एमपीएससी,युपीएससी स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र तयार करणे बाबत खा. राजाभाऊ वाजे यांना निवेदन
- नाशिक - प्रतिनिधी -/ वार्ता -
मध्य विधानसभा परिक्षेत्रात एमपीएससी,युपीएससी स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र तयार करणे बाबत, नाशिककर मुख्यत्वे मध्य विधानसभा परिक्षेत्र नागरीकांच्यावतीने खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनाद्वारे विनंतीवजा मागणी करण्यात आली आहे की,आमच्या मध्य विधानसभा क्षेत्रात जुने नाशिक, नागजी, व वडालागांव हे घनदाट लोकवस्ती असलेले क्षेत्र आहे व मुख्यत्वे याच परिसरात मध्य विधानसभा क्षेत्रातील दाट लोकवस्ती असल्याने कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांची संख्या लक्षणीय आहे, येथील नागरीकांना दैनंदिन जिवनात लागणाऱ्या गरजेंबरोबरच आर्थिक व शैक्षणिक सुविधांसाठीही खुप तडजोड व मेहनत घ्यावी लागते आहे.
केवळ फक्त शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास याबाबत येथील नागरीकांकडे पुरेश्या साधनसामुग्री व पर्याय उपलब्ध नाहीत. करीता ज्या प्रमाणे आपण सिन्नर येथे लोकनेते शंकररावजी वाजे वाचनालय तयार करुन तेथील शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या विद्यार्थ्यांना सदरील बाबी मार्ग उपलब्ध करुन दिला आहे. त्याच धर्तीवर आम्हालाही स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र एमपीएससी, युपीएससी स्टडी सेंटर करुन द्यावे अशी विनंती ही शेवटी या निवेदनात करण्यात आलेली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, युपीएससी, एमपीएससी स्टडी सेंटर अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्यावर आम्हाला विश्वास आहे की, लवकरच आम्ही आमच्या विभागातून देशासाठी व राज्यासाठी आपल्या सेवा प्रदान करण्यासाठी सक्षम व देशात आपल्या शहराचा नावलौकिक करणारे उत्कृष्ट अधिकारी देऊ करीता आमच्या या निवेदनाला स्विकरुन आम्हाला लवकरात लवकर अख्ख्या महाराष्ट्राला हेवा वाटेल असे वाचनालय,स्टडी सेंटर तयार करुन द्यावे. अशी मागणीही शेवटी करण्यात आली आहे.
याप्रसंगी माजिद पठाण समवेत अल्ताफ शेख, कलविंदर गरेवाल,गौसिया बाजी शेख, शकिल चाचा शेख, अरशीया शेख, वसिम पठाण आदि उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार माजिद खान, नाशिक
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
Very good demand 😄
ReplyDelete