भोकर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे वणीकरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोकर-कमालपूर रोडलगत राहत असलेल्या एका कुटूंबाच्या घरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकास पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.
भोकर- कमालपूर रोडलगत सामाजीक वणीकरणाच्या क्षेत्रात सध्या राहत असलेले रविंद्र नवनाथ बर्डे हे कुटूंबियासमवेत घरात झोपलेले असताना रवीवार दि.२५ जूनच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरात कसलातरी आवाज आला म्हणून जागे झाल्यानंतर घरात चोरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराच्या बाहेर एकाच्या पाठीमागे पळून एका खड्ड्यात येथील आकाश दत्तू परदेशी यास पाठलाग करून पकडल्याचे रविंद्र पवार हे सांगत आहेत. त्याच्याकडून माझा व पत्नी मोबाईल मिळाला परंतू रोकड मिळाली नाही. सदरच्या व्यक्ती पकडून पहाटेच पोलीसांच्या ताब्यात दिले, यावेळी त्याच्या बरोबर आणखी दोघे किंवा तीघे होते परंतू ते पळूण जाण्यात यशस्वी झाल्याचे बर्डे यांनी सांगीतले.
या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु र नं. १३२८/२०२३ भादंवि कलम ३८०,५११ प्रमाणे रविंद्र नवनाथ बर्डे यांचे फिर्यादीनुसार येथील आकाश दत्तू परदेशी यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. मोहन शिंदे हे करत आहे. दरम्यान पोलीसांत देण्यात आलेला आकाश परदेशी हा अल्पवयीन असल्याने त्याची जामीणवर मुक्तता करण्यात आली असल्याचे पोलीसांकडून समजले.
((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
No comments:
Post a Comment