- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त नुकताच बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले.
दरम्यान चि.रक्षित सोळंकी (इ.पाचवी) याने आपले मनोगत व्यक्त केले, तर संगीत शिक्षक दिपक वाघ यांनी उपस्थितांसमोर बालपणातील भावविश्व उलगडणारे गीत सादर केले. तसेच इ.पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांचे मनोरंजनपर शाब्दिक खेळ घेण्यात आले. व इ.पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक चित्रपट दाखविण्यात आला.
यावेळी सहशिक्षिका ज्योती खंडागळे,गायत्री तांबे, नम्रता फोपसे,साक्षी भणगे,विजेता व्यवहारे,अजय आव्हाड यांनी विनोदी गीतगायन सादर करून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. दरम्यान विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके, व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन सुनंदा थोरात यांनी केले,तर आभार नम्रता फोपसे यांनी मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment