राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, March 27, 2023

दोघाने PAYTM कर्मचारी आहे असे भासून व्यावसायिकां ला ठगावले फसवणूक करुन खात्यातून परस्पर पैसे काढले ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता -
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका व्यापार्‍याच्या दुकानात दोन अनोळखी तरूण गेले. आम्ही पेटीएमचे कर्मचारी आहे, असे सांगून बोलबाला केले. त्यानंतर व्यापार्‍याच्या खात्यावरून ऑनलाईन 29 हजार रुपये काढून घेतले. अशाच प्रकारे दुसर्‍या एका व्यापार्‍याच्या खात्यामधुन 10 हजार रुपये काढून घेतल्याचे घटना चे प्रकार घडले प्रकाश शिवाजी नगरे, वय 35 वर्षे, हे राहुरी
तालुक्यातील ब्राम्हणी येथे राहत असून त्यांचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे. प्रकाश नगरे हे त्यांच्या दुकानात पेटीएम स्कॅनर मार्फत पैसे घेतात. दोन महिन्यापुर्वी त्यांनी पेटीएम साउंड बॉक्स वापरण्यास सुरवात केली होती. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजे दरम्यान दोन अनोळखी इसम प्रकाश नगरे यांच्या
दुकानावर गेले.
आम्ही पेटीएमला कामाला आहे. असे त्यांनी सांगीतले. तेव्हा नगरे यांनी त्यांना सांगितले की, मला पेटीएम बंद करावयाचे आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की, तुमचा मोबाईल माझ्याकडे दया व तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड दया, तुमचे पेटीएम बंद करतो. त्या प्रमाणे नगरे यांनी त्यांना मोबाइल दिला व आधार कार्ड, पॅन कार्ड
त्यांना दाखवले.त्यांनी मला सांगितले की, आज नेटवर्क प्रोब्लेम आहे. तुमचे पेटीएम आज बंद होणार नाही. आम्ही उद्या येऊ, असे बोलुन ते दोघे तेथुन निघुन गेले. त्या नंतर दुसर्‍या दिवशी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी तेच पेटीएम चे दोन अनोळखी इसम दुकानावर आले. त्यांनी पुन्हा प्रकाश नगरे यांचा मोबाइल, आधार कार्ड, पॅन कार्ड घेतले. त्या नंतर त्यांनी सांगितले की, आता तुमचे पेटीएम बंद झाले आहे.
दोन दिवसांनी कंपनीचे लोक येतील त्यांना तुम्ही पेटीएम साउंड बॉक्स, चार्जर देवुन टाका. असे सांगुन तेथुन निघुन गेले. दिनांक 13 मार्च रोजी प्रकाश नगरे यांना पेटीएम कंपनीचा फोन आला व त्यांनी मला विचारणा केली की, तुम्ही पेटीएमचे क्रेडीट प्रोस्पेड पेमेंट घेतलेले आहे. ते पैसे भरले का नाही. त्यावेळी आपली फसवणूक करून खात्यामधुन एकूण 29 हजार रुपये काढून घेतल्याचे नगरे यांच्या लक्षात आले.
दुसर्‍या घटनेत गणेश बन्सी रहाणे, राहणार गोटुंबे आखाडा, ता. राहुरी. यांच्या सप्तश्रुंगी जनरल स्टोअर्स या दुकानातही त्याच दोन अनोळखी भामट्यांनी रहाणे यांना बोलबचन करून त्यांच्या खात्यामधुन 10 हजार रूपये काढून घेतले. या दोन्ही घटनेत खात्यामधुन काढलेली रक्कम ही विनोदकुमार बब्रुवान बनसोडे यांच्या पेटीएमचे प्रोस्पेड खातेवर गेली आहे.
फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रकाश शिवाजी नगरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 321/2023 भादंवि कलम 420, 419, 34, 66(सी) प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी : संपादक.भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा.शब्द., ✍️✅️ 🇮🇳.रचना.संकलन...वार्ता.
--------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------
























No comments:

Post a Comment