" जिहाद " ही ईस्लामला दिलेली फार मोठी देणगी आहे , परंतु , जगामध्ये ईस्लामी जिहाद ला फार विकृत स्वरूपात दाखविले आहेत.." जिहाद " या शब्दाचा वेगवेगळ्या अर्थाने अर्थ घेतला जातो.(१) " सत्याचा असत्या विरूद्ध , विरोधी लढा " (२) दुष्टांच्या विरूद्ध सत्याचा लढा होय (३) दुष्कार्माच्या विरोधी सत्य कर्माचा लढा (४) दुराचारा विरोधी सदाचराचा लढा होय (५) अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी न्यायाचा लढा होय.(६) तसेच , जिहाद चा अर्थ " कष्ट सहन करणारा " ( पवित्र कुराण ,अन - नहल अ.नं.११०)
(७) प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ( पवित्र कुराण ,अल-फुरकान आ.नं.५१).
प्रेषीत मुहम्मद स्व.यानी सांगितले की, " संयम बाळगणे व आपल्या वाईट कृत्यांवर आवर घालणे म्हणजे सर्वाधिक मोठा, योग्य जिहाद ,!! कारण , अल्लाहा ला संयम बाळगणारे जास्त पसंद आहेत ". पवित्र कुराण , ( सुरह अल - नहल आ.नं. ११०)
" परवानगी दिली गेली युद्ध करण्याची,त्या लोकांना ज्यांच्या ज्यांच्या लोकांवर अत्याचार केले गेले , कारण , ते अत्याचार पीडीत आहेत " (पवित्र कुराण , सुराहा नं. २२ अल- हशर ,आ .न.३९ ).
" आणि त्यांच्याशी युद्ध करा ,जिथे कुठे तुमचा त्याच्या (अत्याचार,आतिरेक ) करणारांशी सामना होईल, आणि त्यांना त्या ठिकाणापासून हाकलून , हुसकावून लावा, जिथून तुम्हाला जिथून त्यांनी (अत्याचार करण्याऱ्यां) नी , हाकलले होते ". पवित्र कुराण ,सुराहा नं.२ अल- बकराहा, आ.नं.१९३).
संपूर्ण जगामध्ये शांतता स्थापन करणे हे ईस्लाम चे प्रथम प्रमुख उद्दिष्ट राहीलेले आहेत , युद्ध करणं हा अगदी शेवटचा पर्याय आहेत.
ईस्लाम ने शत्रुशी देखील न्याय करण्याचा आदेश , हुकूम दिला आहे व हिच बाब न्यायाच्या सर्वोच्च आदेशाची ग्वाही देतो आपली प्रस्तुत करते . यासंदर्भात खाली पवित्र कुराण म्हणतात की," हे ईमानवंतांनों, अल्लाहा (परमेश्वर) साठी सत्यावर अढळ राहणारे, व न्यायाची खात्री , ग्वाही देणारे बनावे ..जर एखाद्या गटाच्या शत्रूत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभिक ( उकसू ) नयेत की तुम्ही न्यायापासून विमुख (दूर ) व्हाल . न्याय करा .हे तुमच्या अल्लाहा जवळ अधिक निकटवर्तीय आहेत. अल्लाहा चे भय बाळगून कार्य करीत राहा.)
ईतका महान संदेश व शिकवणी देणाऱ्या ईस्लामी व्यवस्था व पवित्र कुराण हे रक्तपातास , अतिरेक करण्यासाठी बिलकुल उत्तेजन देत नाही . यावर पवित्र कुराण म्हणते की, आणि तुम्ही अल्लाहा च्या मार्गात त्या लोकांशी लढा ,जे तुमच्या शी लढतात . पण , परंतु , मर्यादांचे उल्लंघन (अतिरेक) करू नका , अल्लाहा ला मर्यादांचे उल्लंघन करणारे आवडत नाहीत. ( पारा न.१, अल- बकराहा ,आ.नं.१९० ).
खरै तर जिहाद म्हणजे सर्व सामान्य लोकांच्या डोक्यात फक्त , मुस्लिम, मुसलमान चं येतात की ते हुकूमशाही पद्धती, रक्त पात ,खुन , सतत लढाया, मुंडकं उडवण़ , कत्तली करणं ,आयाबहीणींची इज्जत लुटणं , मारामाऱ्या , युद्ध वगैरे हे सर्व मुस्लिम विरोधी विश्व पातळीवर पेरले गेले आहेत.
पण वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून विचार केला तर ,हे अगदी विरुद्ध दिशेने जातं ,
जिहाद म्हणजे , युद्ध नसून सत्कृत्याचा -दृष्टकृत्याविरोधी , सत्याचा -असत्याविरोधी ,जुलूमकरणाऱ्या विरुद्ध , अन्यायाविरुद्ध , अत्याचार करणाऱ्या विरोधी , हुकूमशाही विरोधी , विरूद्ध लढणाऱ्यांचा ,आवाज उठवणाऱ्यांचा लढा होय. .
आपल्या मनातील शैतानी भावना, शैतानी प्रवृत्ती,शैतानी मनोवृत्ती,शैतानी विकृती चा लढा होय . आपल्यामधे चांगले काही निर्माण व्हावं ,चांगली विचारसरणी निर्माण व्हावी यासाठी एक प्रयत्न होय .
ज्या जमातीवर ,अत्याचार होत असेल तर त्या अत्याचार करणाऱ्या वर आवाज उठवण्यासाठी जिहाद करणं होय . एखाद्या हुकूमशाही राजा विरूद्ध आवाज उठवणं याला जिहादच म्हणतात,
जिहादी मुसलमाना म्हणतात. एखाद्या स्त्री वर अत्याचार होत असेल ,तिच्या इज्जती, इभ्रतीवर अतिक्रमण होत असेल तिथै धाउन जातो ,तिचे रक्षण करतो , शेजारच्याला काही त्रास दिला जात असेल तर धाउन जातो , एखाद्याच्या रक्षणार्थ धावून जाणं हा सुद्धा जिहाद च ...
जे जे अल्लाहा च्या सांगितलेल्या सत्कर्माच्या मार्गावर सर्वस्व अर्पण करतो ..
परंतु प्रेषीत मुहम्मद स्व.सांगतात की, " संयम बाळगणे , आपल्या वाईट कृत्यांना आवर घालणं म्हणजे सर्वाधिक योग्य जिहाद , कारण अल्लाहाला संयम करणाऱ्यांना पसंद करतो ".
आशा समाजोपयोगी,लोक कल्याण करण्यासाठी दोषी ठरवले जात असेल ,तर एक सत्वपरीक्षाच .ठरते .
आपल्या मित्रांना आवश्य पाठवा , कृपया खाडाखोड , कॉपी पेस्ट करू नयेत , प्रतिक्रिया अवश्य कळवा ..)
=================================
-----------------------------------------------
आपला मित्र डॉ सलीम सिकंदर शेख,
बैतुशशिफा हॉस्पिटल,
मिल्लतनगर श्रीरामपूर
९२७१६४००१४ ...
-----------------------------------------------=================================
No comments:
Post a Comment