राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 31, 2023

*हातभट्टी गावठी दारू निर्मिती. विक्री ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर विभागाची धडक कारवाई*


श्रीरामपूर/प्रतिनिधी - वार्ता
डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी राज्यातील हातभटटी दारु विरुद्ध सुरु केलेली हातभट्टीमुक्त गाव मोहिम अधिक परिणामकारक करण्यांबाबत दिलेल्या सूचनान्वये तसेच सुनिल चव्हाण, संचालक, (अ व द), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई गोहन वर्दे विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे तसेच प्रमोद सु. सोनोने, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर व उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्वच तालुक्यात दिनांक २८/१०/२०२३ ते दि. २९/१०/२०२३ या दोन दिवसांचे कालावधीत हातभटटी गावठी दारू निर्मिती व विक्री विरोधात प्रभावीपणे कारवाई करण्यांबाबत विशेष मोहिम राबविण्यांत आलेली आहे.
       सदर दोन दिवसांचे विशेष मोहिम कालावधीत एकूण २२ गावठी दारू निर्मिती दारुअडडे उध्वस्त करण्यांत आले असून एकूण १३ हातभटटी दारु विक्री करणान्या ठिकाणावर तसेच हॉटेल व ढाबे इतर ५ ठिकाणी सुध्दा प्रभावी कारवाई करण्यांत आलेली आहे. सदरील कारवाईत एकूण ४० गुन्हे नोंद करण्यांत आलेले असून ४१ आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत नियमान्वये कारवाई करण्यांत आलेली आहे. सदरच्या कारवाईत नष्ट केलेल्या मुद्देमालात हातभट्टी गावठी दारु बनविण्याचे तयार रसायन व तयार हातभट्टी दारुचा समावेश आहे.सदर कारवाईत २१३०० लीटर हातभाट्टी निर्मीतीचे तयार रसायन व १३४१ लीटर तयार हातभट्टी गावठी दारु नष्ट करण्यात आली आहे. सदरील कारवाईत एकूण ६,४६,६१३ /- रुपयांचा मुददेमाल नष्ट करण्याची कारवाई विभागाने केलेली आहे.
       तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे /हॉटेल्स यावर देखील कारवाई करण्यांत आलेली असून सदरील ठिकाणी मद्यसेवन करणा-या व्यक्तिवरही कारवाई करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६८ व ८४ अन्वये कारवाई करण्यांत आलेली आहे. सदरील कारवाई मुळे अवैध मद्यविक्री करणा-या ढाबे व हॉटेल्स इ. ठिकाणी मद्यसेवन करणा-या व्यक्तिचे तसेच हातभटटी दारू निर्मिती करणा-यांचे धाबे दणालले आहेत.
      सदरील दोन दिवसांचे विशेष मोहिम कालावधीत जिल्हयातील सर्व कार्यकारी / अकार्यकारी अधिकारी / भरारी पथकांचे अधिकारी तसेच अकार्यकारी घटकाचे प्रशिक्षणार्थी उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क तसेच जवान कर्मचारी कारवाईत सहभागी होते.
      अवैध मद्यविक्री करणारे ढाबे / हॉटेल्स, तसेच हातभटटी दारू निर्मिती / विक्री ठिकाणावर यापुढेही सातत्याने उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती विभागाचे प्रमोद सु. सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. 
        सदर कारवाईत अहमदनगरचे उपधीक्षक सुजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षनार्थी उपअधीक्षक सागर शेलार, जी.व्ही. कसरे यांचे सह अ.विभागाचे निरीक्षक.एम.एम. राख , ब.विभागाचे निरीक्षक जी.टी.खोडे ,संगमनेर विभागाचे निरीक्षक एस.वाय. श्रीवास्तव, कोपरगाव विभागाचे निरीक्षक एस.एस.हांडे, श्रीरामपुर विभागाचे निरीक्षक बी.बी.हुलगे भरारी पथक क्र १ अहमदनगरचे निरीक्षक ए.बी.बनकर भरारी पथक क्र २ श्रीरामपुरचे गोपाल चांदेकर यांचे सह विभागातील दुय्यम निरीक्षक सहाय्यक दुय्यम निरीक्षक व जवान सहभागी झाले होते.

*जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्यास खालील नंबरवर संपर्क साधा - प्रमोद सोनोने, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर*
       *आपल्या परिसरात तसेच गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण कक्षातील १) टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ २) व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ क्रमांकावर तक्रार करावी. जेणे करुन अवैध मद्यविक्री / निर्मिती व वाहतुक इ. परिणामकारक कारवाई होऊन त्याचे समूळ उच्चाटन होण्यास जनतेद्वारे मदत होईल*

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment