राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, May 21, 2023

एलसीबी ची कामगिरी लग्न समारंभात चोरी करणारी टोळी गजाआड दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता - लग्न समारंभातून  रोख रक्कम व मोबाईलची चोरी करणारी नगर शहरातील फिरकत अस्ताना आंतरराज्य टोळी गजाआड करण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) (LCB) पथकाला यश आले असून या टोळीकडून एक लाख 44 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आला आहे.प्रदीप कालुसिंग दपानी (वय 24 रा. कडीयासासी, ता. पचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश), अमित पन्नासिंग सासी (वय 19 रा. लक्ष्मीपुरा ता. गोगर, जि. बारहा, राजस्थान) अशी जेरबंद केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. यमुना रघुनाथ लांडगे (वय 75 रा. लांडगेमळा ता. नगर) या 12 मे रोजी मनमाड रोडवरील बंधन लॉन येथे लग्न समारंभात असताना दोन लाख 10 हजार रूपये किंमतीचा
ऐवज असलेली त्यांच्याकडील पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरली होती.या प्रकरणी लांडगे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) फिर्याद दिली होती. सदर चोरीची (Theft) घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (LCB PI Dinesh Aher) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डीले, संतोष खैरे, रोहित मिसाळ, रणजीत जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, फुरकान शेख, संभाजी कोतकर यांचे पथक समांतर तपास करीत होते.सदरच्या गुन्ह्यातील चोरटे हे मध्यप्रदेश पासींगच्या दुचाकीवरून पुणे (Pune) येथून नगर जिल्ह्याकडे येत आहेत, अशी माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली होती.
निरीक्षक आहेर यांनी पथकास पंचांना सोबत घेवुन खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे पथकाने सुपा टोल नाका ( Toll Plaza ) परिसरात सापळा लावुन थांबलेले असताना नगरचे दिशेने बातमीतील वर्णनाप्रमाणे दुचाकीवर आलेल्या दोघांना पकडले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता 80 हजार रूपये रोख रक्कम व दोन मोबाईल फोन मिळुन आल्याने रोख रकमेबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरची रक्कम ही नगर शहरातील बंधन लॉन्स येथील लग्न समारंभामध्ये चोरी केले असल्याबाबत सांगितले.

रक्कम बँक खात्यात पाठवली

चोरट्यांनी 80 हजार रूपये रोख रक्कम व दोन मोबाईल काढून दिले असले तरी चोरीला गेलेल्या उर्वरीत रकमेबाबत त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी एक लाख रूपये वसंत कुमार (पुर्ण नाव माहित नाही, रा. कडीयासासी, ता. पचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) व कालुसिंह (पुर्ण नाव माहित नाही, रा. लक्ष्मीपुरा, राजस्थान) यांच्या बँक खात्यामध्ये पाठविले असल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेले मोबाईल हे फेकुन दिल्याची कबूली त्यांनी दिली. त्यांच्या इतर साथीदाराबाबत विचारपुस करता त्यांनी साथीदार भुपेद्रसिंह अर्जुनसिंह भानेरीया (रा. कडीयासासी, मध्यप्रदेश) याच्या सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

Thursday, May 18, 2023

श्रीरामपूर मध्ये धार्मिक मिरवणुकीच्या कारणावरून टवाळ टवळ्यांचें जमावणे दगडफेक तणाव केल्याने पोलिसांनी जमाव पांगवला कुठलाच अनोकोचीत प्रकार घडला नाही पोलिसांचे सर्तकते ने ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधी - वार्ता -

श्रीरामपूर शहरात एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त सुरू असलेल्या एका धार्मिक मिरवणुकीत अचानक  शांततेचे दिशेने चालल्याले गटांत ले संख्येवर दगडफेक झाली. यात काहीजण जखमी झाले आहेत. अशी माहिती समजते श्रीरामपूर शहरात काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होत श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात एक धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक गोंधवणी परिसरातील कॉलनी जवळच आली असता घोषणाबाजी झाल्याने शांततेने चालल्याले गटांत पेच उत्तभव वादावादी करुन दगडफेक केली यात पळापळ होऊन काहीजण खाली पडले. यात अनेकजण जखमी झाले आहेत. या भागात वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. त्यांनी जमाव पांगविला.
मात्र या घटनेचे पडसाद दशमेश नगर व वॉर्ड नंबर दोनमध्ये झाले. दशमेश नगर भागात जमाव जमलाहोता.येथील स्थानिक सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने भीती भेद्रट पणे घाबरून लाग्होपाट काहीवेळातच बंद केली. कुठलेच गालबोट न लागता सर्व परस्तिती नियंत्रण राहिली.
पोलिसांनी त्या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त तैनात केला. वॉर्ड नंबर दोन मध्ये सुरू असलेल्या उरुसावर त्याचा परिणाम होणार नाही म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तात्काळ वाढविला. तसेज उरसात सर्व धर्माचे सर्वीकडे चे नागरिक निरनिराळ्या जाती जमातीचे अनेक वर्षा पासून भाई बंधू एकोप्याने उर्स जत्रेच काळात सुरवाती पासून  पुर्ण होऊस्तर दर्शन व आशीर्वाद घेण्या करितादर्गा दायरा परिसरात मोठया संख्येने नागरिकांची वर्दळ निदर्शनास येते अनेक ग्रामिण भागातून शहरातून येऊन उपस्तित राहून  काजी बाबा दर्गा पावन भूमी वर हाजरी लावून -मनो कामना (मन्नत )पुर्ण होण्याचे आप आपल्या -मार्जिन पदतीने दर्शन घेऊन आशिर्वाद घेतात (जियारात ) करतात दुवा मागतात व आनंद ही घेतात तसेज सर्व धर्मा करिता जागृत दैवत असून दर्गे ला येणारे प्रचंड प्रमाणात अनेक दिन दुबळे  सर्व समान्य व्यक्ती चे कितीही अवघड (गंभीर )समस्या सोफी होऊन बाबा कुठले ना कुठले रूपात येऊन सोडवितात पावन होत असून पीडिताना आशीर्वाद दुवा देतात असे चमत्कार सुद्धा जेष्ठ नागरिकां कडण घडल्याला अनुभव ऐकण्यास मिळते ही महत्वाची  बाब आहे व हिंदू मुस्लिम सिख इसाई एकोपायचे प्रतिक असून (प्राचीन ) -दिर्घ -काळापासून सर्व घटक सोबत राहून संयम शांततेने आनंद गुन गौरव गोविंदाणे कित्तेक वर्षाचे परमपरेणे उर्सचे कार्यक्रम संघनमताने यशवंशी पणे पारपाडतात
वाड नंबर दोन मध्येही असलेल्या मिरवणुकीत काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. शिवाजी रोड येथे एका दुकानाजवळ जमाव जमला होता तेथूनही जमावास पोलिसांनी काढून दिले.



-------------------------------------------------------------------=====================================================================
सा : राज प्रसारित...सह...संपादक...रंजित बतरा... शब्द... ✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
=====================================================================
------------------------------------------------------------------

प्रगतीसाठी यश प्राप्त होणे करिता पर्याय मार्ग शिक्षण च आहे सत्त्यजीत तांबे यांचे नाशिक मधे प्रति पादन ?


(नाशिक) - प्रतिनिधि - सौजन्ये दै. पुढारी - वार्ता -जुने नाशिक : कोणत्याही समाजाला प्रगती करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कुतूहल असणे गरजेचे असते. जगात होणारे नवनवीन आविष्कार व झपाट्याने होत असलेल्या विकासाशी संलग्न होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे मत नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.
मंगळवारी (दि. १६) वडाळा रोड येथे मुस्लीम बांधवांकडून त्यांच्या नागरी सत्कारावेळी ते बोलत होते. यावेळी विविध विषयांवर चर्चाहीझाली. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर गायकवाड, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, मुशीर सय्यद, माजी नगरसेविका समिना मेमन, आशा तडवी, फैज बँकेचे अध्यक्ष हाजी सलीम मिर्झा, उपाध्यक्ष शकील शेख, अल्पसंख्याक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हनीफ बशीर, दाऊद शेख, नदीम शेख, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक इम्तियाज शेख, जाकिर शेख, ऑल इंडिया मुस्लीम ओबीसीचे जिल्हाध्यक्ष हाजी तनवीरखान तांबोळी, प्रवक्ते फैयाज पठाण, भाजपचे रफिक शेख, मुजम्मिल मिर्झा, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष साजिद मुलतानी, समाजसेवक इमरान कोकणी, नइम मामू शेख, मुराद शेख, झिया सर, हन्नान मिर्झा, नासिर शेख, अॅड. साहिल कोकणी उपस्थित होते.









Wednesday, May 17, 2023

आस्तिक कुमार पांडेय जिल्हा अधिकारी औरंगाबाद शासकीय कागदपत्रावर शहराचे नावअद्याप बदलू नका - मनपा, पोलिस आयुक्त आणि बसस्थानक प्रशासनावर कारवाई होण्याची शक्यता ?

(औरंगाबाद) - प्रतिनिधी - वार्ता - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय केंद्रशासनाने दोन महिन्यापूर्वी घेतला असून त्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शहरातील काही सामाजिक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. उच्च न्यायालयाने दाखल याचिकांची तसेच जिल्ह्याच्या नामांतराला आलेल्या हरकतींची सुनावणी पूर्ण
(((आस्तिक कुमार पांडेय)))

होईपर्यंत शासकीय कागदपत्रावरील औरंगाबाद नाव बदलू नये असे आदेश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्र काढुन जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना शासकीय कागदपत्रावरील औरंगाबाद नाव बदलू नका असे आदेश दिले आहेत.औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने दोन महिन्यापूर्वी घेतला असून त्याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाला शहरातील काही सामाजिक संघटना व काही नागरिकांनी विरोध करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच अनेकांनी विभागीय आयुक्तांकडे लेखी अर्जाद्वारे
आपले आक्षेप दाखल केले आहेत. उच्च न्यायालयाने दाखल याचिकांची तसेच जिल्ह्याच्या नामांतराला आलेल्या हरकतींची सुनावणी पूर्ण होईपर्यंत शासकीय कागदपत्रावरील औरंगाबाद नाव बदलू नये असे रितसर आदेश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्र काढुन जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना शासकीय कागदपत्रावरील औरंगाबाद नाव बदलू नका असे आदेश दिले आहेत.
दरम्यान, केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करीत महानगर पालिका, पोलिस आयुक्तालय आणि मध्यवर्ती बसस्थानकावरील औरंगाबाद नाव हटवून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे नाव लावण्यात आले आहे. त्यामुळे मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रशासनाविषयी उच्च न्यायालय व जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


-----------------------------------------------------===========================================================================================
सा : राज प्रसारित...कार्यकारी...संपादक...   भगवंत  सिंग प्रितम सिंग बतरा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना... संकलन...वार्ता...
========================================================================-===================----------------------------------------------------


हजरत काजीबाबा दर्गाह उर्स शरीफ साल 57 खूबसूरत नुरांनी रोशनी अमन और रंगीली मैफिल दिलकश नजारो के साथ 16.17.18 2023 श्रीरामपूर के सरजमि पर मनाया जा रहा हैं ?


साल
57
(राजु मिर्जा) - खिदमदगार - हजरत - काजी बाबा रहेमत उल्लाहे रहे दर्गाह शरीफ श्रीरामपूर /-श्रीरामपूर की सरजमिपर हजरत काजीबाबा दर्गाह उर्स शऱीफ (((काबिल ऐ तारीफ हिंदू मुस्लिम सिख इसाई कौमी एकता के साथ सारे हिंदुस्थान मे माँशुहूर श्रीरामपूर की अजिबो शान और शौकत से मनाया जाता है )))
हर साल के मुताबिक इस साल भी हजरत काजीबाबा दर्गाह का उर्स शरीफ बरोज मंगल १६ मे २०२३ को संदल और बरोज बुध १७ मे और बरोज जुमेरात १८ मे को उसे मनाया जायेगा। जिसमे हिंदुस्थान के मशहूर कव्वालोंका कव्वाली का मुकाबला होगा। बरोज मंगल ९६ मे २०२३ संदल शरीफ मरहूम शेख पापाजलालभाई इनके मकानसे निकाला जायेगा! शानदार कव्वाली मुकाबला
आमदार लहुजी कानडे श्रीरामपूर विधानसभा (सदस्ये )
करण दादा ससाणे मा. उपनगराध्यक्ष. श्रीरामपूर
अफजल, साबरी जेसीबी (मुजप
रोज बुध १७ मे २०२३
दिलीप नागरे (नगरसेवक) अध्यक्ष उर्स कमेटी
अनिस जवाब (अहमदावाद ।। बरोज जुमेरा १८ मे २०२३
दानिश शेख अध्यक्ष-फतेह यंग पार्टी
(नगरसेवक)
हाजी मुजफ्फरभाई शेख संयोजक
* कार्याध्यक्ष : एजाज इनामदार, नबीभाई मोंडेवाले, गफ्फारसेठ पोपटीया, अमन शाह स्वागताध्यक्ष फिरोज मुन्शी कुरेशी, सलीमभाई (टर्नर), रमजान शाह, मुश्ताकभाई भंगारवाले, हाजी जावेदभाई बागवान
* उपाध्यक्ष : महंमदभाई फिटर हमिदभाई पटेल, अमजद पोपटीया, सागर घोरपडे सेक्रेटरी जावेद शेख (अलनुर), किशोर बारहाते, सरताज इनामदार, युसुफभाई सेंट्रिंगवाले, हनिफ मेमन
सह सेक्रेटरी शाहिद कुरेशी, रजनीकांत तुपे (बप्पा), राजु मिर्जा (पत्रकार )अजय कदम, इकबाल भाई चेअरमन, हनिफभाई पटेल, राजु पठाण (खोकर), खजिनदार महंमद वहाब, इरफानशेठ जीवाणी, रचना गोमुख
अजिमभाई (अशोकनगर अस्ती त्रिभुवन प्रसिध्दी प्रमुखः शफि महंमद बागवान,(पत्रकार )बरकतअलीभाई, (पत्रकार )महेमुदभाई कुरैशी शिडीया प्रमुख : अस्लम बिनसाद,(पत्रकार)अल्ताफ भाई, जयेश सावंत (पत्रकार )
अनमोल सहकार्य : संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, अशोक नाना काकीसेट शर्मा, संजय छल्लारे, सुनिलशेठ गुप्ता, आशिष बोरावके, कंत्रोड महाराज, हाजी लतीफभाई (करीष्मा), फिरोज मुलानी शेक शर्मा, युनुसभाई पटेल, समीर खान, प्रताप शिंदे, सलीम जहागीरदार, सुलेमान शेख, ने.के. बटाटेवाले
दारुवाला, अमित कोलते, रीयाजभाई पेंटर, मुख्तारभाई (MM), फरीद भाई आतर, डॉ. पडघन, अक्षय शिरसाठ, डॉ. कुलकर्णी, राजभाई सतीच जमशेदभाई पटेल, चंदू गायकवाड, साई (बेकरीवाले)
र्स कमेटी : निसार मन्सुरी, अस्लम (बबलुशेठ), हाजी मतीन, राजू शाह, शाह, रज्जुचिचा (वैजापूर), युसुफ कुरेशी (कली ग्रुप), सलीम दुलुभाई, जाकिर भाई जहागीरदार आतामीर सैय्यद, फिरोज कुरेशी, दिलीप बारहाते, सलीम बनेमिया, शेळके सर, सरफराज (भैया) - बेलापूर, अब्दुलभाई कोल्हार ले, गणेश साळुंके
नाई. अमित जगताप, दत्तु गोराणे, अक्रम कुरेशी, अल्ताफ शेख रफिक इनामदार, नईम पोंगेवाला, काके गुलाटी, अमजद ने फिरोज टेलर, रमिज शेख, अफसरभाई नमिल कुरेशी, बहुद्दीन पटेल, बाबामाई भजेवाले नबूभाई लिंबूवाले, मुखाभाई मिर्झा, खालीदलाई कुरेशी, अजीम दावती, तौसिया मतीन शेख
नश शेख, इरफान गणी शेख, राहुल मोरे, अमान घासवाला मुनाफभाई शेख, अनिल आंग्रे, इकबाल भाई (धडीवाले), आबेद शेख, दिनमोहंमद शेख, सुरेश भाई(सरकार), सलीम मन्सुरी, राजु कुरेशी, राजु गुप्ता, क्षमाभाई मुर्गीवाले, मुनीरभाई (कारेगाव), विशाल घोगरे, वसिम पिरजादे, असल रेशी, मनोज इंग
शेख, संदीप डवले, गोरख साळुंके, नाजीम पिरजादे, मुख्तार काझी, तनवीर रशिद पांडे, तौसिफ पटेल, गुड्डू शेठ, सलीमभाई काकर, अ.रहमानभाई काकर, जाकिरभाई वायरमन, मोईनदादा, नाझीम शेख, वसिम पेंटर, अनिसभाई, हारूनभाई टर्नर, युनुसभाई शेरखान पठाण, जुबेर इनार (अशोकनगर),
आई (अशोकनगर), जीशानभाई, रम्हु बाबनशेठ, जब्बारभाई हाकिम, फिरोजभाई शेख (सभापती), शकीलभाई पठाण (बेकरी), मुक्तारभाई (एजंट), नईमभाई (वळदगांव), शेख, सदाम पेंटर, हेमंत गुप्ता, रेहान शेख, समिर शेख (फिटर दुबई), शोहेब खान (वायरमेन), विनोद गुप्ता, मोसिन शेख भंगारवाला)
(वळदगांव), शाहरुख चिप्पी, जबी पटेल, जिया सय्यद, रफिकभाई पासवाले जहाँगिरभाई पठाण, राजुभाई दुबई, सलमान कुरेशी, लखन छतवाणी, मो. अली अमनभाई शेख, महस्व शेख, अहेमद शेख, साहिल शेख, नसीरभाई (अशोकनगर), अरबाज (अशोकनगर), सुलतानभाई (कारेगांव), परशुराम बलम टेलफ शेख, अर्शद फिरोज कुरेशी, नजीरभाई टेपवाले, मोहसीन बेल्डींग, रजा पिरजादे, अलीम वेल्डर, सरफराज वेल्डर, अजीमभाई घासवाले, महेब शेख, इम्रान शेख, रजा शेख, मोहम्मद साद, मोईन सलीम, शहेबाज खान (SK), सौद शेख, हुजेफा खात, जुबेर महेबुब शेख, मुफिज शेख, शोएब इनामदार, इखान पठा
कार-लाल हसेन पटेल, हाजी अलाउद्दीन संदभाई, हाजी राज मोहंमद रुस्तुमभाई, बाबामाई इनामदार, मुन्नाभाई पठाण, समद अकबर अली काझी
कायदे सलाहकार अॅड. बापू चव्हाण, अँड. गोराणे, अॅड. सादिक शिलेदार, अँड. तुधार चौदंते, अँड. सौरभ गदिया, अँड. आरीफ शेख नासिर शेख
निर्देशन, लब्बैक ग्रुप, के.जी.एन. ग्रुप, संजरी फ्रेंड ग्रुप, फतेह यंग पार्टी (अशोकनगर), नौलाना आझाद युथ फौंडेशन, एस. के ग्रुप, ब -मुकाम :फतेह चौक काजी बाबा उर्स मैदान, वॉर्ड नं.02,श्रीरामपूर...

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^{}{}{}{}{}{}{}{{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
लेखक : -...शायR...मिर्जा...🖊️✅️🇮🇳...+919730595775
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡¡




Tuesday, May 16, 2023

सव्वा दोन लाखाचा सुगंधी गुटखासह मुद्देमाल औजार सहित जप्त करुन एक जण अटकेत श्रीरामपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधी - वार्ता -
 राज्यात बंदी असताना सुगंधी गुटखा विक्रीस पोलिसांनी छापा (Police Raid) घालून 2 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करून एका आरोपीला केली अटक (Arrested) केली. शोएब शेख (वय 28, रा. संजयनगर, वार्ड नं. 2, तक्वा मशीद जवळ, श्रीरामपूर) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सुगंधी गुटखा (Aromatic Gutkha ), तो तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन तसेच मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. श्रीरामपूर शहर पोलीसांच्या (Shrirampur Police Team) पथकाने ही कारवाई केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवार दि. 15 मे 2023 रोजी सायंकाळी 6.30 वा. सुमारास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना  झिरो पोलीस मार्फत बातमी मिळाली की, संजयनगर, वार्ड नं. 2 मधील तक्वा मशीद जवळील एका बंद घरात शोएब शेख हा संगुधीत गुटखा खर्रा तयार करुन त्यांची चोरटी विक्री करीत आहे. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी तपास पथकास या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
तपास पथकाने लागलीच दोन पंचासह वरील ठिकाणी छापा टाकला असता, एक व्यक्ती लोखंडी मशिनच्याजवळ प्लॉस्टिक पिशव्यामध्ये काहीतरी भरत असताना दिसला. त्यास पकडुन पंचासमक्ष नाव विचारले असता त्याने शोएब अकबर शेख (वय 28, रा. संजयनगर, वार्ड नं. 2, तक्वा मशीद जवळ, श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. या ठिकाणी पंचासमक्ष पाहणी केली असता, त्याच्याजवळ 78 हजार रु. किंमतीचा प्लास्टीक पिशवीत पॅक केलेला संगधित गुटखा / खर्रा, (प्रत्येकी 5 किलो वजनाचे एकुण 26 प्लास्टीक पिशवीत), एका पिशवीची किंमत प्रत्येकी 3000 रूपये तसेच 1 लाख रुपये किमतीचे लोखंडाचे सुगंधीत गुटखा / खर्रा तयार करण्याचे मशीन व त्याचेवर एक इलेक्ट्रीक मोटर बसविलेली आणि खुटखा विक्री करीता वापरत असलेली 50 हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटार सायकल (क्र. एमएच 16, एएन 7087) असा एकुण 2 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.
पोलिसांनी शोएब शेख याच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. 458/2023 भादंवि कलम 328, 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक दादाभाई मगरे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, अमोल जाधव, भैरव अंडागळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, रमिझ अत्तार, गणेश गावडे, मच्छिद्र कातखडे, संभाजी खरात, शिवाजी बडे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक दादाभाई मगरे हे करीत आहेत. असे माहिती पत्रकात दिली.


-----------------------------------------------------========================================================================
सा :राज प्रसारित...कार्यकारी संपादक...भगवंत  सिंग प्रितम सिंग बतरा...✍️✅️🇮🇳...शब्द...
रचना...संकलन...वार्ता...
====================================-====================================------------------------------------------------------
























Sunday, May 14, 2023

बेदममारहाण श्रीरामपूर च्या युवकाला रांजहांणखोल येथील घडलेला प्रकार चार जणांवर गुन्हा दाखल ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधी - वार्ता -
मागील भांडणाच्या वादी वाद कारणावरून श्रीरामपूर 
येथील तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहाता तालुक्यातील रांजणखोल  येथील चार जणांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. प्रतीक उल्हास प्रधान (राहाणार - बोंबलेनगर, वार्ड नं.7 श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला
फिर्याद दिल आहे.फिर्यादीत म्हटले आहे की. मी सरफेस कोटीग कंपनीमध्ये कामासाठी गेलो असता मी कंपनीमध्ये असताना माझ्याकडे किसन ढोकचौळे आले व तु बाहेर चल, असे म्हणाले. मी त्याच्यासोबत बाहेर आलो व मला त्याचे मोटारसायकल घेवुन वाकडी फाटा 
येथे आणले व मागील भांडणाच्या कारणावरुन किसन ढोकचौळे, द्त्तु बाळासाहेब ढोकचौळे, शिवाजी शंकर ढौकचोळे व कैलास भाऊसाहेब ढोकचौळे (रांजणखोल, ता. राहाता, जि. अ.नगर) यांनी कैलास ढौकचोळे यांच्या हातातील लोखंडी चैन, पट्टीने पाठीवर मारले व किसन ढोकचौळे व दत्तु ढौकचोळे, शिवाजी ढौकचोळे यांनी लाथाबुक्यानी मारहाण केली. दत्तु ढोकचौळे याने त्याच्या हातातील फायटरने माझ्या उजवे हातावर, बरगडीवर व तोंडावर मारले तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यानंतर आपम दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालो.दवाखाना जबाबावरून शहर पोलीस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध गुन्हा रजि. नं. 450/2023 भा.दं.वि कलम 324,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक
रघुवीर कारखिले, साईनाथ राशिनकर हे करीत आहेत.दरम्यान, हे वाद दत्तनगर चौकातील वाकडी फाटा, टिळकनगर पोलीसचौकी समोरच घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या वादाच्या घटना घडत असतात. चोरीचे प्रमाणही वाढत
आहे. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व डीवायएसपी संदीप मिटके यांनी पोलिसांना योग्य सूचना देऊन या भागात विशेष लक्ष देण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.