राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, January 26, 2025

डी पॉल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय संविधान स्विकारुन आज २६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्ष पूर्ण झाल्याने हे वर्ष देशभरात हिरक महोत्सव म्हणून साजरे होत आहे, यानिमित्त श्रीरामपूर येथील डी.पाॅल इंग्लिश मीडियम स्कूल च्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर श्री.बाबासाहेब दिघे, ॲडमिनीस्टेटर फा.फ्रॅन्को, मुख्याध्यापिका सि.सेलीन यांनी शालेय ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात केली. सर्वप्रथम भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यानंतर पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी च्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यानंतर रॅली पुढे शाहिद भगतसिंग चौकात पोहोचली येथे शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तेथे माजी नगरसेवक श्री. रवी (अण्णा) पाटील व दिपक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच ठिकाणी अमर जवान स्मारक येथे सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक यांचे मार्गदर्शन लाभले व त्या ठिकाणी देखील अभिवादन करण्यात आले. शेवटी डी पॉल स्कूलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप झाला.
रॅली यशस्विरित्या पार पाडण्यात फादर फ्रँको, रवींद्र लोंढे सर, संदिप निबे, गणेश पवार, विकास वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच याच दिवशी आगाशेनगर या ठिकाणी देखील प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी सुनील बोरगे मामा यांनी परिश्रम घेतले.याही फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला डी पॉल स्कूलच्या प्रांगणात सौ. मंगल ताई दुशिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासाठी सौ.अनुराधा कपिले, शिना कुथुर, प्रतिक्षा कोळगे यांनी परिश्रम घेतले. 
या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडमिनिस्ट्रेटर फा. फ्रॅन्को मॅनेजर फा. शिजो, मुख्याध्यापिका सि. सेलीन यांचे तसेच श्री रवी सर यांचे देखील अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment