राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, August 28, 2024

अशोक पॉलिटेक्निक व फार्मसीमध्ये दहिहंडी मोठ्या उत्साहात साजरी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील तालुक्यातील अशोकनगर येथे अशोक पॉलिटेक्निक व अशोक फार्मसी महाविद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोपालकाला व दहीहंडीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव तर अध्यक्षस्थानी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे उपस्थित होत्या. प्रसंगी अशोक बँकेचे चेअरमन ॲड. सुभाष चौधरी, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, गोरे कॉम्प्युटर्सचे संचालक चंद्रशेखर गोरे, पोलीस कॉ. प्रविण कांबळे, पो.कॉ. वसीम इनामदार, पो. कॉ. रुबिना शेख पो.ना. किरण टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. जाधव यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करतांनी सांगीतले की, दहीहंडी फोडताना गोविंदांना दुखापत होण्याची शक्यता असते. दहीहंडीमध्ये मानवी मनोरे तयार करून हंडी फोडण्यासाठी उंच थर रचले जातात. यामुळे गोविंदांच्या पायाला, खांद्याला दुखापत किंवा डोक्याला दुखापत होऊ शकते. अशावेळी डोक्याला, पायाला किंवा मनगटाला कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सोमनाथ जाधव यांनी केले.
अशोक पॉलिटेक्निक व फार्मसीमध्ये या उपक्रमाचे श्री. जाधव यांनी कौतुक करून गोपाळकालाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यभरात सर्वच ठिकाणी हा सण जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी गोविंदा पथक खुप उत्साही असतात. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाची लगबग सुरू असते. गोविंदा पथक एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी 'गोविंदा आला रे आला, जरा मटकी सम्भाल ब्रीजवाला...' च्या घोषणांनी संपुर्ण परिसर दुमदुमून गेला. रेवती शिंदे व रसिका कुमावत यांनी राधा-कृष्णची वेशभूषा परिधान केलेली होती.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दहीहंडी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये मुलांनी चार थराचा व मुलींनीही तीन थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडली. मुलांच्या दहीहंडी मध्ये केमिकल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यानी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेने पटकाविला. तर मुलींमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेने प्रथम व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेने द्वितीय क्रमांक मिळविला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
दहीहंडी कार्यक्रमासाठी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे, फार्मसीचे प्राचार्य प्रसाद कोते, कार्यक्रम समन्वयक प्रा. सचिन कोळसे, विभाग प्रमुख महेश नवपुते, विशाल घोगरे, मयूर पांडागळे, रामेश्वर पवार आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.अरुण कडू यांनी केले तर आभार प्रा. मोहितकुमार गायकवाड यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर ±९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


No comments:

Post a Comment