राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, January 8, 2025

"'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"'


💐💐💐💐💐💐💐💐💐

*"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"*  
--------------------------------------------
आमचे आदर्श गुरुवर्य तथा अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष,साप्ताहिक दर्शक चे प्रमुख संपादक, दिलदार व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार मा.रियाजभाई शेख यांना त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आमच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा 💐 
येणारे भावी आयुष्यात त्यांना सुखसमृद्धी,भरभराटी यासोबतच उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा 💐 


=================================
-----------------------------------------------
*शौकतभाई शेख*✍️💐🇮🇳...
(संस्थापक अध्यक्ष) 
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
तथा,समता फाऊंडेशन,श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Tuesday, January 7, 2025

हेल्मेट युक्त श्रीरामपूर,अपघात मुक्त श्रीरामपूर मोहिमेस प्रारंभ


वाहतूक नियम जनजागृतीपर
हेल्मेट दुचाकी रॅली संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रस्ते सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत दि. ७ जानेवारी २०२५ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांचे तर्फे वाहतूक नियमांची जनजागृतीसाठी हेल्मेट दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रेतील सात तालुक्यांमध्ये सन २०२४ मध्ये एकूण ३४५ जणांनी अपघातामध्ये आपले प्राण गमावावे लागले आहे, त्यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या जवळपास ७० टक्के म्हणजेच २४२ इतकी होती. म्हणून दुचाकी चालवताना हेल्मेट वापरांचा नागरिकांमध्ये प्रसार करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांचे तर्फे आरटीओ कार्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली.सदर रॅलीस श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रविद्र कुटे उपस्थित होते.
सदर रॅलीमध्ये मोठ्या संख्येने दुचाकी स्वाराने सहभाग नोंदविला. 
सदरील रॅलीची उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून सुरुवात होवून संगमनेर रोड, महात्मा गांधी चौक, गिरमे चौक, छत्रपती शिवाजी महाराज रोड, दशमेश नगर चौक, कर्मवीर भाऊराव पुतळा, नवीन प्रशासकीय इमारत अशा मार्गाने शिरसगाव मार्गे उपदेशक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला. 
या रॅलीच्या निमित्ताने श्रीरामपूरकरांमध्ये दुचाकी चालवताना कायम हेल्मेटचा वापर करण्याची सवय कायमस्वरूपी लावून घ्यावी असा संदेश देण्यात आला, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक प्रवीण सर्जेराव, विशाल मोरे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रोहित पवार, धीरज भामरे, कुणाल वाघ, अतुल गावडे, रोशन कुमार चव्हाण, पांडुरंग सांगळे, हेमंत निकुंभ, शितल तळपे, रोशनी डांगे, परेश नावरकर, गोकुळ सूळ, संतोष मुंडे, दर्शन सोनवणे, संजय जाधव आणी मयूर मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे प्रताप शिंदे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

बैलांना क्रुर वागविल्यास,ऊसाचा जादा भार लादल्यास होणार आता कारवाई


साखर आयुक्तांचे राज्यातील
साखर कारखान्यांना आदेश

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
सध्या महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे. त्यासाठी बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त ऊसाचा भार लादून बैलांना क्रुर पद्धतीने वागणूक दिली जात असल्याचे ठिकठिकाणी रस्त्यांवर दिसून येते आहे. अशा पद्धतीने बैलांकडून क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करून घेऊन त्यांना क्रुरपणाची वागणूक देणारांविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांनी दिले आहेत.
राज्याचे साखर आयुक्त दीपक तावरे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्वच साखर कारखान्यांसह राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी, प्रादेशिक साखर सहसंचालक, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांना याबाबत निर्देश दिले आहेत. श्रीरामपूर येथील प्रेरणा फाऊंडेशनच्या पल्लवी आल्हाट यांनी याबाबत साखर आयुक्त व पशुसंवर्धन आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत साखर आयुक्तांनी संबंधितांना आदेश दिले आहेत.
 बैलगाडीने ऊस वाहतूक करताना बैलांना क्रूरतेची वागणूक देण्यात येऊ नये, बैलांवर क्षमतेपेक्षा जास्त वजन लादू नये. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पशुधनाची पायी ने - आण करू नये. जखमी, आजारी कुपोषित किंवा जास्त वय असलेले बैलांचे स्वास्थ्य उचित रहावे यासाठी त्यांना सक्तीची विश्रांती देण्यात यावी. जनावरांना नऊ तासाहून अधिक काळ वाहतूक देऊ नये. दुपारी १२ ते ३ या वेळेत त्यांना विश्रांती देण्यात यावी. खाणेपिण्यासाठी चार किलोमीटरच्या पलीकडे प्राण्यांची ने - आण करता येणार नाही.अशा सूचनाही साखर आयुक्तांद्वारे महाराष्ट्रातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक यांना देण्यात आलेल्या आहेत.
पशुधनाची काळजी घेणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे तथा काळाची गरज देखील आहे,प्राणी हिताचा विचार करता आपण वरील सूचनांचे पालन करावे. असे आवाहन प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या पल्लवी आल्हाट यांनी केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार मिलिंदकुमार साळवे 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐🇮🇳✅...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

हजरत ख्वाजा गरीब नवाज रहे. यांच्या ८१३ व्या ऊर्सानिमित्त


शिवस्वराज्य मंच सामाजिक संघटना यांच्यावतीने (नियाज) प्रसादाचे वाटप 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राजस्थान राज्यातील अजमेर शरीफ याठिकाणी जागतिक सुप्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिष्ती रहे.(गरीब नवाज) यांच्या ८१३ व्या ऊर्सानिमित्त येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिवस्वराज्य मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने (नियाज) महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सर्व जाती - धर्मातील अनेक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला, 
यावेळी शिव स्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण, भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय महासचिव, हनिफभाई पठाण,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रइस शेख, युवा नेते विशाल मोजे, रमिज पोपटीया, तन्वीर तांबोळी, युसुफ शेख, अब्दुल शेख, आसिफ पोपटीया, मोईन शाह, हारून तांबोळी, कफील सिद्दिकी, सिकंदर तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, January 3, 2025

मख़दुम सोसायटी तर्फे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन


सावित्रीमाई फुले यांच्यामुळे आजच्या स्त्रियांना स्वातंत्र्य आहेत - आबीद खान

अ,नगर - प्रतिनिधी -/ प्रतिनिधी - वार्ता -
सावित्रीमाई फुले यांचा वयाच्या आवघ्या नवव्या वर्षीच विवाह झाला व त्यांना पती ज्योतीबा फुले यांनी विवाहानंतर शिक्षण दिले. त्याच पुढे जाऊन स्त्री शिक्षणाच्या जनक ठरल्या. त्याकाळी स्त्रियांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन फार संकुचित होता. अशा काळात त्यांनी स्त्रियांना शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यामुळेच आजच्या स्त्रिया स्वातंत्र्य उपभोगत आहेत, परंतु काय खर्‍या अर्थाने स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजामध्ये खरोखरच बदलाल आहे का ? हा विचार समाजातील प्रत्येकाने करण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले.
स्त्री शिक्षणाच्या अद्यपर्वतक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी अहमदनगर तर्फे भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी उर्दू स्कूल मध्ये त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. व विद्यार्थ्यांना मोफत बाल साहित्याची पुस्तके आबीद दुलेखान यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या प्रसंगाचे माहिती आपल्या वक्तृत्वाद्वारे सादर केली.याप्रसंगी मुबीना बाजी, सुमैया सैय्यद आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना आबीद खान म्हणाले की, त्या काळी स्त्रीयांबद्दल जी भावना समाजामध्ये होती तीच भावना आजपण समाजामध्ये रुप बदलून वावरत आहे. स्त्रीया आज शिक्षित झाल्या, मोठमोठ्या पदावर पोहचल्या तरी त्यांना आज व्यक्ती स्वातंत्र्य असल्याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण होतो आहे. परंतु आता समाजाने हा दृष्टीकोन बदलून स्त्रीयांना सन्मान मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबीना बाजी यांनी केले. तर आभार सुमैया सैय्यद यांनी मानले. यावेळी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

मोटार वाहन निरीक्षकांचे तालुका स्तरावर शिबीर


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
जिल्ह्यातील शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, पारनेर व जामखेड या तालुक्यातील मोटार वाहन मालक व चालक यांच्या सोयीसाठी अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचे जानेवारी २०२५ ते जून २०२५ या कालावधीतील मासिक शिबिर वेळापत्रक जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली आहे.

