💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
हिंदू धर्मियांची अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) व मुस्लिम धर्मियांचा ईद-ए- मिलादुन्नबी (प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर जयंती) हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे एकच सुट्टी देण्यात आली होती. दोन्ही सणाच्या मोठ्या मिरवणुका सर्वत्र निघतात. त्यामुळे यावर्षी अनंत चतुर्दशी ('गणेश विसर्जन) च्या दिवशी मिरवणूक न काढता दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्याचा निर्णय राज्यातील मुस्लिम समाजाने घेतला होता. प्रेषित हजरत पैगंबर जयंती निमित्त राज्यभर मिरवणूक काढल्या जातात. त्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव व बालगोपाल मोठ्या संख्येने सामील होतात. परंतु दुसऱ्या दिवशी सुट्टी नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ईद-ए-मिलाद ची सुट्टी शुक्रवारी देण्यात यावी अशी मागणी राज्यभरातील मुस्लिम संघटनांनी शासनाकडे केली होती. राज्यातील सौहार्दाचे वातावरण टिकविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईद-ए- मिलादची मिरवणूक दुसऱ्या दिवशी शुक्रवारी काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाने देखील मुस्लिम समाजाला धन्यवाद दिले होते. मुस्लिम बांधवांच्या भावनांची दखल घेऊन राज्य शासनाने ईद-ए-मिलादची सुट्टी उद्या शुक्रवारी जाहीर केल्याबद्दल येथील मानवता संदेश फाउंडेशनने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व शासनाला मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.
ज्याप्रमाणे मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या भावनांची दखल घेत अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) च्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूक पहिल्या दिवशी न काढता दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला होता व याबाबत शासनास देखील कळविले होते. तसेच हिंदू बांधवांनी देखील मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे व्यापक प्रमाणात स्वागत केले होते. राज्यातील धार्मिक सलोख्याचे वातावरण कायम राहण्यासाठी दोन्ही समाजाच्या प्रमुख घटकांनी समजूतदारीची भूमिका घेऊन दोन्ही उत्सव शांततेने साजरे करण्याबाबत पुढाकार घेतला होता. राज्य शासनाने देखील जन्मताचा कौल लक्षात घेऊन आज अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) व उद्या पैगंबर जयंतीची सुट्टी जाहीर केल्याबद्दल मानवता संदेश फाउंडेशन चे प्रमुख सलीमखान पठाण, नजीरमामू शेख, तनवीर शेख, खालीद मोमीन, हाजी सय्यद युसूफ,सय्यद इमाम, तोफिक शेख, अहमदभाई जहागीरदार, साजिद मिर्झा, मुक्तारभाई शाह, अझहर शेख,जाकीर सय्यद, बबलूभाई शेख, हुजेबखान पठाण, डॉक्टर सलीम शेख, इकबाल काकर, आरिफ पटेल, फारुक पटेल, याकूब शाह, अँडवोकेट समीन बागवान,अँड शफी शेख, सलाउद्दीन शेख, युसुफ लाखानी, रज्जाक पठाण, अजिज शेख, समीर शेख आदींनी राज्य शासनास धन्यवाद दिले आहेत.
अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) व ईद-ए-मिलादची मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील मानवता संदेश फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9562174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment