भयाण घडलेला दुर्दैवी नेसर्गिक अप्पती प्रकार इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे, असे सांगण्यात येत आहे. यातून लोक सुखरूप बाहेर पडावीत, इतकी इच्छा. जे जखमी आहेत, त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत ना, आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल, हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावे.खरे तर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती; पण आता इतकंच सांगतो
की, कुठे दरड कोसळू शकतात याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर हे कसले प्रशासन ? असो. पुढे यावर सविस्तर बोलेन, पण आता तरी सगळे सुखरूप राहावेत, ही इच्छा!' अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली.
=================================------------------------------------------------
: - नवकेश कुडाळकर - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment