- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
पाट पाण्याच्या व्यवस्थित नियोजनामुळे गोंडेगाव मधील शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन सरपंच सागर बढे यांनी केले आहे.
गोदावरी उजवा कालव्यावरील चारी नंबर १९ व २० चे सिंचन शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल अधीक्षक आमले साहेब व कार्यकारी अभियंता सोनल शहाणे मॅडम यांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गोंडेगाव मधील समस्त शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे. कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी पुढाकार घेऊन कॅनॉलच्या खोलीकरणाचे काम पूर्ण केले. तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना खरिपाच्या पिकासाठी वेळेवर पाणी देऊन गावतळी भरून दिली . त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पाट पाण्याच्या व्यवस्थित नियोजनामुळे सोनल शहाणे यांचे गोंडेगाव मधील शेतकरी व ग्रामस्थांनी विशेष आभार मानले आहे. यानिमित्ताने उर्वरित चारी दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment