(छत्रपती संभाजीनगर)-औरंगाबाद-प्रतिनिधि-वार्ता-भारतात सर्व राज्यात सध्या सायबर गुन्ह्यांची (Cyber crime) संख्या वाढली आहे. दिवसेंदिवस या गुन्ह्यांचे स्वरूप आणि प्रकार यांच्यात मोठा बदल होत चालला आहे. सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून कधी आर्थिक तर कधी व्यक्तिगत हानी पोहचवली जाते.या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर वाढत चालले आहे. पण पोलिसच जर या गुन्ह्यांचे शिकार ठरत असतील तर.परिस्थिती जरा किचकट स्वरूपात भयानकच आहे.असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे.सायबर गुन्हेगाराने चक्क एका महिला आयपीएस (IPS) अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळविण्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडून पैसे उकळण्यात आले
आहे.छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने हे पैसे उकळण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरून सायबर गुन्हेगाराने देशभरातील IPS अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मोठे चर्चेचा विषय : उत्पन्न झालं आहे
त्या गुन्हेगाराने बनावट अकाऊंटवरून, एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची पोस्ट केली. सोबतच या मुलीला उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा मेसेज केला. उपचार सुरू असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्विट करून व्हायरल केला. तर हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्याचा विश्वास ठेवून, देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली.
दरम्यान या सर्व प्रकाराबाबत मोक्षदा पाटील यांना माहिती
मिळताच त्यांनी लोहमार्ग, ग्रामीण व शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधून बनावट खाते बंद करण्यासाठी ट्विटरला रिपोर्ट करण्याबाबत कळविले. अनेक ठिकाणांवरून ट्विटरला रिपोर्ट गेल्यानंतर 27 मार्चला रात्री 11 वाजेदरम्यान हे बनावट खाते बंद झाले. तसेच या सायबर गुन्हेगाराचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तर ट्विटरवर माझे कोणतेही खाते नसून, नागरिकांनी सायबर महाठग भामट्यांच्या पोस्टला बळी पडू नयेत, असे आवाहन मोक्षदा पाटील यांनी केले आहे. हे खाते बंद करण्यात आले असले तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.तसेज कुठलेही ऑनलाईन वेव्हार करता खातर जमा करूनच वेव्हार करावेत असे अहवान केले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी.संपादक.भगवंत सिंघ प्रितम.सिंघ. बत्रा. शब्द. ✍️ ✅️ 🇮🇳रचना. संकलन. वार्ता...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment