राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, April 18, 2023

थोरात महाविद्याल यातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनीं ची उत्तम भरारी सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात ?

(संगमनेर) - लियाकत खान पठाण - वार्ता -
सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात  महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींची पोलीस पदी नियुक्ती झाली आहे.
   या विषयी माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील सर म्हणाले की, राष्ट्रीय छात्र सेनेच्या दोन विद्यार्थिनी कोकने प्रिया चंद्रभान हिची ठाणे ग्रामीण चालक पोलीस पदी तर पवार पूजा देविदास हिची नवी मुंबई पोलीस पदी नियुक्ती झाली आहे.तर पानसरे पूजा रामनाथ या भूगोल विभागातील विद्यार्थिनीची मुंबई रेल्वे पोलीस पदी नियुक्ती झाली आहे. या तीनही विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या शिरपेचात तुरा रोवण्याचे काम केले आहे.
     या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत बसून आपला अभ्यास प्रामाणिकपणे, जिद्दीने करून सर्व विद्यार्थ्यांसमोर  आदर्श ठेवण्याचे महान कार्य केले आहे.
 त्यांच्या या कार्याबद्दल मा. बाळासाहेब थोरात, संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. सुधीरजी तांबे, पदवीधर आमदार मा. सत्यजित तांबे, संस्थेचे सचिव, सहसचिव, रजिस्ट्रार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना यासाठी विशेष मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, उपप्राचार्य प्रा.शिवाजी नवले,प्रोफेसर डॉ.बाळासाहेब वाघ, प्रा.लक्ष्मण घायवट, प्रा. गोरक्षनाथ थोरात, श्री. गोरक्षनाथ पानसरे, प्रा. जयराम डेरे, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. शोभा राहाणे यांनी केले असून  सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment