श्रीरामपूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे व अशोक कारखान्याच्या संचालिका सौ. मंजुश्री मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. त्यास अखेर यश येवून गोदाकाठच्या भामाठाण, पढेगांव, मालुंजा,भेर्डापूर आणि नायगांव येथील आपदग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे ५ कोटींची मदत जाहिर झाली असून संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खाती लवकरच सदरची
रक्कम जमा होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०२२ मध्ये अतिवृष्टी होवून श्रीरामपूर तालुक्यातील बहुतांशी गावांना त्याचा फटका बसला होता. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय येथे ऑगस्ट २०२३ मध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनात पुंजाहरी शिंदे, हिम्मतराव धुमाळ, नाना पाटील, ॲड्.सुभाष चौधरी, किशोर बनसोडे, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, मयुर पटारे, भाऊसाहेब हळनोर, आबासाहेब गवारे, विरेश गलांडे, आदिनाथ झुराळे, बाबासाहेब आदिक, यशवंत रणनवरे, प्रफुल्ल दांगट,ॲड्. उमेश लटमाळे, ॲड्. पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र तोरणे, रोहन डावखर, हरिदास वेताळ, गणेश भाकरे, शिवाजी मुठे, अंबादास आदिक, नारायणराव बडाख, अच्युतराव बडाख, रामनाथ सांगळे, राजेंद्र बनसोडे, संदीप शेरमाळे आदीसह लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनास अखेर यश येवून या आपदग्रस्त शेतकऱ्यांना पाच कोटी मदत शासनाकडून मंजूर झाली आहे. याबद्दल माजी आ.भानुदास मुरकुटे, उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व शासनास संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले आहेत.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
(ब्यूरो चिफ - नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment