राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, March 29, 2023

श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीसाठी अनेक.राजकीय पक्ष रिंगणात उत्तर न्याचे तयारीत स्वम्भवते ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काल काँग्रेस, राष्ट्रवादी , उध्दव ठाकरे शिवसेना व शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन बैठक घेत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर कोण उभे ठरणार याची उत्सुकता लागली आहे. ससाणे गटाने याकडे पाठ फिरवली तर विखे व मुरकुटे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीस काँग्रेसच्यावतीने आ. लहू कानडे, अशोक कानडे, इंद्रनाथ थोरात, अरुण पा. नाईक, विष्णूपंत खंडागळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, वंदना मुरकुटे राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, कैलास बोर्डे, शिवसेनेचे अशोक थोरे, अरुण पाटील, सचिन बडधे, शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, सुरेश ताके, अनिल औताडे,जगताप, किशोर बकाल,रज्जाक पठाण, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. कानडे यांनी सांगितले की, वरिल पातळीवर सध्या महाविकास आघाडी म्हणून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने त्या पार्श्वभीमूवर आज तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेतकरी संघटना यांना एकत्रित करुन बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी लागणार असल्याचे सांगितले. यावर सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने महाविकास आघाडी तयार होऊन या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेणार असल्याचे चित्र दिसले. वरिल पातळीवर सर्वच पक्षांनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावून त्यांना महाविकास आघाडीच्यावतीने या निवडणुका लढविण्याचे संकेत दिले
होते त्यानुसार काल याबाबत प्राथमिक बैठक
यावेळी राष्ट्रवादीचे अविनाश आदिक यांनीही सांगितले की, यापुढील सर्व निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचे शरद पवार यांनी सांगितले असल्याने आपण महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.
ससाणे गटाची अद्याप स्पष्ट भूमिका मांडण्यात आली नसल्याने समजते
श्रीरामपूर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत ससाणे यांना विचारले असता अद्याप आपण काहीच निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आम्ही एकत्रित निर्णय घेऊ असे सांगितले. मात्र काल काँग्रेस म्हणून जी बाजार समितीबाबत बैठक आ. लहू कानडे यांनी बोलावली होती त्याकडे त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजून दिशा उघड केली नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अद्यापही स्पष्टता आहे. मुरकुटे यांच्या बरोबर युती करून निवडणूक लढवितात की स्वतंत्रपणे लढतात याकडे अनेक जण तर्क वितरक लावत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी.संपादक.भगवंत. सिंघ. प्रितम. सिंघ. बत्रा. शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
----------------------------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment