- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
महिला बचत गटांना विविध स्तरावरुन अर्थसहाय्य मिळते. याचा लाभ घेवून महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून गृहोद्योग, व्यवसाय सुरु करावेत. यातून आर्थिक सक्षम बनून स्वावलंबी व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी
आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
शहरातील महिला बचत गटांना विविध व्यवसायासाठी अ.नगर जिल्हा बँकेचे संचालक माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे सहकार्यातून १३ महिला बचत गटांना सुमारे १७ लाखाचे कर्ज वितरण श्री.मुरकुटे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील म्हणाले की, अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार व जिल्हा बँकेचे संचालक माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच अशोक सह.साखर कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या प्रयत्नाने श्रीरामपूर शहरात यापुर्वी ४६ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आलेली असून सुमारे ५१ लाख रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आलेले आहे. महिलांनी बचत गटाचे माध्यमातून विविध व्यवसाय सुरु करून आपले कुटूंबाचा विकास करावा. भविष्यातही अशा प्रकारच्या योजना राबविण्यात येणार असून स्थापन झालेल्या बचत गटाच्या महिलांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे असे ते
म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यालय अधिक्षक बाबासाहेब खर्डे यांनी महिला बचत गटाविषयी सविस्तर माहिती दिली व बचत गटाचे आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने करावे, आर्थिक व्यवहार करतांना काय काळजी घ्यावी, यावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश छल्लारे, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र जगधने, शाखाधिकारी अशोक पटारे, प्रमोद करंडे, बाळासाहेब शिंदे, शंकरराव डहाळे, बाबासाहेब थोरात, सौ.शालिनी कोलते, सौ.संगीता शिंदे, सौ. अनिता सुर्यवंशी यांचेसह महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. शेवटी नाना पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment