रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 26 वां, गुरुवार दिनांक 27-03-2025..
!! " लैलतुल कद्र -जुमाआ -तुल- विदाह " च्या एका - लम्हा - क्षणा -क्षणाची सुवर्ण संधी साधा.. "!!.
आज पवित्र रमजान मधील 26 वा रोजा ची लैलतुल कद्र ची 27 वी रात्रं, पुन्हा जुमाआ ची पवित्र रात्रं अर्थात योगा योग..
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह म्हणतात कीं, "(1) निश्चितच आम्ही पवित्र कुरआन ला शब ए कद्र च्या रात्रीत अवतरीत केलेले आहेत, (2), तुम्हाला ( शब ए कद्र ) कद्र ची रात्रं म्हणजेच काय? हें काय माहित आहे??(3)हजार महिन्याहुनही ( महिन्यांपेक्षा ही )अधिक उत्तम अशी रात्रं म्हणजेच कद्र ची रात्रं. (4)या रात्रीत देवदूत ( फारिस्ते )आणि खास देवदूत ( जिब्राईल अलै.)आपल्या अल्लाह ची आदेशानुसार प्रत्येक चांगल्या सुखाच्या गोष्टी घेऊन पृथ्वीवर अवतरतात., (5) आणि ही संपूर्ण रात्रं बरकतीची आणि शांती ची आहेत.( उष काळा पर्यंत ).(पारा 30 वा, सुरह 97,अल - कद्र आ. नं. 1 ते 05).
हजरत इब्न अब्बास रजि. सांगतात कीं , आम्हाला पैगंबर मुहम्मद स्व. नी सांगितले कीं, लैलतुल कद्र च्या पवित्र रात्रीं रमजान महिन्यात शेवटच्या विभागात (अशहरा )मध्ये विषम( ताक )संख्येत 21,23,25,27,29, पाच रात्रीं येतात, ( हदिस बुखारी 2020).
यामध्ये कोणती रात्रं जास्तच महत्वाची आहेत यामध्ये विविध
मुफ्ति व विशेष अभ्यास करणाऱ्या मध्ये मत्मात्तांतर दिसून येते. याचं गुपीत फक्त्त अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व. यांनाच माहित, तरीही विशेष रात्रं ही 26 व्या रोजाची येणारी रात्रं ही अंदाजे महत्वाची मानली गेली,
पूर्वीच्या काळात लोकं 500- 1000 वर्ष जगत होती, त्यांमुळे त्यांनी ठेवढे पुण्यांची कर्म केलेलं , व प्रेषितांच्या काळात सहाव्या शतकात लोकांचं आयुर्मान हें 60-ते 80-90 वर्षांच्या आसपास म्हणून प्रेषित यांना काही मित्र सहकारी यांनी प्रश्न उपस्थित केला कीं, हें अल्लाह च्या रसूल ( पैगंबर ) त्याकाळातील लोकांच्या बरोबर पुण्य कामावणे आज च्या दृष्टीने अशक्य आहेत आजच वय त्याकाळापेक्षा कमी आहेत.. तर., अल्लाहचा संदेश वरील सुरह अल कद्र च्या स्वरूपात आला. कीं कद्र ची एक रात्रीचे महत्व रोजच्या रात्रीं पेक्षा जास्तच अर्थात एक हजार महिन्याच्या रात्रीं पेक्षा ही जास्तच असणार आहेत ( सुरह 97, अल - कद्र आ. नं., 03)..त्या रात्रीचे महत्व जाणाल तर तुम्हीं स्तबध आश्यर्य चिकीत व्हाल. तुम्हाला भान राहणार नाहीत.
काही अभ्यासक, तज्ञ मंडळीनीं आप आपल्या कुवतीनुसार अंदाजे आकडेमोड दिलीत, एक हजार (1000) महिन्याच्या दिवसानुसार त्या रात्रीं, एक (1)सेकंद = 23 तास , एक मिनिट (1 मिनिट ) = 58 दिवस, एक (1) तास = 8-9 वर्ष यांची आकडेमोड करून बेरीज केली तर 83 त्रेयांशी वर्ष्याची इबादत - बंदगी - प्रार्थना होते.. अशा आपल्याला 20-25 वर्ष्याच्याप्रत्येक वर्षाची एक तरी लैलतुल कद्र ची पवित्र रात्रं भेटली तर त्याकाळातील हजार वर्ष्याच्या प्रार्थना पेक्षा ही कितीतरी जास्तच होईल. प्रत्येक सेकंद मिनिटाचं पुण्य एवढ्या प्रमाणात भेटत असेल तर यां सुवर्ण संधीचा फायदा इमाने इतबारे इबादत प्रार्थना करून उचलणं अत्यन्त गरजेचं.मग एक एक सेकंड, मिनिट, तास का? वाया घालवायचं.
प्रेषित मुहम्मद स्व.यां रात्रींचं महत्व सांगतात कीं, " अल्लाह -परमेश्वर - परमात्मा -गॉड यां रात्रीं मध्यरात्रीं सातव्या आकाशात येऊन पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र, मानवानां आव्हान करतात कीं, " #कोण आहेत जो माझ्याकडे दयेची याचना करेन त्यावर मी ती दया देईल, #:कोण आहे कीं, माझ्याकडे करुणेची भीक मागेल मी त्याला त्या करुणेची भीक देईल,:# कोण आहे जो आपल्या केलेल्या लहान मोठया पापांची क्षमा माफी मागेल कीं मी त्याला क्षमा माफी देईल, # कोण आहे जो माझ्या कडे त्याच्या मनातील मनोकामना साठी माझ्या कडे येईल कीं मी त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल, "
पुन्हा पुन्हा अल्लाह मनाव जातीला आव्हान करतात कीं " कोण आहेत जो एका अशा अल्लाहला कर्ज देईल ".. हें कर्ज कशाला तर, समाजातील गरीब -पीडित,-अनाथ -लाचार- विधवा- अत्याचारीत - दिन दुबळे - उपाशी पोटी झोपलेल्या साठी, त्यांची भूक मिटवण्यासाठी, त्यांचं पालनपोषण करण्यासाठी, त्यांच्या बरीकातील बारीक, छोटया छोटया गरजा पुरवण्यासाठी.
तर यां मध्ये लैलतुल कद्र बराबरंच जुमाआ ची ही रात्रं आहेत व दिवस ही पवित्र जुमाआ आहेत.. त्या दिवस एक क्षण असा असतो कीं अल्लाह आपलं कोणतं ही दुआ पूर्ण कबूल करतात.. त्याचा डबल डबल फायदा आहेत तर त्याचा ही लाभ उठवला पाहिजे..
(मित्रांनो लेख आवडल्यास मित्रांना, नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांना ही फायदा होईल.. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा )
(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
लेखक :- डॉक्टर. सलीम साईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर
मोबाईल नं. 9271640014.👍👌
🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹
(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>