राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, March 31, 2024

नॉर्दन ब्रँच येथे युवा जागृती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी


श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता 
 नॉर्दन ब्रँच येथील युवा जागृती प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.   यावेळी माजी आ.भानुदास मुरकुटे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी असून विश्वासू मावळे, योग्य संघटन कौशल्य, उत्कृष्ट व्यवस्थापन, महिलांचा सन्मान, आदर्श नीती, युद्ध कौशल्य व प्रजेच्या हिताचे निर्णय, अशा असंख्य गुणांनी परिपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आदर्श असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या    तसेच खा.सदाशिव लोखंडे, भाजपचे प्रकाश चित्ते, मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, प्रवीण फरगडे, योगेश जाधव, युवा जागृती प्रतिष्ठानचे संस्थापक रोहित मालकर यांनी मनोगत व्यक्त करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर, हरिनाम सप्ताह समितीचे बाबासाहेब मोरगे, गणेश मगर, दिलीप भिसे, गणेश भिसे, सागर भागवत, लहानु त्रिभुवन, उत्तमराव मालकर, संकेत संचेती, मनोज दिवे, सुरेश रावत, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अंबादास निकाळजे, रावसाहेब तोडमल, डॉ.मच्छिन्द्र त्रिभुवन, डॉ.महेश शरणागत, कैलास भागवत, बबन आसने, साहेबराव गायकवाड, अनिल कुलकर्णी, अतुल भिसे, विशाल पिंगळे, गौरव तुपसाखरे, राहुल जाधव, दिपक खैरनार, संजय मोरे, प्रशांत कारवाळ, किशोर चव्हाण, चेतन कारवाळ, सिद्धार्थ मोरगे, दिपक शहाणे, अमोल वराडे, गणेश दळवी, सौरभ फरगडे, हर्षद देव, शुभम कुलथे, किरण शेळके, विशाल कदम, राजेंद्र लाड, उज्वल डाकले, विकी देशमुख, निलेश कारवाळ, निलेश राणेजा, संदीप सातपुते, साई चिटणीस, शरद वाघ, सुदेश झगडे, भास्कर गायधने, रोहित देशमुख, प्रमोद पिंगळे, खुशाल ढोरमारे, ऋतिक देशमुख, मनोज थोरात,प्रकाश कुमावत, गणेश ताकपेरे, हेमंत मुसमाडे, अक्षय फाळके, मनोज भिसे, विशाल खैरनार,मनोहर पवार, बाळासाहेब लोंढे, तुषार भोर, प्रफुल्ल खजिनदार आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
ब्यूरो चिफ नाशिक विभाग
===========
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर -
*9561174111*
-----------------------------------------------
=================================

रोजा :- "' - मी - अहंकाराला- घालवण्यासाठी हे दहा दिवस


रमजान मुबारक २०२४ मालिका.
" इस्लाम समजून घेताना "
रोजा नं.२० वा .
रविवार दि.३१-०३-२०२३
=====================

आज २० विसावा रोजा चालला आहे अर्थात पहिला अशहरा ( विभाग) " रहमत,( 'दये)चे संपलेंत , आज २० रोजा पुर्ण " मगफीरत '( माफी दैवून कृपादृष्टी )चे (१०- ते २० ) संपूं राहिलेत , आज संध्याकाळी तिसऱ्या विभाग ( अशहारा ) हा " नरकाग्नितल्या ( जहान्नुम) च्या आगीच्या होणाऱ्या इंधनापसून संरक्षण " वाचण्यासाठी पुढील दहा दिवस आहे 🎉 , वेळ दिवस खुप लवकर संपत चाललेली ..आज संध्याकाळीच "लैलतुल -कद्र " च्या पवित्र रात्रीं ( ज्यांचे पुण्य हे एका रात्रीचं एक हाजार महीन्यांच्यां रात्रीं पेक्षाही अधिक असतं) बरोबरच" एहतेकाफ "संध्याकाळ पासूनच सुरू होणार , आज ही अल्लाहच्या कृपेपासून विमुक्त आहोत . याचं महत्त्व आपल्या लक्षात घेतलं पाहिजे . दुआ याचना करण्याच्या पर्वाचा प्रवास सुरू झाला आहे. 
                 एक ते वीस दिवसांत तुम्हाला तुमच्या व्यस्तते ,हालगर्जीपणामुळे , त्याचं महत्त्व न समजल्यामुळे अल्लाहा ( ईश्वरा) च्या एवढ्या मोठ्या पर्वाच्या संधीचा फायदा उचलला नाहीत ,तर तुम्ही दरीद्रीच समजा. " मगफिरत "या पर्वात वर्षांनु वर्षे क्षणा क्षणाला ,कळत नकळत केलेल्या पापांची , चुकांची दुरुस्ती , चुकांची माफी मागणं व अल्लाह ला पुन्हा पुन्हा या चुकीचं होणार नाहीत यासाठी कृपादृष्टी व्हावीत . याला म्हणतात "मगफिरत ' होणं. संपूर्ण आयुष्यभर श्रद्धांवान बांधव याच आशेवर जगत असतात की परमेश्वर( अल्लाह) ने आमची मगफीरत करावी..हे फक्त परमेश्वराच्याच हातात आहे.
आपण कळत नकळत चुका होतच असतात . एखाद्या शुल्लक चुका ; त्याला साधी लहान चुक समजतो , परंतु ती कोणां दुसऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानिची ठरु शकते हे कधीच आपल्या लक्षात येत नसते , आशा चुक ही आपल्यासाठी नरकातील इंधनासाठी पुरेशी ठरु शकते.  
पवित्र कुरआन सांगितले की, " त्या ( कयामत) दिवशी तुम्हाला वाचवणारा कोणी नसेल , त्या दिवशी स्वतः चे आई-बाबा मुलांना ओळख देणार नाही , बहीण- भावाला , पती -पत्नी ला ,मुलं- आई-बाबांना ओळख देणार नाहीत . ज्याला त्याला स्वतःचं पडेल. " 
आयुष्यभर केलेल्या चांगल्या -वाईट कर्मांचां हिशोब द्यावाच लागणार आहे . मग त्यासाठी आजच तय्यारीला लागा .
तिसऱ्या टप्प्या ( अशराह )ला २१ ते ३० ला सुरूवाती बरोबरच रमजानुल मुबारक मधील पवित्र लैलतुल -कद्र च्यां रात्रीं रोजा२१ , रोजा २३ ,रोजा २५ , रोजा २७- रोजा २९- रोजा ३० वी, या विषम संख्यात्मक " लैलतुल-कद्र " च्या रात्रीं असतात , या एक रात्र ही एक हजार महीण्यांच्या रात्रींच्यां पेक्षा ही जास्त पुण्यंचीं फक्त एक लैलतुल कद्रची रात्रींचं पुण्यं - सबाब भेटतं.
दिव्य कुरआन मधे सांगितले , " आम्ही या( कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरले आहे .(१), आणि , तुम्हाला काय माहित ,की, " कद्र " ची रात्र काय आहेत ? म्हणून, (२), कद्र ची रात्र ही हजार महीण्यांपेक्षा ही अधिक उत्तम आहेत (३),ईशदूत ( फरिशते) आणि रुह (जिब्राईल अलै.) त्यारात्री आपल्या पालनकर्तांच्या आज्ञेनुसार प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (४), ती रात्र म्हणजे पुर्णतः " शांती" आहेत व उष: काळा पर्यंत...(५) ..( दिव्य कुराण ,सुरहा नं. ९७ .अल- कद्र आ.नं. १ ते ५).

त्याच बरोबरच आज २० व्या रोजा च्यां दिवसांपासून ते थेट ३० व्या रोजा पर्यंत १० दिवस सलग अल्लाहच्या याचने नतमस्तक होउन याचना करण्यासाठी बांधंव २४ तास १० दिवस बसतात त्यालाच " एहतेकाफ " ला बसणं.
जगात प्रत्येक मस्जिद मधे या शेवटच्या दहा दिवसांत एक तरी रोजेदार बांधंव बसणं गरजेचे आहे.दहा दिवस अल्लाह च्या भक्तीत बाहेरील जगाशी संपर्क तोडून - जग विसरून, स्वतःच्या प्रंपाचाला बाजूला ठेवून , फक्त अल्लाहाला संपूर्णतः समर्पण करून- देह भान विसरून अल्लाहचच नामस्मरणात तल्लीन होऊन जाणं ..बस..
     या रात्रीच्या आलेल्या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा उचलून अल्लाहा जवळ सर्वस्वी अर्पण- लिन - तल्लीन होऊन छाती बदडून , रडून -डोळ्यात पाणी आणून , आयुष्य भर केलेल्या चुकांची जाणीव करून उदा. जाणते व अजाणतेपणी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता व खात्री देउन गरीबांचे ,मजुरांचे , भिकारी, बहीण,भाउ , आई-बाबा , आजी-आजोबा, मित्र मंडळ , गिऱ्हाईक या सर्वांबरोबर कधीतरी उच्च निच झाले असतील , एखाद्याला वेडेवाकडे अपशब्द वापरले गेले असतील , अपमानास्पद भाषेचा वापर झाला असेल, संशयास्पद वागणूक दिली गेली असेल, कधी घमेंडी आली असेल , " मी " ही जागा झाला असेल, कधी" अहंकार" आला असेल , 
"अहंकार""रावर :- प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम . म्हणतात की, " ज्या व्यक्तींच्या मनात तिळमात्र देखील अहंकार असेल ,तो स्वर्गात जाणार नाहीत, " 
त्यावर त्यांच्या एका मित्र( सहाबी) ने विचारले की चांगले कपडे परिधान करणे, नव्या पादत्राणांचां वापर करणं, हे देखील अहंकारासारखंच आहे का? 
त्यावर प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी उत्तर दिले," अल्लाह सुंदर आहे आणि त्याला सौंदर्य आवडते, अहंकार हा आहे की तो सत्याला नाकारतो आणि दुसऱ्या लोकांना तुच्छ समजणे " ( हादिस ईब्न मस- उद , मुस्लिम.). कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नयेत. आपल्यातल्या " मी "पणा , अहंकार माणसाच्या आयुष्यात खूप गडबड करत असतो तर त्या मी व अहंकाराला बाजूला काढून टाकण्यासाठी अल्लाहच्या दरबारात येउन बाजूला काढण्याचं प्रयत्न करा .
         " , आपल्या व्यस्त जीवनाचा काही वेळ , जितकं वेळ मिळाला तेवढं का होईना वेळ काढून , एकांतात ,एका शांत जागी , निवांत बसून, अल्लाहा जवळ पुर्ण पणे लीन -शरण - समर्पित होउन - अगदी तल्लीन होऊन , निर्विकार पणे , अंतर्मनात दडलेल्या प्रत्येक प्रत्यक्ष गुन्हेची , दुष्कृत्ये ची , काही घटना फक्त आपल्यालाच माहीत असतात , आशा केलेल्या गुन्हे ची माफी मागणं , आगदी मनापासून- मनमोकळेपणाने अल्लाहा (परमेश्वरा) बरोबर संवाद साधणं ..जसं एका खास मित्राला मनमोकळेपणाने गप्पा मारतो तशा पध्दतीने अल्लाहा (परमेश्वरा) समोर मनापासून मनमोकळे करणं .याला रिते होणं , फक्त रिते होणे ‌, आत्मक्लेश करणे , आत्मचिंतन करणं , पुन्हा पुन्हा अल्लाहा( परमेश्वर )ला सांगणं पुढे कधीच कोणत्याही परिस्थितीत अशा चुकीचं होणार नाही याची ग्वाही - खात्री देणं . म्हणजेचं मोकळे ,रिते होउन अल्लाहा ( ईश्वराला) ला राजी करणं .
आशा गोष्टींमुळे जेव्हा आपण केलेल्या पापांची - गुन्ह्याची कबुली कुठे तरी देत असतो ; निश्चितपणे माणुष्यात सकारात्मक बदल घडत असतात . निगेटिव्ह विचार -आचार हळूहळू जावून सकारात्मक पॉझिटिव्ह विचार येतात . प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक च होत जाते . हे फक्त स्वतः ठरवलं तर अशक्य काहीच नसतं . " मी "फार धोकादायक ठरतो ,तो मी च आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतो . तो " मी' मनापासून गायब झाला तर अहंकार ही नष्ट होऊन मनाची अंतर्मुख होऊन आत्मशुद्धी होते व आत्मविश्वास वाढला जातो .मणुष्य स्वतः च स्वतः ला कित्येक वर्षे ओळखत नसलेला या दहा दिवसात ओळखू लागतो याच साठी अंतरात्माला आत्मक्लेश आत्मसमर्पण आत्मसमर्पित करणं गरजेचे असते.
नंतर निर्विकार -शांत - नितळ अंतरमन होउन आत्मिक शुध्दी होउन व्यक्तीचा उत्सव वाढतो , चेहऱ्यावर तेज , आनंद ,झळकतो . आपल्या जीवनात एक अल्हाददायक , आनंदी पहाटचं ..
 अल्लाह राजी हुआ समझो...

( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.)
=================================
-----------------------------------------------
: - लेखक डॉ सलीम सिकंदर शेख ,✍️✅🇮🇳
 बैतुशशिफा हॉस्पिटल ,
श्रीरामपूर ९२७१६४००१४.
-----------------------------------------------
=================================


Saturday, March 30, 2024

रोजा :- जकात :- गरीबांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी व स्थिरता देण्यासाठी


" इस्लाम समजून घेताना " मालिका.
रमजानुल मुबारक २०२४ ,
रोजा नं १९ वा.
शनिवार दि.३०-०३ -२०२४
=================================

( लेखन :- डॉ सलीम सिकंदर शेख )

 अल्लाह ने दिव्य कुर'आन मधे सांगतात की, " आम्ही ज्यांना खुप दिलं ; अशांनी हे नाही समजलं पाहिजे की आम्ही त्यांच्या वर खुप खुश आहोत..; व ; ज्यांना आम्ही काहीच दिले नाही ; तर : त्यांनी हे नक्कीच नाही समजलं पाहिजे की आम्ही त्यांच्या वर नाराज आहोत ..!!
प्रत्यक्षात मात्र त्यामागे हे लक्षात ठेवलं पाहिजे की, दोन्हींची अग्निपरीक्षा च आहे ती , ".
     खरोखरच तर परमेश्वर -अल्लाह त्यांच्या वर खुप मेहरबान झाले तर या जगातील प्रत्येक गोष्ट त्यांच्या साठी मेहरबान च असेल ..आणि अल्लाह परमेश्वर ज्यांच्यावर नाराज - ना मेहरबान तर जगातील प्रत्येक शुल्लक शुल्लक गोष्टी ही त्यांच्यासाठी त्रास दायक, छोट्या छोट्या गोष्टींसाठी ही लोकं आपल्याला खाली बघतात...असो .
दिव्य कुर'आन मधे अल्लाह प्रेषित मुहम्मद स्व.यानां आज्ञा करतात की , " हे पैगंबर स्व. , तुम्ही यांच्या मालमत्तेतून दान घेउन यांची संपत्ती शुध्द करावा आणि सदावर्तनाच्या मार्गात यांना पुढे करून , यांच्या साठी दयेची कृपेची दुआ याचना करा ; कारण तुमची दुआ यांच्या साठी समाधान कारक ठरेल.( सुराह अल - तौबा आ.नं.१०३).
                    आज ३० मार्च आहे, भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या राहीलेल्या शेवटच्या दिवसा पैकी शिल्लक एक दिवस अर्थात ३१ मार्च...ला .. मार्च एंड...
आपल्या भारतीय विकास अर्थ व्यवस्था ही प्रत्येक गोष्टींच्या "कर" प्रणाली तून अर्थात टॅक्स रिटर्न भरण्यातूनच चालत असते ..१ एप्रिल ते ३१ मार्च हा आपल्या अर्थ व्यवस्था चा कालावधी ब्रिटिश सरकार भारतात आल्यां पासूनची कर प्रणाली..त्याचे वेगवेगळ्या व्यवसायांच्यां दृष्टीने वेगवेगळ्या स्टेजेशने टॅक्स रिटर्न भरावं लागतं..त्यावर सर्व योजनांची अंमलबजावणी होत असते..त्यावर भारत देश चालतो. 
अगदी तशीच इस्लामी पद्धतीची गरीबांसाठी अल्लाह ( परमेश्वर) ने राबविलेली अर्थ व्यवस्था.
भारतीय रिटर्न टॅक्स मधे थोडीफार हेराफेरीच्या घटना आपण वृत्त पत्रांत वाचत असतो .. परंतु अल्लाह च्या कर प्रणालीत हेराफेरी करणं अशक्यच कारण तो तर सर्वज्ञानी आहे.. चोरी करूच शकत नाही.
अल्लाह ने प्रत्येक " साहेब ए निसाब " अर्थात ऐफतदार धनिकांसाठी जकात अदा करण्याचे बंधनकारक _ फर्ज केलेले आहे.आपल्या संपूर्ण वर्षभरातील व्यपार ,धंदे , नोकरी, व विविध रास्त मार्गातून मिळालेल्या पैशाच्या उलाढाली चा हिशोब करून लाखांवर आडीच हाजार याप्रमाणे लागू होणारी " जकात " प्रामाणिक पणे आदा केली पाहिजे.
पवित्र कुर'आण मधे जकाती संबंधित ८२ वेळा शब्द आलेला आहे.यावरून अल्लाह परमेश्वराला गोरगरिबांच्या आर्थिक स्थिती ची व सामाजिक, आरोग्याची किती काळजी घेतली आहे.
अपण जकात - जकात हे शब्द सतत ऐकत असतो परंतु ते नक्की काय आहे हे जाणून घेऊ या.. आपलं जसं सरकारी कर अर्थात टॅक्स अपण म्हणतात तसच हे जकात ..
जकात चा शाब्दिक अर्थ हा वृध्दी अर्थात इंग्रजी मधे ग्रोथ ( Growth) म्हणतोय.याचच दुसरा अर्थ" पवित्रता "असा ही होतो. तुम्ही जेवढं धन दौलत पैसा आडका जमीन जुमला तुमचं जेवढं कमाई केली आहे त्याचं आडीच टक्के दान दिले म्हणजे ती सर्व प्रॉपर्टी तुमची " व्हाईट " white झाली "शुध्द "होते.व वृध्दी ही होते. पहिल्या अर्थी पवित्रता: नुसार तुम्ही जे गोरगरिबांना आर्थिक दान मदत देतानाच तुमच्या मनात एक आत्मिक समाधान होतं असतं म्हणून आत्मिक शुध्दी होतंच असतं.व तुम्हाला दान देताना बघुन तुमची येणारी पिढी ही दानशूर व्यक्ती बनते . जेवढं तुम्ही समाजातील लोकांना दान द्याल तेवढं तुमचं समाजात स्थान -मान -सन्मानात वाढ होत जावून तुमच्या प्रत्येक व्यवहारात आपोआपच दिवसेनदिवस वृध्दी म्हणजे Growth होत असते. आर्थिक वृद्धी बरोबरच सामाजिक स्थान ही आपोआपच दिवसेनदिवस मोठं होत जाते.तसेच अल्लाह परमेश्वराच्या नजरेत ही उच्च स्थानी असतात.
  " धनीकांसाठी जकात अनिवार्य ( कंपल्सरी) केलेली आहेत. ज्यांच्याकडे वर्षभर साडे बावन ५२.५ तोळे चांदी( सिल्व्हर )व साडेसात ७ ५ तोळे सोने (गोल्ड)किंवा त्यांच्या किमती एवढी रक्कम घरामध्ये वर्षभर - वर्षातील सर्व गरजा भागून राहिलेली शिल्लक रक्कम वर २.५% ( अडीच टक्के रक्कम) म्हणून '" जकातअनिवार्य ( कंपल्सरी) केले आहेत .
जकात घामाच्या, मेहनतीच्या ,कष्टाच्या किंवा चांगल्या कर्माच्या पैशातूनच दिली जाते.
         पवित्र कुरआन सांगते की ,
                " ( १)लाच घेतलेला व अवैध मार्गाने कमावलेल्या , कोणत्याही कब्जा केलेला पैसा , (सुराह .नं.२ अल- बकराह अ.नं . १८८) चालत नाही.;
                   ( २) बेईमानीने , बेकायदेशीर रित्या कमावलेला पैसा .(अल-ईमरान) चालत नाही ; 
                    ( ३) मूर्ती बनवणारा व मूर्ती चा धंदा करणारा , मूर्ती विकणारा याचा पैसा.(अल-मायदा.अ.नं.९०)चालत नाही ;
                      (४) चोरी करणारा , चोरी करून त्याचा माल विकणारा , चोरीला सहकार्य करणारे व चोरीचा पैसा गडप करणाऱ्यांचा .(अल-मायदा अ.नं.३८) चालत नाही ;
                    (५) दुकानदार व्यावसायिक मापा( तराजू) मध्ये कमी जास्त प्रमाणात घोटाळा केलेला पैसा चालत नाही .(अल-ततफीक नं.१३ ) चालत नाही.;
                  ( ६) अनाथांचा मालामधुन पैसा कमावणारे व अनाथांचा माल गडफ करणाऱ्या लोकांचा .(अल-निसा अ.नं१) चालत नाही. ,‌
                  (७) अचानक पणे कमावलेला , अर्थात धन लाभ, उदा. जुगार ,सट्टा , मटका, लॉटरी , कमाईतून आलेला पैसा.(अल-मायदा अ.नं.९०) चालत नाही., 
                  (८) दारू चा पैसा ,दारू दुकानदार ,तो बनवणारा, तो विकणारा ,दारूचा धंदा करणारा ,दारूच्या धंद्याला मदत करणाऱ्यांचा पैसा .(अल-मायदा.नं.९०) चालत नाही.
                  ( ९) अश्लीलता आणि वेश्या व्यवसाय किंवा वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देणारा किंवा नाच-गाणे तमाशा डान्स बार इत्यादींचा पैसा चालत नाही .(अल-नूर.अ.नं.१९, ३३) चालत नाही.; 
                    ( १०)ज्योतिष व्यवसाय करणाऱ्यांचा पैसा(अल-मायदाअ.नं९०) चालत नाही.
        # पवित्र कुरआन म्हणतो की " भरपूर गडगंज पैसा कमावून घरी साठवून ठेवण्याला इस्लामने हराम ठरवलेले. (अत-तौबा अ.नं.३४. )
     माननीय हजरत आयेशा रजि. हे प्रेषित मुहम्मद स्व.सल्लमच्या धर्मपत्नी कथन करतात की , " ज्या संपत्ती तून " जकात " काढण्यात आली नाही,आणि ती त्यातच मिसळून गेली तर ,ती संपत्तीचा विनाश करून टाकते ." ( हादिस मिश्कात ) .
स्पष्टीकरण:-" विनाश "झाला म्हणजे असा नाही की एखाद्या ने जकात स्वतःच खाल्ली तर लगेच त्याची संपत्ती नष्ट होईल अर्थ असा आहे की तो विनाश म्हणजे त्या संपत्ती पासून लाभ घेण्याचा त्याला अधिकार नव्हता,तर तो हिस्सा गरिबांचा होता ,तो गरिबांचा हक्काचे होतं ."
जकात ही प्रामाणिक पणे आदा केलीच पाहिजे.... नाही तर अल्लाहच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल ...
असं म्हणतात की , " देणाऱ्यांचा हात : घेणाऱ्यांच्यां हातापेक्षा चांगलाच असतो ..."!!!

पुर्वाध :: क्रमशः.. उद्याच्या अंकात पुढे पाहू ...
(मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच
आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा.. कृपया प्रतिक्रिया अवश्य नोंदवा).


================================
-----------------------------------------------
लेखन :- डॉ सलीम सिकंदर शेख.✍️✅🇮🇳
 बैतुशशिफा हॉस्पिटल,
मिल्लतनगर ,श्रीरामपूर 🎉
🎉 ९२७१६४००१४ ...
-----------------------------------------------
=================================



Friday, March 29, 2024

मानवता हाच धर्म


रमजानुल मुबारक -१९
रमजान महिन्याचा कालावधी जसजसा संपत आहे तशी ईदची तयारी सुरू झाली आहे.बाजारपेठेत कपडे व इतर साहित्य खरेदी सुरु झाली आहे.जकात आदा करुन गरजूंना मदत करण्याची लगबग वाढली आहे.जवळचे गरजू नातेवाईकांना मदत पोहोच झाली असून देशभरातील मदरसांच्या सफिरांनी आपली वसूली केली आहे व काही करत आहेत.एकमेकांना साह्य करण्यासाठी हात पुढे सरसावले आहेत. मानवतेच्या भावनेतून मदतीचा ओघ कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सुरु आहे. हजरत पैगंबरानी सांगितलेला मार्ग व कुरआन मधील मार्गदर्शनानुसार वर्तन करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असून रमजान महिन्याच्या पुण्यपर्वाचा लाभ घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपल्या परीने करीत आहे. 
काल वाट्सअप ग्रुपमधील एक पोस्ट पाहिली अन मन विषण्ण झाले.या पोस्टमध्ये एक व्यक्ति पंतप्रधान व त्यांच्या पक्षाला शिवीशाप देत असल्याचे दाखविले आहे.हे पाहून एक विचार मनात आला कि आपल्या देशात सर्व जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. भाजी विकणारा, दुधवाला,किराणावाला, डॉक्टर, ड्रायव्हर व इतर अनेक क्षेत्रात सर्व जातिधर्माची माणसे एकत्र वागतात,व्यवहार करतात पण त्यांच्यात कधी जात आडवी येत नाही. भाजी विकणाऱ्याला त्याची जात कुणी विचारीत नाही कि किराणावाला कोण आहे हे कुणी पाहत नाही.कय्युमच्या दुकानात मटन चांगले मिळते म्हणून शहरातील सर्व समाजाचे लोक तेथे गर्दी करतात तर सिकंदरच्या दुकानातून शहरातील सर्व व्यापारी तेल खरेदी करतात. गुजराणीच्या दुकानातून शेकडो मुस्लीम किराणा खरेदी करतात.दैनंदिन जीवनात जाती धर्माचा विचार कुणीही करीत नाही पण गेल्या दशकभरात देशात नवे सत्ताधारी आल्यापासून समाजविघटनाची प्रक्रिया सुरु झाल्यासारखे दिसत आहे.तेच गाव,तोच समाज,तेच लोक असतांना आता तेढ वाढतेय.नागरिकांचे मूलभूत प्रश्न व समस्या सोडविण्याऐवजी नको ते प्रश्न निर्माण करुन लक्ष विचलीत केले जात आहे.हे विश्वचि माझे घर ही ज्ञानेश्वरांनी मांडलेली संकल्पना मोडीस काढून वेगळया पध्दतीने केवळ मुस्लीम विरोध निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ति करीत आहेत. याला मिडिया खतपाणी घालत आहे.विरोधी पक्ष दीन आणि हीन झाला आहे.पण या परिस्थितीतही काही समजूतदार माणसंही या बेफाम सुटलेल्या वारु ला आवरण्याचा प्रयत्न करीत आहेत.खरं तर इस्लाम धर्माने कुणाचा द्वेष करण्याची शिकवण दिलेली नाही.अजाणला आक्षेप घेणारे खूप निर्माण झाले पण आरतीला कुणी मुस्लीमाने कुठं आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही.मी राहतो त्या भागात जेवढया मशिदी आहेत तेवढीच मंदिरे आहेत.नवरात्र व गणेशोत्सवात या ठिकाणी खूप उत्साहात आरत्या व पूजा पाठ होते पण कुणी कधी आक्षेप घेतलेला नाही. सर्व जण गुण्यागोविंदाने राहतात.हे वातावरण प्रत्येक ठिकाणी हवे. यालाच मानवता धर्म म्हणतात.माझा हिंदू धर्मिय मित्रपरिवार खूप मोठा आहे.त्यांच्यामध्ये वावरताना मला नेहमी आदराचे स्थान मिळते. आम्ही कधीही एकमेकांचा द्वेष करीत नाही.असं प्रत्येकाच्या बाबतीत आहे.खूप मित्र चांगले आहेत.परंतु दोन्हीकडच्या मुठभर लोकांमुळे वातावरण बिघडते.त्यात आता राजाश्रय मिळत असल्याने नको ते प्रश्न निर्माण केले जात आहेत आणि प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीय सारी पाटावर वेगळ्या पद्धतीने यश मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय.परंतु मला खात्री आहे आपली लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. आपली जनता सुज्ञ आहे आणि देशाचे हित लक्षात घेऊन आगामी काळात देखील चांगले निर्णय होतील.मानवता हीच सर्वश्रेष्ठ आहे. या दृष्टीने जे काही घडेल ते चांगलेच घडेल अशी आशा आहे.(क्रमशः)


=================================
-----------------------------------------------
सलीमखान पठाण (सर)...✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9226408082
: - संकलन... ✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, March 28, 2024

छत्रपती शिवराय हे ग्रामविकासाचे प्रवर्तक तसेच शेतक-यांचे कैवारी होतेः माजी आ. मुरकुटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
छत्रपती शिवराय हे सतराव्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती होते. उण्यापुऱ्या पन्नास वर्षाच्या हयातीत त्यांनी जगातील सर्व प्रमुख योद्ध्यांचा पराभव केला. उत्तम व्यवस्थापन हे शिवरायांच्या यशाचे गमक होते. छत्रपती शिवाजी महाराज हे ग्रामविकासाचे प्रवर्तक होते. तसेच ख-या अर्थाने शेतकयांचे कैवारी होते, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
               लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात श्री.मुरकुटे बोलत होते. यावेळी अशोक बँकेचे चेअरमन अ‍ॅड्.सुभाष चौधरी, लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, अ‍ॅड्.पृथ्वीराज चव्हाण, नानासाहेब मांढरे, संजय लबडे, भगवान सोनवणे, प्रवीण फरगडे, नानासाहेब गांगड, संकेत संचेती, प्रमोद करंडे, नितीन खंडागळे, बाळासाहेब शिंदे, विशाल धनवटे, बाबा वायदंडे, संदीप डावखर, अमोल कोलते, नवाब सय्यद, वैभव सुरडकर, मुक्तार शाह, बाळासाहेब लोंढे, कैलास भागवत, रामदास सलालकर, जयेश परमार, लाला देवी, राजेंद्र फरगडे, बाळासाहेब लबडे, पंकज देवकर, सोहम मुळे, संजय वेताळ, प्रशांत लहामगे आदी उपस्थित होते.
                 प्रारंभी माजी आ.श्री.मुरकुटे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ते पुढे म्हणाले की, शिवरायांनी मोजक्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. सतत संघर्ष करीत स्वराज्य निर्माण केले. चारशे वर्षांपूर्वी त्यांच्या वाटेला मोठा संघर्ष आला व त्या संघर्षाला सामोरे गेल्यानेच शिवराय आजही तुमच्या आमच्या हृदयात विराजमान आहेत. तुम्ही जग बदलण्याचा प्रयत्न केला तर कुठेही परिवर्तन दिसणार नाही. परंतु स्वतःला बदलण्यात यश मिळवल्यास जग आपोआपच बदललेले दिसेल, असे ते म्हणाले.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अमोल शिरसाठ - श्रीरामपूर*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी - ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे .महाराजांनी प्रजेच्या हिताला प्रथम प्राधान्य दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा.उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. 
ससाणे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज केवळ उत्तम प्रशासकच नव्हे तर ते शूर, पराक्रमी, मुत्सद्दी व उत्तम राजकारणी देखील होते. महाराजांनी सर्वसामान्य रयतेला केंद्रस्थानी ठेवून समाज व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहावा असे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आहे.असेही ते म्हणाले.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, माजी नगरसेवक दिलीप नागरे, रितेश रोटे, के.सी. शेळके, आशिष धनवटे, प्रवीण नवले, बिबवे अण्णा, निलेश नागले, सुरेश ठुबे, अशोक जगधने, मिथुन शेळके, रितेश एडके, रितेश चव्हाणके , युवराज फंड, रियाजखान पठाण, नवाजभाई जहागीरदार, युनुस पटेल, वैभव पंडित, शेख नजीर गफूर (नजीर मामु) सुनील साबळे, बुऱ्हाणभाई जमादार, जमील शहा, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, निलेश बोरावके,संजय गोसावी, योगेश गायकवाड, विशाल साळवे, तीर्थराज नवले, आकाश जावळे, राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ - प्रचाराच्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण करणे आवश्यक


जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण 
समिती स्थापन, पेडन्यूजवर ठेवणार लक्ष
=================================

- अहमदनगर - जिमाका -/ वृत्तसेवा : -
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (मिडीया सर्टीफीकेशन ॲण्‍ड मॉनिटरिंग कमि.) जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी विविध माध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण करणे, एखादी बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून उचित कारवाई करणे आदी कामे ही समिती करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक आज दि. २८ मार्च रोजी संपन्न झाली.
बैठकीस उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील, उपविभागीय अधिकारी तथा समितीचे सदस्य सुधीर पाटील, सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी गजानन नकासकर, आकाशवाणीचे केंद्र प्रमुख राजेंद्र दासरी,पत्रकार महेश देशपांडे, समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर आदी उपस्थित होते.
माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज टीव्‍ही चॅनेल, रेडीओ एफएम, आकाशवाणी, सिनेमागृह, सोशल मिडीया तसेच वृत्‍तपत्रांच्‍या ई - आवृत्‍तीतील (जाहिराती) सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्‍या दृकश्राव्‍य (ऑडिओ –व्‍हीज्‍यूअल) जाहिरातींसाठी प्रसारणपूर्व प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्‍यासाठी उमेदवारांनी विहीत नमुन्‍यातील अर्ज (इंग्रजी किंवा मराठी भाषेतील) दोन प्रतींमध्‍ये आवश्‍यक माहिती भरुन समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत दोन सीडी / पेनड्राईव्ह (सीडीमधील गीत, संवाद, घोषणा यांच्‍या टंकलिखीत मजकुरासह दोन प्रती – ट्रान्‍सस्‍क्रीप्‍ट ) माध्यम कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, अहमदनगर येथील जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्‍या कक्षात आणून देणे आवश्‍यक आहे. 

*राजकीय पक्षांच्‍या जाहिराती राज्‍यस्‍तरावरील समितीकडून प्रमाणित करुन दिल्‍या जातील*

मुद्रीत माध्‍यमातील (प्रिंट मिडीया) जाहिराती मतदानाच्‍या दिवशी किंवा मतदानाच्‍या एक दिवस अगोदर प्रकाशित करावयाची असल्‍यास जिल्‍हास्‍तरीय समितीचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
=========
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

निष्पाप कोंकरू - प्रभू येशू ख्रिस्त


निर्दोष आणि निष्पाप ख्रिस्ताचे जीवन आणि मरण हा नेहमीच अभ्यासकांसाठी महत्त्वाचा विषय राहिलेला आहे कारण ; ख्रिस्त निरपराध असतानाही त्याच्या पदरी निंदा, कुचेष्टा व हाल-अपेष्टा आल्या. राज मुकुटाचा मानकरी असणाऱ्या स्वर्गीय राजकुमाराच्या शिरावरती काट्यांचा मुकुट चढविला. ज्याच्या कृतीत जीवनाचा सार दडलेला होता त्याला चाबकाच्या फटक्यांचा मार मिळाला. शापित व बदनाम असलेला अवजड क्रूस ख्रिस्ताला वाहावा लागला. चोर दरोडेखोरांना दिली जाणारी वधस्तंभावरील शिक्षा त्याला मिळाली. 
अखेर का? व कोणासाठी? 
या निर्दोष कोंकराला मरण दंडाला सामोरे जावे लागले. का ? या निरपराध कोंकराचा बळी गेला. कोणताही दोष नसताना ख्रिस्ताने विरोध न करता ही शिक्षा का स्वीकारली असेल ?
हा प्रश्न सातत्याने पुढे येतो तो अगदी दरवर्षीच.
 गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार जवळ आला की, असे प्रश्न मनाला भेडसावू लागतात.
खरचं,ख्रिस्ताच्या निर्दोष रक्ताने मानवाच्या पापमुक्तीसाठी ही खंडणी का भरली असेल ? या प्रश्नाच्या मुळाशी जायचे असेल तर आपणांस पवित्र शास्त्र हाती घ्यावी लागते.
पवित्र शास्त्र (बायबल) चे प्रामुख्याने दोन भाग पडतात :-
१) ख्रिस्ताच्या जन्मा अगोदरचा शास्त्र भाग ज्याला 'जुना करार' असे म्हणतात. 
२) ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा शास्त्र भाग ज्याला 'नवा करार' असे म्हणतात.
 जुना करार व नवा करार यांचा अभ्यास करण्या अगोदर 'करार' म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. 
दोन व्यक्तींमध्ये मध्यस्थाद्वारे एखाद्या मुद्द्यावर एका विचाराने झालेली अधिकृत सहमती म्हणजे करार होय.
जगाच्या उत्पत्ती नंतर आपल्या प्रजेशी हितगुज करण्यासाठी परमेश्वर संदेष्ट्यांची निवड करीत असे. याच प्रकारे मोशे नावाच्या संदेष्ट्यांसह अनेक संदेष्टे ज्यांना स्वर्गीय पिता दृष्टांत देऊन आपले म्हणणे कळवीत असे.
 ते म्हणणे जसेच्या तसे हे संदेष्टे लोकांपर्यंत पोहोचवीत असे. थोडक्यात संदेष्ट्यांच्या मध्यस्थीने परमेश्वराचा आदेश,आज्ञा किंवा निरोप देवाच्या प्रजेपर्यंत पोहचविला जात असे व त्याद्वारे परमेश्वर व लोकांमध्ये ज्या गोष्टींवर शिक्कामोर्तब होई त्यास करार असे म्हटले जाई.
हा करार ख्रिस्त जन्मापूर्वीचा व नव्या कराराच्या अगोदरचा असल्याने याला जुना करार असे संबोधतात.
याच जुन्या करारात उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, परमेश्वराने सात दिवसात ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली. या सुंदर सृष्टीवरती अधिराज्य गाजविण्यासाठी त्याने त्याच्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने या दोघांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला की, फलद्रुप व्हा, बहुगुणीत व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.
निर्माण केलेल्या या पुरुष व स्त्री दोघांची नावे अनुक्रमे आदाम आणि हवा असे होते.
 देवाने यांना राहण्यासाठी एक अतिशय मनमोहक बाग निर्माण केली होती. त्या बागेचे नाव एदेन बाग असे होते. या बागेत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्याचा अधिकार देवाने या दोघांना दिला होता. मात्र याच बागेसंदर्भात देवाने एक गोष्ट त्यांना निक्षून सांगितली होती, ती म्हणजे बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या बागेतील मधल्या झाडाचे फळ खाऊ नका. तसे केल्यास तुम्हास मरण प्राप्त होईल.
 परंतु धुर्त सैतानाने मात्र सापाच्या रूपात येऊन आदाम आणि हवेला भुरळ घातली अन् सांगितले की, मधल्या झाडाचे फळ खाल्ले तर तुम्हालाही देवासारखे ज्ञान प्राप्त होईल. सैतानाचे ऐकून हळव्या मनाची स्री असणाऱ्या हवेच्या मनात स्वार्थ निर्माण झाला. तिने त्या झाडाचे फळ स्वतःही खाल्ले आणि आदामाला सुद्धा खाण्यास भाग पाडले. फळ खाताच तात्काळ त्यांना ते नग्न असण्याची जाणीव झाली.
 अर्थात त्यांना बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान झाले. तोपर्यंत ते निष्पाप बालकासारखे होते. त्यांची जाणीव जागृती म्हणजे पापाचा प्रारंभ होता. पापातून मरण हे अटळ असते. आपल्या प्रतिरूपाच्या प्रथम मानवाने केलेली ही कृती देवाला आवडली नाही; कारण माती पासून बनविलेल्या मानवात स्वतःचा श्वास फुंकून देवाने त्यांना जीवन दिलेले होते. मानव ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती होती मात्र मधल्या झाडाचे फळ खाल्ल्याने आज्ञाभंग झाला व देवाने अगोदर सुचित केल्याप्रमाणे मानवास मृत्यू मिळाला. 
पुढे देवाने आदाम आणि हवेला शापित केले, तो त्यांना म्हणाला की, "तुम्ही माती आहात आणि मातीला मिळणार आहात ; कारण मातीतून तुमची उत्पत्ती आहे." घडलेल्या या घटनेने परमेश्वर व्यतीत झाला होता. मानवावरती शाप आल्याने तो अधिक दुःखी झाला होता. कारण परमेश्वर प्रेमस्वरूप आहे, तो दयाळू व क्षमाशील आहे.
 हा शाप मानवावरती कायमस्वरूपी असावा ही गोष्ट देवाला कदापिही मान्य नव्हती. या पापातून मानवाची मुक्तता व्हावी, त्याचे तारण व्हावे, पुनरुत्थनाद्वारे त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून, योहानकृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, "देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले, ते यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे."
 यावरून देवाची मानवावरील प्रीती प्रकट होते. जुन्या करारात आदाम आणि हवेने केलेल्या आज्ञाभंगामुळे शाप अर्थात मरण अधोरेखित होते तर नव्या करारात ख्रिस्ताच्या आगमनाने पुनरुत्थनाद्वारे जीवन अर्थात तारण अधोरेखित होते.
ख्रिस्त जन्मापूर्वी जुन्या करारात पाप क्षालनासाठी किंवा पापाची भरपाई म्हणून देवाला कोंकराचा बळी दिला जात असे. 
रोमकरांस पत्र आठवा अध्याय व बत्तीसाव्या वचनात मानवास आश्वासित केल्याप्रमाणे स्वर्गीय पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरती पाठविला.
 त्याला पृथ्वीवरती पाठविण्यासाठी माध्यम म्हणून येरुसलमेची निष्कलंक कुमारी पवित्र मारिया हिची निवड परमेश्वराने केली. पवित्र मारिया पवित्र आत्म्याचे योगाने गर्भी संपवली व तिने दैवी योजनेचा आदर करून ख्रिस्ताला जन्मास घातले. 
ख्रिस्ताचे येणे, पृथ्वीवरील जीवन व्यथीत करणे, लोकांना देवाचा संदेश कळविणे, त्याचे दुःखसहन, त्याचा मृत्यू व पुनरुत्थान हे सर्व काही दैवी योजनेचा एक भाग होते. ख्रिस्ताला पृथ्वीवरती साडे तेहतीस वर्षाचे आयुष्य लाभले.
 महामंदीरावरील वयाच्या बाराव्या वर्षी केलेल्या प्रवचना पासून ते आयुष्याच्या शेवटापर्यंत ख्रिस्ताने लोकांना सत्याचे ज्ञान दिले.
 दया, क्षमा व शांतीची महान देणगी दिली.
 याचमुळे तत्कालीन शास्त्री,पंडित दुखावले गेले. येशू ख्रिस्त धर्माच्या आणि राजाच्या विरोधात बोलतो, असा आरोप त्यांनी ख्रिस्तावरती ठेवला.
 लोकांना एकत्र करून त्यांना चिथावणी देऊन ख्रिस्ताच्या विरोधात उभे केले. तत्कालीन राजा पिलात याच्यासमोर आरोपी म्हणून त्याला उभे केले. त्याच्यावरती खटला चालविण्यात आला. पिलात जनसमुदायाच्या दबावाला घाबरला. खरं तर तो जाणून होता की, ख्रिस्त निर्दोष आहे. ख्रिस्ताला शिक्षा करणे त्याला योग्य वाटले नाही म्हणून त्याने त्याला लोकांच्या हवाली केले. यहुदी लोकांनी ख्रिस्ताचा अतोनात छळ केला.
 ख्रिस्तावरती खोटे आरोप करून त्याची निंदानालस्ती केली. त्याच्या तोंडावर थुंकले. त्याला चापकाचे फटके मारिले. त्याच्या मस्तकी काटेरी मुगुट घातला.
 तो रक्तबंबाळ झाला होता. त्याचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले. त्याच्या हातीपायी खिळे ठोकिले. त्याला वधस्तंभी दिले. त्याच्या कुशीत भाला भोकसला. ज्या ख्रिस्ताला जीवनी पाण्याचा झरा म्हणून संबोधले जाते त्याच ख्रिस्ताने पूर्ण झाले आहे, असे म्हणून पाण्याविना क्रूसासावरती प्राण सोडला. शास्त्रलेख पूर्ण झाला. निरपराध कोंकराने मानव जातीची पापातून सुटका केली. पित्याची योजना पूर्ण करण्यासाठी येशूने आपल्या निर्दोष रक्ताने मानवाच्या पापाची खंडणी भरली. समस्त मानव जातीचे तारण झाले. त्याग, धैर्य, संयम, समर्पण, दया, क्षमा, शांती व प्रीतीच्या या अद्वितीय उदाहरणास, या निष्पाप, निर्दोष कोकरांस, प्रभू येशू


=================================
-----------------------------------------------
 ख्रिस्तास शतश : नमन.
- *रवींद्र त्रिभुवन (सर)*✍️✅🇮🇳
   *श्रीरामपूर - 9623280978*
===========
*संकलन*💐✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य खुपच प्रेरणादायी - सुनील साळवे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आज प्रत्येक माणसासाठी खुपच प्रेरणादायी आहे, समाजात एकता व समानता निर्माण करण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते म्हणून आजच्या प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारे हे कार्य आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपणही कार्य करावे असे प्रतिपादन जागतिक रेड क्रॉस संघटना, शाखा श्रीरामपूर सचिव श्री. सुनील साळवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भि.रा. खटोड कन्या विद्यालयात केले.
याप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन श्री.दत्तात्रय साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुलींना शुभेच्छा दिल्या व यशस्वी विद्यार्थिनींना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची जाणीव व्हावी म्हणून विद्यार्थिनींनी या प्रसंगी भाषणे केली.
या कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री मधुकर पवार, सौ. दीप्ती लोंढे,अस्लम शेख, सीताराम कातोरे, सौ. वनिता जंगले, सौ. पूजा जोशी, श्रीमती राणी साळुंके,सौ.वॄषाली कुलकर्णी, सौ. सुधा डोंगरे, सौ. रंजना शिरसाठ, सौ.ज्योती पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.निर्मला लांडगे यांनी केले तर आभार पंकज देशमुख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व सेवकवॄंद यांनी प्रयत्न केले.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
ब्युरो चीफ : - नाशिक विभाग
========
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

जुमआ (शुक्रवार) - दिवसांचा सरदार


जुमआ (शुक्रवार) -दिवसांचा सरदार
=================================

रमजानुल मुबारक १८
चालू वर्षाच्या रमजान महिन्यातील आजचा तिसरा अंक म्हणजे जुमआ अर्थात शुक्रवार.ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात सोमवारला महत्व आहे तसेच महत्व रमजान महिन्यात शुक्रवारला आहे. ईश्वराने पृथ्वीचा पाया शुक्रवारी रचला. इस्लामी इतिहासानुसार जगाच्या इतिहासातील अनेक महत्वपूर्ण घटना या शुक्रवारीच घडल्या आहेत.पृथ्वीवरील पहिला मानव असणारे हजरत आदम अलैसलाम (जे समस्त मानवजातीचे पिताश्री आहेत) हे शुक्रवारीच स्वर्गातून पृथ्वीतलावर पाठवले गेले.याच दिवशी अल्लाहने त्यांची माफी स्विकारली. शुक्रवारीच हजरत नुह अलैसलाम यांची नौका प्रचंड प्रलयानंतर किनारी लागली.शुक्रवारीच हजरत इब्राहीम अलै सलाम नमरुदच्या आगीतून सुखरुप बचावले.हजरत मुसा अलैसलाम फिरऔनच्या जाचातून मुक्त झाले. हजरत युनूस अलै सलाम माशाच्या पोटातून सुखरूप बाहेर आले.
अशा खूप घटना सांगता येतील.शुक्रवारला ईद - ऊल- मोमीनीन ही म्हटले जाते.
आजच्या दिवशी विशेष साप्ताहिक प्रार्थना नमाज ए जुमआ ही आदा केली जाते.दुपारी नमाजची अजान झाल्याबरोबर सर्व व्यवहार बंद करुन नमाजला जावे अशी हजरत पैगंबरांची शिकवण आहे.शुक्रवारी एक क्षण (पल) असा आहे कि या क्षणाला जे काही मागाल, दुआ कराल ती स्विकार केली जाते.पण तो क्षण नेमका कोणता हे अल्लाहने गुप्त ठेवलेले आहे.मात्र तो क्षण दुपारच्या वेळेत आहे असे म्हणतात. रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार हा जमातुल विदाअ अर्थात निरोपाचा शुक्रवार म्हणूनही पाळला जातो.रमजान महिन्यात मिळणारे 70 पट पुण्य हे प्रत्येकासाठी एक पर्वणी आहे. या संधीचा सदुपयोग करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.रमजान महिना सुरू झाला आणि आता तो पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करीत आहे. 18 दिवस कसे निघून गेले हे समजले देखील नाही.त्यामुळे उर्वरित दिवसांचा जास्तीत जास्त पुण्य संचय करून घेण्यासाठी प्रयत्न करावा.(क्रमशः)

=================================
-----------------------------------------------
*सलीमखान पठाण (सर)*✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9226408082
*संकलन*💐✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, March 27, 2024

रोजा-एक फर्ज इबादत रमजानुल मुबारक - १७


रमजान महिना प्रसिद्ध आहे तो यातील रोजा (उपवासा) मुळे. प्रत्येक धर्मात उपवासाला महत्व दिले गेले आहेत. उपवास धरण्याच्या पध्दती काहीशा वेगवेगळ्या असल्या तरी सर्व उपवासांचा सार एकच आहे तो म्हणजे आत्मशांती व शरीर शुद्धी.
प्रेषित हजरत पैगंबर यांनी रमजानचे रोजे कशा पध्दतीने धरावे हे स्पष्ट केले आहे.केवळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपाशी राहणं म्हणजे रोजा नव्हे तर शरीराच्या प्रत्येक भागाशी निगडीत काही बंधने रोजामुळे आपण स्वतःवर लादून घेतो व अल्लाहची भिती मनात बाळगून स्वतःच्या स्वछंदी आचरणावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो.यातून वाईट सवयींना तिलांजली देऊन चांगल्या सवयी अंगी बाणाव्यात ही अपेक्षा असते.
पूर्वीच्या काळी लोकांचे शिक्षण कमी होते मात्र धार्मिकता खूप होती. हल्लीच्या काळात सुशिक्षितपण वाढले पण चुकीचे,वाईट,वाममार्ग अवलंब करणारी संख्या ही वाढली.कोणतेही वाईट कार्य नजरेसमोर आणल्यास ते करणारांमध्ये सुशिक्षित लोकच मोठया प्रमाणावर दिसून येतात. रोजा सर्व प्रकारच्या वाईट कार्यापासून रोखण्याचे कार्य करतो. डोळ्यांनी अश्लील काही पाहू नये,तोंडाने वाईट शब्द उच्चारु नये. निरपराध किंवा कमजोर लोकांवर अत्याचार करु नये,वाईट ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारचे कार्य रोजेदाराकडून अपेक्षित असते.ही सर्व बंधने पाळण्याचे कार्य रमजान महिन्यात केले जाते.
शास्त्रीय दृष्ट्यासुद्धा उपवासाचे खूप महत्त्व आहे.महिन्याभराचे रोजे पूर्ण केल्यामुळे कॅन्सर सारख्या भयानक आजार सुद्धा बरा होतो हे अभ्यासाने सिद्ध झाले आहे.त्याचबरोबर शारीरिक शुद्धीकरणाचे मोठे कार्य रोजामुळे घडून येते. सर्व धर्मांनी उपवासांचा पुरस्कार केलेला आहे त्यामुळे शास्त्रीय दृष्टी देखील उपवास करणे फायदेशीर आहे. मानवाकडून कोणत्याही प्रकारचा प्रमाद घडू नये यासाठी उपवासामध्ये अनेक बंधने लावलेली आहेत.ही सर्व बंधने पाळली गेल्यास सर्वार्थाने मनुष्य जीवन हे सतमार्गी होते.
(क्रमशः)

=================================
-----------------------------------------------
सलीमखान पठाण सर✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9226408082
========
संकलन💐✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


अशोक कारखान्याची भरभराट बघून बेलापूरचे व्यापारी भारावले


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनू असून श्रीरामपूर तालुक्यातील बाजारपेठा या कामधेनूवर अवलंबून आहेत. माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन नविन प्रक्रल्पांची भर घालून अशोक कारखान्याचे उद्योग समुहात रुपांतर केले. अशोक कारखान्याची भरभराट बघून आम्ही व्यापारी भारावून गेलो आहोत, असे गौरवोदगार बेलापूर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण व सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष अरुण मुंडलिक यांनी काढले.
               बेलापूर मर्चट असोसिएशन, किराणा मर्चट असोसिएशन आणि सुवर्णकार संघटनेच्या वतीने अशोक सहकारी साखर कारखाना येथे सहकुटुंब सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीचा जवळपास ५० व्यापारी, महिला, युवा, बालगोपाल यांनी मनसोक्त आनंद घेतला. ऊसापासून रस बनविणे, साखर उत्पादन, अल्कोहोल निर्मिती, इथेनॉल निर्मिती आणि वीज निर्मिती या सर्व विभागांची माहिती देण्याची व्यवस्था कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर कारखान्याचे भास्करराव गलांडे पाटील सभागृहात मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, कारखान्याचे संचालक हिम्मतराव धुमाळ, संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, माजी संचालक राधाकिसन उंडे, कारेगाव भाग कंपनीचे संचालक नारायण बडाख यांचे उपस्थितीत बेलापूर मर्चट असोसिएशन, किराणा मर्चट असोसिएशन आणि सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
             याप्रसंगी मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे व संचालक हिम्मतराव धुमाळ यांनी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले प्रकल्प यांची माहिती देऊन त्याचा श्रीरामपूर व बेलापूर बाजारपेठेला होत असलेला फायदा याची माहिती दिली. तसेच अशोक कारखान्याने परिसरातील मुला-मुलींसाठी नविन शैक्षणिक संकुलांची उभारणी केली असून त्यामध्ये शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी नामांकीत कंपन्यांमध्ये तसेच सरकारी सेवेत रुजू झाले असल्याची माहिती संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.
           यावेळी किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, सुवर्णकार संघटनेचे अनिल मुंडलीक, जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन प्रविण लुक्कड आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत यांनी उपस्थित व्यापारी बंधू भगीनींचे स्वागत केले. तर युवा उद्योजक अमित लुक्कड यांनी प्रास्ताविक केले.
            यावेळी पंकज हिरण, केदारनाथ मंत्री, विकी मुथ्था, महेश मंत्री, आनंद लुक्कड, प्रविण राका, बेलापूर मर्चंटच्या संचालिका सरोज हरकुट, सुषमा लुक्कड, मोनाली लुक्कड, सोनाली लुक्कड, रश्मी लुक्कड, सुषमा लुक्कड, सुनंदा चांडक, अक्षरा मुंदडा, गौरी मंत्री, दिव्या मंत्री, राखी हिरण, ज्येष्ठ महिला श्रीमती सुलोचनाबाई लखोटीया, श्रीमती चंद्रकला हिरण, स्वाती राका, निकिता लुक्कड, रेणुका मुंडलीक, कविता मुथ्था, गिता मुथ्था, शिल्पा लखोटीया, सुवर्णा चोरडीया, मोहिनी दायमा, पूर्वा मुथ्था, जयेश लड्डा, यश बिहाणी, अनुज लुक्कड आदी उपस्थित होते. सहल यशस्वी करणेकरीता गणेश लड्डा, शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, अनिल मुंडलीक यांनी विशेष प्रयत्न केले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
 ब्युरो चीफ: नाशिक विभाग 
=========
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Tuesday, March 26, 2024

जिहाद म्हणजे सत्वपरीक्षा



" जिहाद " ही ईस्लामला दिलेली फार मोठी देणगी आहे , परंतु , जगामध्ये ईस्लामी जिहाद ला फार विकृत स्वरूपात दाखविले आहेत.." जिहाद " या शब्दाचा वेगवेगळ्या अर्थाने अर्थ घेतला जातो.(१) " सत्याचा असत्या विरूद्ध , विरोधी लढा " (२) दुष्टांच्या विरूद्ध सत्याचा लढा होय (३) दुष्कार्माच्या विरोधी सत्य कर्माचा लढा (४) दुराचारा  विरोधी सदाचराचा लढा होय (५) अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी न्यायाचा लढा होय.(६) तसेच , जिहाद चा अर्थ " कष्ट सहन करणारा " ( पवित्र कुराण ,अन - नहल अ.नं.११०)
(७) प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ( पवित्र कुराण ,अल-फुरकान आ.नं.५१).
                प्रेषीत मुहम्मद स्व.यानी सांगितले की, " संयम बाळगणे व आपल्या वाईट कृत्यांवर आवर घालणे म्हणजे सर्वाधिक मोठा, योग्य जिहाद  ,!! कारण , अल्लाहा ला संयम बाळगणारे जास्त पसंद आहेत ". पवित्र कुराण , ( सुरह अल - नहल आ.नं. ११०)
                          " परवानगी दिली गेली युद्ध करण्याची,त्या लोकांना ज्यांच्या ज्यांच्या लोकांवर अत्याचार केले गेले , कारण , ते अत्याचार पीडीत आहेत " (पवित्र कुराण , सुराहा नं. २२ अल- हशर ,आ .न.३९ ).
                             " आणि त्यांच्याशी युद्ध करा ,जिथे कुठे तुमचा त्याच्या (अत्याचार,आतिरेक ) करणारांशी सामना होईल, आणि त्यांना त्या ठिकाणापासून हाकलून , हुसकावून लावा,  जिथून तुम्हाला जिथून त्यांनी (अत्याचार करण्याऱ्यां) नी , हाकलले होते ". पवित्र कुराण ,सुराहा नं.२ अल- बकराहा, आ.नं.१९३).
                 संपूर्ण जगामध्ये शांतता स्थापन करणे हे ईस्लाम चे प्रथम प्रमुख उद्दिष्ट राहीलेले आहेत , युद्ध करणं हा अगदी शेवटचा पर्याय आहेत.
ईस्लाम ने शत्रुशी देखील न्याय करण्याचा आदेश , हुकूम दिला आहे व हिच बाब न्यायाच्या सर्वोच्च आदेशाची ग्वाही देतो आपली प्रस्तुत करते . यासंदर्भात खाली पवित्र कुराण म्हणतात की," हे ईमानवंतांनों, अल्लाहा (परमेश्वर) साठी सत्यावर अढळ राहणारे, व न्यायाची खात्री , ग्वाही देणारे  बनावे ..जर एखाद्या गटाच्या शत्रूत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभिक ( उकसू ) नयेत की तुम्ही न्यायापासून विमुख (दूर ) व्हाल . न्याय करा .हे तुमच्या अल्लाहा जवळ अधिक निकटवर्तीय आहेत. अल्लाहा चे भय बाळगून कार्य करीत राहा.)
     ईतका महान संदेश व शिकवणी देणाऱ्या ईस्लामी व्यवस्था व पवित्र कुराण हे रक्तपातास , अतिरेक करण्यासाठी बिलकुल उत्तेजन देत नाही . यावर पवित्र कुराण म्हणते की, आणि तुम्ही अल्लाहा च्या मार्गात त्या लोकांशी लढा ,जे तुमच्या शी लढतात . पण , परंतु , मर्यादांचे उल्लंघन (अतिरेक) करू नका , अल्लाहा ला मर्यादांचे उल्लंघन करणारे आवडत नाहीत. ( पारा न.१, अल- बकराहा ,आ.नं.१९० ).
खरै तर जिहाद म्हणजे सर्व सामान्य लोकांच्या डोक्यात फक्त , मुस्लिम, मुसलमान चं येतात की ते हुकूमशाही पद्धती, रक्त पात ,खुन , सतत लढाया, मुंडकं उडवण़ , कत्तली करणं ,आयाबहीणींची इज्जत लुटणं  , मारामाऱ्या , युद्ध वगैरे हे सर्व मुस्लिम विरोधी विश्व पातळीवर पेरले गेले आहेत.
पण वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून विचार केला तर ,हे अगदी विरुद्ध दिशेने जातं ,
जिहाद म्हणजे , युद्ध नसून सत्कृत्याचा -दृष्टकृत्याविरोधी , सत्याचा -असत्याविरोधी ,जुलूमकरणाऱ्या विरुद्ध , अन्यायाविरुद्ध , अत्याचार करणाऱ्या विरोधी , हुकूमशाही विरोधी , विरूद्ध लढणाऱ्यांचा ,आवाज उठवणाऱ्यांचा  लढा होय. .
आपल्या मनातील शैतानी भावना, शैतानी प्रवृत्ती,शैतानी मनोवृत्ती,शैतानी विकृती चा लढा होय . आपल्यामधे चांगले काही निर्माण व्हावं ,चांगली विचारसरणी निर्माण व्हावी यासाठी एक प्रयत्न होय .
ज्या जमातीवर ,अत्याचार होत असेल तर त्या अत्याचार करणाऱ्या वर आवाज उठवण्यासाठी जिहाद करणं होय . एखाद्या हुकूमशाही राजा विरूद्ध आवाज उठवणं याला जिहादच  म्हणतात,
 जिहादी मुसलमाना  म्हणतात. एखाद्या स्त्री वर अत्याचार होत असेल ,तिच्या इज्जती, इभ्रतीवर अतिक्रमण होत असेल तिथै धाउन जातो ,तिचे रक्षण करतो , शेजारच्याला काही त्रास दिला जात असेल तर धाउन जातो , एखाद्याच्या रक्षणार्थ धावून जाणं हा सुद्धा जिहाद च ...
जे जे अल्लाहा च्या सांगितलेल्या सत्कर्माच्या मार्गावर सर्वस्व अर्पण करतो ..
परंतु प्रेषीत मुहम्मद स्व.सांगतात की, " संयम बाळगणे , आपल्या वाईट कृत्यांना आवर घालणं म्हणजे सर्वाधिक योग्य जिहाद , कारण अल्लाहाला संयम करणाऱ्यांना  पसंद करतो ".
आशा समाजोपयोगी,लोक कल्याण करण्यासाठी  दोषी ठरवले जात असेल ,तर एक सत्वपरीक्षाच .ठरते .

आपल्या मित्रांना आवश्य पाठवा ‌, कृपया खाडाखोड , कॉपी पेस्ट करू नयेत , प्रतिक्रिया अवश्य कळवा ..)

=================================
-----------------------------------------------

आपला मित्र डॉ सलीम सिकंदर शेख,
 बैतुशशिफा हॉस्पिटल,
मिल्लतनगर श्रीरामपूर 
९२७१६४००१४ ...
-----------------------------------------------=================================

निधी वाटपातील दिरंगाईबाबत मंत्री आदिती तटकरेंची नाराजी


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना; मिलिंदकुमार साळवेंचा पाठपुरावा; कारवाईचा इशारा
=================================

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
महाराष्ट्रातील महाराष्ट्र जवळपास ७५ हजारांहून अधिक बालकांच्या बँक खात्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वर्षभरापासून जमा होण्यास प्रचंड विलंब होत असल्याबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 
महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक, संजय गांधी निराधार योजना अनुदान समिती व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी याबाबत आवाज उठविला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिला व बालविकास मंत्री तटकरे यांचे लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास झालेला विलंब, निधी वाटपातील दिरंगाई व ढिसाळपणाबद्दल लक्ष वेधले होते. त्याची गंभीर दखल घेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे व आयुक्तालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे समजते.
 त्यानंतर आयुक्तांनी तातडीने याबाबत राज्यातील पुणे, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर महसूल विभागातील जिल्हा महिला बालविकास अधिकारी व त्यांच्यावर नियंत्रण असणाऱ्या विभागीय उपायुक्तांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभार्थी बालकांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्याबाबतच्या कार्यवाहीबाबत दिनांक १ व ५ मार्च २०२४ रोजी पत्र पाठविले होते. त्यानंतरही फरक पडला नाही. त्यामुळे १५ मार्चला पुन्हा सर्व उपायुक्त व जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले. त्यानुसार "राज्यातील ७२ हजार २११ बालकांच्या बँक खात्यात एप्रिल-२०२३ ची रक्कम जमा करण्यात आली आहे. याबाबत ६ मार्च २०२४ पूर्वी सॉफ्ट व हार्ड कॉपीत माहिती आयुक्तालयास सादर करण्याबाबत कळविले होते. दि. १४ मार्च रोजी सहआयुक्त व विभागीय उपायुक्त पुणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी उपायुक्त तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांनी यापूर्वी सादर केलेल्या माहितीची पडताळणी केली असता त्यामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या रकमा बालकांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अडचणी येत आहेत.
बालकांच्या बँक खात्यात रकमा जमा होत नसल्याने राज्यभरातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये विपरित बातम्या प्रसिद्ध होत आहेत. यातून महिला व बालविकास विभागाची प्रतिमा देखील मलिन होत आहे. त्यामुळे निधी हस्तांतरणास होणाऱ्या विलंबाबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व सचिवांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे." याकडे राज्यातील उपायुक्त व जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांचे आयुक्तांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
मंत्री महोदयांकडून व सचिवांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्यामुळे शनिवार व रविवारी राज्यातील शासकीय कार्यालयांना सुट्टी असताना देखील महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा जिल्हास्तरीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि. १६ व १७ मार्चला पुणे येथील आयुक्तालयात आपापल्या जिल्ह्यातील बालसंगोपन योजनेच्या लाभार्थी बालकांच्या बँक खात्याचा व इतर सर्व तपशील घेऊन बोलाविण्यात आले होते. तसेच बँक खात्यांचा सर्व तपशील तपासून देऊन प्रमाणित करण्यास सांगण्यात आले होते. या प्रक्रियेस कोणत्याही स्थितीत विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त प्रशांत नारनवरे व सहआयुक्त राहुल मोरे यांनी दिला होता. 
*लाभ हस्तांतरणास गती येण्याची आशा*
 सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा योजनेचा लाभ देण्यासाठी ५४ कोटी ८४ ८४ लाख रू. आयुक्तालयास देण्यात आले होते. यातून सध्या डी.बी.टी. च्या प्रायोगिक तत्त्वावर फक्त एप्रिल २०२३ या एकाच महिन्याचा निधी हस्तांतरित केला जात आहे. त्यालाही विलंब झाला आहे. त्यामुळे एकल महिला व बालकांची हेळसांड सुरू आहे. सलग दोन दिवस युद्ध पातळीवर आयुक्तालयामध्ये राज्यातील ७२ हजार २११ बालकांच्या बँक खाते व इतर तपशीलाची तपासणी करून घेण्यात आली आहे. मंत्री महोदयांनी लक्ष घातल्यामुळे वर्षभरापासून रखडलेल्या निधी वाटपास आता गती येण्याची आशा निर्माण झाली आहे.

=================================
-----------------------------------------------

*मिलिंदकुमार साळवे*
समन्वयक महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समिती. सदस्य मिशन वात्सल्य शासकीय समिती.
=================================
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्युरो चीफ नाशिक विभाग) 
====================
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



दारिद्रय निर्मुलनासाठी जकात


रमजानुल मुबारक -१६
इस्लामी तत्वानुसार प्रत्येक ऐपतदार मुस्लीम व्यक्तिने जकात आदा केली पाहिजे.न देणारे गुन्हेगार आहेत.यासाठी आपल्या दैनंदिन व्यवहाराचा चोख हिशोब ठेवला पाहिजे.हजरत पैगंबरांनी ही म्हटले आहे कि कुणाशी देणे घेणे व्यवहार करतांना नेहमी लिहून ठेवीत जा म्हणजे हिशोबात गोंधळ होत नाही. आपल्या देशात कर प्रणाली एवढी किचकट आहे कि इन्कम टॅक्स किंवा सेल टॅक्स आदा करतांना खोटे रेकार्ड करुन कर चुकवेगिरी कडे बहुतेकांचा कल असतो. जीएसटीने तर व्यापारी व सर्वसामान्यांना जेरीस आणले आहे.मात्र इस्लामी जकातीमध्ये चोरी अथवा चुकवेगिरी करुन चालत नाही तर दिलेली जकात म्हणजे आपल्या मालाचा मळ असून जकात दिल्याने माल स्वच्छ होतो. व्यापार,व्यवहार, शेती व सर्व प्रकारच्या उदिम व्यापारातील नफ्यावर जकात आदा करणे आवश्यक आहे.एक वर्ष झाल्यावर जकात दिली पाहिजे. 
जकातीच्या अनेक बाबी आहेत ज्यावर जकात लागू आहे.दैनंदिन वापरातील गाड्या,राहते घर आदि वर जकात नाही.मात्र मालवाहू किंवा प्रवासी वाहने, भाडोत्री दिलेली घरे, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जकात दिली पाहिजे. शेकडा अडीच टक्के म्हणजे हजार रुपयाला पंचवीस रुपये एवढे जकातीचे प्रमाण आहे.जकात देतांना रोख स्वरूपात किंवा कपडे, धान्य,किराणा माल आदि स्वरूपातही दिली जाते. समाजातील गरिब व गरजू लोकांच्या गरजा पूर्ण होऊन त्यांनाही इतरांप्रमाणे जीवन जगता यावे हा जकातीचा मूळ उद्देश आहे.मोठ्या शहरातून श्रीमंत लोक गरीब लोकवस्तीत जकातीच्या रकमेतून मदत वाटप करतात.जकात देतांना जवळच्या गरजू नातेवाईकांना प्रथम दिली पाहिजे.मात्र आई, वडील,मामा हे जकातीची मदत घेण्यास पात्र नाहीत. इतर नातेवाईकांना ती देता येते.एखादयाच्या गरजा पूर्ण होतील एवढी मदत त्याला केली पाहिजे. १०० लोकांना देण्यापेक्षा १० लोकांना देऊन ते स्वयंपूर्ण होतील व पुढच्या वेळी त्यांना जकात घेण्याची वेळ येणार नाही अशा पध्दतीने नियोजन करुन समाजाच्या गरजा कशा पूर्ण होतील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. 
सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यामध्ये जकातीचा मोठा वाटा आहे.कधी कधी व्यापार किंवा धंद्यामध्ये तोटा झाल्यास कुटुंब उघड्यावर पडते.दिर्घ आजारपणामुळे ही कुटुंबाची वाताहात होते. गरीबीमुळे जीवन जगणे अशक्य होते अशा उद्भवणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी जकातीच्या रकमेचे मोलाचे योगदान असते. ज्यांच्या मागे कुणी नाही अशा कुटुंबांना यातून मदतीचा हात दिला जातो.अनेक सामाजिक संघटना समाजातील अशा गरजू घटकांना वर्षभर मदत करीत असतात.या कामासाठी लागणारा निधी रमजान महिन्यात जकातीच्या रकमेतून एकत्रित केला जातो व गरजूंना त्याचे वितरण केले जाते.(क्रमशः)

=================================
-----------------------------------------------
*सलीमखान पठाण (सर)*
 *श्रीरामपूर - 9226408082*
=========
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Monday, March 25, 2024

उद्धव फंगाळ यांना आंतरराष्ट्रीय पातळीचा राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर


