वजीर - शेख - / पाथर्डी -
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे महागाई व बेरोजगारीच्या विरोधात तसेच गायरान जमीनी आदिवासींना मिळावीत व निराधार वृध्दापकाळ योजनेची प्रलंबित अर्ज मंजूर व्हावेत या मागणीकरीता कळवण तहसील कार्यालया समोर निदर्शने आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत असलेली अन्याय अत्याचार निर्मुलन समितीतर्फे विविध सामाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जातात, तथा अन्याय अत्याचार निर्मूलनाप्रश्नी सातत्याने आवाज उठविला जातो.
करीता या सामाजिक संघटनेमार्फत कळवण तहसील कार्यालया समोर महागाई व बेरोजगारीच्या विरोधात तसेच भेंडी येथील गायरान जमीनी साठ वर्षापासून ताब्यात व करणाऱ्या मागासवर्गीय आदीवासींच्या नावावर करण्यात यावीत तसेच शिधापत्रिका आणि वृध्दापकाळ व संजयगांधी निराधार योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करण्यात यावेत आदी मागण्यांबाबत समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया चे राज्य उपाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली तर जिल्हाध्यक्ष संजयबाबा गायकवाड यांचे उपस्थितीत निदर्शने आंदोलन करण्यात येवुन तहसीलदार रोहीदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येवून घोषणाबाजी करण्यात आली तर लक्ष वेधण्यासाठी रॅलीने जावून तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निदर्शनात समितीचे पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष दिनेशभाऊ आहीरे, जिल्हा संघटक संतोषभाऊ शेजवळ, तालुकाध्यक्षा शर्मिलाताई गांगुर्डे, भेंडी सरपंच व शाखाध्यक्ष कुसुमताई वाघ, हौसाबाई पवार, शिला वाघ, वामन बागुल, चिंधा वाघ,गोरख पवार, इंदुबाई बागुल, बायटाबाई माळी, लताबाई कांबळे, लक्ष्मीबाई बर्डे, चंद्राबाई कुवर, फुलाबाई जगताप आदींसह असंख्य महीला,पुरुष कार्यकर्ते आदि उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
(ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment