या विषय अंतरगत सविस्तर माहिती असे की दिनांक 22/06/2023 रोजी राकेश ओला,पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांना ZIRO पोलीस मार्फत माहिती मिळाली की, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी येथील समर्थ शाळेजवळ एक लाल रंगाचा टी शर्ट, निळे रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला व सॅक असलेला इसम भारतीय सैन्य दलात, इंटेलिजन्स विभागात (RAW) अधिकारी असल्याचे भासवुन बनावट ओळखपत्र, चिन्ह व कागदपत्रे वापरत आहे. आता गेल्यास मिळून येईल. अहमदनगर जिल्हा तसेच लगतचा औरंगाबाद व पुणे जिल्हा सैन्य दलाचे दृष्टीने अतिशय महत्वाचे व संवेदनशील ठिकाणे असल्याने अशा प्रकारे कोणी सैन्य दलातील इंटेलिजन्स विभागाचे बनावट ओळखपत्राचा वापर करुन संबंधित सैन्य विभागाचे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करुन अनुचित प्रकार किंवा घातपात करण्याची
शक्यता देखील नाकारता येत नाही.
वरील प्रमाणे घटना निदर्शनास आल्यानंतर राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभाग पुणे येथील अधिकारी व पंचाना बरोबर घेवुन नमुद बातमीतील संशयीत इसमाची खात्री करुन कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेश दिले.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विजय ठोंबरे, संतोष खैरे, पोकॉ/आकाश काळे व अमृत आढाव तसेच सदन कमान मिलिट्री इंटेलिजेन्स, पुणे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन यांना कारवाई करणे बाबत नियोजन करुन मार्गदर्शन केले.
पथकातील अधिकारी व अंमलदार
यांनी दिनांक 22/06/23 रोजी 22.00 वाचे सुमारास बातमीतील नमुद ठिकाणी प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी येथील समर्थ शाळे जवळ जावुन वेशांतर करुन सापळा लावुन थांबलेले असताना एक लाल रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला व सॅक घेतलेला इसम दिसला. पथकाची खात्री होवुन संशयीतास पकडण्याचे तयारीत असताना त्यास पोलीस पथकाची चाहुल लागताच तो पळुन जावु लागला. लागलीच पथकाने संशयीताचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) संतोष आत्माराम राठोड, वय 35, रा. दिवटे, ता. शेवगांव, जिल्हा अहमदनगर असे सांगितले. त्यास सैन्यदलामध्ये कोठे नोकरीस आहे अशी विचारणा केली असता त्याने इंटेलिजन्स विभागात (RAW) अधिकारी म्हणुन नोकरीस असल्याचे सांगितले व तसे ओळखपत्र दाखविले. संशयीत इसमाने हजर केलेले ओळखपत्र व कागदपत्रांची पथकातील पोलीस अधिकारी व मिलिट्री इंटेलिजन्स अधिकारी यांनी पडताळणी करता सदर कागदपत्रे ही बनावट असल्याची खात्री झाल्याने त्यांचेकडे अधिक विचारपूस करता त्याने मी सैन दलात अधिकारी असल्याचे भासवुन नोकरीचे आमिष दाखविण्यासाठी ओळखपत्र व कागदपत्रे तयार केल्याची माहिती दिली. ताब्यातील संशयीत इसमाबाबत सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स, पुणे पथकाचे अधिकारी यांनी त्यांचे विभागात चौकशी करुन खात्री केली असता नमुद इसम हा कोठेही सैन्यदलात सेवेत नसल्याची माहिती दिल्याने त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली.
त्याच्या अंगझडतीत स्वत:चा फोटो, राजमुद्रा असलेले ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, इतर बनावट कागदपत्रे व विवो कंपनीचा मोबाईल फोन असा 10,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कब्जात मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोना/सचिन दत्तात्रय अडबल ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 908/2023 भादविक 465, 468, 170, 171 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
------------------------------------------------
=================================
कार्य,संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
=================================------------------------------------------------
No comments:
Post a Comment