- राहाता - प्रतिनिधि -/ वार्ता -
माणसाला समाजाप्रती आपल्या कार्य क्षेत्रांत एका चंदना सारखं झिजाव लागतं.रात्र दिवस संघर्ष करून तिळभर ही स्वःताचा स्वार्थ न साधता. शोषित,वंचित ,पिडीत, शेतकरी कष्टकरी ,गोर गरीब, कामगार, रोज मजूर शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक क्रीडा विद्यार्थी वर्ग तसेच प्रत्येक घटकातल्या माणसांच्या व्यथा आणि भावना समजून घ्याव्या लागतात, त्यांच्या दुःखात फक्त सहभागी न होता त्यांच दुःख हे आपलं दुःख समजून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढावं लागतं . मान ,अपमान सहन करून केवळ समाजांचे हीत अनं कार्य चिरंतर करावं लागतं.स्वत: मागे राहून दिन दुबळ्यांना पुढे जाता येईल यासाठी धडपड करावी लागते, त्यांच्यासाठीच सतत प्रयत्न करावे लागतात.शुन्यातून विश्व निर्माण करावं लागतं, प्रत्येकांच्या मनाचं समाधान होई प्रर्यंत कष्ट करावे लागतात.जेव्हां दुःखीतांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू उमटतं,तेव्हाच समाजात माणसालाही श्रेष्ठ किंमत प्राप्त होते. आणि योग्य कार्य कर्तृत्वाचा सन्मान म्हणून समाजभूषण ही उपाधी माणसाला बहाल होते.अशीच एक समाजभूषण ही श्रेष्ठ उपाधी बहाल झालेले बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर शहरातील लेखणी संघर्षाचे एक लढाऊ व्यक्तीमत्व असलेले उद्धव फंगाळ होय ,
यांच्या समाजाप्रती असलेल्या उल्लेखनीय कामगिरीची आणि कार्याची दखल घेवून त्यांचे दैदिप्यमान वास्तव कार्य पाहून ओम साई विकास प्रतिष्ठान व
बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन निर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा २०२४ या वर्षीचा अतिशय मान सन्मानाचा उत्कृष्ट असा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा
साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ हा नुकताच त्यांना जाहीर झाला आहे. समाजभूषण म्हणून त्यांचे कार्य असे की, संघर्षाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व उद्धव फंगाळ गेल्या तीस वर्षांपासून प्रत्रकारीता क्षेत्रात पत्रकार, संपादक म्हणून काम करत आहेत, सदरील काम करत असताना, एक निष्ठ राहून दुःखीतांच्या ,शोषितांच्या कष्टकरी कामगार ,शेतकरी ,बळीराजांच्या पाठीशी त्यांची लेखणी समक्षपणे आणि ठामपणे उभी राहीली. वास्तव भावना गोरगरीब जनतेच्या आवाजाला त्यांनी योग्य न्याय मिळवून देण्याचे काम केले . समाजातील विविध घटकांना विषयांना त्यांनी वेळोवेळी जनतेसमोर मांडले . प्रत्येकाला मदत योग्य न्याय मिळवून देण्याची भुमीका त्यांनी पार पाडली.प्रत्येक क्षेत्रातील गाढा अभ्यास यासह दांडगा अनूभव त्यांना आहे. नंतर पत्रकारिता क्षेत्रात असेच पत्रकार ,संपादक म्हणून काम करतं असताना.त्यांनी आपले स्वतःचे एक दैनिक वृत्तपत्र सुरू केले एका नव्या युगाला प्रारंभ आणि सुरुवात केली,ज्यांचे नाव अल्पावधीतच महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय झाले दैनिक साईसंध्या ( बुलढाणा आवृती) आणि दैनिक विदर्भ सत्यजीत या वृत्तपत्रांचे सिद्धहस्त संपादक उद्धव फंगाळ म्हणून ते चर्चेत आणि प्रसिद्धीस आले .कारण त्यांचे कार्य हे पहिल्यापासूनच समाजाप्रती उल्लेखनीय होते व आहेत आणि त्यापेक्षा जास्त वर्तमानात आणखी भरीव होतं गेले.
त्यांची प्रतिमा आणि प्रतिभा ह्या दोन्हीं ही शब्दांत मावणाऱ्या नाहीत. दैनिक साईसंध्या, विदर्भ सत्यजीत हे वर्तमानपत्र चालवत असतांना शोषित, वंचित‌, पिडित, गोरं ,गरीब शेतकरी ,कष्टकरी, कामगार यांच्या पाठीशी त्यांची लेखणी आधीचं उभी होती आणि राहीली ही.आपल्या मागे कुणी राहू नये म्हणून सर्वांना पुढे नेणारा हा संपादक अवघ्या महाराष्ट्रातून माणसे जोडत गेला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रांत आपला ठसा उमठवत गेला. तशी आर्थिक परिस्थिती खूपच बिकट त्यावर संकटे हजारो आले, कुणी साथ दिली, कुणी सोडून गेले, परंतु कुठेही न डगमगता, हार न मानता, खंबीर नेतृत्व करत, संघर्ष करत उद्धव फंगाळ यांनी कष्टांतून हे अवघे नंदनवन उभारले आहे. अनेकांच्या लेखणीला वाव देऊन त्यांनी सर्वांना पुढे नेले आहे, मोठे केले आहे, जे आज खूप मोठे झालेत. स्पष्टवक्तेपणा सत्य वाणी, निर्भिड कार्य, गरजूंना मदत,सर्वांना समान संधी देऊन ते आपली कामे करत आहेत. पत्रकार, संपादक म्हणून आपली रोखठोक भुमिका बजावताना ते आज शेकडो प्रतिनिधींना एकत्र करून सामाजिक सलोखा जपत आहेत. त्यांचे हे कार्य त्यांचा हा संघर्ष एक अलैकिक प्रेरणा घेण्या सारखा आहे .सहजासहजी व्यक्तीमत्व घडतं नसतं स्वतःचा स्वार्थ न साधता सर्वांना मोठे करणे ,त्यांना जगात मानाचं स्थान प्राप्त करुन देणे,प्रसिद्ध करणे हे कोणालाही करता येत नाही. बुद्ध, फुले ,शिव, शाहू आंबेडकरी विचारांचा वसा वारसा पुढे नेत. महाराष्ट्रात कणखर दमदार निर्भिड वर्तमानपत्र चालवून राज्य आणि देशांसाठी आपले कार्य करत राहणे, कोणताही स्वार्थ न बाळगणे हाच उद्धव फंगाळ यांचा उदात्त हेतू आहे.आरशा सारखे आपले प्रतिबिंब स्वच्छ ठेवून कधीच गर्व,अहंकार न बाळगता साधी राहणीमान परंतु उच्च विचारसरणी जोपासून त्यांनी नेहमीच सर्वांना मोठे केले आहे. जनहितार्थ राज्याच्या अगदी ग्रामीण भागातही आपले वर्तमानपत्र पोहचवून सकाळ आणि सायंकाळी ते ताजे वृत्त वाचणात आनून देत आहेत. वंचितांच्या दुःखाला न्याय मिळवून देणे हे श्री.फंगाळ यांच्या दैनिकांचे वैशिष्ट्य आहे.वर्तमान चालू घडामोडी सांयदैनिक साईसंध्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करून सदैव तत्पर वार्तांकन ते देत असतात.कोणाचही मन न दु:खवता योग्य मार्गदर्शन करत संपादक श्री.फंगाळ सर्वांना सोबत घेऊन काम करतात हे त्यांचे मोठेपण आहे. साहित्यिकांना हक्कांचे व्यासपीठ उपलब्ध करून रोजच्या अंकांत आध्यात्मिक लेख,कविता, वाचकांसाठी प्रकाशित होतात. सध्या सोशल‌ मिडिया खुप मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आहे. व्हिडिओ चित्रफीत वार्तांकन युट्यूबवर चालू घडामोडी विशेष वार्तांकन मिडीया स्वरूपात प्रत्येका पर्यंत त लाईव्ह बातमी म्हणून ते पोहचवत आहेत. श्री.फंगाळ यांच्या समाजाप्रती असलेल्या याचं उल्लेखनीय गौरवशाली कार्य कर्तृत्वाची दखल घेवून आंतराराष्ट्रीय पातळीवरचा साई कलारत्न सामाजभूषण पुरस्कार २०२४ साठी त्यांची निवड केली आहे .सदर पुरस्कार आणि गौरव सोहळा हा शुक्रवार दि.३ मे २०२४ रोजी जागतिक दर्जा असलेल्या तालुक्यातील श्री साईबाबाजींच्या पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी शहरात पार पडणार असून.पुरस्कार गौरव सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे येथील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माता आणि अभिनेते काळुराम ढोबळे व देशातील नामांकित म्हणून असलेल्या नागपूर येथील सावी उर्फ सोनी वासनीक मॅडम,तसेच लोणी प्रवरा येथील समाजभूषण उत्तम काका घोगरे पाटील व औरंगाबाद येथील प्रसिद्ध रोड काँट्रेक्टर व चित्रपट निर्माते सतिष खांडविकर यांच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट असा आंतरराष्ट्रीय पातळीचा समाजभूषण २०२४ पुरस्कार मान सन्मानाने कार्य गौरव यथोचित सत्कार सम्मान करून उद्धव फंगाळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्कार सोहळा निवड पत्र हे पुरस्कार सन्मान सोहळा समिती अध्यक्ष सुदाम संसारे यांनी उद्धव फंगाळ यांना अधीकृतरित्या निमंत्रण म्हणून पुरस्कार स्विकारण्यासाठी दिले आहे.समाजभूषण म्हणून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पातळीचा २०२४ हा उत्कृष्ट असा पुरस्कार मेहकर येथील समाजभूषण उद्धव फंगाळ यांना जाहीर झाला असून सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक प्रत्रकारीता तसेच विविध क्षेत्र आणि राज्याच्या काना- कोपऱ्यातून उद्धव फंगाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
========
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



अशोक फार्मसीच्या विद्यार्थ्यांची नाशिक येथील कोरल फार्माला भेट


मुल्यवर्धक प्रशिक्षणामुळे फार्मसीचे विद्यार्थी करिअरमधील आव्हान सहज पेलतील; सौ.मंजुश्रीताई मुरकुटे
=============================

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
माजी आमदार भानुदास मुरकुटे व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी तथा अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अशोक कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नाशिक येथील कोरल फार्मा कंपनीमध्ये औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.
              कंपनीत आयुर्वेदिक औषधे, बाम, मलम, लोशन, चूर्ण, भस्म या सगळ्यांसाठी लागणारा कच्चा माल कशा पद्धतीने उपलब्ध केला जातो. तसेच त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारचे औषधे कसे व कोणत्या मशिनचा वापर करून बनवले जातात, याची सर्व माहिती कंपनीचे अनिरुद्ध राज पाठक यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच तयार झालेल्या मालाची साठवणूक व ते तयार करण्यासाठी लागणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्याची प्रक्रिया या सर्वांची सखोल अभ्यासक्रमासोबत त्यांच्याशी निगडित असे विविध उपक्रम राबविण्यात येऊ शकतात.
              अशाप्रकारे दिलेल्या प्रत्यक्ष भेटीमुळे विद्यार्थ्यांना करिअर मधील वेगवेगळ्या संधीची माहिती मिळते आणि प्रत्यक्ष कंपनीमध्ये चालणारे कार्य समजून घेता येते. या मुल्यवर्धक प्रशिक्षणामुळे फार्मसीचे विद्यार्थी करिअरमधील येणारे प्रत्येक आव्हान सहज पेलतील, असा विश्वास संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी व्यक्त केला. तसेच अशा भेटींमुळे विद्यार्थ्यांची ज्ञानवृध्दी होवून आत्मविश्वास वाढतो, असे मत सहसचिव भास्कर खंडागळे यांनी व्यक्त केले. 
           या कंपनी भेटीमुळे विद्यार्थ्यांनी कोरल फार्मामध्ये होणाऱ्या विविध तंत्रज्ञान, उद्योग, व्यवसाय तसेच वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या संधी याबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद कोते, प्रा.वैशाली सुकेकर, प्रा.किरण थोरात, प्रा.चैतन्य घोलप, प्रा.प्रमोद राऊत, प्रचिती जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
========
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

यौगेश सौभागे यांना आंतरराष्ट्रीय पातळीचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर


राहाता प्रतिनिधि वार्ता 
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन निर्मित यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा मान - सन्मान व प्रतिष्ठेचा असा
आंतरराष्ट्रीय पातळीवरील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ हा नुकताच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष व दैनिक विदर्भ सत्यजित या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक यौगेश सौभागे यांना जाहीर करण्यात आला आहे.
यौगेश सौभागे यांचे उपेक्षित तथा दुर्लक्षित समाज घटकास नेहमीच विशेष मोलाचे भरीव असे योगदान लाभलेले आहे. सामाजिक,धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच हिरिरिने सहभाग हा प्रथम आणी अग्रस्थानी असतो.नवपिढीला योगदान, प्रोत्साहन, मदत समाजातील विविध घटकांना सातत्याने त्यांची खंबीरपणे साथ असते. विविध सामाजाभिमुख नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यौगेश सौभागे यांनी समाजात एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून मान मिळविलेला आहे.
श्री बालाजी अर्बन चे ते अध्यक्ष असून दैनिक विदर्भ सत्यजीत या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.समाजास त्यांचे भरीव योगदान लाभले आहे,
आपल्या परोपकारी स्वभावामुळे सामाजात एक प्रभावी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्य कर्तुत्व आणि भरीव कामगिरीची दखल घेवून आंतराराष्ट्रीय पातळीवरील सदरील पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. सदर पुरस्कार आणि गौरव सोहळा हा शुक्रवार दि.३ मे २०२४ रोजी तालुक्यातील जागतिक दर्जा असलेले जगद्गुरु श्री साईबाबाजींचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी शहरात संपन्न होणार असून,या पुरस्कार गौरव सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे येथील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक,निर्माता आणि अभिनेते काळुराम ढोबळे व देशातील नामांकित म्हणून असलेल्या नागपूर येथील सावी उर्फ सोनी वासनीक मॅडम तसेच लोणी प्रवरा येथील समाजभूषण उत्तम काका घोगरे पाटील व औरंगाबाद येथील प्रसिद्ध रोड कॉन्ट्रॅक्टर तथा चित्रपट निर्माता सतिष खांडविकर यांच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट असा आंतरराष्ट्रीय पातळीचा समाजभूषण २०२४ पुरस्कार मान - सन्मानाने योगेश सौभागे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार सोहळा निवड पत्र हे पुरस्कार सन्मान सोहळा समितीचे अध्यक्ष सुदाम संसारे यांनी यौगेश सौभागे यांना अधीकृतरित्या निमंत्रण म्हणून पुरस्कार स्विकारण्यासाठी दिले आहे, यौगेश सौभागे यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारबद्दल 
विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन केले जातं आहे.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
========
*संकलन* ✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

शहीद क्रांतीविरांचे बलिदान युवकांना सदैव प्रेरणा देत राहील - करण ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
 देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे बलिदान युवकांना सदैव प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. 
ससाणे पुढे म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीची मशाल हाती घेऊन आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिवीरांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. यावेळी शहीद भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, मा नगरसेवक दिलीप नागरे, के सी शेळके,आशिष धनवटे, कॉंग्रेस सेवा दल चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद, अशोक जगधने, डॉ राजेंद्र लोंढे, सुरेश ठुबे, नवाज जहागीरदार, रितेश चव्हाणके, अमोल शेटे, नजीरभाई शेख, भगवान जाधव, बुऱ्हानभाई जमादार, बाबा वायदंडे, योगेश गायकवाड, युनुस पटेल, गणेश काते, लक्ष्मण शिंदे, विशाल साळवे, सुरेश बनसोडे, राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
ब्युरो चीफ : - नाशिक विभाग
========
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

कबड्डीला कॉर्पोरेट सी एस आर मिळावा यासाठी प्रयत्न केल्यामुळेच लाभले चांगले दिवस - खा. गजानन कीर्तिकर


७० व्या राष्ट्र्रीय कबड्डी स्पर्धेत प्रथमच २५ द्रोणाचार्य, ध्यानचंद, अर्जुन खेलरत्न, शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा झाला सन्मान
=================================


- अहमदनगर - प्रतिनिधि -/ वार्ता -
 कबड्डी हा खेळ जेव्हा त्याला हू तू तू म्हणायचे तेव्हाचा काळ आम्ही गाजवला होता. या खेळात जीवापाड मेहनत करून आम्ही मुंबई त्या काळी गाजवली. शिवसेनेच्या माध्यमातून कबड्डीला बँका, एल आय सी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा कॉर्पोरेट सी एस आर फंड मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यामुळंच आता या खेळाला आता चांगले दिवस आले आहेत. ७० व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नगरमध्ये कबड्डी च्या माध्यमातून संपूर्ण जग गाजवणाऱ्या द्रोणाचार्य, अर्जुन, खेलरत्न, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त २५ खेळाडूंचा प्रथमच एकत्र सत्कार करण्यात आला . 
हे कौतुकास पात्र आहे , हे सर्व खेळाडू म्हणजे भारताचे भूषण आहे असे प्रतिपादन शिवसेना द. मुंबईतील खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले. कबड्डीला जे चांगले दिवस प्राप्त झाले ते सर्वानी एकत्र येऊन केल्याचे फलित आहे असे ते म्हणाले.* 
         ७० व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कबड्डीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व प्राप्त करून देणाऱ्या २५ द्रोणाचार्य,ध्यानचंद, अर्जुन, खेलरत्न पुरस्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त महान खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
    यात इंडियन रेल्वे चे खेळाडू राष्ट्रपती भवन द्वारा सन्मानित १९७२ चे कबड्डी पटू एस एम थोरवे, महाराष्ट्रातून सन्मान झालेल्या पहिल्या महिला कबड्डीपटू शकुंतला पंढरीनाथ खटावकर, महाराष्ट्राचे जेष्ठ कबड्डी पटू शांताराम रंगनाथ जाधव, कबड्डी मधील पहिले पदमश्री, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते डॉ. सुनील डबास , ध्यानचंद पुरस्कार प्राप्त पंजाब चे मनप्रीत सिंग , द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, आंध्र प्रदेश मधील इ प्रसादराव, हरियाणातील इंडियन सर्व्हिसेस चे बलवान सिंग , क्रिशन कुमार हुंडा, केरळ मधील इंडियन आर्मी सर्व्हिसेस चे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते इ भास्करन तसेच अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूं , माया काशिनाथ मेहेर, इंडिया रेल्वेकडून गौरविल्या गेलेल्या पश्चिम बंगाल मधील रमा सरकार, इंडियन सर्व्हिसेस कडून खेळलेले पंजाब चे हरदीप सिंग, महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते खेळाडू अशोक शिंदे, तामिळ नाडू येथील पी गणेशन, श्रीराम भावसार, इंडियन रेल्वे दिल्लीचे रणधीर सिंग, वेस्ट बंगाल चे विश्वजित पाटील , कर्नाटकातील जेष्ठ कबड्डी पटू, सी होनाप्पा गौडा, बी सी रमेश, इंडियन सर्व्हिसेस राम मेहेर सिंग, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त , भारतीय संघाचा कर्णधार, पोलीस उप अधीक्षक पंकज शिरसाठ, अभिलाषा म्हात्रे, राजस्थान मधील दीपक हुडा, इंडियन रेल्वेचे पवन शेहरावत, यांचा श्री साई बाबांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
         अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे प्रा. शशिकांत गाडे, जयंत वाघ, विजय मिस्कीन, भास्कर जऱ्हाड, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, सदानंद शेटे, आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त किशन कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा कबड्डी असोसिएशन पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी यांनी खूप चांगले काम केले . आणि या स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या हे खरोखरच उल्लेखनीय आहे. सर्वानी एकत्र येऊन केल्याचा हा आनंद आहे.
 राणा तिवारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक प्रा. शशिकांत गाढे यांनी केले तर आभार जयंत वाघ यांनी मानले. 
    तिसऱ्या दिवशी वाडिया पार्क या ठिकाणी नॉक आउट राउंड नंतर क्वार्टर फायनलचे सामने झाले ४५ विरुद्ध २५ अशी महाराष्ट्राने कर्नाटकवर मात करून सेमी फायमल मध्ये प्रवेश केला.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
=========
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


आयोध्यानगरी येथील नागा गोपालदास महाराजांचे श्रीरामपूर नगरीत भव्य स्वागत


श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता 
श्रीराम भूमी आयोध्यानगरी येथे सेवेत असलेले अखिल भारतीय श्री पंच रामानंदीय दिगंबर आखाड्याचे नागा गोपालदास महाराज यांचे संत नागेबाबा मल्टी स्टेट पतसंस्थेच्या कार्यालयात आरोग्य मित्र सुभाष दादा गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
  यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष व स्वच्छता दूत म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले आदित्यजी घाटगे, प्रथीतयश व्यापारी विलासराव शेटे, हिंद सेवा मंडळ कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन आदीक जोशी, व्यापारी ज्ञानेश सारंगधर, निशिकांत पंडित, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
  अडीचशे पुरस्कार प्राप्त आरोग्य मित्र सुभाष दादा गायकवाड यांच्या आरोग्य क्षेत्रातील कामा संदर्भात नागा गोपालदास महाराज यांचा संपर्क आला त्यांच्याकडून रुग्णाला झालेल्या मदतीची भावना ठेवून महाराज त्यांच्या भेटीसाठी श्रीरामपूर येथे आले असता अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराच्या झालेल्या प्रांण प्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात माहिती देऊन सर्व धर्मीयांनी आपापसातील मतभेद विचारभेद बाजूला ठेवून एकसंघ राहावे अशी भावना व्यक्त केली पतसंस्थेचे चेअरमन कडू भाऊ काळे यांच्याशीही महाराजांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना व उपस्थित मान्यवरांना आयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले तर आज खरोखर महाराजांचे दर्शन झाले याचा आनंद तर झालाच परंतु आम्ही आयोध्यातच असल्याची जाणीव झाल्याची भावना सुभाष दादा गायकवाड यांनी व्यक्त केली.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम -श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
========
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Sunday, March 24, 2024

सामाजिक समरसता


रमजानुल मुबारक - १४
समाजातील सर्व घटकांना समान संधी देऊन आपली प्रगती साधण्याची संधी इस्लाम ने जगाला उपलब्ध करुन दिली आहे. जगभरातील सर्व लोकांना समान कायदा निर्माण करुन समतेचे सूत्र इस्लाम धर्माने निर्माण केले आहे.
रमजान महिन्यात सर्व मशिदी या भक्तांनी फुलून गेलेल्या असतात. गर्दीचा जणू महापूर आलेला असतो. पाचही वेळची नमाज तसेच तरावीहच्या नमाजसाठी भक्तिभावाने सर्वांनी हजेरी लावलेली असते. नमाज ही अल्लाह साठी आदा केली जाते तशी प्रतिज्ञा (निय्यत) करुनच तिचा प्रारंभ होतो. एका रांगेत(सफ) एकमेकाला खेटून सर्वजण उभे राहतात.यावेळी कुणी कुणाच्या शेजारी उभे राहावे याचे बंधन नसते. बादशाहच्या शेजारी गुलाम,राजा शेजारी रंक,गोऱ्या शेजारी काळा असा कोणीही उभा राहू शकतो.तेथे कोणी उच्च किंवा कनिष्ठ नसतो. सर्वजण समान असतात. व्ही. आय. पी दर्शन ही पध्दत तेथे नसते.नमाजची निश्चित केलेली वेळ झाल्यावर कुणाची ही वाट न पाहता प्रार्थनेला प्रारंभ होतो. मस्जिद हे अल्लाहचे घर असून तेथे सर्व समान आहेत. कोणताही भेदभाव तेथे केला जात नाही. खलिफा,बादशाह, सुलतान यांच्या काळात व आजही जेथे इस्लामी राजवट आहे अशा देशात बादशाह व त्याचे नोकर चाकर एकमेकांच्या शेजारी उभे राहून अल्लाहची प्रार्थना करतांना तसेच रोजा ईफ्तार करतांना एका ताटात बसलेले पहावयास मिळतात.
समानता किंवा मसावात हे इस्लाम धर्माचे मुख्य सूत्र आहे. 
हजरत पैगंबरांनी त्यांच्या जीवनात जेव्हा हजच्या प्रसंगी शेवटचा खुत्बा (प्रवचन) दिला.त्यावेळी जाहीर केले की, लोक हो,आज तुमच्यावर तुमचा दीन (धर्म) मी पूर्ण केला आहे. माझ्यावर जी जबाबदारी अल्लाहने दिली होती ती सर्व मी, तुमच्यापर्यंत पोहोचविली आहे. तुम्ही सर्व समान आहात. कुणाचेही कुणावर वर्चस्व नाही. काळा गोरा, अरबी व अरबेतर असा कोणताही भेद इस्लाम मध्ये नाही.तुम्ही सर्व एकमेकाचे भाई भाई आहात.
इस्लामला जाती भेद मान्य नाही. पोटजाती हा प्रकार आपल्याकडे मुस्लिमांमध्ये व्यावसायावरुन पडला आहे.धर्म म्हणून इस्लाम व जात म्हणून मुस्लीम किंवा मुसलमान एवढी एकच जात मान्य आहे. शासनाच्या सवलतीसाठी जातीभेद हा इस्लाम मध्ये मान्य नाही. 
सर्वांनी एकदिलाने रहावे, आपल्यातील गरजूंना सर्वांनी मिळून मदत करावी व त्यांचा भार हलका करावा. कुणीही विकासापासून वंचित राहू नये. सर्वांना प्रगतीच्या समान संधी प्राप्त व्हावी ही इस्लाम धर्माची शिकवण आहे. रमजान महिन्यातील विविध उपक्रम हे या समानतेचाच एक भाग आहे. समानतेचा एक भाग म्हणजे जकात.जकात व्यवस्था ही समाजातील दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रामुख्याने निर्माण झाली आहे. त्याबाबतचा सविस्तर आढावा पुढील लेखांमध्ये आपण घेणार आहोत.(क्रमशः)


=================================
-----------------------------------------------
*सलीमखान पठाण (सर)*
 *श्रीरामपूर - 9226408082*
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================