श्रीरामपूर प्रतिनिधी वार्ता
आत्मचरित्र हॆ जीवनजाणिवेचे प्रेरणास्तोत्र असते.ते स्वबरोबर कुटुंब,समाज आणि स्थलकाल यांना अमृतमय करते, यादृष्टीने अकोले येथील जेष्ठ साहित्यिक पुंडलिक गवंडी कुमावत यांचे 'ठिणगी 'हॆ आत्मचरित्र म्हणजे आजच्या,उद्याच्या पिढीसाठी ज्ञानज्योतीसारखे आहे, असे मत साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक डॉ. शिवाजी काळे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगर मधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे अकोले येथील जेष्ठ साहित्यिक पुंडलिक चिमणराव गवंडी कुमावत यांच्या 'ठिणगी 'आत्मचरित्राचे प्रकाशन संपन्न झाले, त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शिवाजीराव काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे होते. प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. लेखक पुंडलिक गवंडी,अध्यक्ष प्राचार्य डॉ. गागरे आणि मान्यवरांचा प्राचार्य शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य टी. ई. शेळके,डॉ. रामकृष्ण जगताप, प्रा. शिवाजीराव बारगळ,श्रीरामपूर सुवर्णकार समाज तालुका अध्यक्ष स्वामीराज कुलथे,पत्रकार बाबासाहेब चेडे, संगीता फासाटे, गणेशानंद उपाध्ये, सौ.आरती उपाध्ये, सुरेश बेलदार, भीमशन्कर परदेशी, गणेश गवंडी,शुभदा दहिमिवाळ आदी उपस्थित होते.डॉ. शिवाजी काळे यांनी पुंडलिक गवंडी यांच्या आत्मचरित्रातील शेवगाव, अकोले येथील हृदयस्पर्शी आठवणी विशद करून पुंडलिक गवंडी अकोले परिसरातील साहित्य कोहिनूर आहेत पण त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नसल्याची खंत व्यक्त केली. पुंडलिक गवंडी यांनी श्रीरामपुरात वाचन संस्कृती प्रतिष्ठानने दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनी अध्यक्षीय भाषणातून साहित्य आणि समाज यांचे नाते सांगून 'हातोडा'नंतरची 'ठिणगी'प्रकाशयात्री ठरणारी असल्याचे सांगितले.प्राचार्य टी. ई. शेळके यांनी सांगितले, शिक्षक हा नेहमी पिढी घडवितो, एक आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक आणि लोकप्रबोधक साहित्यिक म्हणून पुंडलिक गवंडी यांचे योगदान प्रेरणादायी आहे, असे सांगून आयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी एका आदर्श साहित्यिकाची दखल घेतली,जे निष्ठावान आणि समर्पित साहित्यिक आहेत,पुंडलिक गवंडी, डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. शिवाजी काळे, सुखदेव सुकळे अशी साहित्यतपस्वी व्यक्तिमत्वे अंधारात असली तरी शब्दप्रकाश देतात त्यांचे कार्य आणि जीवन यांचा अभ्यास झाला पाहिजे असे मत प्राचार्य शेळके यांनी विविध अनुभवातून सांगितले डॉ रामकृष्ण जगताप म्हणाले, खऱ्या साहित्यिकाची आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्याची दखल समाजात आणि साहित्य वर्तुळात घेतली जात नाही,त्यामुळे साहित्य आणि साहित्यिक यांचा शब्दसुगन्ध नव्या पिढीला मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली.पुंडलिक गवंडी यांची नात शुभदा दहिमिवाळ यांनी आपल्या मनोगतातून पुंडलिक गवंडी यांचे कुटुंबप्रेम सांगितले,माझे वडील वारल्यानंतर त्यांनीच आम्हाला आधार दिला, आम्हाला मुलासारखा मान देतात, मुलगी, मुलात फरक करीत नाहीत,त्यांच्यामुळे मी श्रीरामपूरच्या बोरावके कॉलेजमध्ये डॉ. बाबा तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विषयावर पीएच.डी करीत आहे, असे सांगून आठवणी सांगितल्या. सौ. आरती उपाध्ये, निर्मिक उपाध्ये यांनी नियोजन केले. प्रतिष्ठान उपाध्यक्ष संगीता फासाटे यांनी 'हातोडा' ते 'ठिणगी' साहित्यसूत्र सांगून सूत्रसंचालन केले तर प्रतिष्ठान कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आ.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment