- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी ऍड. हाफीज जहागीरदार यांची निवड झाली, ही निवड केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नाही, तर आपल्या कार्यतत्परतेची, प्रामाणिकपणाची आणि कायदा क्षेत्रातील योगदानाची पावती आहे.
नोटरी पब्लिक म्हणून त्यांनी अनेक वर्षे समाजाला प्रामाणिक, पारदर्शक आणि जनतेच्या हिताचे कार्य दिले आहे. कायदा हे केवळ पुस्तकांतील नियम नाही, तर न्यायाची भावना प्रत्यक्ष कृतीत उतरवणे, हे आपण आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.असे प्रतिपादन इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष इंजि.इकबाल सय्यद यांनी केले.
महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी अॅड शेख हाफिज एन.जहागीरदार नोटरी पब्लिक यांची निवड झाल्याबद्दल नगर शहरातील इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या पी.ए. इनामदार स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तथा सोसायटी पदाधिकाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इंजिनियर सय्यद इकबाल, आर्किटेक्ट विकार काजी, पत्रकार आबिद खान,अॅड. अरकान जहागीरदार आदी उपस्थित होते.
यावेळी आर्कि. विकार काझी म्हणाले की,आज आपल्या यशाचा सन्मान करताना, आपल्यासारख्या व्यक्तीमुळे समाजात विश्वास, शिस्त आणि न्यायाची भावना अधिक बळकट होते, हे आम्ही खात्रीने सांगू शकतो. आपल्या कार्यामुळे केवळ कायद्याचा आदर वाढत नाही, तर तरुण पिढीलाही प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची प्रेरणा मिळते असे नमुद केले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ .नगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment