- संगमनेर - मुज्जफर  शेख - / वार्ता - 
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाप्तेखोर व खंडणीखोर पोलीस कर्मचारी यांच्या सखोल चौकशीसाठी उपोषणाचा तिसरा दिवस मात्र आत्तापर्यंत वरिष्ठांची चुप्पी भूमिका
प्रतिनिधी संगमनेर शहरात कारवाईच्या नावाखाली दिनांक 23 /6 /2024 रोजी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचारी सचिन आडबल मोबाईल नंबर 79 99 17 30 48 रणजीत जाधव मोबाईल नंबर 93 56 82 31 40 व इतर दोन कर्मचारी यांनी आपल्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून तसेच गृह खात्याची प्रतिमा मलिन करून आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव घेऊन दोन गुटखा विक्रेते यांच्याकडून दोन लाख पचवीस हजार रुपयाची खंडणी वसूल केली म्हणून यांची माहिती मिळताच संगमनेर शहरातील आरटीआय कार्यकर्ता अकील पठाण यांनी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे त्या चार पोलीस कर्मचारी यांचे सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध खंडणी व जबर चोरीचे गुन्हे दाखल व्हावेत म्हणून लेखी तक्रार केली असून त्यांच्याकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी संगमनेर यांना उपोषणाची नोटीस देऊन दिनांक 15/ 7 /2024 रोजी पासून अकील पटाण यांनी उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आज तिसरा दिवस असून जोपर्यंत त्या चारही खंडणीखोर पोलीस कर्मचारी अहमदनगर यांच्याविरुद्ध सखोल चौकशी करून खंडणी व जबर चोरीचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू राहणार असल्याचे पठाण यांनी आमच्या प्रतिनिधी सांगितले

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


करबला युद्ध : मानव - कल्याणासाठीच परीवारासह ७२ वीरांनी पत्करले हौतात्म्य


 संपूर्ण जगात विविध कारणांसाठी अनेक युद्ध झालेत. लाखों कोटींच्यावर माणसे मारले गेलेत , त्यामध्ये अनेक आपल्या देशांसाठी -राष्ट्रांसाठी -धर्मांसाठी हौतात्म्य पत्करलेत .पण असेच एक मानवी कल्याणासाठीच संपूर्ण परीवारासह म्हणजे अगदी सहा महिण्यांच्या निरागस बाळाला ही हौतात्म्य पत्करावे लागलेला रणसंग्राम म्हणजेच " करबला" च्यां रणसंग्रामांच्या आठवणी आपसूकच " मोहर्रम "च्या दहा तारखेला यालाच अर्थात म्हणतात "यौम- ए - आशुरा " ला कितीही कठोरमनाच्या माणसाला भावना जाग्या होतातच.
प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी अल्लाहाच्या धर्म प्रसार-पचार करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहुन हाल- अपेष्टा काढून छळछावणीत- उपाशीपोटी- राहुन अगदी प्रामाणिकपणे सहनशीलतेचे अंत बघूनही त्याला अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत मध्य आशिया- युरोप-अफ्रीका खंडातील बहुतेक देशात सुव्यवस्थितपणे परिवर्तन घडवून आणले.जगातील प्रत्येक मानव कल्याणासाठी , त्यांच्या रक्षणार्थात जगात ठिकठिकाणच्या जुलमी राजवट राजेशाही, हुकूमशही, बादशही , परीवार वादी जुलमी राजव्यवस्था संपूर्णतः लोकशाही पद्धतीने आपल्या आचरणाने संपुष्टात आणुन ती लोकशाही व्यवस्था कशी असावी व कशा पद्धतीने चालवावी हे समस्त जगाला यांचे प्रात्यक्षिके" रोल मॉडेल " च पवित्र कुरआन- हादीस नुसार स्वतः" पवित्र मदीना शहरात " याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी जगप्रसिध्द आशा "मदीना करार " रूपी स्वरूपात करून जगाला दाखवून दिली.
  पैगंबर येथेच न थांबता आपल्या अनुयायींना (-सहाबां) नां आपल्या हयातीतच माझ्या मृत्यूनंतर संपूर्ण जगात शासन व्यवस्था कशा पद्धतीने चालवावी व निर्माण ही करावयास हवेत याचे प्रत्यक्षदर्शि प्रशिक्षण खास विश्वासू मित्रां (सहाबा) ना दिलेत .
           "खलिफा " म्हणून मुख्य प्रधान - (प्रशासकीय प्रमुख) खलिफा इस्लामी व्यवस्थेमध्ये प्रशासकीय प्रमुख असतो.त्याची निवड " मजलिस - ए - शुरा" च्या अनुसरून केली जाते .
 अर्थात तज्ञ-जाणकार लोकांचे सल्लागार मंडळ स्थापून त्यामधे सर्व संमतीने खलिफाची निवड केली जाते. व कारभार ही मजलिस ए सुरांच्या सल्ल्याने च चालत असतो .असो.
प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी स्वतः प्रमुख असून सुध्दा आपले निर्णय आपल्या साथीदार मित्रांशी सल्ला मसलत करुनच घेत. 
त्यातील खास प्रमुख गोष्ट म्हणजे त्या मध्ये किती ही छोट्या व गरीब सदस्यांनाही सल्ला देण्याचा आधिकार होता. यालाच खरोखरच लोकशाही पद्धती म्हणतात.असो.
                                    प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या महापरिनिर्वाणानंतर इस्लामी राजवट कोणी चालवायची यासाठी मजलिस ए सुरांच्या सल्ल्याने सर्वात अनुभवी वयोवृद्ध व्यक्ती म्हणून पुण्यवान ( राशिदीन) , (१) ह. अबु-बकर सिद्दीक रजि. यांना खलिफा करण्यात आले. त्यांनी दिड वर्ष खिराफत केली.
त्यानंतर दुसरे खलिफा २) ह.उमर फारुख रजि.यांनी ११ वर्ष खिलाफत केली.
तिसरे खलिफा म्हणून (३) ह. उस्मान गनी रजि. यांनी दहा वर्षे. चौथे खलिफा म्हणून (४) आली बिन आबु तालीब रजि. यांनी जवळपास पांच वर्षे खिलाफत केली.
या वेगवेगळ्या घराण्यातील कर्तव्यदक्ष साथीदारांची क्रमाक्रमाने पुढील चार खलीफांची निवड करून त्या सर्व जगभरातील लोकांना" एकनिष्ठता" ची शपथ ( बैत) दिली .
      या चारही खलिफांनी खूप चांगली-आदर्श इस्लामी राज व्यवस्था मध्य आशिया- युरोप- अफ्रीका खंडातील खूप देशात आपल्या प्रतिनिधी मार्फत चालवली.
   त्या चार ही खलिफांच्या राज व्यवस्थापनास " खुलफा - ए - राशिदीन " चे युग " म्हणतात . अर्थात या पुण्यंवान लोकांनी अल्लाह च्या पवित्र कुराण-हादिस च्या शिकवणुकीनुसार राज्य व्यवस्था चालवली. जगात आज ही राज नीती आजरामर आहे . 
राष्ट्रपीता महात्मा गांधीजी व विविध देशातील तज्ञांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या देशात तशी राजकीय व्यवस्था करण्याची गरज ही व्यक्त केली आहे ,असो.
चौथे खलिफा हज.अली बिन अबु तालीब रजि. यांच्या महानिर्वाणानंतर त्यावेळच्या 'सल्लागार (मजलिस ए शुरा) मंडळांने काही काळ ह. अलि. (रजि) यांचे ज्येष्ठ पुत्र ह. हसन रजि. यांना खलिफा म्हणून काही काळासाठी घोषित करण्यात आले. मात्र तीव्र स्वरूपाच्या विरोध, मतभेदांमुळे व निष्पाप जीव धोक्यात घालून, निष्पाप नागरिकांना त्रास व रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने हजरत इमाम हसन बिन हज.अली रजि. यांनी स्वतः हुन पदत्याग केला. काही काळानंतर विरोधकांनी ह. हसन रजि. यांना त्यांच्या विरोधाकांनी राजकीय शडयंत्र करून त्यांच्या अन्नात विष घालून त्यांची हत्या करण्यात आली. 
              याच प्रसंगानंतर प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांच्यां शिकवलेल्या तत्त्वाला हारताळ फासून मसजिस- ए- शुरा (कायदेमंडळा) ला डावलून स्वतः चीच मनमानी करून प्रेषित मुहम्मद स्व. यांचेच पुर्वीचे एक सहकारी आमीर मुआविया रजि. यांनी स्वत:ला स्वयंघोषित खलिफा म्हणून घोषित केले.त्यांनी इस्लामच्या तत्त्वप्रणाली नुसार राज्य न करता राजेशाही- बादशहा- हुकूमशाहा पध्दतीनुसार राज्य कारभार सुरू केला व राजेशाही राहणीमानात वागणूक व एक मोठा राजप्रासाद (महाला) ची बांधणी करुन राज्य कारभार करण्यात आला. 
हे इस्लामी संस्कृतीच्या तत्वप्रणालीच्या राज्य व्यवस्थेच्या बिलकूल विपरीत होते. हे इस्लामला कदापी ही मान्य नव्हते.इस्लाम फक्त साधं सरळ सोप्या पद्धतीने राहणीमानात व साध्या घरात राहुन राज्य कारभार करण्याची पद्धतीला सर्वोच्च प्राधान्य देतो . परंतु आमीर मुआविया येथे न थांबता त्यांनी अतिरेक पणाचा कळस गाठला व स्वतः च्या आपात्र मुलगा यजिद याची आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. वीस वर्षे राजेशाही राज्य कारभार करुन राजधानी मदीना वरुन कुफा (इराक) वरुन सिरिया येथे हलविण्यात आली. आपल्या मृत्यू पश्चयात आपात्र मुलगा यजिद 'यांस राजा करण्यात आले. यजिदच्या राजरोहणास- क्रुर शासन पध्दती होती .. लोकांनी जागोजागी त्याचा वेळोवेळी तीव्र विरोध होत होता. नागरिकांना प्रेषित मुहम्मद स्व. यांचे अवडते नातू हजरत हुसैन रजि. यांना खलिफा म्हणून निवड व्हावी म्हणून संपूर्ण जनमत होते , त्यासाठी नागरिक वारंवार पत्र व्यवहार मागणी याचना करून बारा हजारापेक्षा (१२०००) ही जास्त पत्रे लिहिली जाउन सर्वतोपरी मदत सहकार्य करण्याची ग्वाही देत होते . सर्वांच्याच मागणीची दखल घेऊन ह. इमाम हुसैन रजि. आपल्या खानदानातील मुलांबाळांसह वडील बंधू ह. हसन यांच्या व लहान बंधू च्या परीवारासह मदीना वरुन कुफा येथे जाण्यासाठी निघाले. ही बातमी ऐकून राजा यजिद घाबरून सर्व कुफा वासीयांना जो ह. इमाम हुसैन ला साथ-थारा देईल त्या सर्व साथ देणाऱ्यास मृत्यू दंड दिले जाईल आशी धमकी दिली.या धमकी ला नागरिक घाबरून आपले मत बदलली.
बादशहा यजिदने कुफाशहरातील आपल्या मुख्य गव्हर्नर ईबने जियाद यांस आदेश देण्यात आले की कोणत्याही परिस्थितीत ह. इमाम हुसैन यांना यजिदला बादशहा - राजा करण्यास राजी करावेत. नाहीतर सरळसरळ कैद करून दरबारात हजर करण्यात यावे. 
ह.माम हुसैन यांच्या प्रवासा दरम्यान फुरात नदीच्या काठावर करबला येथील मैदानावर गव्हर्नर ईबने यजिदने चार हजार सैनिकांसह ह. इमाम हुसैन यांच्या काफील्याला घेराव करून यजिदला बादशहा करण्यास सर्व आटी-शर्ती जुलूमशाहीने मान्य करण्यास हुकूम दिला. परंतु जालीम, अत्याचारी, कपटी यजिदला संमर्थन देण्यास ह.इमाम हुसैन यांनी स्पष्ट नकार दिला.. या नकारानंतर ईबने जियाद ने युद्धाचे स्पष्ट अव्हान केल्यानंतर ह. ईमान हुसैन नी रक्त, जीवितहानी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेत. तीन प्रस्ताव मांडले परंतु क्रुर गव्हर्नर जियाद याने मागेपुढे न पाहता सरळसरळ ह. हुसैन यांच्या वर क्रुर पणे अत्याचार करण्यास सुरुवात करून कुरातनदीच्या तीरावर असुन हुसैन च्या परीवारांस पाणी बंदी केली गेली, तीन दिवस म्हणजे ७२ तास रखरखत्या अरबस्थातील उन्हाळ्यात बिना पाण्याची कुंटूंबावर वेळ आली, हालहाल करून, सहा वर्षाच्या बाळ अली असगर यांच्या वर त्रिकोणी बाण मारुन हत्या केली, सात वर्षांच्या कासिम या ह. हसन यांच्या मुलाला घोडयाच्या टाचेखाली चिरडून ठार मारले. या युध्दात सर्व पुरुष शहीद (हौतात्म्य) झाले.
               हा दिवस १० मुहररम हिजरी ६१ ( 10 ऑक्टोबर ६८०) या दिवशी ७२ हुतात्म्यांनी फक्त लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेसाठी शहीद (हौतात्म्य) पत्करलेत.
करबला रणसंग्राम चा जगाला संदेश मिळाला की कोणत्याही अत्याचारी व्यवस्थेपुढे गुडघे टाकायचे नसतात तर बलिदान देण्यास तयार राहिले पाहिजे,
म्हणुनच शायर म्हणतो की.. " करबला के बाद इस्लाम जिंदा होता है.... "


=================================
-----------------------------------------------

*लेखक: डॉ. सलीम सिकंदर शेख* ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा हॉस्पिटल, श्रीरामपूर +91 9271640014,
===============
संकलन: समता न्यूज सर्व्हिसेस,💐✅🇮🇳...श्रीरामपूर  +91 +91 9561174111
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
===============================

Monday, July 15, 2024

संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्या समोर उपोषणास सुरवात


- मुज्जफर - शेख - / संगमनेर - वार्ता -
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील ते चार खंडणीखोर पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या समोर उपोषण 
प्रतिनिधी संगमनेर संगमनेर शहरात मागील काही दिवसापूर्वी अहमदनगर गुन्हे शाखेतील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कायद्याचे धाक दाखवून तसेच कठोर कारवाई करण्याची भीती दाखवून शहरातील दोन किरकोळ गुटखा विक्रेत्यांकडून सव्वा दोन लाख रुपये रक्कम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून वसूल करून शहरातून निघून गेले तसेच व गुटखा विक्रेत्यांना आपल्या गाडीत बसवून गंभीर मारहाण देखील केली होती तसेच एका गुटखा विक्रेता कडे तब्बल सात लाख रुपये खंडणी मागितली होती परंतु तडजोड करून दीड लाख रुपये खंडणी वसूल करण्यात ते यशस्वी देखील झाले तसेच 75 हजार रुपये एका गुटखा विक्रेत्यांकडून देखील घेतले या दोघांसोबत झालेल्या अन्याय न्याय मिळवून देण्यासाठी शहरातून एक आरटीआय कार्यकर्ता यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज पासून उपोषण सुरू केले आहे आता वरिष्ठ याची दखल घेता का तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करता का हे आता बघणे महत्त्वाचे ठरेल


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Sunday, July 14, 2024

पोलीस उपाधीक्षक संगमनेर कार्यालयासमोर उपोषण

- मुज्जफर शेख - संगमनेर - / वार्ता -
संगमनेर शहरातून २ लाख २५ हजार रुपयाची खंडणी वसूल करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर कार्यालयातील त्या चार पोलीस कर्मचारी यांना गजाळ करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपाधीक्षक संगमनेर कार्यालयासमोर उपोषण
प्रतिनिधी संगमनेर पोलीस अधीक्षक दिन शहर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे अधिपत्याखाली कार्याधर ला स्कोर पोलीस कर्मचारी सचिन अर्बल मोबाईल नंबर 79 99 17 30 47 रणजीत जाधव मोबाईल नंबर 93 56 82 31 40 व इतर दोन पोलीस कर्मचारी यांनी दिनांक 23 6 2024 रविवार रोजी रात्रीच्या वेळेस संगमनेर शहरात येऊन दोन गुटखा विक्रेत्यांकडून त्यांना कारवाईचा धाक दाखवून दोन लाख 25 हजार रुपयाची खंडणी वसूल केलेली आहे म्हणून यालाच स्कोर व खंडणीखोर त्या चार पोलीस कर्मचारी विरुद्ध चौकशी करून दाखल व्हावेत म्हणून पोलीस निरीक्षक संगमनेर यांना संगमेश शहरातील एक आरटीआय कार्यकर्त्यांनी नियमानुसार लेखी तक्रार करून ही कोणती कारवाई न झाल्याने व त्या चारही खंडणीखोर पोलीस कर्मचारी यांना पोलीस निरीक्षक संगमनेर यांनी पाठीशी घातले म्हणून दिनांक 15 सात 2024 रोजी पासून पोलीस उपाधीक्षक संगमनेर कार्यालयासमोर संगमनेर शहरातील एक आरटीआय कार्यकर्ता उपोषण करणार असून त्याबाबतचे उपोषणाची नोटीस त्यांनी पोलीस उपाधीक्षक संगमनेर तहसीलदार संगमनेर पोलीस अधीक्षक संगमनेर शहर यांना दिली असून त्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून खंडणी तसेच जबर चोरीचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे आरटीआय कार्यकर्ता यांनी आमच्या प्रतिनिधी सांगितले...


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================