शेवगाव व श्रीगोंदा तालुक्यात ७ व २१ जानेवारी २०२५, ४ व १८ फेब्रुवारी, ४ व १८ मार्च , ८ व २२ एप्रिल , ६ व २० मे आणि जून महिन्यात १० व २५ जून २०२५ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येईल.

 कर्जत व पाथर्डी तालुक्यात ८ व २२ जानेवारी २०२५, ५ व १७ फेब्रुवारी, ५ व १९ मार्च, ९ व २३ एप्रिल, ७ व २१ मे आणि ११ व २५ जून २०२५ रोजी शिबिराचे आयोजन होईल.

 पारनेर व जामखेड तालुक्यात ९ व २३ जानेवारी २०२५, ६ व २० फेब्रुवारी, ६ व २० मार्च, ११ व २४ एप्रिल, ८ व २२ मे आणि १२ व २६ जून २०२५ असे मासिक शिबिर वेळापत्रक आहे.

नियोजित मासिक दौऱ्याच्या दिनांकाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल किंवा शासकीय सुट्टी जाहीर होईल तसेच प्रशासकीय कारणास्तव दौरा रद्द झाल्यास त्या दिवसाच्या मासिक दौऱ्याचे कामकाज दुसऱ्या सोईस्कर दिवशी होईल व त्याची तारीख त्यावेळी जाहीर करण्यात येईल. अर्जदारांची अपूर्ण कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्विकारली जाणार नाहीत. शिबिराचे सर्व कामकाजाबाबत शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक राहील.

 दौऱ्याच्या ठिकाणी परराज्यातून आलेली वाहने व बसेसची तपासणी केली जाणार नाही. ज्या तालुक्यात शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्याच तालुक्यातील नागरिकांचे शिबिरामध्ये कामकाज करण्यात येईल. शिबिर कामकाज ठिकाणी तपासणी होणाऱ्या सर्व नवीन तात्पुरती नोंदणी झालेल्या परिवहनेत्तर संवर्गातील वाहनांचे डिस्क्लेमर असल्याशिवाय वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री.सगरे यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, January 2, 2025

लोकशाहीच्या चवथ्या आधारस्तंभाची कमान मजबूत करण्यासाठी प्रविण सावरकरांची पत्रकारीता


  सामान्य कुटूंबात जन्म घेवूनही उतुंग महत्वाकांक्षा बाळगण्याची जिद्द ठेवून प्रतिकूल परिस्थितीत प्रविण वृतपत्र सृष्टीत संपादक म्हणून काम करित आहे. सुरुवातीला ब्रेड विकण्यापासून त्यांचा प्रवास सुरु झाला. तो आज संपादक व आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स मिडीया स्नींग करण्यापर्यंतचा त्यांचा कालानुक्रम आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील असलेले प्रवीण वसंतराव सावरकर यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. वडीलांचा सलून व्यवसाय असतांना वडीलांसोबत सलून व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावण्याची उदरनिर्वाह करून सुद्धा पुरेसा पैसे मिळत नव्हते. त्यामुळे कमावलेल्या पैशांमध्ये कुटुंबाचा प्रपंच होत, नसल्यामुळे सोबतीला ब्रेड विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.प्रवीण सावरकर यांनी वरुड नगरीतील देवते बेकरी, होले बेकरी, पालेकर बेकरी या कंपनीमधील ब्रेड विकून कुटुंबात हातभार लावण्याचा प्रयत्न सुरु केला. यासोबतच अगदी सकाळी वृत्तपत्र वाटप ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भड यांच्याकडे पेपर वाटप करण्याचे काम सुद्धा त्यांनी केले.आर्थिक परिस्थितीची आस प्रत्येक वेळेस प्रवीणला भासत होती. परंतु आपले मनोधैर्य खचु न देता प्रवीण काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. प्रविणला दोन भाऊ आहे. मोठा भाऊ शिक्षण घेऊन कॅसेट लायब्ररीमध्ये काम करून स्वतःहाच्या मेहनतीवर शिक्षक झाले तर. दुसरा भाऊ सलून व्यवसाय मध्ये उत्तम कारागिर असुन अमरावती येथील रंगोली लॉन मागे अंबाई जेष्ट पार्लर चे प्रशस्त शॉप आहे, प्रविणचे वास्तव्य हे.पी डी कन्या शाळेच्या मागील परिसरामध्ये आहे. सोबतच आज प्रविणने आई - वडिलांच्या आर्शीवादाने एन. टी.आर. शाळेमागे आदित्यनगरमध्ये नवीन घराचे बांधकाम केले आहे. आज प्रविण च्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सौभाग्यवती सौ.निलम प्रविण सावरकर या सुद्धा काम करीत आहेत. त्या सुद्धा सांयदैनिक वरुड केसरी या वृत्तपत्राच्या मालक आहेत. पत्रकारीता क्षेत्रामध्ये त्यांचे सुद्धा मोठे सहकार्य त्यांना मिळत आहे. सोबतच या मिडीया क्षेत्रामध्ये प्रविणचे अत्यंत जवळचे मित्र व लहान भावा समान असलेले त्याचे सहकारी दैनिक वरुड केसरी चे सह संपादक निखिल बावणे यांची त्यांना क्षणो क्षणी साथ लाभते असे. प्रविण चे एकूण सहा जणांचे कुटुंब वरुडला राहतात तर दोन भाऊ आपल्या परिवारासह अमरावती ला स्थाईक झालेले आहेत. वरुडला त्यात आई-वडील पत्नी व दोन मुलं व प्रवीण असा हा परिवार आहे. प्रविण हा कामात कुठलाही कमीपणा न बाळगता हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा आहे. आपल्या घरची परिस्थिती नाजूक असली तरी, चेहऱ्यावर कधी तसा भावाने दिसू देत नाही." पत्रकारीता हे सेवा असून सार्वजनिक जीवनातील समस्यांना संपादकीय सेवेतून वाचा फोडण्यासाठी प्रविण सावरकर हे सक्रीयपणे काम करीत असल्यामुळे जनमानसात त्यांनी प्रतिष्ठानियती आहे.
सुरुवातीपासून प्रवीण ला लेखन साहित्य वाचनाची आवड होती. त्यातूनच शहरातील प्रतिष्टीत ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भड यांनी प्रविणला मातृभूमी पेपरच्या जुनं ते सोनं वाळ्याचे फोटो काढण्याचे, माहिती गोळा करण्याचे काम दिले. पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कसे काम करायचे? याचे मार्गदर्शन चंद्रकांत भड यांनी केले. त्यामुळे चंद्रकांत भड यांना प्रविण आपले पत्रकारीता क्षेत्रामधील गुरु मानतात. त्यानंतर विविध कार्यक्रमाचे संकलन पत्रकारीतेच्या माध्यमातुन प्रवीण ने केले.
वरुड शहरातील जागृत विद्यालयांमध्ये प्रविण आपले शिक्षण पूर्ण केलं.त्यानंतर
कुठेतरी आपल्या लेखनशैलीला व कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रविण ने साप्ताहिक चुडामणी दर्शन या नावाचे वृत्तपत्र सुरू केले व पत्रकारीता क्षेत्रामध्ये पहिले पाऊल ठेवले. नागरिकांच्या विविध समस्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी व विविध मागण्या पेपरच्या माध्यमातून प्रशासकीय करून शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचवण्याचे काम
प्रविणने केले.
प्रविणचे सामाजिक योगदान
आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाला आपल ही काही देण असते आपण सुद्धा सामाजिक प्रवाहामध्ये आलो पाहिजे, हा उद्देश बाळगून शहरांमध्ये सर्वप्रथम वरुड नाभिक दुकानदार संघटना त्यांनी स्थापन केली, त्याच्या माध्यमातून व्यवसाय व नाभिक बांधवांना एकत्रित करण्याचा मोठा प्रामाणिक प्रयत्नही त्यांनी केला आहे. यामध्ये श्री रामकुष्ण शिरूळकर, राजीव बाभुळकर,भालचंद्र चौधरी, मुरलीधर आसोलकर, अशोकराव साखरकर, स्व रुपेश निभोरकर, बंडू राऊत, अंबादास पाटील, रमेश माथुरकर, दिपक पापडकर यांनी सुध्दा मोठी मोलाची मदत केली. त्यांच्या कामामध्ये त्यांचे जीवलग मित्र असलेले लोकेश अग्रवाल, निखिल बावणे व तुषार खासबागे यांचे क्षणोक्षणी खंबीर साथ लाभते.
पत्रकारीता क्षेत्रामध्ये काम करत असतांना पत्रकारीता क्षेत्रामध्ये विविध पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. समाजभूषण पुरस्कार, स्व. पांडूरंगजी बहुरूपी पत्रकार पुरस्कार २०२२ .नाभिक समाज भुषण पुरस्कार .नाभिक रत्न पुरस्कार .उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या वतीने मुंबई येथे पत्रकार भुषण पुरस्कार प्रविणला मिळालेला आहे.
सांयदैनिक वरुड केसरी. व साप्ताहिक चुडामणी दर्शन,चुडामणी न्यूज पोर्टलच्या माध्यमातुन प्रविण सर्वसामान्य लोकांना न्याय मिळून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, आज प्रविणच्या माध्यमातुन अनेक लोकांना न्याय मिळत आहे याच प्रयत्नातून वरुड शहरामध्ये समाज भवनाची उपलब्धी झाली, नाभिक समाजामध्ये प्रविण काम करत असून संत नगाजी महाराज समाज भवनाचे काम पूर्ण झाले आहे व राहीलेले कंपाऊड वॉल सुद्धा काही दिवसांमध्ये पुर्ण होणार आहे असे त्यांनी सांगितले. समाज भवनामुळे नाभिक समाजाचे लहान मोठे कार्यक्रम सुद्धा होत आहे. अश्या विविध कामामध्ये प्रविण सतत अग्रेसर असून विविध सामाजीक संघटनेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश उपाध्यक्षपद देखील प्रविण सावरकर यांनी भुषवले आहेत. तसेच वरुड नाभिक दुकानदार संघटनेच्या सचिव, संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष , ज्ञानेश्वरी बहुदेशीय शिक्षण संस्थेचे सचिव, महिला उत्थान शिक्षण पुनर्वसन जलालखेडा या संस्थेचे विश्वस्त, श्री शंभूशेष महाराज देवस्थान वर्ध मनेरी चे सहसचिव, ऑरेज सिटी मराठी संपादक व पत्रकार सोसायटी सचिव, गुरुकुंज सोशल असोसिएशचे सचिव या पदावर सध्या प्रविण काम करत आहे. ४ जानेवारी १९८२ ला प्रविणा चा जन्म वरुड या गावी झाला. लहानपणा पासुनच प्रविण हा अत्यंत मनमिळाऊ असल्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्यात प्राविण्य पात्र आहे. पत्रकारीता क्षेत्रामध्ये आज प्रविणकाम करत असतांना त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या पत्रकारितेतून समाजाला नवी दिशा मिळाली आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ते करीत आहे. त्यांच्या सोबतीला जे जुळले ते तुटलेले नाही. समाजाचे नाते त्यांनी घट्ट पकडलेले आहे. माझा संबंध जवळपास प्रवीणसोबत दहा वर्षांपासून आहे. या व्यक्तीने कुणाचे मन दुखावली नाही. नेहमी सहकार्य करण्याची भूमिका, परिस्थिती कमकुवत असतांना सुद्धा सहकार्य, जेव्हा जेव्हा या जगात ईश्वर समाजाला आवश्यक असतो, तेव्हा ईश्वर माणूस रूपाने जन्म देऊन या माध्यमातून सेवा करण्याचे काम करतो त्यातलाच मला प्रवीण वाटतो.
दैनिक वरुड केसरी या वृत्त पत्राचे संपादक प्रविण वसंतराव सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्य अभिष्टचिंतन ! प्रत्येक वाढदिसांगणिक तुमच्या यशाच आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जाओ! तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुल सदैव बाहरलेली असावीत, आपले आयुष्य सुख समृद्ध आणी ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा ! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शोर्यता आणी सह्याद्रीची उंच लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास तुळजाभवानी माता उदंड आयुष्य देवो ही सदिच्छा! 


=================================
-----------------------------------------------

*संकलन* ✍️✅🇮🇳...
शेषराव गो.कडू - वरुड
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================