- तुषार खासबागे - वरुड जि.अमरावती -/ वार्ता
पत्रकारीता क्षेत्रामध्ये अल्प कालावधीत सर्वांना सुपरिचित झालेले युवा पत्रकार निखिल अनिल बावणे (सह संपादक दैनिक वरुड केसरी) यांनी न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.
अत्यंत सामान्य कुंटूबा मध्ये जन्म घेउन शिक्षणा सोबतच सोशल मिडीया मध्ये काम करित असतांनी कुठलही प्रशिक्षण न घेता ग्राफिक्स डिझाईन बनवण्याची कला अवगत करून आपल्या परिवारा साठी शिक्षणा सोबतच जोड व्यवसाय म्हणून काम करत असतांनी दैनिक वरुड केसरी या वृत्त पत्राच्या माध्यमातुन सोशल मिडींया सोबतच प्रिन्ट मिडीया मध्ये सुद्धा अल्प कालावधी मध्ये आपली ओळख निर्माण करण्याचे धाडस श्री निखिल बावणे यांनी केले व आज ते सहसंपादक म्हणून दैनिक वरुड केसरी या वृत्त पत्रा मध्ये काम करित आहेत, आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त वरुड शहरातील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे लहान मुलांन सोबत मित्रांनी वाढदिवस साजरा करण्याचा मानस केल व या छोटेखानी कार्यकमाला शाळेच्या प्राचार्य कोमल पांडव यांच्या मदतीने लहान मुलांन सोबत आपला आनंदाचा क्षण साजरा करण्याचा आनंद मिळऊन दिला. या वेळी प्रामुख्याने धिरज खोडस्कर सचिन परिहार तुषार खासबागे संपादक प्रविण सावरकर व शाळेच्या प्राचार्य कोमल पांडव व शिक्षक वृंध प्रामुख्याने उपस्थित होत्या या वेळी केक कापुन .मुलांना चॅकलेट वाटप करण्यात आले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment