- मुबंई - प्रतिनिधी -/ वार्ता -
"'येक नंबर' हा मराठी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित या चित्रपटामध्ये अभिनेता धैर्य घोलप आणि सायली पाटील हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. दरम्यान 'येक नंबर' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी हे नामांकित व्यक्ती उपस्थित होते."
"राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'येक नंबर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित करण्यासारखा आहे. 'येक नंबर'चं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास दिसत आहे. प्रताप त्याचे ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नाची उकल येत्या 10 ऑक्टोबरला होणार आहे."
"ट्रेलर पाहून प्रेक्षकांना सध्या या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का? तर याचे उत्तरही प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. दरम्यान, 'येक नंबर'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची झलकही दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटातून मलायकानं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यापूर्वी चित्रपटातील 'जाहीर झालं जगाला' या प्रेमगीतानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. सध्या हे गाणं प्रचंड गाजत आहे. 'येक नंबर'म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे, हे नक्की ! एकंदरच या सगळ्यावरूनच चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज येतोय."
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment