राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, November 26, 2024

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेचा राष्ट्रीय गौरव म्हणजे संविधान दिन


विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांच्या अलौकिक आणि अद्वितीय प्रकांड पांडित्यातून उदयास आलेला भारत देशासह देशातील तमाम जनतेचा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय. भारतीय संविधान लिहण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तब्बल दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी लागला. 
     या प्रदीर्घ कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता अहोरात्र निरंतर अभ्यास, चिंतन,मनन करत जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांच्या संविधानांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या संविधानांपेक्षा भारतीय संविधान हे जास्तीत जास्त कसे लोककल्याणकारी निर्माण करता येईल या करिता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कायम राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून निरंतर प्रामाणिक प्रयत्न केला. आणि जगातील सर्व श्रेष्ठ आणि जगातील प्रगत राष्ट्रांच्या अस्तित्वात असलेल्या सर्व संविधानांच्या तुलनेत सर्वात मोठ्या लिखित भारतीय संविधानाची निर्मिती केली. हे राष्ट्रहिताचे महान लेखन कार्य अविश्रांतपणे परिपूर्ण करून सदर संविधान घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते देशाला अर्पण केले तो ऐतिहासिक दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी हे भारतीय संविधान राष्ट्रहितासाठी सर्वानुमते अंगिकृत करून अधिनियमित केले. या नंतर घटना समितीने एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करून त्या जाहीर कार्यक्रमात घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे पहिले प्रधान मंत्री पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य आणि अलौकिक संविधान निर्माण कार्याची प्रशंसा करून त्यांच्या प्रखर राष्ट्र प्रेम आणि जाज्वल्य देशभकीचा गौरव केला आणि २६ जानेवारी १९५० पासून हे संविधान भारतीय शासन प्रशासनात प्रत्यक्षपणे अंमलात आले. 
      न्याय, समता, स्वातंत्र आणि विश्व बंधुत्व या चतुः सुत्रीवर आधारित भारतीय संविधानाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुता प्रवर्धीत होण्यासाठी देशातील सर्व सामान्य जनतेत, विद्यार्थी व शिक्षक वर्गात, लोकप्रतिनिधी आणि सरकारी निमसरकारी प्रशासकीय अधिकारी, लोकसेवक यांच्या मध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरावर संविधान साक्षरता व जाणिव जागृती होणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा अंतर्भाव केला पाहिजे. 
       या संविधान गौरव दिनानिमित्ताने भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, संविधानिक हक्क, अधिकार आणि कर्तव्य स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणार आहेत. हीच संविधानिक तत्वे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनात आणि विद्यार्थी मनावर बिंबवून त्यांना देशाचे सुजाण व जागरूक नागरिक भडवणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आपल्या भारतीय संविधानाच्या अधीन राहून भारताचा प्रशासकीय कारभार चालतो याची जाणीव, जागृती विद्यार्थ्यांना आणि भारतीय नागरिकांना झाली पाहिजे. आपल्या देशाच्या या घटपात्मक संसदीय लोकशाहीच्या आधारे कार्य पालिका, न्याय पालिका, संसद, मंत्रीमंडळ, निवडणूक आयोग, प्रसार माध्यमे यांच्या दैनंदिन कारभाराचे समग्र ज्ञान विद्याथ्यांना आणि नागरिकांना व्हाने या करिता शासनाने सन २००८ ला अध्यादेश काढून २६
नोव्हेंबर रोजी देशासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालम, विद्यापीठ अनुदान आयोग तथा युजीशी, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, ग्राम पंचायत कार्यालयात संविधान गौरव दिन आगोजित करून या दिनाचे महत्व विशद करण्यासाठी वकृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन आणि भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचे सामुहिक वाचन करने सर्वांना बंधनकारक केले आहे. या संबंधीचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांव्याकडे पाच डिसेंबराच्या आत सविस्तर सादर करावयाचे आहे. संबंधित जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या जिल्यात प्रत्यक्ष किती ठिकाणी शासकीय आदेशाची अंमलबजावणी केली आहे, हे गांभीर्याने पहायचे आहे. अशा सुचना आहेत. 
       भारतीय संविधान हा आपल्या राष्ट्राचा तथा भारतीयांचा एकमेव राष्ट्रीय ग्रंथ आहे. या संविधानाच्या माध्यमातून आपण जगातील सर्वश्रेष्ठ संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. त्यामुळे ती अत्यंत निस्वार्थी वृत्तीने व पारदर्शकपणे राबविणे आणि तिचे पालन करणे जसे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी वर्गाची जबाबदारी आहे, तशीच ती सर्व भारतीम नागरिकांची सुद्धा तितकीच नैतिक जबाबदारी आणि आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे.


=================================
-----------------------------------------------
*शब्दांकन:*✍️✅🇮🇳...
पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड
बोरघर- माणगाव,रायगड. 
भ्रमणध्वनी - ९८२२५८०२३२ / ८००७२५००१२
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment