- मुंबई - प्रतिनिधी - वार्ता -
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज विधानसभेचे अध्यक्ष मा.श्री. राहुलजी नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत अधिवेशनातील कामकाजाचे स्वरूप, प्रस्तावित विषय आणि पुढील प्रक्रिया याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत दि. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूर अधिवेशन घेण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच, अधिवेशनातील सर्व महत्त्वाचे विषय सुरळीतरीत्या पार पडावेत, यासाठी आवश्यक नियोजनावरही यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीस मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार तसेच कामकाज सल्लागार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment