राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, July 25, 2023

तपोवन रस्त्यावर कारवाई || गावठी कट्ट्यासह हत्यारे जप्त दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी शितफिने गजाआड गुणे अन्वेषन

अहमदनगर- प्रतिनिधि - वार्ता -

  पाच जणांची टोळी दरोड्याच्या तयारीत असलेली  स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने (LCB)जेरबंद केली. मंगळवारी (दि. 25) तपोवन रस्त्यावर भिस्तबाग महालाजवळ ही कारवाई केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा तीन जिवंत काडतुस  कोयता, दोन चाकु, सात मोबाईल, लाकडी दांडके व एक कार असा एकुण चार लाख 94 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला आहे.
नयन राजेंद्र तांदळे (वय 29, रा. पवननगर, पाईपलाईन रस्ता), लियाकत जाफर शेख (वय 36, रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर), अमोल लक्ष्मण रणसिंग (वय 35, रा. केडगाव), धुराजी नामदेव महानुर (वय 25, रा. आष्टी, जि. बीड) व बजरंग नारायण मिश्रा (वय 35, रा. भिस्तबाग चौक, सावेडी) अशी जेरबंद  केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, मनोहर गोसावी, रवींद्र पांडे, देवेंद्र शेलार, सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, विजय धनेधर व अरूण मोरे यांचे पथक नगर शहरात पसार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना निरीक्षक आहेर यांनी पथकास कळविले की, राखाडी रंगाचे कारमधील काही इसम नगर शहर परिसरात कोठेतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा  करण्याचे उद्देशाने घातक हत्यारे घेवुन कॉटेज कॉर्नर ते भिस्तबाग महाल रस्त्याने येत आहेत, अशी माहिती मिळाली असून खात्री करून कारवाई करा.

पथकाने तपोवन रस्त्यावर  भिस्तबाग महालाजवळ जावुन सापळा लावला. संशयित राखाडी रंगाची कार कॉटेज कॉर्नर कडून महालाकडे येताना दिसली. पथकाची खात्री होताच चालकास गाडी थांबवण्याचा इशारा करताच त्याने गाडी थांबविली. वाहनातील नयन राजेंद्र तांदळे, लियाकत जाफर शेख, अमोल लक्ष्मण रणसिंग, धुराजी नामदेव महानुर, बजरंग नारायण मिश्रा मिळून आले. त्यांच्याकडील कट्टा, जिवंत काडतुसे, कोयता, चाकू, मोबाईल व कार जप्त  करण्यात आली आहे. त्यांच्या विरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===================================
या टोळीत तिघे सराईत गुन्हेगार
===================================
नयन तांदळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरूध्द ठाणे व नगर जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत. तसेच अमोल लक्ष्मण रणसिंग याच्याविरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा व इतर कलमान्वये गंभीर स्वरूपाचे एकुण पाच गुन्हे दाखल आहेत. बजरंग नारायण मिश्रा विरूध्द दोन गुन्हे दाखल आहेत.

===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक-अमोल दिक्षित-शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================








No comments:

Post a Comment