- राहुरी - प्रतिनिधी -/ वार्ता -
राहुरी तालुक्यातील दोन कोल्हार खुर्द येथून अल्पवयीन मुलांचे अपहरण करण्यात आले. क्रिक्रेट अकॅडमी जात असल्याचे सांगत दोघा मित्रांनीच त्यांचे अपहरण केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
विघ्नेश संदिप शिरसाठ आणि परसराम रामदास थोरात अशी अपहरण झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. तर रुद्राक्ष राजेंद्र मोरे व पवन दिलीप डोईफोडे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.विघ्नेशचे मित्र परसराम रामदास थोरात, रुद्राक्ष राजेंद्र मोरे, पवन दिलीप डोईफोडे हे शेजारीच राहतात.
१२ जूनला सायंकाळी विघ्नेश हा मित्रांसमवेत क्रिकेट खेळण्यासाठी मारुती मंदिर परिसरात गेला. विघ्नेशच्या मित्रांनी साई प्रकाश कानडे यांच्या फोनवर आम्ही क्रिकेट अॅकॅडमीसाठी जात असल्याचे सांगितले. तशी चिठ्ठी मारूती मंदिर येथे ठेवल्याचे ते म्हणाले. त्यानंतर विघ्नेशचे वडील संदिप शिरसाठ यांनी तत्काळ मारुती मंदिर परिसरात धाव घेतली. त्यावेळी तेथे त्यांना चिठ्ठी आढळून आली. त्यानंतर विघ्नेश व परसराम या दोघा मुलांचे अपहरण झाल्याचे समोर आले. रुद्राक्ष मोरे व पवन डोईफोडे यांनीच अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी मोरे व डोईफोडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची विषयी.संदीप शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र त्रिंबक मोरे, पवन दिलीप डोईफोडे, दोघे रा. कोल्हार खुर्द ता. राहुरी. यांच्यावर गु.र.नं. 697/2024 भादंवि कलम 363 प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment