राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, October 27, 2023

पुणे नाशिक अंतर कमी होणार, कसा आहे रस्ते आराखडा ‘द्रुतगती’ मार्ग


मुंबई - प्रतिनिधि - / वार्ता -
पुणे ते नाशिक प्रवासासाठी  पाच ते सहा तास लागतात. अंदाजे जवळपास 220 किलोमीटर असलेले हे अंतर पार करताना पुणे शहरातून बाहेर पडण्यास जवळपास एक तास लागतो. परंतु आता पुणे ते नाशिक प्रवास कमी वेळेत होणार आहे.
पुणे 27 ऑक्टोंबर 2023 : महाराष्ट्रात पुणे-मुंबई प्रमाणे पुणे-नाशिक प्रवास नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत. या प्रवासासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागतात. दोन्ही शहरांमधील जवळपास 220 किलोमीटर असलेले हे अंतर पार करताना वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. हा मार्ग द्रुतगती मार्ग नाही. यामुळे अनेक ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. आता पुणे ते नाशिक अंतर कमी होणार आहे. तब्बल 50 किलोमीटरने हे अंतर कमी होणार आहे. तसेच हा मार्ग सहा पदरी द्रुतगती मार्ग होणार आहे. यामुळे पुणे-मुंबई महामार्गाप्रमाणे वेगाने या मार्गावरुन जाता येणार आहे. या मार्गावर वाहनांचा वेग वाढून प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.


असा असणार हा महामार्ग
पुणे नाशिक द्रुतगती महामार्गाला सुरुवात पिंपरी-चिंचवडच्या तळवडे आणि चिखली लगतच्या म्हाळुंगे येथून सुरू होणार आहे. तसेच नाशिक फाटा ते चाकणपर्यंत असणारा महामार्ग सहापदरी रुंद करण्याचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. तळवडे येथे हा महामार्ग सुरु होणार असून म्हाळुंगे आंबेठाणकडून कोरेगाव येथे जाणार आहे. कोपरगाववरुन किवळे कडूस- चास घोडेगावपर्यंत हा द्रुतगती महामार्ग असणार आहे. त्यानंतर जुन्नर अकोले संगमनेर येथून नाशिक जिल्ह्यात हा महामार्ग पोहचणार आहे. नाशिक जिल्ह्यातून सिन्नरवरुन नाशिकपर्यंत द्रुतगती महामार्ग होणार आहे.
पुणे नाशिक जवळ येणार
पुणे नाशिक ही दोन्ही महत्वाची शहरे वेगवेगळ्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी पुणे ते नाशिक सेमीहायस्पीड मार्गाची घोषणा करण्यात आली. या रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात अजून सुरु झाले नाही. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी याकडे लक्ष दिले आहे. यामुळे लोकसभेच्या 2024 निवडणुकीपूर्वी या महामार्गासंदर्भात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन आणि पुणे नाशिक द्रुतगती महामार्गामुळे हे दोन्ही शहरे अधिक जवळ येणार आहेत. भविष्यात पुणे-मुंबई प्रमाणे पुणे नाशिक या दोन्ही शहरांचे महत्व वाढणार आहे.

===================================
---------------------------------------------------
: - शैलेंद्र कुलकर्णी - वार्ता प्रसारण -✍️✅🇮🇳...
---------------------------------------------------
===================================




