राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, June 28, 2023

वरिष्ठ राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत तसेच जिल्हा स्तरीय जलतरणातील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलला यश...

मुंबई - नारायण - सावंत - समाचार -
नुकत्याच बैंगलोर येथे पार पडलेल्या ७६ व्या वरीष्ठ राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलातील एकूण ६ डायव्हिंग खेळाडूंची निवड झाली होती.
सदर स्पर्धा बैंगलोर येथे पार पडल्या. संकुलातील खेळाडू मेधाली रेडकर हीने महिलांच्या १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात १६१.५५ गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला तर तुषार गितये याने पुरुषांच्या गटात हायबोर्ड डायव्हिंग प्रकारात २५२.३५ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच जलतरणातही संकुलातील दोघा बहिण-भावानी आपल्या स्वतःबरोबर संकुलाचे नाव लौकिक केले. गोरेगांव येथील ओझोन जलतरण तलावात झालेल्या जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत सिया देवरुखकर हिने १०० मीटर ब्रेस्ट्रोक मध्ये तसेच ८०० मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक,२०० मीटर ब्रेस्ट्रोक मध्ये रौप्य पदक तर ४०० मीटर फ्रीस्टाइल आणि ४०० मीटर मिडले मध्ये कांस्यपदक पटकावले. तसेच तिचा लहान भाऊ दुर्वेश देवरुखकर याने ५० मीटर बटरफ्लाय मध्ये रौप्य पदक तर ५० मीटर ब्रेस्ट्रो, १०० मीटर  बटरफ्लायमध्ये कांस्यपदक तसेच २०० मीटर फ्रीस्टाइल मध्ये देखील कांस्यपदक पटकावले.
संकुलाचे अध्यक्ष श्री.अरविंद रमेश प्रभू आणि सचिव डॉ. मोहन अनंत राणे सर यांचे नियमित सहकार्य आणि प्रशिक्षक सायली महाडीक आणि तुषार गितये यांचे मार्गदर्शन तसेच जलतरणाचे प्रशिक्षक सहदेव नेवाळकर यांच्या जोरावर खेळाडूंनी इथपर्यंत मजल मारली.

    (((संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

No comments:

Post a Comment