राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, June 24, 2023

शिक्षण पद्धतीतील बदलाव काळाची गरज

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 ( राहता ) - प्रतिनिधि - वार्ता -
शिक्षणामध्ये प्रामुख्याने शिक्षक, विद्यार्थी याचबरोबर समाजाचाही प्रामुख्याने सहभाग असतो. कुटुंब, मित्रमंडळी, परिसर यावर शिक्षण अवलंबून असते. समाज परिवर्तन काळानुरूप बदलत असते त्यानुसार शिक्षण पद्धती ही बदलणे आवश्यक आहे. समाज नवनवीन संकल्पना, विविध प्रकारांचे परिवर्तन व त्यांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याचा स्वीकार समाज करत असतो. थोडक्यात जुन्याचा विसर व नव्याचा स्वीकार समाज करत असतो. त्यानुसारच शिक्षण बदलणे आवश्यक आहे.
फार पूर्वीच्या शिक्षणाचा विचार केला तर भारतात प्रामुख्याने दोनच संस्था कार्यरत होत्या एक म्हणजे संस्कृत पाठशाला आणि मदरसा.याद्वारे शिक्षण दिले जात असे त्यामध्ये मुलींनी शक्यतो शिक्षण दिले जात नव्हते. कालांतराने त्यात अनेक प्रकारचे बदल घडत गेले. अनेक भाषांचा उपयोग होऊन ज्ञानार्जन होऊ लागले. प्रांतनिहाय शिक्षण पद्धती निर्माण झाली. त्यानंतर इंग्रज भारतात आले त्यांनीही त्याच पद्धतीने व त्यांच्या साम्राज्यास पूरक होईल अशी शिक्षण पद्धती निर्माण केली. त्यानुसारच अध्ययन व अध्यापन होऊ लागले. इंग्रजांच्या काळातही अनेक शिक्षण तज्ज्ञ होऊन गेले, परंतु इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्यास पूरक होईल अशाच शिक्षण तज्ज्ञांच्या मताचा स्वीकार केला व इतर मात्र दुर्लक्षित केले त्यामुळे शिक्षण तज्ज्ञाचे मत कितीही दर्जेदार असले तरी त्यास ते मान्यता देत नसत.
  स्वातंत्रोत्तर काळात मात्र त्यात अनेक बदल झाले. त्यामध्ये प्रामुख्याने देशास पूरक स्वातंत्र्योत्तर उदयन्मुख भारतीय समाजाला ज्या शिक्षण पद्धतीचा उपयोग होईल अशा शिक्षण पद्धतीचा विचार प्रामुख्याने करण्यात आला.अशाच शिक्षण तज्ज्ञांच्या विचारांना प्राधान्य देण्यात आला. दर दहा वर्षांनी शिक्षण पद्धतीत बदल करण्यात आले. दिवसेंदिवस समाजाच्या गरजा वाढत चालल्या, सामाजिक गरजांचा विचार करता पूर्वीच्या शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षणातील बदल कुच कामी ठरले. त्यांची शिक्षण पद्धती व सामाजिक गरजा यात तफावत होऊ लागली. अशा वेळेस शिक्षण पद्धतीत बदल होण्याची आवश्यकता भासू लागली.
    जशी जशी समाजाची गरज वाढत चालली त्याप्रमाणे नवीनविन शिक्षणतज्ज्ञांनी नवनवीन शिक्षण पद्धतीचा शोध लावला व त्यांच्या मताचा स्वीकार समाजांनी केला. 1997 पासून अमलात आणलेली क्षमताधिष्टीत अध्ययन अध्यापन पद्धतीचा विचार शिक्षणास प्रामुख्याने करण्यात आला. अशा प्रकारे या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांच्या भविष्याकालीन शिक्षणाचा विचार करण्यात आला.सध्याच्या विचार करता वाढती लोकसंख्या , स्त्री- पुरुष असमानता, बेरोजगारी, दुष्काळ व इतर समस्या यावर उपाय योजना करणाऱ्या व त्यादृष्टीने भविष्यकालीन भारतीय नागरिक घडविणाऱ्या शिक्षण पद्धतीचा विचार प्रामुख्याने केलेला दिसतो.अशा प्रकारे बदलत्या सामाजिक गरजानुसार शिक्षणात बदल होणे ही काळाची गरज होऊन बसली.


श्रीमती देशमुख भारती दिगंबर
 प्राथमिक शिक्षक,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खर्डे पाटोळे, क्लास भगवतीपुर
 ता. राहता जि.अहमदनगर
मोबा : 9423462015
-------------------------------

((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

No comments:

Post a Comment