*जिद्द,आत्मविश्वास व मेहनतीची तयारी असेल तर ग्रामीण विद्यार्थ्यांना परदेशातही संधीः माजी आ.भानुदास मुरकुटे*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - /वार्ता -
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही न्यूनगंडामुळे प्रगती होत नाही. आत्मविश्वास असेल व मेहनत करण्याची तयारी असेल तर देशातच नव्हे तर परदेशातही विविध संधी उपलब्ध आहे. धाडस व स्वकतृत्वावर विश्वास असेल तर हमखास यश मिळते, असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
        श्रीरामपूर येथील रहिवाशी व सध्या आॕस्टेलियातील सिडनीस्थित टोयाटो कंपनीचे टेक्निशियन पदावर कार्यरत असलेले सिताराम आप्पासाहेब लबडे यांचा अशोकनगर येथे अशोक शैक्षणिक संकुलाचे वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी श्री.मुरकुटे बोलत होते. यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव भास्कर खंडागळे, कार्यकारी अधिकारी तथा कारखाना संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, अशोक महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड, प्राचार्य अंजाबापू शिंदे, प्राचार्य प्रसाद कोते, प्राचार्य रईस शेख आदी उपस्थित होते.
            श्री.मुरकुटे म्हणाले की, श्री.लबडे यांनी आय.टी.आय. केले. त्यानी काही काळ भारतात नोकरी केल्यावर ते आॕस्ट्रेलियात गेले. आज ते नामांकीत कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. जिद्द,आत्मविश्वास व मेहनतीची तयारी असेल तर यशस्वी होता येते हे श्री.लबडे यांनी कृतीतून दाखविले आहे. त्यांचेपासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांना निमंञित केल्याचे श्री.मुरकुटे म्हणाले. यावेळी श्री.लबडे यांचा माजी आ.मुरकुटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.आर.कडू यांनी केले. यावेळी अध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*इम्रान एस.शेख*
( *सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ)
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

देशाच्या राष्ट्रीय आपत्तीत मदत करणारी अग्रेसर संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ -प्रा बारहाते*💐🙏🇮🇳...

🌹🥀🌺🌷🌸 ✅ 🇮🇳

*देवीदास देसाई - बेलापुर*
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या महाराष्ट्रात एकुण ७३१८६ शाखा असुन समाजातील प्रश्नांचा अभ्यास करुन जनजागृती करणाऱ्या २७ उपसंस्था आहेत त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीत मग किल्लारीचा भुकंप असो ,आसाम पुरग्रस्तांचा प्रश्न असो किंवा अलीकडील कोरोना असो सर्वात आगोदर मदत कार्य पोहोच करणाऱ्यामध्ये संघ प्रथम स्थानी असल्याचे मत ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा ,डाँ. गोरख बारहाते यांनी व्यक्त केले . विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बेलापुर शाखेच्या वतीने पथसंचलन तसेच बेलापुर जे टी एस हायस्कूलच्या प्रांगणात शस्र पुजन सोहळा संपन्न झाला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डाँ.बारहाते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख संघटक राजेंद्र देशपांडे तसेच उत्तर अहमदनगर जिल्हा कार्यवाह लहु शिंदे उपस्थित होते.
प्रा. डाँ. गोरख बारहाते पुढे म्हणाले की आजचा विजयादशमीचा दिवस म्हणजे संघ स्थापनेचा दिवस आज संघ स्थापनेला ९८ वर्ष पुर्ण होत आहे .समाजासाठी सतत काम करणारी एकमेव संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ. लोक संघाविषयी उलट सुलट चर्चा करतात पण संघाचे कार्य शिस्तबध्द तसेच संघातील प्रत्येक स्वंयसेवक हा शिस्तप्रिय आहे संघ जात भेद मानत नाही संघाच्या परमपवित्र ध्वजाखाली सर्व समान असतात म्हणून तर संघाचे संघटन दिवसेंदिवस मजबुत होत चालले आहे आसेही प्रा, बारहाते म्हणाले,
या वेळी नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख संघटक राजेंद्र देशपांडे म्हणाले की बाल तसेच तरुण मनावर संस्कार करणारा संघ हाच एकमेव परिवार आहे.आरएसएस एक संवाद आहे आज आपल्यातील समाजातील संवाद हरपत चालला आहे . संवादामधील स नाहीसा झाल्यामुळे केवळ वाद निर्माण होत आहे आपली भाषा शुद्ध हवी आपली भुषा पेहेराव चांगला पाहीजे ,आपले भोजन सात्वीक पाहीजे तसेच भ्रमण केले पाहीजे ते करताना निरीक्षण केले जावे या सर्व बाबी संघात शिकविल्या जात असल्याचेही देशपांडे म्हणाले प्रारंभी संघाचे घोषासह गावातुन संचलन काढण्यात आले होते.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील १४ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*गरिबीतून मुक्ती हाच खरा सामाजिक न्याय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*महाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटीबध्द*

*राजेंद्र बनकर - शिर्डी*
(उमाका वृत्तसेवा शिर्डी)

 गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणे हाच खरा सामाजिक न्याय आहे. केंद्र शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ही गरीब कल्याणआहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. महाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन कटीबध्दअसल्याची ग्वाहीदेखील प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शिर्डी विमानतळाजवळ असलेल्या काकडी येथील मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात आज प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संगणकीय कळ दाबून महाराष्ट्रातील १४ हजार कोटी रूपयांहून अधिक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार राम शिंदे, आ.बबनराव पाचपुते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

"पाच वर्षांपूर्वी शिर्डीत आलो होतो तेव्हा साई शताब्दी वर्ष होते‌. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती‌‌." असे वाक्य मराठीतून बोलून आपल्या भाषणाला प्रधानमंत्र्यांनी सुरूवात केली.प्रधानमंत्री श्री. मोदी यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राला पन्नास वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे आज जलपूजन करून लोकार्पण झाले. यामुळे या भागातील शेती पाण्याखाली येणार आहे. पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. तेव्हा पाण्याचा जपून वापर झाला पाहिजे, अशी अपेक्षाही प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.‌

श्री साईबाबा मंदीर दर्शनरांगेचे आज लोकार्पण झाले.दर्शन रांग प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे देश विदेशातील भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

वारकरी संप्रदायाचेवैभव बाबा महाराज सातारकर यांचे आज दुखद निधन झाले. त्यांनी कीर्तन-प्रवचनातून माध्यमातून समाज जागृतीचेकाम केले, अशा शब्दात त्यांनी यावेळी बाबा महाराजांना श्रध्दांजली अर्पण केली.

महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्मान भारत कार्ड देण्यात येणार आहेत. या सर्वांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.गरिबांना मोफत शिधावाटप योजनेवरही ४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांच्या मोफत आवास योजनांसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हर घर जल पोहोचविण्यासाठी आतापर्यंत २ लाख कोटी खर्च करण्यात आले आहेत.पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत देखील पथारी व्यवसायातील लाभार्थ्यांना हजारो रुपयांची मदत मिळत आहे.आता प्रधानमंत्रीविश्वकर्मा योजना सुरू केली आहे. यातून सुतार, सोनार, कुंभार, मूर्तिकार असे लाखो कारागिरांना प्रथमच शासनाकडून मदत मिळणार आहे. या योजनेवरही १३ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत,असे श्री. मोदी यांनी सांगितले.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी छोट्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून या योजनेतून २ लाख ६० हजार कोटी रुपये दिले आहेत. या योजनेत महाराष्ट्रातील छोट्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २६ हजार कोटी थेट पध्दतीनेवर्ग केले आहेत. १९७० मध्ये घोषणा झालेल्या निळवंडे धरण प्रकल्प मागील पाच दशकापासून रखडला होता.शासनाने या प्रकल्पाला गती दिली.राज्यातील अवर्षणप्रवण भागासाठी सुरू केलेली बळीराजा जल संजीवनी योजना प्रभावी ठरणार आहे. असे ही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत अंतर्गत गेल्या सात वर्षात साडेतेरा लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.एमएसपीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्याची व्यवस्था केली आहे. नुकतीच रब्बी पिकांसाठी एमएसपीची घोषणा केली असून त्यात चना, गव्हाच्या एमएसपी मध्ये वाढ करण्यात आली आहे. ऊसाचे मूल्य ३१५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. गेल्या ९ वर्षात ७० लाख कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी केले आहे. शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळावेत म्हणून साखर कारखान्यांना लाखो कोटींची मदत शासनाने केली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

सहकारी चळवळीला बळकट करण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. देशभरात २ लाख पेक्षा अधिक सहकारी संस्था स्थापन केल्या जात आहेत. सहकारी संस्थामार्फत कोल्ड स्टोरेज उभारण्यात येत आहेत. छोट्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक संघांच्या माध्यमातून संघटित केले असून जितका महाराष्ट्राचा विकास होईल तितकाच वेगाने देशाचा विकास होईल.असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात रेल्वेच्या विस्ताराबरोबर रस्ते विकासाचे काम सतत चालू आहे. ही दळणवळण साधने प्रगती आणि सामाजिक विकासाच्या नवे मार्ग बनतील, असेही प्रधानमंत्र्यांनी सांगितले.

२०४७ साली देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असताना जगात भारताचे नाव विकसित भारताच्या रुपात असेल हा संकल्प करूया असेही श्री .मोदी म्हणाले.

*राज्यात केंद्राच्या सहकार्यातून २ लाख कोटींची विकासकामे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात २ लाख कोटी रूपयांच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आतापर्यंत झाले आहे. देशाचा सर्वंकष विकासाचा ध्यास घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे जात आहेत.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, देशाला महासत्ता बनवण्यासाठी श्री मोदी अविरतपणे कार्य करत आहेत तोच आदर्श घेऊन आपले सरकार सुद्धा गोरगरिबांच्या विकासासाठी काम करत आहे. राज्यात नवीन विकास योजना आणण्याचे महत्त्वपूर्ण काम श्री मोदी यांनी केले आहे.
राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला असून गोरगरिबांना यामाध्यमातून विनामूल्य उपचार उपलब्ध करून दिला जात आहे. नागरिकांना पाच लाखापर्यंत विविध आरोग्य विषयक सुविधांचा कॅशलेस स्वरूपात लाभ दिला जात आहे,असेही त्यांनी सांगितले.
शिर्डी साईबाबा मंदीर दर्शनरांगेचा फायदा असंख्य भाविकांना होणार आहे. असे त्यांनी सांगितले.

*पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भांला देण्याचा आराखडा तयार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २०१७ मध्ये शिर्डी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन केलेल्या कामांचे उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते होत आहे. जगभरातून साईभक्त येथे येतात त्यांच्याकरिता अनेक सुविधा देण्यात येत आहेत. अनेक वर्षापासून वाट पाहायला लागलेल्या निळवंडे प्रकल्पाला २०१६ - १७ मध्ये आम्ही गती दिली.गेल्या ९ वर्षात प्रधानमंत्र्यांनीमहाराष्ट्रातील सिंचन योजनांसाठी ३० हजार कोटी रूपये दिल्यामुळे राज्यात अनेक सिंचन योजना राबविता आल्या.पीएम किसानच्या धरतीवर आम्ही नमो किसान सन्मान निधी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्राचा ५० टक्के भाग अवर्षणग्रस्त आहे. या भागाला पाणी दिल्याशिवाय महाराष्ट्रातील आत्महत्याची संख्या कमी होणार नाही. पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी नदीपात्रात वळते करून मराठवाडा सुजलाम सुफलाम करू शकतो. या योजनेचा आराखडा तयार केला आहे. तसेच वैनगंगा नदीच्या खालील भागातून वाहून जाणारे १०० टीएमसी पाण्यापैकी ६७ टीएमसी पाणी नळगंगा मध्ये आणू शकतो. ज्यातून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू शकतो. यासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पांनाही मदत करावी. अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांकडे व्यक्त केली.

*केंद्रशासनाच्या पाठबळामुळे निळवंडेचे स्वप्न साकार - अजित पवार*

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाच्या ५३ वर्षाच्या इतिहासात निळवंडे धरण प्रकल्पास गती मिळाली नव्हती. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र शासनाने या प्रकल्पास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे स्वप्न साकार झाले आहे. महाराष्ट्र ही भक्ती - शक्तीची भूमी आहे. प्रधानमंत्री यांच्या भेटीतून लोककल्याणासाठी काम करण्याची उर्जा मिळणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे विकास हे समीकरण घट्ट झाले आहे. आज अनेक प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. निळवंडे धरण होत असतांनाच योग्य प्रकारचीपीके घेण्यात यावे. शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज व एक रूपयात पीक विमा असे अनेक कल्याणकारी निर्णय शासनाने घेतले आहेत. असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे यावेळी स्वागतपर भाषण झाले. निळवंडे धरण प्रकल्पामुळे लाभक्षेत्रातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. अहमदनगर जिल्हा केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीत आघाडीवर असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी संपत नाना राक्षे, खरैनूसा बशीर शेख, सविता गणेश राजभोज यांना आयुष्यमान कार्ड तसेच स्वामीत्व योजनेचे लाभार्थी दगडू भागवत गिते, शहाजी शंकर लोके यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी, मेरी माटी मेरा देश अभियानात अहमदनगर जिल्ह्यातून संकलित करण्यात आलेल्या मातीचा कलश प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
*या विकास प्रकल्पाचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन व लोकार्पण*


👉 *महाराष्ट्रात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी ’ योजनेची ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रूपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करून शुभारंभ*

👉 *शिर्डी येथे भाविकांच्या सुविधेसाठी नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन (प्रकल्प खर्च रू.१०९ कोटी)*

👉 *निळवंडे धरण डाव्या कालव्याचे लोकार्पण (रू.५१७७ कोटी )*

👉 *राष्ट्रीय महामार्ग-१६६ च्या सांगली व बोरगाव चौपदरीकरण टप्प्याचे लोकार्पण (रू.११०२ कोटी)*

👉 *जळगाव ते भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण (रू.६४० कोटी)*

👉 *कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण प्रकल्पाचे लोकार्पण (रू.२३७ कोटी)*

👉 *मनमाड गॅस टर्मिनल येथे अतिरिक्त सुविधांचा शुभारंभ (रू.२२१ कोटी)*

👉 *अहमदनगर येथे माता व बाल आरोग्य जिल्हा रूग्णालय भूमिपूजन (रू.२५.४५ कोटी)*

👉 *राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत अहमदनगर येथील आयुष रूग्णालय उद्घाटन (रू.९ कोटी)*

👉 *१.११ कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा शुभारंभ*

 👉 *स्वामित्व योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप*

===================================
---------------------------------------------------
 *पत्रकार अजीजभाई शेख - राहाता*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================





Thursday, October 26, 2023

निळवंडे धरणाचे प्रधानमंत्री नरेंद्र* *मोदी यांच्या हस्ते जलपूजन संपन्न* 🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*दुष्काळी भाग होणार सुजलाम सुफलाम*
*६७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली*

*पत्रकार रमेश कापकर संगमनेर* 
अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगांव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६७ हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज निळवंडे धरण साईट येथे कोनशिलेचे अनावरण करून जलपूजन करण्यात आले. त्यानंतर डाव्या कालवा मार्गिकेचे कळ दाबून पाणी सोडण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.

-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-

*असे आहेत निळवंडे*
*धरणाची प्रमुख वैशिष्टे*

● उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे २) हा महाराष्ट्र राज्यातील एक मोठा पाटबंधारे प्रकल्प असून मौजे निळवंडे, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे प्रवरा नदीवर बांधण्यात आलेला आहे.

● धरण Gravity type Masonary dam असून धरणाची एकूण लांबी ५३३ मीटर व महत्तम उंची ७४.५० मीटर इतकी आहे. धरणाचा सांडवा ओगी प्रकारचा असून त्यावर १२ मीटर x ६.५ मीटर आकाराच्या ५ वक्राकार द्वारांची उभारणी केली आहे. धरणाचा एकुण पाणीसाठा २३६ द.ल.घमी (८.३२ TMC) आहे.

● प्रकल्पाच्या ८५ कि.मी. लांबीच्या डाव्या व ९२.५० कि.मी. लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे तसेच जलाशयावरील ४ उपसा सिंचन योजना तसेच उच्चस्तरीय पाईप कालव्यांद्वारे एकूण ६८ हजार ८७८ हेक्टर एवढी सिंचन क्षमता प्रस्तावित आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील २४ गावांमधील ४ हजार २३५ हेक्टर, संगमनेर तालुक्यातील ८० गावांमधील २५ हजार ४२८ हेक्टर, कोपरगांव तालुक्यातील ११ गावांमधील ५ हजार ६६६ हेक्टर, राहाता तालुक्यातील ३७ गावांमधील १७ हजार २३१ हेक्टर, श्रीरामपूर तालुक्यातील ३ गावांमधील ९९९ हेक्टर, राहुरी तालुक्यातील २१ गावांमध्ये ८ हजार ८९ हेक्टर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २ हजार ६१२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. अशा एकूण १८२ दुष्काळी गावांतील ६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

<-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><->
*पत्रकार रमेश कापकर - संगमनेर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
<-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><->


*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले* *श्री साईबाबा समाधीचे दर्शन*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

राजेंद्र बनकर/ शिर्डी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते साई बाबांची पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी साई मंदिराची पाहणी करून मंदिरात उपस्थित भाविकांना अभिवादन केले.

===================================
---------------------------------------------------
पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
*सहयोगी* ✍️✅🇮🇳...स्वाभिमानी संपादक सेवा संघ
---------------------------------------------------
===================================


*आरोग्य धनसंपदा* *गर्भधारणेची पूर्वतयारी*


डॉ.प्रणाली सायंकार-हिंगणघाट
बाळावर चांगले संस्कार करण्याची सुरुवात ही गर्भापासूनच होते. प्रत्येक आई-वडिलांचेच आपल्या मुलाचा चांगला सांभाळ करण्यासोबतच चांगले संस्कार करण्याचे स्वप्न असते.घरात लहान बाळ येणार असलं की त्याची तयारी घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने करु लागतो. मग त्या नव्या पाहुण्याचे स्वागत कसे करायचे? त्याला कम्फर्टेबल वाटेल अशी घरातील जागा कोणती? त्याचं नाव काय ठेवायचं? त्याच्यासाठी शॉपिंग काय करायची? याविषयी घरातील सर्वजण उत्सुक असतात. तर आई-वडिलांचा आनंद तर या काळात गगनी मावत नसतो. बाळ येणार हा आनंद एका बाजूला आणि येणा-या बाळाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्याच्या जबाबदारीचा ताण एका बाजूला अशा द्विधा मनस्थितीतून पालक जात असतात.जसं बाळाचं शरीर निरोगी व सुदृढ राहवं म्हणून ते प्रयत्न करतात अगदी तसंच ते बाळावर गर्भातच संस्कार करण्यासाठीही प्रयत्न करतात. भारतीय संस्कृतीत अनेक चालीरितींचे पालन केले जाते त्यापैकीच गर्भसंस्कार ही देखील एक महत्त्वाची पद्धत आहे. गर्भसंस्कार यामध्ये गर्भ म्हणजे बाळ व संस्कार म्हणजे त्या बालावरील संस्कार असा त्याचा अर्थ आहे. गर्भावस्थे दरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणे व सकारात्मक विचार व नैतिक मुल्य गर्भावर रुजवणे म्हणजेच गर्भसंस्कार होय! 
प्रत्येक महिलेसाठी आपण आई होणार आहोत हे कळणे हा अत्यंत खास क्षण असतो. महिन्याला येणारी पाळी अर्थात मासिक पाळी चुकली की मनात शंकेची पाल चुकचुकते आणि मग आपण प्रेग्नंट अर्थात गरोदर तर नाही ना? हाच मनात पहिला विचार येतो. गर्भधारण नंतर निरोगी बाळाच्या जन्मासाठी, गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी गरोदरपणात स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. चांगले अन्न गर्भवती स्त्रीला तंदुरुस्त आणि निरोगी बनवते, तसेच अन्नाचा थेट परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. त्याचबरोबर सकस व पौष्टिक अन्नामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या समस्याही टाळता येतात. गर्भधारणेदरम्यान स्त्री जे काही खाते त्याचा परिणाम पोटातील बाळावर होत असतो. मुलांचा मेंदू तीक्ष्ण असतो, त्याला संपूर्ण पोषण मिळाले तर प्रसूतीनंतर सुदृढ बालकाचा जन्म होतो. 

*या विषयावर हिंगणघाटच्या सुप्रसिद्ध डॉक्टर प्रणाली सायंकार यांनी आपले काही मत व्यक्त केले आहेत,ते कोणते हे आपण जाणून घेऊयात*

त्या दिवशी ओ पी डी मध्ये पाहिलीच पेशंट दीड महिन्याची गर्भवती फक्त २२ वर्षाची होती तिचे शुगर लेवल प्रचंड वाढून होते
            इतके जास्त शुगरचे प्रमाण होणाऱ्या बाळासाठी घातक असल्यामुळे नाईलाजाने आम्हाला गर्भपाताच्या निर्णय घ्यावा लागला गेल्या काही वर्षापासून गर्भ अवस्था व डिलिव्हरी प्रसूती संबंधित प्रॉब्लेम्स खूप वाढले आहेत 
सिझेरियनचे प्रमाण वाढत आहे बदललेली जीवनशैली प्रदूषण इत्यादी कारणामुळे प्रत्येक वयातील शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे अगदी कमी वयातही डायबिटीस मधुमेह लठ्ठपणा अश्या समस्या खूप जास्ती प्रमाणात दिसून येत आहे या सगळ्यांच्या परिणाम होणाऱ्या बाळावर निश्चितच होतो म्हणूनच आज-काल प्रेग्नेंसी आणि डिलिव्हरी किती कठीण होत चालले आहे ओरड न करता त्याचे मुळे कारण काय आहे हे जाणून घेणे आणि त्यासंबंधी उपाययोजना करणे हे जास्ती आवश्यक आहे,प्रीकन्सेपशनल कौन्सिलिंग किंवा गर्भधारणापूर्वीची तयारी म्हणजेच गर्भधारणा करण्यापूर्वीच स्त्री आणि पुरुष या दोघांनीही आपण त्यासाठी योग्य प्रकारे तयार आहोत का याची चाचणी करून घेणे यासाठी खालील काही मुद्दे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

*गर्भधारणेचे वय*

खूप कमी वय आणि खूप जास्ती वय या दोन्हीही स्थितीत
प्रेग्नेंसी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स होण्याची रिस्क धोका जास्ती असतो आजकाल शिक्षण करियर या सर्वामुळे मुलीच्या लग्नाचे वय पर्यायने गर्भधारणा चे वय वाढत आहे,
यामुळे बाळामध्ये शारीरिक व्यंग आणि स्त्रियांना बीपी शुगर असे प्रॉब्लेम येण्याची शक्यता जास्त असते साधारणता २२ ते ३०,३२ वयापर्यंत दोन्ही प्रेग्नेंसी आटोपलेल्या बऱ्या.

*वजन*

खूप जास्ती लठ्ठपणा आणि खूप कमी वजन या दोन्ही गोष्टी प्रेग्नेंसी साठी घातक आहेत, लठ्ठ मुलींच्या पोटी जन्मलेल्या बाळांना न्यूरल ट्यूब डेफिट्स हार्ट डेफिट्स आणि आईला बीपी शुगर असे प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता जास्ती असते कमी वजनाच्या आईच्या बाळाचे वजन कमी असते वेळे आधी प्रसूती (प्रीमॅच्युर बर्थ) अशा गोष्टीची रिस्क धोका असतो.

*मासिक पाळीचे पॅटर्न*

जंक फूड लठ्ठपणा फिजिकल एक्सरसाइज च्या अभाव यामुळे हार्मोन्स ईमबॅलन्स व पर्यायांनी मासिक पाळी संबंधित प्रॉब्लेम्स मुलींचे खूप वाढलेले आहे, गर्भधारण पूर्वी मासिक पाळी नियमित येणे व मासिक पाळीच्या स्त्राव योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.

*आहार*

होणाऱ्या आईच्या शरीरामध्ये विटामिन कॅल्शियम मायक्रो न्यूट्रियन्स लोह इत्यादींची कमी असल्यास होणाऱ्या बाळावर त्याच्या निश्चितच परिणाम होतो, प्रेग्नेंसी प्लान करण्यापूर्वी कमीत कमी एक ते दोन महिन्यापूर्वी पासून फॉलिक ऍसिड रिप्लिमेंटीशन घेणे आवश्यक आहे.

*फॉलिक ऍसिड*

 सेप्लीमेंटेंशन,ओबेसथेटिक हिस्ट्री/पर्सनल अँड फॅमिली हिस्ट्री

कधीही पहिल्या प्रेग्नेंसी मध्ये काही कॉम्प्लिकेशन झाल्यास गर्भपात झाल्यास पुढील प्रेग्नेंसी ठेवण्यापूर्वी डॉक्टरच्या सल्ला घेणे जरुरी आहे मुलींना अस्थमा डायबिटीस झटक्यांची बिमारी अशा कुठल्याही प्रकारच्या आजार असेल आणि त्याचे काही औषधी चालू असल्यास प्रेग्नेंसी प्लान करण्यापूर्वी डॉक्टर ना जरूर भेटा तुमच्या कुटुंबामध्ये कोणालाही मतिमंद पणा किंवा शारीरिक व्यंग असलेले बाळ असेल तुमच्या आई-बाबांना ब्लडप्रेशर मधुमेह अशा प्रकारचे आजार असतील तर अशा परिस्थितीत गर्भधारणापूर्वी डॉक्टरची सल्ला घ्या युरीन इन्फेक्शन पांढऱ्या पाण्याचे इन्फेक्शन असल्याच त्याची अगोदरच आणि समुळ उपचार करणे जरुरी आहे.

*रक्त चाचण्या*

गर्भधारणे पूर्वी स्त्री आणि पुरुष यांच्या हेमोग्लोबिन,सीबीसी, रक्तगट, रक्तातील साखरेचे प्रमाण, थायराइड प्रोफाइल, सिकलसेल/थेलेसेमिया, अशा सर्व प्रकारच्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे,
             शक्य असल्यास रूबेला हिपर्टायटिस- बी यांचे लसीकरण करून घेतल्यास फारच उत्तम.

*देखो इन्हें यह है औस की बूंदे*

*पत्तों की गोद में आसमान से कुंदे*

*अंगड़ाई ले फिर करवट बदलकर* 

*नाजुक से मोती हंस दे फिसल कर*

*खो ना जाए यह तारे जमी पर*

येणारे नवीन बाळ आयुष्यभर शारीरिक व मानसिक दृष्ट्याने स्वस्थ रहावे ही प्रत्येकांची जबाबदारी आहे या दिशेने आपण पाऊले उचलल्यास फक्त स्वच्छ भारताचे नवे तर सुदृढ आणि सुसंस्कारीत भारत ही संकल्पना प्रत्यक्ष आकारात येण्यास निश्चितच मदत होणार आहे.
*डॉक्टर प्रणाली सायंकार*
(स्त्रीरोग तज्ञ)
अध्यक्षा : इंडियन मेडिकल असोसिएशन 
(आय.एम.ए.) हिंगणघाट जि.वर्धा

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार इस्त्याकभाई शेख*
( *सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ) हिंगणघाट जि.वर्धा 
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================