- शौकतभाई शेख - जेष्ठ संपादक -/ श्रीरामपूर -
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने अहिल्यानगर येथील बडीसाजन हॉलमध्ये समाजोपयोगी सेवा प्रकल्प राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ११ सायकली, ११ शिवणयंत्रे, ११ वेंडिंग मशिन्स व ११ इंसीनरेटर यांचे वितरण करण्यात आले.
या प्रकल्पामुळे महिला सक्षमीकरणास चालना मिळाली.
क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुनील कटारिया यांनी प्रास्ताविक केले.
सहायक प्रांतपाल मधुरा झावरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हा फर्स्ट लेडी रोटेरियन संगीता लातूरे यांनी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.
मुख्य अतिथी जिल्हा प्रांतपाल रोटेरियन सुधीर लातूरे यांनी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करून सर्व रोटरी क्लब्स व दात्यांनी रोटरी फाउंडेशनसाठी उदारतेने दान द्यावे असे आवाहन केले.
या प्रकल्पासाठी सी.बी. छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, रिसन्स इंडस्ट्रीज एमआयडीसी अहिल्यानगर, रमेश फिरोदिया चॅरिटेबल ट्रस्ट अहिल्यानगर, संगिता चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, आर. एन.धाडीवाल कल्याणी नगर पुणे या संस्थांचे व व्यक्तींचे मोलाचे योगदान लाभले.
हा उपक्रम क्लबच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा ठरला.
तसेच या कार्यक्रमात अवयव दान जनजागृती अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा समन्वयक सतीश अहिरे यांनी सर्वांना अवयव दान संबंधित शपथ दिली.
या सोहळ्यास जिल्हा प्रांतपाल रो. सुधीर लातुरे तसेच जिल्हा फर्स्ट लेडी सौ. संगीता लातुरे, सहायक प्रांतपाल रो. मधुरा झावरे, क्लबचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शिरीष रायते, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाॅमिनी रो. क्षितिज झावरे, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. प्रमोद पारीख, सहाय्यक प्रांतपाल रो.ईश्वर बोरा सर्व जिल्हा संचालक, विविध क्लबचे अध्यक्ष, सचिव, रो. डॉ. श्रीकृष्ण जोशी , रो.नरेंद्रभाई चोरडिया, रो.मनीष बोरा, रो.प्रसन्न खाजगीवाले, रो. अमर गुरप (सचिव), रो. सुजाता कटारिया, रो. श्रेया खाजगीवाले, रो. हरीश नय्यर, रो. हितेश गुप्ता, रो. निलेश शाह, रो. चेतन अमरापूरकर, रो.राजेश परदेशी,रो. सुनील मुथा,रो. संजय मुनोत,रो. वसंत मुनोत रो. विनोद भंडारी, रो.डॉ दिलीप बागल, रो.डॉ उज्वला शिरसाठ,क्लबचे अॅनस अॅनेट्स व इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच विविध शाळा आणि संस्थांचे अनेक पदाधिकारी व लाभार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्लबचे सचिव रोटेरियन अमर गुरप यांनी मानले.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचा हा उपक्रम "सेवा हेच सर्वोच्च" या ब्रीदाचा उत्तम प्रत्यय देणारा ठरला.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment