राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, January 9, 2025

वॉर्ड क्र.२ नवीन घरकुल मधील त्रस्त नागरीकांची माथी शेवटी भडकणार ?


अन् त्रस्त नागरीकांचा मोर्चा कधीही
नगर पालिकेवर येवून धडकणार !!

नागरीकांच्या घरात शिरत असलेल्या गटारीच्या घाण पाण्याचा बंदोबस्त करा

अन्यथा नगर पालिकेवर त्रस्त नागरीकांचा धडक मोर्चा - रियाजखान पठाण यांचा इशारा 

शौकतभाई शेख / श्रीरामपूर
येथील वॉर्ड क्र.२ नवीन घरकुल याठिकाणी कमालीची अस्वच्छता निर्माण झाली असून यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगर पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करुनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने परिसरातील त्रस्त नागरीकांचा मोर्चा नगर पालिकेवर धडकणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण आणी परिसरातील त्रस्त नागरीकांनी श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकारी यांना दिलेला निवेदनात म्हटले आहे की,वॉर्ड क्र.२ मधील नवीन घरकुल याठिकाणी दोन्ही घरकुल इमारतींच्यामधून जी ड्रेनेजची गटार गेलेली आहे. ती गटार खुप खराब झालेली आहे. त्या गटारीमध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून त्यात उंदीर आणी घुशीचे मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे सदरील ड्रेनेज गटारीत माती जावून गटारीची लेव्हलच राहिलेली नाही. यामुळे नेहमी गटार तुंबते आणी गटारीचे व ड्रेनेजचे घाण पाणी नवीन घरकुलमधील नागरीकांच्या बाथरुमद्वारे थेट घरात शिरत आहे.अशी ही अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असल्याने सदरील ठिकाणी रहिवासी नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे,
या परिसरात प्रचंड प्रमाणात डास,मच्छर आणी रेंगणारे किटक घरात रेंगताना आढळून येत असल्याने यामुळे येथील रहिवाशांच्या लहान लहान बालकांसह थोर मोठ्यांना गंभीर स्वरूपाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करुनही म्हणावी तशी दखल घेतली जात नाही,न.पा. कर्मचारी कधी काळी येतातही मात्र थातूर - मातूर साफसफाई करुन जातात, परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे, या संदर्भात तात्कालिन मुख्याधिकारी गणेश शिंदे, सोमनाथ जाधव यांच्याकडे देखील अनेक तक्रारी केलेल्या होत्या व आहे,तसेच न.पा.चे मुकादम असलम शेख,आरोग्य विभागाचे धारवर,आरणे न.पा. बांधकाम अभियंता गवळी, यांना देखील कळविले होते. त्यांनी सांगितले की यावेळी संभाळून घ्या. पुढच्यावेळी ठिक करु,मात्र ही आश्वासने केवळ फोलच ठरली आहे. याबरोबरच सदरील ठिकाणच्या रहिवाशांच्या घरात खुपच दुर्गधी पसरली, आहे. करीता विद्यमान मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जातीने लक्ष घालून सदरील ठिकाणच्या गटारीचे कामे लवकरात लवकर हाती घ्यावे आणी याठिकाणच्या जवळपास तीनशे ते चारशे रहिवासी नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली असून. 
या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, सदरील कामे ही लवकरात लवकर न झाल्यास परिसरातील त्रस्त नागरीकांच्या सहनशिलतेचा अंत होवून त्यांची माथी भडकतील आणी पुढे याच गटारीचे घाण पाणी घेऊन ते आपल्या नगर पालिकेवर धडक मोर्चाद्वारे धडकतील यापासून निर्माण झालेल्या बऱ्या व वाईट परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित नगर पालिका प्रशासनावरच राहील याची वेळीच नोंद घेण्यात यावी असा इशाराही शेवटी सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण आणी संबंधित त्रस्त नागरीकांद्वारे नगर पालिका प्रशासनास देण्यात आला आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561274111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------

श्रीरामपूर - येथील वॉर्ड क्र.२ मधील नवीन घरकूल याठिकाणी गटार साफ होत नाही, मोठ्या प्रमाणात गटारी तुंबलेल्या आहेत, गटारीचे घाण पाणी नागरीकांच्या घरात शिरत असल्याने याठिकाणच्या रहिवासी खुपच त्रस्त झालेले आहे, त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही घरकुल इमारतींच्या मध्ये तात्काळ नवीन ड्रेनेज गटार बांधण्यात यावी, यामुळे नागरीकांच्या समस्यांचे निवारण होवून सुविधा उपलब्ध होईल अशा अशयाचे निवेदन श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले, याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण, सुनिल भाऊ, उस्मान भाई काकर,फिरोजभाई शहा व परिसरातील त्रस्त नागरीक उपस्थित होते.
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment