राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, October 30, 2023

*प्रत्येकाने आपल्यातला प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठपणा जिवंत ठेवावा-जीवन बोरसे*

बेलापूर - प्रतिनिधि - / वार्ता -
प्रत्येकाने आपल्यातला प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठपणा जिवंत ठेवावा आणि आपले काम नि:स्वार्थीपणे व निरपेक्षपणे करीत राहावे असे प्रतिपादन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे एपीआय जीवन बोरसे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन आदेशान्वये "भ्रष्टाचार दक्षता जनजागृती सप्ताह"अंतर्गत बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे असेही म्हणाले की, भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण.लाच घेणे, लाच देणे हा गुन्हा आहे.वाहतुकीचे नियम न पाळणे हा गुन्हा आहे.१९८८ मधे हा कायदा अस्तित्वात येऊन त्यात काही नवीन सुधारणा झाल्या. भ्रष्टाचार जर सिद्ध झाला तर दंडासहित सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रो.डॉ.गुंफा कोकाटे म्हणाल्या की, भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. भ्रष्टाचाराचा अंध:कार सगळीकडे पसरलेला असताना आपण छोटीशी पणती व्हावे. त्रास होईल पण सत्य उजळून निघेल. प्रामाणिकपणाने, नि:स्वार्थीपणाने सेवा करणे हेच महत्त्वाचे आहे असे त्या म्हणाल्या.सदर कार्यक्रमात भ्रष्टाचार निर्मूलन सत्यनिष्ठतेची शपथ उपस्थितांना देण्यात आली.यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून बेलापूर पोलिस औट पोस्टचे लोखंडे मामा व ढोकणेज्ञमामा उपस्थित होते.
 डॉ.बाबासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले व अतिथींचा परिचय करुन दिला.प्रा.रुपाली उंडे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा.प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा.चंद्रकांत कोतकर,प्रा.रुपाली उंडे, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ.संजय नवाळे,प्रा.प्रकाश देशपांडे,प्रा.किशोर गटकळ , डॉ.बाळासाहेब बाचकर, प्रा. ओंकार मुळे,प्रा.अशोक थोरात यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment