राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, April 1, 2023

बाजार समिती निवडणुकी साठी ना.विखे-मुरकुटे-ससाणे युती बहुतेक होण्याची शक्यता पुढील चित्र दाखवत आहे परंतु काही गोष्टी पर्द्या मागेच श्रीरामपूर ?

(श्रीरामपूर) विशेष - प्रतिनिधि - वार्ता - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीरामपूर निवडणुकीसाठी आ.कानडे - आदिक - उध्दव ठाकरे.गट.व.शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात अचानक ना. विखे-मुरकुटे व ससाणे यांचीही युतीजवळपास होण्याचे शक्यताने राजकीय चरच्छेद उधाण...
कोण कोणाबरोबर शामिल होणार हे निश्चित नसल्याने उमेदवारी अर्ज कसा भरायचा हे समजत नव्हते. दोन-तीन दिवसांपूर्वी आमदार लहू कानडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी - शिवसेना (उध्दव ठाकरे गट), शेतकरी संघटना यांची एकत्रित बैठक घेऊन सोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र जागा वाटपाबाबत निर्णय नंतर घेणार असल्याचे सांगितले. आता या महाविकास आघाडीच्या विरोधात कोण कसे लढणार हा मुद्दा होता. मात्र अचानकपणे पालकमंत्री ना. विखे-मुरकुटे - ससाणे यांनी एकत्रित येण्याचा निर्णय झाला आणि सर्वांना एक आश्चर्याचा धसकास दिला.
बाजार समितीसाठी आ. कानडे यांच्या महाविकास आघाडी विरुध्द ना. विखे- मुरकुटे-ससाणे यांची युती लढणार हे आता निश्चित झाले आहे. जागा वाटपही निश्चित झाले. ससाणे यांना ८, मुरकुटे यांना ६ तर पालकमंत्री ना. विखे गटाला ४ असा जागा वाटपाचा निर्णय झाला आहे. मात्र यात कोण कोणत्या ठिकाणी लढणार मात्र हे स्पष्ट झाले नसल्यामुळे प्रत्येकी ठिकाणी प्रत्येक गटाचे समर्थक अधिकचे उमेदवारी अर्ज भरुन ठेवणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी याबाबत सर्व चित्र स्पाष्टीकरण होणार आहे

स्थानिक पातळीवर कोणत्याही पक्षाचे राजकारण न करता बाजार समितीच्या आणि तालुक्याच्या विकास सर्वांनी राजकीय संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवा त्या दृष्टीकोनातून निवडणूक लढविली गेली पाहिजे असे तज्ज्ञ जाणकारांचे मनोबल आहे. बाजार समितीत निवडणूक लढविण्याचे हे गणित नगर पालिका निवडणुकीतही जुळण्याची शक्यता असल्यास ठळक चित्र उभारणी होण्यास प्राथमिक अंदाज प्रारंभ होईल.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी संपादक भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन.वार्ता...
============================================================================================================














No comments:

Post a Comment