राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, January 1, 2024

छ.शिवाजी कॉलेज मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ सामंजस्य करार


- सातारा - प्रतिनिधि -वार्ता
सातारा - येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांचा सामंजस्य करार नववर्षाचे औचित्य साधून १ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आला.
 शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ ही शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील मराठी शिक्षक यांची महाराष्ट्रातील साहित्य आणि भाषाप्रेमी यांचे संघटन आहे. मराठी भाषा,साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन आणि विकसन करण्याचे ध्येय घेऊन या संघटनेने आजवर मराठी प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यासाठी अनेक कार्यक्रम केले.या संघटनेचे आजवर अनेक महाविद्यालये व विद्यापीठाचे विभाग यांचेशी सामंजस्य करार झालेले आहेत. मराठी भाषा व साहित्य यांचे विकसन करण्यासाठी विद्यार्थ्यासाठी निबंधलेखन,कथा लेखन,कथाकथन ,काव्यवाचन अशा विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे.मराठी प्राध्यापक यांचेसाठी संशोधन निबंध,ललित व ललितेतर ग्रंथाना संघटनेने पुरस्कार दिलेले आहेत. संघामार्फत शिविम संशोधन पत्रिका हे विद्वतप्रणीत त्रैमासिक प्रसिद्ध होत असून युजीसी मान्यताप्राप्त यादीमध्ये व विद्यापीठ यादीमध्ये त्याचा समावेश आहे संघाने राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले असून मॉरिशस,रशिया इत्यादी ठिकाणी संघाचे सदस्य प्राध्यापक यांनी सहभागी होऊन,संस्कृती,साहित्य अभ्यास व संशोधन केलेले आहे. छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय जे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९४७ ला सुरु केले. महाविद्यालयीन पातळीवरील ‘कमवा आणि शिका योजना’ याच महाविद्यालयात सुरु झाली आणि आज देखील ती मोठ्या प्रमाणात याच कॉलेजमध्ये चालू आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या स्थापनेपासून मराठी विषय सुरु असून मराठी विभागात अनेक विद्वान, साहित्यिक, प्राध्यापक यांनी काम केले आहे. प्राचार्य शंकरराव उनउने,वसंत जोशी,ह.बा. कुलकर्णी,सूर्यकांत खांडेकर,
 प्राचार्य,डॉ.मा.के.यादव,डॉ.र.बा.मंचरकर,प्रा.डॉ.द.ता.भोसले,प्रा.श्रीधरहेरवाडे,प्रा.ज.म.डोंबाले,प्रा.डी.ए.माने,प्रा.बी.डी.पाटील,प्रा.डॉ.विमला पाटील, प्राचार्य संभाजीराव देसाई,प्रा.आनंद घाटूगडे, प्रा.डॉ.नलिनी महाडिक, प्रा.सरलादेवी निकम,डॉ.शिवाजी पाटील, प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, प्रा.उत्तमराव सूर्यवंशी, प्रा.मीरा देठे,प्रा.डॉ.शुभांगी भूतकर, डॉ.सुमन पाटील, डॉ. हेमलता गायकवाड,डॉ.मानसी लाटकर, इत्यादी अनेक प्राध्यापक यांनी मराठी विभागात अध्यापन करून भाषाविभाग समृद्धीसाठी योगदान दिले आहे. सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय म्हणून कॉलेज झालेले आहे. मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ संचालक म्हणून काम पाहत आहेत.ते स्व
तः शिविम आयोजित मॉरीशस चर्चासत्रात सहभागी झाले आहेत.शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या कार्यकारणीत या मराठी विभागाचे प्राध्यापकांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे.
दोन्ही संस्थांनी या पूर्वी करार करून राज्यस्तरीय व राष्ट्रीय कार्यक्रम केले आहेत. शिविमद्वारे प्राचार्य संभाजीराव देसाई यांचे स्मृतीप्रीत्यर्थ निबंध लेखन व कथालेखन स्पर्धा आयोजित केल्या जातात.सामंजस्य करार झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी आनंद व्यक्त करून शिविम सोबत यापुढेही विविध विद्यार्थी, प्राध्यापक व सामाजिक हिताचे नाविन्यपूर्ण, व संशोधनविषयक कार्यक्रम घेण्याच्यासाठी
 सहयोग दिला जाईल असे सांगितले.
या कराराच्या वेळी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.भरत जाधव, प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व विभागातील डॉ.विद्या नावडकर, डॉ.संजयकुमार सरगडे, प्रा. प्रियांका कुंभार,प्रा.श्रीकांत भोकरे,स्वप्नील जाधव,ऋतुजा पाटील,सोनाली जाधव,तुषार बोकेफोडे ,विनय कर्चे,अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*लक्ष्मण संभाजी भिसे - इंदापूर (पुणे)*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment