राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, October 2, 2023

खपवुन घेणार नसल्याचा निर्धार सिंहस्थात कुंभ मेळाव्यात दुर्लक्ष......


नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीगेल्या चारही सिंहस्थात शासनाकडुन आलेल्या निधीतुन मुळ पंचवटी व जुने नाशिक मधील विकास दुर्लक्षीत राहीला असुन यंदाच्या सिहस्थात जुन्या पंचवटी व जुन्या नाशिककडे दुुर्लक्ष केल्यास कदापी खपवुन न घेण्याचा निर्धार आज पंचवटीत झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला  पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाला आराखडा सादर करण्यासाठी महापालिकेने ४३ विभागांकडून प्रस्तावित कामांची यादी मागितली आहे. त्या पार्श्वभुमीवर आठवण लॉन्स येथ पुरोहीत संघ, काळराम मंदीर, कपालेश्वर देवस्थान, तपोवनातील मठ मंदीरांचे पुजारी, महंत, विश्वस्त, गोदवरी प्रेमी नागरीक, तसेच गेले चार सिंहस्थांचे साक्षीदार असेलेले ज्येष्ठ नागरीक उपस्थीत होते. यावेळी देवांंग जानी, नंदु पवार, मंडलेश्वर काळे,शांतराम अवसरे, सतीश शुक्ल आदींनी मार्गदर्शन केले.

त्या सर्वांनीच पंंचवटीच्या विकासाकडे झालेल्या दुर्लक्षाकडे लक्ष्य वेधले. येणारा निधी ठरावीक भागात खर्च होता, वर वर विकास दिसतो आतुन मात्र नाशिक भकास असते. त्याचा फायदा मुळ पंचवटी व जन्या नाशिकला अजीबात होत नाही, त्यामुळे हा परीसर अद्यापही विकसीत झाला नाही. अशी खंत यावेळी व्यक्त झाली....
२०२७ व २८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविक साधुमहंतांना सेवा व सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त होतो. त्याचा फायदा पंचवटीकरांना झाला पाहीजे असा सुर यावेळी व्यक्त झाला. त्यासाठी नियोजन करतानाच जुन्या नाशिक व पंचवटीच्या विकासासाठी सुचना करुन त्यासाठी पाठपुरावा करावा. असे यावेळी ठरले.आमदार, खासदार व लोकप्रतीनीधी यांच्या माध्यमातून आता पासूनच त्यासाठी प्रयत्न केले तरच भविष्यात या भागात विकास कामे होतील, अन्यथा आज पर्यंत झाले तसेच दुलक्ष होत राहील. असे पवार यांंनी यावेळी सांगीतले.

===================================
---------------------------------------------------
: - सहाय्यक - माहिती...वार्ता - प्रविण रामचंद्र देशपांडे...✍️✅🇮🇳...
---------------------------------------------------
===================================









No comments:

Post a Comment