💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूरच्या ७५ वर्षाच्या इतिहासात अनेक कर्तृत्वशील व्यक्तिमत्वे झाली, यामध्ये ॲड,. विजयराव साहेबराव बनकर पाटील यांचे चरित्रस्मरण ध्यानीमनी आहे. माणुसकीतील एक माणूसपण जपणारे हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांना सर्वजण ओळखतात. त्यांच्या आठवणी आणि कर्तुत्वाच्या संदर्भाने खूप लिहिण्यासारखे आहे.
स्व. ॲड. विजयराव बनकर पाटील यांचा जन्म ५ जानेवारी १९४९ रोजी झाला.तर त्यांचा स्वर्गवास २३ मे २०२३ रोजी पुण्यात झाला.७६ वर्षाच्या त्यांच्या जीवनचरित्राचे अनेक प्रेरणादायी प्रसंग आणि आदर्श समाजपोषक आहेत.
स्व.ॲड. विजयराव बनकर पाटील यांचे आजोबा नारायणराव माधवराव बनकर पाटील कर्तृत्वशील शेतकरी व्यक्तिमत्व होते.त्यांचे वडील साहेबराव नारायणराव बनकर पाटील यांचे आदर्श संस्कार त्यांना लाभले. पढेगावच्या बनकर पाटील परिवाराचे पंचक्रोशीत मोठेपण प्रसिद्धच आहे. ॲड. विजयराव बनकर पाटील हे श्रीरामपुरातील एक निष्णात वकील होते. त्यांना आदर्श असा कौटुंबिक परिवार लाभलेला आहे. ज्यांच्या मागे कुटुंब आणि नातेवाईक भक्कमपणे उभे राहतात, त्यांना समाजात आपला नावलौकिक वाढवण्यात अधिक गती मिळते. यांच्या पत्नी मृणालीनीताई विजयराव बनकर यांचे संसारी व्यक्तिमत्व त्यांना सदैव पूरक, सहकार्यशील ठरले.बांधकाम व्यवसायात त्यांची मुले कुणाल विजयराव बनकर पाटील आणि रवीराज बनकर पाटील यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. तसेच आपल्या वडिलांची वकिलीची परंपरा चालवणारे ॲड. ऋतुराज विजयराव बनकर पाटील यांचा न्यायालयीन कामकाजात मोठा प्रभाव आहे. कु. वैष्णवी व राजवीर कुणाल बनकर पाटील ही नातवंडेही तशीच बुद्धिमान व घरंदाज आहेत.
स्व. ॲड. विजयराव बनकर पाटील यांचे सासरे माजी आमदार ॲड. विजयसिंह शिवराम चालुक्य हे उस्मानाबाद जिल्ह्यातील, उमरगा तालुक्यातील मुळज येथील आहेत.त्यांची २२ वर्ष आमदारकी लोकप्रिय ठरली. मेहुणी माजी खासदार रूपाताई निलंगेकर यांचे मोठेपण सर्वश्रुत आहे. तर मोठे सासरे भास्करराव शिवराम चालुक्य हे तीन टर्म आमदार होते. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे या त्यांच्या लहान मेहुणी आहेत.लातूर निलंगा भागाची एक राजकीय वजन असलेल्या कुटुंबातील जावई असलेले स्व.ॲड. विजयराव बनकर पाटील यांनी कधी अहंकार केला नाही.सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आणि सर्वसमावेशक असे ते व्यक्तिमत्व होते.
ॲड. विजयराव बनकर पाटील यांनी अनेक कामे केली.त्या सर्व पदांना त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.१९९२ ते १९९७ या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपला ठसा निर्माण केला. ते स्थायी समितीचे सदस्य होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे झाली. पढेगाव ते कान्हेगाव रस्ता रुंदीकरण, मोटारसंच ,पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन केली. सरकारी दवाखान्यासाठी दुरुस्ती निधी मिळविला. प्राथमिक शाळेसाठी तार कंपाउंड केले. टी.व्ही.संच बसविला पढेगावच्या अनेक विकास कामात त्यांनी छाप निर्माण केली. रयत शिक्षण संस्थेचे ते जनरल बॉडी सदस्य होते. पढेगाव येथील यशवंत विद्यालयास त्यांनी खूप सहकार्य केले. टी. व्ही. संच बसविला. भर उन्हाळ्यात लोकांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्याशी भेटून उन्हाळी रोटेशनची व्यवस्था केली.लाख कालवा दुरुस्ती, सरकारी जनावरांचा दवाखाना त्यास मंजुरी घेणे, इमारत बांधकाम पूर्ण करणे, त्यात त्यांनी भरीव योगदान दिले. कोर्टाची इमारत , दुसरा मजला बांधकाम पूर्ण करून घेतले.पढेगाव रेल्वे स्टेशन तिकीट आरक्षण सुरू केले. त्यासाठी खा.शंकरराव काळे साहेब यांचे सहकार्य त्यांना लाभले.
ॲड.विजयराव बनकर पाटील यांनी वकिली व्यवसायात त्यांनी एक छाप निर्माण केली. बार असोसिएनचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका कार्यशील राहिली. स्व. सुमनभाई शाह यांच्या जागृती व्यासपीठासाठी त्यांनी योगदान दिले. महामानव डॉ. बाबा आमटे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. श्रीरामपुरात आनंदवन मित्र मंडळाचे ते अध्यक्ष होते. या कार्यात त्यांचा सेवाभाव फार प्रभावी ठरला. ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या शैक्षणिक ,सामाजिक कार्यास त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानच्या स्थापनेत व कार्यात ते सक्रिय सहभागी होते. ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या यांच्याशी सदैव हसत खेळत त्यांनी वातावरण आल्हादीत ठेवण्याचे तत्परता दाखविली, ती सर्वांच्या आठवणीत आहे. ते शिंदे साहेब यांचे आवडते व्यक्तिमत्व होते. श्रीरामपूर येथील विचार जागर मंच,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, रयत शैक्षणिक संकुल अशा विविध संस्था यांच्याशी ते निगडित होते.
स्व. ॲड.विजयराव बनकर पाटील हे अनेक क्षेत्रीय विकास कार्याचे आदर्श होते. विविध क्षेत्रात त्यांनी माणुसकीचे हिरवे वलय निर्माण केले. राजकीय,शैक्षणिक, सामाजिक कार्यातील एक अभ्यासू, शांत, सयंमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची छाप मोठी आहे.
*"मातीवरचे पाय आमचे आकाश हाती पेलायचे*
*'न' करतल्या धुळीमध्ये 'शिल्प 'आम्हाला कोरायचे"*
ॲड. विजयराव बनकर पाटील म्हणजे जीवनमूल्ये आणि विज्ञान यांचा सन्मान करणारे व्यक्तिमत्व होते.सर्वांना हसतखेळत ठेवणारे दिलदार आपलेपणा म्हणून एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांचे 'विजय'हे ठेवलेले नाव सार्थक केले. जीवनातल्या संकटप्रसंगी ते डगमगले नाहीत, दुःखातही हसणारा चेहरा त्यांनी जपला. अनेक क्षेत्रीय नेतृत्वात त्यांनी विजयाचा उत्सव साजरा केला. मोठ्यांचा आशीर्वाद आणि स्नेहीजणांचा सहवास त्यांना हवाहवासा वाटत असे. राजकारण, सहकार क्षेत्रात त्यांनीभाग घेतला, अनेकांना त्यांनी मार्गदर्शनही केले.पण तितकेच निरपेक्ष राहिले. प्रकृतीच्या कारणामुळे ते खचले नाहीत,पण आयुष्य हॆ अळवारचे पाणी आहे, ते निसटून जातेच पण जाता जाता हिरवेपणा देऊन जातात, तसेच ॲड.विजयराव बनकर पाटील आपल्यातून गेले तरी माणुसकीची त्यांनी पेरून ठेवलेली विचार आणि कर्तृत्वाची हिरवळ ताजीतवानी आहे. ॲड,विजयराव बनकर पाटलांची जीवनगंगा साठवणीने प्रवाहित आहे.त्यांना मी शब्दनमन करीत आहे.
=डॉ. बाबुराव उपाध्ये,श्रीरामपूर दुरभाष: 9270087640
(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))
No comments:
Post a Comment