राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, June 2, 2023

अ.भा. सफाई मजदूर काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांची अहमदनगरला सदिच्छा भेटलाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबतची प्रथा चालु रहावी यासाठी मुंबईत आक्रोश मोर्चा आणि धरणे आंदोलन ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अहमदनगर - प्रतिनिधि - समाचार -
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक आणि राहुल चरणसिंग टाक यांनी भिंगार - अहमदनगर येथे सदिच्छा भेट दिली,

याप्रसंगी बोलताना श्री.चरणसिंग टाक म्हणाले की,लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी देणे बाबतची प्रथा यापुढे चालू
राहण्याच्या मागणीसाठी दिनांक ७ जून पासून मुंबई येथील आजाद मैदानावर सफाई कामगारांचे भव्य राज्यव्यापी जन आक्रोश मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाअध्यक्ष अनिलभैय्या तेजी,उपाध्यक्ष रवीभैय्या मोरकरोसे,उपाध्यक्ष पै.लक्ष्मण सारसर तसेच कार्यध्यक्ष अनिल बाबूजी वाणे,सचिव प्रमोद भैय्या आठवाल, सहसचिव शुभमभाई टाक,सामाजिक कार्यकर्ता संतोष छजलाने तसेच शेवगाव चे सुरेशदादा चव्हाण, संगमनेर चे अध्यक्ष मनोजभाई जेधे व महिला अघाडीचे मुन्नाताई चावरे, अ.भा.मे.स.संघटना ने चे जिल्हा अध्यक्ष सनी भैय्या खरारे, अ.भा.स.म.कांग्रेस चे युवा प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष अजयभाई सौदे, ,धीरजभाई सारसर,रोहन भैय्या चावरे,धीरजभाऊ पटोना, अविनाश सारसर तसेच नगर व भिंगार चे सामाजिक व पंचायत चे पदाधिकारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
समाज एकतेने दिनांक ७ जुन रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरु होत असलेल्या सफाई कामगारांचे भव्य राज्यव्यापी जन आक्रोश मोर्चा व धरणे आंदोलन या न्याय हक्काच्या आंदोलनासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे अहवानही त्यांनी यावेळी केले.

[[[ समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर ]]]

भारतीय लहुजी सेनेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरीश्रीरामपूर शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दोन महिन्यांत पुतळा बसवावा- अन्यथा भारतीय लहुजी सेना उग्र आंदोलन छेडणार : हानिफभाई पठाण ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधी - विषेश - वार्ता -
येथील मेनरोड वर भारतीय लहुजी सेनेच्या वतीने लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वा जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता, सदर उत्सवानिमित्त आलेल्या भाविकांना प्रसाद स्वरूप वडापाव या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे प्रतिमा पूजन श्रीरामपूर तलाठी कार्यालयाचे विद्यमान तलाठी तथा तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र घोरपडे भाऊसाहेब यांचे हस्ते करण्यात आले.तर महाप्रसादाचे वाटप संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण,ॲड. रमेश कोळेकर यांचे हस्ते
करण्यात आले.
प्रतिमा चे पूजन करण्याकरिता लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, सचिनभाऊ गुजर, करणदादा ससाणे, चंद्रकांत क्षीरसागर आदी प्रमुख पाहुणे यांनी जयंती उत्सवात सहभाग नोंदवला.
यावेळी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय महासचिव हानिफभाई पठाण म्हणाले की,श्रीरामपूर शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दोन महिन्यांत पुतळा बसवावा, अन्यथा भारतीय लहुजी सेना उग्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रसंगी अतिथी म्हणून बाळासाहेब मोरे, संदिप शेठ शेडगे,राज शेडगे,विशाल मोजे, दीपक कुऱ्हाडे,सलमान पठाण, सतीश लोखंडे,रमिज पोपटीया, अब्दुल भाई शेख, रज्जाकभाई शेख, फैजान पठाण, यश कोळेकर शुभम बागुल, हारूनभाई तांबोळी, राजेन्द्र त्रिभुवन,सागर चापानेरकर,रईस शेख,डॉक्टर जमदाडे,साबीर शाह, सचिन घुगे, नागेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))
----------------------------------------------------=================================== : - प्रभावशैली सविस्तर (Web) पाहण्यासाठी झूम🔍🔎 करा...
===================================
---------------------------------------------------





Thursday, June 1, 2023

दीनदुबळ्यांची सेवा करतो तोच परमेश्वर बनतो =पत्रकार प्रकाश कुलथे ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
आईवडील होणे हॆ आज सोपे नाही, ज्या मुलामुलींना आपण वंशाचे दिवे मानतो, तेच अंधार निर्माण करतात,जीवन हॆ समस्यांनी भरलेले आहे. आज भौतिक समृद्धी आली पण संस्कृती हरवत चालली आहे, अशा काळात निराधार, दीनदुबळ्यांची सेवा करतो तोच परमेश्वर बनतो, असे भावपूर्ण उदगार महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी काढले.
 येथील माऊली वृद्धाश्रमात कविसंमेलन, पुस्तक परिसंवाद, मुले आणि आईबाप, सन्मानसोहळा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश कुलथे बोलत होते, माजी प्राचार्य टी. ई. शेळके हे अध्यक्षस्थानी होते. माऊली वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष वाघुंडे यांनी स्वागत करून मान्यवरांचा सत्कार केले.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी विविध कार्यक्रमाचे नियोजन सांगून प्रास्ताविक केले.माजी प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील, पत्रकार प्रकाश कुलथे, कवी आनंदा साळवे यांच्या सेवाभावी जीवनकार्याबद्दल त्यांचा शाल, फेटे, बुके, पुस्तके,भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले. माऊली वृद्धाश्रम, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान आदिंनी सन्मानसोहळा आयोजित केला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश कुलथे बोलताना पुढे म्हणाले,माऊली वृद्धाश्रम हे भारतीय संस्कृती आणि सेवाभावाचे ऊर्जाकेंद्र आहे. वाढदिवस हे औक्षण करणे, पुस्तके देऊन वाचन संस्कृती वाढवणे, परिसंवाद घेणे, दिवे विझविण्यापेक्षा दीपप्रज्ज्वलन करणे, फेटा, उपरणे, टोपी प्रदान करणे अशा संस्कृतीला बळ आणि प्रतिष्ठा देण्याचे संस्कार येथे मिळतात.मला व कवी आनंदा साळवे यांना सत्तावन्न वर्षात बरेच अनुभव आले, प्राचार्य भाऊसाहेब भवार यांनी साठ वर्षात शैक्षणिक सेवा करून आता ते कारेगावसारख्या खेड्यात नवनिर्मिती करीत आहेत.याविषयीं आमचा सन्मान केला हे आम्हाला प्रेरणादायी असल्याचे कुलथे यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी असलेले माजी प्राचार्य टी. ई. शेळके म्हणाले, आईवडिलांनी मुलामुलींना समजून घेतले पाहिजे, या नव्या पिढीची काही स्वप्ने आणि जीवनधारणा असतात,त्यांनाच दोष देऊन आपण राग व्यक्त न करता सुखसंवाद साधावा. विवाहाच्या बाबतीत त्यांना स्वातंत्र्य असावे. खरे तर आता लग्नात अंतरपाटाची गरज नाही, कारण वधू -वर एकमेकांना जाणून असतात,चेहरे पाहिलेले असतात, आज त्यांच्या स्वतंत्रतेला महत्व दिले तर कुटुंबसंघर्ष कमी होतील.घरातील जाणकाराने इतरांचा विचार करून संवाद साधून सर्वसमावेशक धोरण स्वीकारावे असे सांगून वृद्धाश्रमातील कार्याचे कौतुक केले. प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ.अनिताताई भवार, अश्विनी सुखदेव सुकळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, राजेंद्र देसाई, कु. मृणाली देसाई, दत्तात्रय खिलारी, प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील आदिंनी मनोगत व्यक्त करून कविता सादर केल्या. प्रा. रायभान दवंगे लिखित 'दप्तर 'या कथासंग्रहावर परिसंवाद झाला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुस्तकाचे सर्वांना वितरण करून दप्तर चे महत्व सांगितले.सुभाष वाघुंडे,राजेंद्र देसाई, कु. मृणाली देसाई,शुभम नामेकर आदिंनी नियोजन केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर राजेंद्र देसाई यांनी आभार मानले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

अॅड. विजयराव बनकर पाटील:माणुसकीची हिरवळ"दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर आमचीजुळती" ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूरच्या ७५ वर्षाच्या इतिहासात अनेक कर्तृत्वशील व्यक्तिमत्वे झाली, यामध्ये ॲड,. विजयराव साहेबराव बनकर पाटील यांचे चरित्रस्मरण ध्यानीमनी आहे. माणुसकीतील एक माणूसपण जपणारे हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांना सर्वजण ओळखतात. त्यांच्या आठवणी आणि कर्तुत्वाच्या संदर्भाने खूप लिहिण्यासारखे आहे.
 स्व. ॲड. विजयराव बनकर पाटील यांचा जन्म ५ जानेवारी १९४९ रोजी झाला.तर त्यांचा स्वर्गवास २३ मे २०२३ रोजी पुण्यात झाला.७६ वर्षाच्या त्यांच्या जीवनचरित्राचे अनेक प्रेरणादायी प्रसंग आणि आदर्श समाजपोषक आहेत.
   स्व.ॲड. विजयराव बनकर पाटील यांचे आजोबा नारायणराव माधवराव बनकर पाटील कर्तृत्वशील शेतकरी व्यक्तिमत्व होते.त्यांचे वडील साहेबराव नारायणराव बनकर पाटील यांचे आदर्श संस्कार त्यांना लाभले. पढेगावच्या बनकर पाटील परिवाराचे पंचक्रोशीत मोठेपण प्रसिद्धच आहे. ॲड. विजयराव बनकर पाटील हे श्रीरामपुरातील एक निष्णात वकील होते. त्यांना आदर्श असा कौटुंबिक परिवार लाभलेला आहे. ज्यांच्या मागे कुटुंब आणि नातेवाईक भक्कमपणे उभे राहतात, त्यांना समाजात आपला नावलौकिक वाढवण्यात अधिक गती मिळते. यांच्या पत्नी मृणालीनीताई विजयराव बनकर यांचे संसारी व्यक्तिमत्व त्यांना सदैव पूरक, सहकार्यशील ठरले.बांधकाम व्यवसायात त्यांची मुले कुणाल विजयराव बनकर पाटील आणि रवीराज बनकर पाटील यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. तसेच आपल्या वडिलांची वकिलीची परंपरा चालवणारे ॲड. ऋतुराज विजयराव बनकर पाटील यांचा न्यायालयीन कामकाजात मोठा प्रभाव आहे. कु. वैष्णवी व राजवीर कुणाल बनकर पाटील ही नातवंडेही तशीच बुद्धिमान व घरंदाज आहेत.
   स्व. ॲड. विजयराव बनकर पाटील यांचे सासरे माजी आमदार ॲड. विजयसिंह शिवराम चालुक्य हे उस्मानाबाद जिल्ह्यातील, उमरगा तालुक्यातील मुळज येथील आहेत.त्यांची २२ वर्ष आमदारकी लोकप्रिय ठरली. मेहुणी माजी खासदार रूपाताई निलंगेकर यांचे मोठेपण सर्वश्रुत आहे. तर मोठे सासरे भास्करराव शिवराम चालुक्य हे तीन टर्म आमदार होते. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे या त्यांच्या लहान मेहुणी आहेत.लातूर निलंगा भागाची एक राजकीय वजन असलेल्या कुटुंबातील जावई असलेले स्व.ॲड. विजयराव बनकर पाटील यांनी कधी अहंकार केला नाही.सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आणि सर्वसमावेशक असे ते व्यक्तिमत्व होते.
   ॲड. विजयराव बनकर पाटील यांनी अनेक कामे केली.त्या सर्व पदांना त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.१९९२ ते १९९७ या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपला ठसा निर्माण केला. ते स्थायी समितीचे सदस्य होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे झाली. पढेगाव ते कान्हेगाव रस्ता रुंदीकरण, मोटारसंच ,पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन केली. सरकारी दवाखान्यासाठी दुरुस्ती निधी मिळविला. प्राथमिक शाळेसाठी तार कंपाउंड केले. टी.व्ही.संच बसविला पढेगावच्या अनेक विकास कामात त्यांनी छाप निर्माण केली. रयत शिक्षण संस्थेचे ते जनरल बॉडी सदस्य होते. पढेगाव येथील यशवंत विद्यालयास त्यांनी खूप सहकार्य केले. टी. व्ही. संच बसविला. भर उन्हाळ्यात लोकांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्याशी भेटून उन्हाळी रोटेशनची व्यवस्था केली.लाख कालवा दुरुस्ती, सरकारी जनावरांचा दवाखाना त्यास मंजुरी घेणे, इमारत बांधकाम पूर्ण करणे, त्यात त्यांनी भरीव योगदान दिले. कोर्टाची इमारत , दुसरा मजला बांधकाम पूर्ण करून घेतले.पढेगाव रेल्वे स्टेशन तिकीट आरक्षण सुरू केले. त्यासाठी खा.शंकरराव काळे साहेब यांचे सहकार्य त्यांना लाभले.
ॲड.विजयराव बनकर पाटील यांनी वकिली व्यवसायात त्यांनी एक छाप निर्माण केली. बार असोसिएनचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका कार्यशील राहिली. स्व. सुमनभाई शाह यांच्या जागृती व्यासपीठासाठी त्यांनी योगदान दिले. महामानव डॉ. बाबा आमटे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. श्रीरामपुरात आनंदवन मित्र मंडळाचे ते अध्यक्ष होते. या कार्यात त्यांचा सेवाभाव फार प्रभावी ठरला. ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या शैक्षणिक ,सामाजिक कार्यास त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानच्या स्थापनेत व कार्यात ते सक्रिय सहभागी होते. ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या यांच्याशी सदैव हसत खेळत त्यांनी वातावरण आल्हादीत ठेवण्याचे तत्परता दाखविली, ती सर्वांच्या आठवणीत आहे. ते शिंदे साहेब यांचे आवडते व्यक्तिमत्व होते. श्रीरामपूर येथील विचार जागर मंच,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, रयत शैक्षणिक संकुल अशा विविध संस्था यांच्याशी ते निगडित होते.
स्व. ॲड.विजयराव बनकर पाटील हे अनेक क्षेत्रीय विकास कार्याचे आदर्श होते. विविध क्षेत्रात त्यांनी माणुसकीचे हिरवे वलय निर्माण केले. राजकीय,शैक्षणिक, सामाजिक कार्यातील एक अभ्यासू, शांत, सयंमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची छाप मोठी आहे.

*"मातीवरचे पाय आमचे आकाश हाती पेलायचे*
*'न' करतल्या धुळीमध्ये 'शिल्प 'आम्हाला कोरायचे"*

ॲड. विजयराव बनकर पाटील म्हणजे जीवनमूल्ये आणि विज्ञान यांचा सन्मान करणारे व्यक्तिमत्व होते.सर्वांना हसतखेळत ठेवणारे दिलदार आपलेपणा म्हणून एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांचे 'विजय'हे ठेवलेले नाव सार्थक केले. जीवनातल्या संकटप्रसंगी ते डगमगले नाहीत, दुःखातही हसणारा चेहरा त्यांनी जपला. अनेक क्षेत्रीय नेतृत्वात त्यांनी विजयाचा उत्सव साजरा केला. मोठ्यांचा आशीर्वाद आणि स्नेहीजणांचा सहवास त्यांना हवाहवासा वाटत असे. राजकारण, सहकार क्षेत्रात त्यांनीभाग घेतला, अनेकांना त्यांनी मार्गदर्शनही केले.पण तितकेच निरपेक्ष राहिले. प्रकृतीच्या कारणामुळे ते खचले नाहीत,पण आयुष्य हॆ अळवारचे पाणी आहे, ते निसटून जातेच पण जाता जाता हिरवेपणा देऊन जातात, तसेच ॲड.विजयराव बनकर पाटील आपल्यातून गेले तरी माणुसकीची त्यांनी पेरून ठेवलेली विचार आणि कर्तृत्वाची हिरवळ ताजीतवानी आहे. ॲड,विजयराव बनकर पाटलांची जीवनगंगा साठवणीने प्रवाहित आहे.त्यांना मी शब्दनमन करीत आहे.

=डॉ. बाबुराव उपाध्ये,श्रीरामपूर दुरभाष: 9270087640

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

कुस्तीपटूंना न्याय द्या : राज ठाकरे आपण सहद्यय आहात पंतप्रधानांना पत्रातून साकडे ?

मुंबई - प्रतिनिधि - वार्ता - लैंगिक छळवणूक प्रकरणी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी महिला कुस्तीपटू या दिल्लीत आंदोलन करत आहेत. या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून केली आहे. आपण सहदय आहात, याची इतिहासात अनेक उदाहरणे : आहेत. ही सहदयता आपण महिला कुस्तीपटूंबाबत दाखवावी व त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केले आहे.

देशातील ऑलिम्पिक
पदक विजेत्या महिला कुस्तीपटू या दिल्लीत महिनाभरापासून आंदोलनाला बसल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात त्यांची लैंगिक छळवणुकीची तक्रार आहे. आता या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा देत थेट मोदी यांनाच पत्र लिहिले आहे.
आपण प्रधान सेवक आहात, या नात्याने या विषयाकडे लक्ष द्यावे, असेलिहून राज ठाकरे पुढे म्हणतात,
आपल्याला न्याय मिळावा आणि या लढाईतकोणाच्याही
बाहुबलीचे दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीचखात्रीत्यांना सरकारकडून, म्हणजेच आपल्याकडून हवी आहे. याआधआपण गुजरातचे मुख्यमंत्री
असताना, उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली असताना किवामुंबईवर
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर धाव घेतली होती. हीतुमचीसहृदयता होती. हीच सहृदयता
तुमच्या कार्यालयापासून अवघ्या
काही किलोमीटर अंतरावर बसलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी, अशी इच्छा जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच मनसेची देखील आहे. जर त्यांना न्याय मिळाला नाही तर कुठल्या खेळाडूला रक्ताचे पाणी करून देशासाठी पदक मिळवावे असे वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असे चित्र उभे राहिले तर 'खेलो इंडिया' हे स्वप्नच राहील. त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना आश्वस्त केले जाईल इतके तर आपण नक्कीच कराल, याची मला खात्री आहे, असेही राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.


----------------------------------------------------
===================================:- सह संपादक...रंजित बतरा...शब्द रचना संकलन वार्ता...✍️✅️🇮🇳...
===================================-----------------------------------------------------


निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनिळवंडेच्या कामाला गती देण्यात येईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनिळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ?

राजेंद्र बनकर
शिर्डी (उमाका वृत्तसेवा): निळवंडे धरणलालाभक्षेत्रातील  शेतकऱ्यांसाठी आजचा दिवसआनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरणकालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरतापडू देणार नाही. हे
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  यांनी  व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळीदिली. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची  प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते  जलपूजन करून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली .यावेळी महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसायविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  राधाकृष्ण ‍विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपककपूर,नाशिक
विभागीय आयुक्त राधाकृष्ण  गमे, जिल्हाधिकारीसिध्दाराम सालीमठ, जलसंपदाविभागाचे  कार्यकारी अभियंता विजय भोगले, अधीक्षक अभियंताअरूण नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्षशिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री मधुकरराव पिचड, अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी आमदारस्नेहलता कोल्हे, वैभव पिचड आदी मान्यवरउपस्थित होते.
  या शासनाने पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेतला असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,शासनानेअकरामहिन्याच्या कालावधीत २९ प्रकल्पांना तात्काळसुधारितप्रशासकीय मान्यता दिली आहे .यामुळे राज्यातील ६ लाख८ हजार हेक्टर जमीनसिंचनाखाली आली आहे. शेतकरी,कष्टकरी व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून शासन काम करत आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याने शेतकऱ्यांना नमोमहासन्मान योजना सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे ६ हजारांची मदत दिली जाणार आहे. ‌एक रूपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आला आहे.नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना निकषाच्या दुप्पटी नमदत देण्यात आली, ‌राज्याने २५  लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय  शेतीचे उद्दिष्ट ठेवले असून  जलयुक्त शिवार योजनाटप्पा  २ सुरू करण्यात आला आहे. निळवंडेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना ५३ वर्ष वाट पाहावी लागली. आताही प्रतिक्षा फक्त या शासना ने घेतलेल्या कल्याणकारी निर्णयामुळे संपली आहे. असे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
निळवंडे' कालव्यांच्या कामांना गती देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा आहे. सुरूवातीला ८ कोटींचा रुपयांचा असलेला हा  प्रकल्प आज ५ हजार १७७  कोटी रुपयांचा  झाला आहे. २०१७मध्ये या प्रकल्पास अडीच हजार कोटी रुपयांचीसुधारित  प्रशासकीय मान्यता दिली आणि या प्रकल्पास गती मिळाली. धरणाच्या सुरूवातीच्या २२किलोमीटरला स्थानिक शेतकरी व आदिवासींनाविश्वासात घेऊन गती देण्यात आली‌.
 यावर्षीच्या बजेट मध्ये  गोसीखुर्द नंतर सर्वाधिक निधी  निळवंडे धरणासाठी देण्यात आला आहे .त्यामुळे याधरण  कालव्यांचे काम कोठेही थांबणार  नाही. धरणाच्या उजव्या  कालव्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
जलयुक्त  शिवार योजनेच्या  माध्यमातून २०१४ ते २०१९ या काळात नगर जिल्ह्यातील २ लाख,९८ हजार हेक्टर  शेती  संरक्षित सिंचनाखाली आली असल्याची माहिती ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली‌. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले की, अकोले व परिसरातील शेतकरी,आदिवासी  बांधवांच्या प्रदीर्घ लढा व संघर्षामुळे आज निळंवडे धरण कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे‌. मधुकरराव पिचड यांनी  आधी शेतकऱ्यांचे पुनर्वसन  मग  धरण अशी त्या काळात भूमिका मांडल्यामुळे विस्थापितांना न्याय मिळाला आहे‌. आता यापूर्वीचे सर्व वाद निळवंडे कालव्याच्या पाण्यात विसर्जित करून आपण आजच आनंद साजरा करूया.पुढील दोन महिन्यात उजव्याकालव्यातूनपाणीसोडण्यात येईल.
यावेळी खासदार सदाशिवराव  लोखंडे, माजी आमदार वैभव पिचड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी, गावकरी  मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कालव्यात पाणी सोडल्यामुळे यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहवयास मिळाला.















साठवण तलावास जमीन - मंत्री मंडळाची मान्यता : बेलापूरात आनंदोत्सव साजरा ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
तालुक्यातील बेलापूर-ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गतच्या १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्यास महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नाने व जि.प.सदस्य शरद नवले यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्य मंञी मंडळाने मंजुरी दिल्याची माहिती सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली आहे.
याबाबत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, बेलापूर-ऐनतपूरची १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.या योजनेसाठीच्या साठवण तलावासाठी जागा नव्हती. त्यामुळे सध्याच्या साठवण तलावांच्या लगतचीच शेती महामंडळाची जमिन मिळावी असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.तसेच यासाठी महसूल मंञी नामा.राधाकृष्ण विखे पा. यांचे माध्यमातून जि.प. सदस्य शरद नवले,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपअभियंता भिमगिरी कांबळे, शाखा अभियंता सुनिल हरदास यांनी सकारात्मक
पाठपुरवठा केला होता.अखेरीस त्यांच्या प्रयत्नास यश येवून राज्य मंञी मंडळाने साठवण तलावासाठी शेती महामंडळाची सुमारे चार कोटी रुपये किमतीची साडे आठ एकर जमिन अंदाजे ३० लाख किमतीत देण्यास मंजुरी दिली. सदर साठवण तलावाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने गावक-यांना १०० दिवस पुरेल एवढ्या क्षमतेच्या सिमेंट काँक्रेटच्या साठवण तलावाची स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी जागा मिळण्यासाठी पाठपुरावा केला म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला तसेच ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनाला धन्यवाद दिले.
सदरचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंञी नाम.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी नाम.देवेन्द्र फडणवीस,महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा मंञी नामदार गुलाबराव पाटील,खासदार सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहु कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदिंसह महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचे उपअभियंता भिमगिरी कांबळे,शाखा अभियंता सुनील हरदास तसेच शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना
धन्यवाद देण्यात आले आहे. यावेळी जालिंदर कुऱ्हे,रणजीत श्रीगोड, मारुतीराव राशिनकर, देविदास देसाई, भाऊसाहेब कुताळ,ग्रा.प.सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले, प्रभात कुऱ्हे, शफिक बागवान, सचिन अमोलिक, अरविंद साळवी,भरत साळुंके, रविंद्र खटोड, प्रफुल्ल डावरे, लहानू नागले,बाळासाहेब दाणी,रावसाहेब अमोलिक, पुरुषोत्तम भराटे, भाऊसाहेब तेलोरे,प्रल्हाद अमोलिक,भैय्या शेख,शफिक आतार, जनार्दन ओहोळ, सचिन वाघ, विशाल आंबेकर, अमोल गाढे, किशोर महापुरे, गणेश मगर,मास्टर हुडे, प्रशांत मुंडलिक,गोपी दाणी, प्रशांत लढ्ढा, सद्दाम शेख, जिना शेख, दादासाहेब कुताळ,सागर ढवळे, बाबुराव पवार,शरद अंबादास नवले, दिलीप अमोलिक, किरण गागरे, विजय अमोलिक,लक्ष्मण रशिनकर, अन्सार पटेल,राजेंद्र फुंदे,बबन मेहेत्रे,प्रविण बाठीया, बाळासाहेब शेलार, पत्रकार सुहास शेलार आदी उपस्थित होते.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))