- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील रहिवासी व राज्य परिवहन महामंडळ श्रीरामपूर आगाराचे सेवानिवृत्त वाहतुक नियंत्रक श्री.अरविंद कुंडलवाल व जि.प.सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती मीना कुंडलवाल यांचे चिरंजीव श्री.गजानन कुंडलवाल यांनी मोठ्या जिद्द,चिकाटी आणी मेहनतीच्या बळावर बी,ई, मेकॅनिक,एम बी ए पदवी धारण करुन,बँकेची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्यांची पुणे येथील पंजाब नॅशनल बँकेच्या सर्कल कार्यालयात वरिष्ठ सर्कल अधिकारी या पदावर नियुक्ती झाली असल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्यानंतर त्यांनी हरीयाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकत आपले बैंकींग ट्रेनिंग पुर्ण केले. या ट्रेनिंग मध्ये देखील त्यांनी चांगल्या प्रकारचे यश संपादन केल्याने त्यांची पुणे येथील पंजाब नॅशनल बँकेंच्या सर्कल ऑफिसमध्ये वरिष्ठ मार्केटिंग ऑफिसर म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
अतिशय संघर्षमय जीवनातून कुंडलवाल या दांपत्याने आपल्या चार मुली व एक मुलास उच्चशिक्षित व उच्च विद्याविभुषित केले.शिक्षण हे खरोखरच वाघिणीचे दुध आहे हे यानिमित्ताने त्यांच्या पाचही लेकरांनी दाखवून दिले असल्याचे यावेळी त्यांच्या सत्काराप्रसंगी मेजर कृष्णा सरदार व उत्तमराव दाभाडे यांनी त्यांचे मोठे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव दाभाडे, आजी माजी सैनिक संघर्ष समिती चे मेजर कृष्णा सरदार, यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करून पुढील भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या,
यासमयी पुढे शुभेच्छा संदेशपर बोलताना मेजर कृष्णा सरदार म्हणाले की, शिक्षण ही अशी धनसंपत्ती आहे की तिला कोणीही चोरून घेऊ शकत नाही, म्हणून आपण उच्च शिक्षण घेतले पाहिजे, सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश दूर नाही असेही ते म्हणाले.
याप्रसंगी मेजर संग्रामजीत यादव,दादासाहेब शेजुळ, श्रीराम ट्रेडर्सचे सर्वेसर्वा रामचंद्र सुगुर, दत्तात्रय शिरसाठ, अशोकराव मंडोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराच्या उत्तराखातर गजानन कुंडलवाल आपल्या मनोगतात म्हणाले की,मला अनेक कंपनीमध्ये कॉल आले, परंतु माझे स्वप्न वरिष्ठ अधिकारी बनवण्याचेच होते आणि हे सर्व काही माझे माता - पिता, गुरुजन सोबत माझी मेहनत आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळेच शक्य होऊ शकले असल्याचे ते म्हणाले.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment