मेडिकल, एलएलबी, दहावी आणि बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे, उच्च शिक्षणाची वाट ही अवघड जरी वाटत असली तरी मात्र ती अशक्यही अजिबात नाही हेच या यशस्वी विद्यार्थ्यांनी सिध्द केले आहे तसेच अल्पसंख्यांक समाजाने शिक्षणावर अधिक लक्ष देण्याची नितांत गरज भासत असल्याने त्यात उर्दू भाषा ही अत्यंत मधुर भाषा असून चित्रपटातील अनेक गाणी व डायलॉग हे उर्दू भाषेत लिहिली जातात जे नेहमी आठवणीत राहतात व उर्दूत शिक्षण घेऊन देखील उच्चशिक्षित होऊ शकतात हेच या यशस्वी विद्यार्थ्यांनी सिद्ध देखील केले असल्याचे प्रतिपादन संगमनेर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद देशमुख यांनी केले.
अंजुमने इस्लाम ट्रस्ट तर्फे संगमनेर येथील अँग्लो उर्दू कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी आयोजित उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सुप्रसिद्ध वकील ॲड. हैदर बॅग हे होते.
यावेळी मेडिकल, एलएलबी, दहावी आणि बारावी मधील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह,शाल व बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन शेख गनी हाजी यांच्याहस्ते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलिस निरीक्षक अरविंद देशमुख यांचा शाल व बुके देवुन सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना एडवोकेट हैदर बेग यांनी न्यायिक प्रक्रियेमधील येणाऱ्या अडचणी व बदलती विस्तारीत समाज व्यवस्थेवर सखोल माहिती विषद केली.
संस्थेच्या व उर्दूत शिक्षण घेऊन सुद्धा मेडिकल मध्ये एम.डी.ही डिग्री यशस्वी होवू शकते हे डॉ.रूही शेख यांनी सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन चीफ ट्रस्टी अब्दुल्ला चौधरी यांनी केले. प्रस्ताविक शमशोद्दीन इनामदार यांनी केले.
या प्रसंगी ट्रस्टी शेख नज़ीर ताजमोहमद, शेख एजाज शमशोद्दीन, मुख्याध्यापिका शेख रिज़वाना सलिम, शिक्षकवृंद पालक वर्ग, जे.यु. सी. उपाध्यक्ष सय्यद असिफ अली,शेख इरफान,शेख दस्तगीर,रि. प्राचार्य दिलशाद शेख, गफ्फार शेख, जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटरचे अध्यक्ष शेख ईदरीस, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन मुन्नवर खलील यांनी केले तर संस्थेचे सचिव पठाण शौकत खान यांनी आभार मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार शेख आदिल ✍️✅🇮🇳...
रियाजभाई - अ.नगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment