राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, September 21, 2024

डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या कथा संस्कारशील - गुरुवर्य शांतीब्रह्म महंत भास्करगिरीजी महाराज


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी माझ्या हस्ते अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले, त्यांनी अनेक पुस्तके भेट दिली. आता त्यांचा नवा कथासंग्रह हाती आला आणि कथा वाचून मी प्रभावीत झालो, त्यांच्या कथा संस्कारशील आहेत असे मत देवगड संस्थानचे गुरुवर्य शांतीब्रह्म महंत भास्करगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
येथील साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी आपला नवा कथासंग्रह' माकडांच्या हाती शाळेची खिचडी' आणि' साहित्यशोध' ही पुस्तके महंत भास्करगिरीजी महाराजांना दिली, त्यातील आणि कमल सापडली' आणि इतर कथा वाचल्या नंतर महंत भास्करगिरी महाराज हे प्रतिक्रिया देताना बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार ऍड. बाळासाहेब तनपुरे यांनी डॉ. उपाध्ये यांच्या व्यक्तित्व आणि साहित्याचा परिचय करून दिला. 
प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी सांगितले की, देवगडसारख्या पवित्र ठिकाणीचे भक्ती आकर्षण पत्रकार, साहित्यिक, समाजसेवक आणि सर्व समाजाला आहे, परमपूज्य किसनगिरी महाराजांनंतर गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज यांचे योगदान खूप मोठे आहे, त्यांनी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या कथेचे मनापासून वाचन करून अभिप्राय दिला, 
हे महाराजांचे वाचनप्रेम आगळे वेगळे असल्यामुळेच आम्हाला देवगड म्हणजे भूलोकीचा स्वर्ग वाटतो असे सांगून स्वच्छ, निर्मळ आणि भक्तिमय देवगडचे कौतुक केले.
        डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या पुस्तकांची ओळख करून दिली. पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे ' माकडांच्या हाती शाळेची खिचडी' हा मार्मिक कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला, त्यातील'-- आणि कमल सापडली' ही कथा विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ठ झाली असल्याची माहिती दिली. महंत भास्करगिरी महाराजांनी कथा अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल डॉ. उपाध्ये यांचे विशेष अभिनंदन करून आशीर्वाद दिले. यावेळी अनेक संत, भक्तगण उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

विठ्ठलवाडी मनपा शाळेत शिक्षक रिक्त पद त्वरित भरावे.- जयप्रकाश सातव पाटी


विठ्ठलवाडी मनपा शाळेत शिक्षक रिक्त पद त्वरित भरावे.- जयप्रकाश सातव पाटील

पुणे (वाघोली) प्रतिनिधी
पुणे जिल्हा अध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडीचे जयप्रकाश सातव पाटील यांनी पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उप-आयुक्त आशाताई राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वाघोली विठ्ठलवाडी येथील मनपा शाळेतील शिक्षक रिक्त पद त्वरित भरण्याबाबत निवेदन दिले. या शाळेत असंख्य गोरगरीब मजुरांची मुले मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे. त्यांच्या शिक्षणाबाबत कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या दृष्टीने प्रशासन स्तरावर लवकरात लवकर प्रयत्न केले जावेत
तसेच विठ्ठलवाडी शाळेतील असलेल्या समस्या बाबत सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर जयप्रकाश सातव पाटील यांनी स्वतः स्वखर्चाने या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चिमटे सर, संकेत जगदाळे,विनायक जगताप इत्यादी उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग*


विठ्ठलवाडी मनपा शाळेत शिक्षक रिक्त पद त्वरित भरावे.- जयप्रकाश सातव पाटील*


=================================
-----------------------------------------------
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे, शिरसगांव 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

ईद ए मिलाद उन नबी, राहाता शहरात मोठ्या उत्साहात साजरी


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता 
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राहाता शहरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद उन नबी) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून भव्य झेंडा रॅली (जुलूस) मिरवणूक काढत मुस्लिम बांधवाच्यावतीने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मिठाई, चॉकलेट, बिस्कीट आदींचे वाटप करण्यात आले. येथील सय्यद बाबा दर्गाह येथून कुरान पठन करुन मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला होता,सदर मिरवणूक छत्रपती संभाजी चौक, चितळीरोड जिल्हा परिषद मराठी शाळा समोरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक, तय्यबा मस्जि़द, कोपरगांव नाका, शनी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते ह.सय्यदबाबा दर्गाह याठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली. 
या प्रसंगी उपस्थित नागरिकांना इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांची दिलेल्या शिकवणीबाबत जावेद अत्तारी यांनी प्रवचन करत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला दिलेला मानवतेचा संदेश याविषयी आपल्या प्रवचनाद्वारे सांगितले की, हजरत मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणी प्रमाणे मानवाने कधीच उच - निच गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांशी प्रेमाने वागावे, तो कोणताही जाती-धर्माचा किंवा पंथाचा असो त्याच्याशी सौजन्याने वागावे, आपल्या शेजारच्यांची नेहमी मदत करावी, होईल तितके ज्ञान प्राप्त करावे,जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे, स्त्रियांना मुलभूत हक्क अधिकारांसोबत सन्मानाची वागणूक द्यावी. वडीलधारें तथा आपल्या माता - पितांचा आदर सन्मान करावा, त्यांना केवळ आपण मोबदला देऊन मुक्त झालो असे कधीच समजू नये, त्यांनी जसा आपला सांभाळ, संगोपन केले आहे तसेच आपणही त्यांचा सांभाळ, संगोपन करावा. असेही त्यांनी स्पष्ट केले.
तदनंतर नियाज (मिठाई प्रसाद) वाटप करण्यात आले. 
यावेळी पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे साहेब , सामाजिक कार्यकर्ते हाजी मुन्नाभाई शाह, पप्पू भाऊ बनसोडे , धनंजय निकाळे, ज्येष्ठ पत्रकार शाह मुश्ताकअली, पत्रकार संदीप वाव्हळ ,पत्रकार किरण वाबळे, पत्रकार चोखर, ईलियासभाई शाह, ऍड.अजीम शेख, इफ्तेकार शेख, नाजीम शेख, तौफीक शेख, सामाजिक कार्यकर्ते तथा आर.टी.ओ. कन्सल्टंट रियाजभाई शेख, अहेमदभाई रेडिएटरवाले, अजीजभाई शेख, मौलाना हाफिज अकीब रज़ा,मौलाना अकबर साहब ,मौलाना शाहरुख मिसबाही,मौलाना अहमद कादरी, अय्याज बैग, जावेद अत्त्तारी,डॉक्टर नजीर शेख, मुसा बेग, अकील बेग, इशराक भाई बेग,अश्फाक बेग,अनवर शेख, राजा भाऊ पाळंदे, अख्तर शेख,शरीफभाई शेख व शहरवासी उपस्थित होते. प्रवचनानंतर शाल व पुष्पगुच्छ देऊन राहाता पोलिस कार्यालयाचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.आयोजक अध्यक्ष. मुसा बेग यांनी उपस्थितांचे आभार मानले.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Friday, September 20, 2024

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न


आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करा - राज्यपाल

- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता,-
 जीवनात अनेक समस्यांना सामोरे जातांना न डगमगता आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास यश संपादन करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

तालुक्यातील लोणी बु. येथील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे, संस्थेचे विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, मोनिका सावंत, ध्रुव विखे पाटील, कुलसचिव डॉ. अरुण कुमार व्यास आदी उपस्थित होते.

स्नातकांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन राज्यपाल म्हणाले, अनेक महापुरुषांच्या जीवनात आव्हानाचे प्रसंग आलेत, त्यांनी आत्मविश्वासाने त्यावर मात करून उद्दिष्ट गाठले. स्नातकांनी सेवा भावनेने कार्य करताना स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नये. आपल्या यशासाठी आई-वडिलांनी परिश्रम घेतले आहेत हे न विसरता त्यांच्याविषयी कायम श्रद्धा मनात बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.राधाकृष्णन पुढे म्हणाले, लोणीसारख्या ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी आणि समर्पित कार्याच्या बळावर प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठासारखी संस्था उभी राहू शकते हे संस्थेसाठी झटणाऱ्या स्व.विठ्ठलराव विखे पाटील आणि स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे विद्यापीठाचे कार्य इतरांना मार्गदर्शक आहे.

वर्षभरात दहा लाख नागरिकांना उपचार देण्याचे संस्थेचे कार्यदेखील उल्लेखनीय आहे. सामान्य कुटुंबीयातून आलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण विद्यापीठात देण्यात येते. सेवाभावनेने काम करणारे डॉक्टर्स येथून तयार होतात. विद्यापीठाने रुग्णावर उपचार करण्यासाठी बहुशाखीय दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि अवयव प्रत्यारोपणसारख्या सुविधा इथे उभारण्यात येत आहेत. संस्थेची प्रगती खरोखर कौतुकास्पद असल्याचे राज्यपाल म्हणाले.

*सामाजिक बांधिलकीतून आरोग्य सेवा देण्याचे कार्य-मंत्री राधाकृष्ण विखे पाटील*

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या माध्यमातून सेवा कार्य सुरू आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले. त्यांची प्रेरणा घेऊन विद्यापीठाचे कार्य सुरू असून सामाजिक बांधिलकीने समाजाच्या प्रत्येक घटकाला सेवा देण्याचे कार्य होत आहे. समर्पण, सामाजिक उत्तरदायित्व, सेवा कार्याची परंपरा प्रवरा आरोग्य विद्यापीठ पुढे नेत आहे, असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना विद्यार्थ्यांनी नवीन संशोधनावर भर देऊन त्याचा समाजासाठी उपयोग करावा असे विद्यार्थ्यांना आवाहन करून श्री.विखे पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पद्मश्री सावजी ढोलकिया यांनी सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्याचेही ते म्हणाले.

पद्मश्री ढोलकीया म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मोठे यश संपादन करू शकतात. विद्यार्थ्यांनी आपण सर्वोत्तम असल्याचा आत्मविश्वास बाळगावा. मी कोणत्याही परिस्थितीत उद्दिष्ट गाठू शकतो, ईश्वर चांगले प्रयत्न करणाऱ्याच्या सोबत असतो, मी विजेता आहे हा विचार मनाशी बाळगा. मागचे अपयश विसरून वर्तमानात विजेत्याचा आत्मविश्वास बाळगून काम करा. नशिबावर अवलंबून न राहता विश्वासाने काम केल्यास यश संपादन करता येते. सेवा ही सर्वोत्तम गुंतवणूक असून त्याआधारे सर्वोत्तम यश मिळविता येईल, असा प्रेरक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मिळालेला सन्मान जबाबदारी म्हणून स्विकारत असून अधिक चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील म्हणाले, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यासाठी अशा भागात सेवा देणारे कुशल वैद्यकीय अधिकारी घडविण्याचे कार्य विद्यापीठ करीत आहे.

कुलगुरू मगरे यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.

राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रवरा विशेषोपचार रुग्णालय आणि अवयव प्रत्यारोपण केंद्राचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले. पदवीदान समारंभात ९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. ९४९ पदवी आणि पदव्युत्तर स्नातकांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात दीक्षांत संचलनाने झाली.

कार्यक्रमाला कार्यकारी परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


धामोरीतील काही भागात स्ट्रीटलाईट विद्युत पुरवठेचा मोठा खेळखंडोबा - नागरीक त्रस्त


धामोरीतील बंद असलेला विद्यूत पुरवठा पुर्वरत सुरु करावा - नागरीकांची मागणी

- कोपरगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
 तालुक्यातील धामोरी येथील ग्रामपंचायत अंतर्गत स्ट्रीटलाईट विद्युत पुरवठा काही भागातील पाच - सहा महिन्यांपासून बंद आहे. गावातील काही भागातील नागरिकांनी ब-याच वेळेस ग्रामपंचायत कार्यालय अधिकारी यांना सांगितले असता यावर कुठलीही प्रक्रिया सुधारणा होत नाही, गावातील श्री खंडेराव मंदिर परिसर,सावता महाराज मंंदिरापुढील परिसर तथा आणखी काही भागातील परिसरात स्ट्रीटलाईट विद्युत पुरवठा सुरळीत नाही.
तरी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष देऊन धामोरी येथील काही भागात बंद असलेला स्ट्रीटलाईट
विद्यूत पुरवठा पुर्वरत सुरळीत करावा अशी मागणी धामोरी येथील बंद असलेल्या स्ट्रीटलाईट विद्युत पुरवठा परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दत्तात्रय घुले - धामोरी 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================




एव्हरेस्ट अबॅकस चा वासिद जावेद सय्यद अबॅकस मध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -वार्ता -
एवरेस्ट अबॅकस अकॅडमी यांच्या वतीने नेवासा या ठिकाणी १ सप्टेंबर रोजी ३० व्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये एव्हरेस्ट अबॅकस क्लासेस श्रीरामपूर शाखेतील वासिद जावेद सय्यद या विद्यार्थ्याने पाच मिनिटात १८० गुणाकार करून चॅम्पियन चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.श्रीरामपूर, बेलापूर, खंडाळा आणि ऑनलाईन क्लासेस च्या संचालिका सौ. सोनाली ठाणगे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


जिल्ह्यातील ५० महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

- अहमदनगर - प्रतिनिधी -वार्ता -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून जिल्ह्यातील ५० महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग विळदघाट येथील जिल्हास्तरीय कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी सुनिल शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे बालाजी बिराजदार, ग्रामोद्योग अधिकारी बी.आर. मुंडे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. उदय नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कौशल्यावर आधारित शिक्षणाला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित शिक्षण घेत जीवनात यश संपादन करावे. महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात युवक-युवतींना सक्षम बनविण्यासाठी महाविद्यालयामध्ये सुरू केलेले कौशल्य विकास केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
        जिल्ह्यातील अकोले तालुक्यात ३ प्रशिक्षण केंद्र, कर्जत २, कोपरगांव ६, अहमदनगर ११,नेवासा २, पारनेर २, पाथर्डी ४, राहाता १३, राहुरी ४, शेवगाव २, श्रीगोंदा ३, श्रीरामपूर १, संगमनेर २ आणि जामखेड येथे एक अशा ५० महाविद्यालयातुन सुरू होत असलेल्या या केंद्रांमधुन ८ हजार २५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार असल्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहा प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व विश्वकर्मा कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

*प्रवेश नोंदविण्याचे आवाहन*
  या योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील इच्छुक युवक-युवतींनी संबंधित महविद्यालयांमध्ये रोजगार, स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आपला प्रवेश नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर 
-------------------------------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================