- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अहिल्यानगर शहरातील अल करम हॉस्पिटलच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोफत सर्वरोग निदान उपचार व औषधासह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील सर्वसामान्य रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला रुग्ण व नागरिकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी तौफिक तांबोली, शेरअली शेख, एजाज तांबोली तसेच नामवंत डॉक्टर्स डॉ.जहीर मुजावर, डॉ. जैनब पटेल, डॉ. नजमा जहीर, डॉ. अशपाक पटेल, शाहनवाज तांबोली आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आरोग्य सेवेला सामाजिक जबाबदारीची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.
शिबिरात विविध आजारांवर तपासण्या व सल्ला रुग्णांना देण्यात आला. विशेषतः हर्निया, अपेंडिक्स, कॅथलॅब तपासणी, एन्जिओप्लास्टी, किडनी स्टोन, डायबेटीस, हृदयविकार, प्रोस्टेट सर्जरी, रक्तदाब, सांधेदुखी, पाठदुखी तसेच व्यंधत्व निवारण यांसारख्या गंभीर आजारांची सविस्तर तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टर्सनी रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन करत औषधेही मोफत उपलब्ध करून दिली.
तसेच सामान्य तपासण्यांमध्ये ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, ईसीजी, एक्स-रे या सेवा पूर्णपणे विनामूल्य देण्यात आल्या. या सेवा सुविधांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
या उपक्रमाद्वारे अल करम हॉस्पिटलने रुग्णसेवा हाच सर्वोत्तम धर्म असल्याचा संदेश दिला. हॉस्पिटलचे डाॅ. जहीर मुजावर यांनी सांगितले की, “आजच्या काळात आरोग्याची समस्या ही सर्वांत गंभीर समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. येत्या काळातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल.”
शिबिरातील डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधून योग्य आहार, व्यायाम, जीवनशैलीत बदल व आजारांपासून बचाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याबरोबरच जनजागृतीतही भर पडली.
या शिबिरामुळे अनेक रुग्णांना योग्य निदान व तत्काळ उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त झाले. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातून आलेल्या रुग्णांनी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले.
समारोपप्रसंगी डॉ.अशपाक पटेल म्हणाले की,अशा सामाजिक वैद्यकीय शिबिरांमुळे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळतो असे ते म्हणाले. यासोबतच वर्षभर असे विविध प्रकारचे आरोग्य शिबिरे आयोजित करत राहण्याचे मानसही यावेळी त्यांनी व्यक्त केले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment