( अकोला जिल्हा ) एटीएम चोरीच्या घटनेनंतर सर्व चोरटे पसार झाले आणि तब्बल १६ लाख ५३ हजार रुपये पाच जणांनी सांगणामताने वाटून घेतले. यातील अटकेत असलेल्या युसुफ खान आस मोहम्मद हा चोरीच्या घटनेत नवीन असल्याने त्याच्या वाट्याला १ लाखाच्या जवळपास रक्कम आली. अटकेत असलेल्या चोरट्याकडून गुन्हयामध्ये वापरलेली चारचाकी वाहन अन् ५० हजार रूपये रोख व मोबाईल असा एकत्रित १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.एटीएम चोरीच्या घटनेनंतर स
५ जानेवारीला अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला होता., कृष्णा नगर भागात असलेल्या एसबीआयच्या एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य करून १६ लाखांवर रक्कम पळवून नेली. दरम्यान, चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटर चा वापर केला असून सदरील चोरीच्या घटनेत पाच चोरटे होते. हे सर्व चोरटे बाहेरील राज्यातील आहेत. आता अकोला पोलिसांनी हा एटीएम फोडीचा गुन्हा उघडकीस आणलाय. सम्माधित चोरीच्या घटनेत सहभागी असलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित चोरट्यांचा शोध सुरू आहे.
एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातून १६ लाख ५४ हजार ३०० रूपये रोख चोरी केली. दरम्यान प्रफुल्ल सुरेश डबरे यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासा दरम्यान चोरटे हरियाणा राज्यातील असल्याचे समजले. सलग १२ दिवस तपास करून आज हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. युसुफ खान आस मोहम्मद (वय ३५ वर्ष, रा. पिनागवा ता. पुन्हाना, जिल्हा बुह, राज्य हरियाणा) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात आणखी चार जण सहभागी असल्याचे त्याने सांगितले.
कऱ्हागृह मध्ये असलेल्या चोरट्याकडून गुन्हयामध्ये वापरलेली चारचाकी वाहन अन् ५० हजार रूपये रोख व मोबाईल असा एकत्रित १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सददाम माजीद (रा. पडली जिल्हा जुड) अताउल्ला खान (रा. पडली जिल्हा - नुह) सलीम खान हनिफ खान (रा. पिनागवा) संजय यादव (रा. रामगड, जिल्हा अलवर, राजस्थान) हे सदर चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. लवकरच या चौघांनाही अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
अकोला शहरातील कृष्णा नगरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएममध्ये ४ जानेवारीला काही लाखांची रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर ५ जानेवारीच्या पहाटे ३ वाजता चोरट्यांनी एटीएमला लक्ष्य केले. अवघ्या सात मिनिटांत चोरट्यांनी एटीएम फोडले. अन् एटीएममध्ये असलेली १६ लाख ५३ हजार रुपये रोख लंपास केली. दरम्यान एटीएममधील चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. तेव्हा या एटीएम चोरीच्या घटनेत चार चोरट्यांचा समावेश असल्याचं समजलं. हे चोरटे चारचाकी वाहनाने गुरुवारी ३ वाजताच्या सुमारास कृष्णा नगरात आलेत. अन् त्यांनी या भागाची बारकाइने पाहणी केली, अन् ३ वाजून ११ मिनिटच्या सुमारास या एसबीआयच्या एटीएमला टार्गेट केलं. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले अन् एटीएममधून तब्बल १६ लाख ५३ हजार एवढी रक्कम चोरून लंपास केली
सदर प्रकरणात या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता चोरटे एका पांढऱ्या रंगाच्या वाहनात आल्याचे दिसले. वाहनाचा शोध घेतला असता या गुन्ह्याचा तपास लागला. ही कारवाई अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनात स्पष्टीकरण केली.
No comments:
Post a Comment