- कोपरगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली,यासाठी कर्मवीर आण्णांनी खूप मोठा त्याग करुन रयतेसाठी अफाट कष्ट घेतले. कर्मवीरांचा आदर्श घेत विद्यार्थ्यांनी वटवृक्षाची फांदी होऊन आपल्या नवीन विचारांची नवनिर्मिती केली पाहिजे.शिक्षणाचा मूळ गाभा समजून घेतल्यास तसेच शारीरिक व मानसिक क्षमता दृढ केल्यास कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होता येते असे विचार प्रमुख पाहुणे संदीप कोळी पोलीस निरीक्षक कोपरगांव यांनी न्यू इंग्लिश स्कुल धामोरीच्या कर्मवीर जयंती सभे दरम्यान प्रतिपादित केले.
न्यू इंग्लिश स्कुल धामोरी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती सभा ३० सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी हे होते तर प्रमुख अतिथीपदी संदीप कोळी पोलीस निरीक्षक कोपरगांव, प्रमुख वक्तेपदी अरुण चंद्रे सर जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा हे उपस्थित होते.
याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील, वहिनी, विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी उर्फ आण्णा,प्रमुख अतिथी संदीप कोळी, प्रमुख वक्ते अरुण चंद्रे सर जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या समवेत इतर शिक्षण प्रेमी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात स्वागतगीत व रयतगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी बागल यांनी केले.
या कार्यक्रमा प्रसंगी रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले तद्नंतर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप व प्रेरणा मिळावी म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना थोर देणगीदारा द्वारे ठेवण्यात आलेल्या रकमेच्या माध्यमातून बक्षीस वितरण करण्यात आले.
वहिनीच्या दोन अश्रूनी रयत शिक्षण संस्थेची निर्मिती कर्मवीर आण्णा च्या हातून झाली. संस्थेचा डोलारा उभा करताना अपार कष्ट आण्णांनी घेतेले याची प्रचिती संस्थेचा विस्तार करताना एकदा त्यांच्या पायातून चौऱ्यांशी काटे निघाले होते यातून येते, विचार परिश्रम आणि ध्यास ही कर्मवीर अण्णांची त्रिसूत्री विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारावी ही त्रिसूत्री नक्कीच आयुष्यात यशस्वी बनवते असे प्रतिपादन प्रमुख वक्ते पदावरून बोलताना अरुण चंद्रे सर यांनी केले तर या महाराष्ट्रात समाज सुधारकांनी कुठलाच स्वार्थ मनात न ठेवता मनापासून सेवा केली. म्हणूनच आज शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारापर्यंत आली असे प्रतिपादन चंद्रशेखर कुलकर्णी उर्फ आण्णा यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले.
यानंतर सांस्कृतिक विभागामार्फत महिला सक्षमीकरण वर पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, स्कुल कमिटी, व्यवस्थापन समिती, व्यवस्थापन व विकास समिती, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ सदस्य, पत्रकार,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना सुरुची भोजन देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या सर्व सेवकांनी परिश्रम घेतले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दत्तात्रय घुले - धामोरी
=================================
-----------------------------------------------
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९२९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment